भेळं, चाट इ. फॅन क्लब

Submitted by लाजो on 9 February, 2011 - 23:13

हा धागा खास लोकाग्रहास्तव Happy

भेळ - पुणेरी, ठाण्याची, चौपाटीची भैय्याच्या हातची.....कुठलीही Happy अगदी दहीभेळसुद्धा Wink

रपॅ - गरम गरम पॅ आणि गरम गरम र त्यावर गार चिं-च आणि दही............ Happy

पापु म्हणा नैतर गोलगप्पा... एकादमात ती पाणी भरलेली पुरी तोंडात टाकुन खाता येत नसेल त्यांना या फॅक्ल चे सदस्यत्व मिळणार नाही Proud

चाट - समोसा, कचोरी, बटाटा वडा... कसलाही... कधीही.... Happy

चला तर मग पुरवा आपल्या जीभेचे आंबट (चिं-च आहे म्हणुन) शौक Happy

हे पदार्थ तुम्ही कसे करता, तुम्हाला कसे खायला आवडतात, कुठे चांगले मिळतात ते सगळे लिहा... Happy

चटक मटक खाणार्‍या सर्व भेळकरांना अर्पण Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला विकतच्या भडंगातील लसूण आवडतो आणी घरी केलेल्या भडंगातील सगळेच आवडते.प्रत्येक घासाला खोबरे,डाळ आणी शेंगदाणा आला पाहिजे आणी सोबत चकली आणी करंजी मग मस्त तंद्री लागते.
अजुनतरी दिवाळी फराळ घरीच बनवातो.बाकी lockdown मधे 4 वेळा दिवाळीचा फराळ झाला असेल.पण प्रमाण कमी असते बनवायचे.सासरी आणी माहेरी पायलीने बुंदीचे लाडू आणी किलोने भडंग,चिवडा बनवतात फक्त आता आचारीकडून बुंदी पाडून आणतात आणी घरी पाकात घालून लाडू बांधतात .आधी घरी आईच बुंदी पाडायची.गल्लीत आठवडाभर(तीन आठवडे) सगळीकडे असा वास दरवळायचा फराळचा मस्तच.शेजारी- पाजारीआमंत्रण असायचे कानवले /कानुले/करंज्या करायला मुलींना.

शेसामेल म्हणजे?
पहिल्यांदा ऐकला हा शब्द
>>>>

मी हा शब्द वाचून थोडावेळ हा काय मायबोली शॉर्टफॉर्म आहे असा विचार करत बसलो Lol

शेसम येणे,शेसामने,सरदाळने हे शब्द तुम्हाला नवीन आहेत तसेच मलाही
खूप कोकणी शब्द इथेच नवीन कळालेत.सांगली-मिरज,तासगाव ,विटा,खानापूर या भागात खूप असे शब्द आहेत जे तुम्ही कधी ऐकलेही नसतील.

शामसेल काहीतरी एक्सॉटिक नाव वाट ले मला. गेम ऑफ त थ्रोन्स सारखे अर्ल ऑफ शामसेल. सीमा जी आम्हाला नवे शब्द शिकवा वेगळा बाफ काढा.
हौशी पब्लिक. मास्टर रेसीपी विश्नू मनोहर ह्यांचे चॅनेल आहे. त्यावर एक हिरवी भेळ म्हणून पाककृती आहे. तळलेले मटार आहेत व इतर हिरव्या बाबी. चविश्ट असेल. नक्की बघा. मी शोधून लिंक देते.

मी हा शब्द वाचून थोडावेळ हा काय मायबोली शॉर्टफॉर्म आहे असा विचार करत बसलो Lol >>> मलाही असच वाटलेलं तोपर्यंत खाली लगेच अर्थ आलेला .
मला हे सगळेच शब्द नवीन आहेत. आम्ही शेरदाळेल म्हणतो.

मुंबईतली लोकं भेळ नरम पडेल म्हणतात. सगळ्यांना समजून जातील असे शब्द वापरणे ही मुंबईची खासियत आहे. भैय्या सुद्धा तेच म्हणतो, अरे नरम हो जायेगा, मजा नही आयेगा..

नवरा मागच्या आठवड्यात सांगलीला गेला होता. इथलं वाचून त्याला मुद्दाम अंबा भडंग आणायला सांगितलं. मस्त आहे. खमंग आणि टेस्टी.

अंबा भडंग नवीनच कळली. आणली पाहिजे. गोरे बंधू इथे मिळते. आधी आवडायची, पण आता कंटाळा आला.
शेमासेल हा मलापण नवीन शॉर्टफॉर्म वाटलेला Proud

सादळणे म्हणजे ताजा न राहाणे. चहा थोडा वेळ कपात तसाच न पिता ठेवला की तो सादळतो म्हणजे थंड , कोमट, सर्द होतो. सर्दावणे म्हणजे थंड पडणे, चैतन्य (कुरकुरीतपणा) हरपणे,

अंबा भडंग रावेत, आकुर्डी निगडी या भागात कुठे मिळेल? जिथे तिथे गोरे आणि साहिल हे 2च दिसत आहेत
गोरे चांगला आहे, अंबा try करायचा आहे

अंबा भडंग कोल्हापूरचा ना, तो टेस्टी असतो. गोरे, भोरेपेक्षा मला तोच आवडतो, पूर्वी आमच्या कोपऱ्यावरच्या दुकानात मिळायचा, हल्ली काही वर्षे नाहीच मिळत. गोरे, भोरे असतात पण हा नाही.

Pages