आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कि ह्या पाच नंतर बाजी पलटवतील ह्याचा विश्वास आहे ?
>>>>>
वीक टीम नसणे आणि स्ट्राँग टीम असणे या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
मी कुठेच म्हटले नाही की ही टीम आधीच्या वर्षीसारखी स्ट्राँग आहे. त्यांच्या मागेच आहे. पण तितकी वीक नाहीये. हे येणारा काळ सिद्ध करेलच.. स्क्रीनशॉट मारून घ्या माझ्या पोस्टचा Happy

आश्विनला पुढे पाठवणे मला तरी गंडलेला डिसीजन वाटतो. तो काही नारायण नाहीये. आश्विन हा मर्यादीत क्रिकेटमधील फटकेबाजी करायची मर्यादीत क्षमता असलेला फलंदाज आहे. पण मागेच मी म्हटल्याप्रमाणे बॅटींगमध्ये डेप्थ नसल्याने असे पर्याय चाचपले जात आहेत.

जर आत्ताची टीम आधीसारखी स्ट्राँग नाही हे मान्य होते तर आधीच्या टीम ने पाच सामने हरल्यावर आय्पील जिंकली आहे हे विधान करण्या मागे काय प्रयोजन ? अजून ही तू माझ्या मापदंडाच्या प्रश्नाचे उत्तर सरळ दिले नाही आहेस. कमीत कमी "तितकी' वीक नि "इतकी' वीक हे कसे मोजायचे ते सांगशील ? स्क्रीनशॉट का घ्यायचा ? प्रत्येक संघ काही ना काही सामने जिंकतो. हे सांगायला फार अक्कल लागत नाही. तू हा संघ यंदा आयपील जिंकेल असे म्हणत असशील तर स्क्रीनशॉट घेतो (अर्थात तू हे करणार नाहीस हे तुझ्या इतकी वीक नि तितकी वीक ह्या कोलांट्या उड्या बघून हे ही उघड आहे)

फेफ. संजूच्या दोन (च) इनिंग्स ड्यू आहेत रे. ते दोन सामने मजा येणार आहे. बाकी सब बटलर भरोसे खेळ आहे.

असामी, हो ना. मला वाटलं होतं की आज त्यातली दुसरी इनिंग बघायला मिळेल (एक झालीय ऑलरेडी).

ऋन्मेष, निशमला खेळवल्यावर सुद्धा जर बॅटींग डेप्थ कमी आहे असं तुला वाटत असेल, तर ११ च्या ११ बॅट्समेनच खेळवावे लागतील. तसंही, फॉर द रेकॉर्ड्स, नरिनला पिंच हीटर म्हणून वापरायचा प्रयोग पहिल्यांदा आयपीएल मधेच झाला होता. त्याआधी तो कधीही वरच्या क्रमांकावर बॅटींगला आला नव्हता. किंबहूना सीपीएल मधे सुद्धा हा प्रयोग फारसा झालेला / यशस्वी झालेला नसावा असं वाटतं.

तू हा संघ यंदा आयपील जिंकेल असे म्हणत असशील तर स्क्रीनशॉट घेतो
>>>>
एखाद्या स्ट्राँग संघाचे नाव तुम्ही घ्या आणि खात्रीपुर्वक सांगा बघू Happy
मुळात जर मी असे म्हणत असेल की जसा पॉईंट टेबल ५-० आणि मुंबई तळाला दाखवतोय तितका मुंबई हा संघ वीक नाहीये तर त्यांनी ईथून आयपीएलच जिंकायला हवी तरच ते ईतके तितके वीक नाही हे मान्य करू हा हट्ट कश्याला. कारण तसे तर कोणत्याही संघाबद्दल खात्रीने सांगता येणार नाही. मुंबईला . ईथून प्ले ऑफला क्वालिफाय होणे अवघड आहे कारण यंदा दहा टीम आहेत हे माहीत असल्याने आता तुम्ही म्हणत आहात.. पण आता उर्वरीत नऊ सामन्यात किती जिंकताहेत याचा विनिंग रेशिओ बघूया आणि मग ठरवूया Happy

नरीनला पिंच हिटर पाठवले त्या काळात २०-२० हे आयपीएललाच जास्त खेळले जायचे. ईंटरनॅशनल मोजके सामने व्हायचे.. त्यामुळे कोणाच्या क्षमता जास्त चाचपल्या वा वापरल्या जात नव्हत्या. नरीन नेटमध्ये खेळताना त्या जाणवल्या असतील त्याचा फायदा उचलला. आश्विनला मात्र आजवर ईतके खेळताना पाहिले आहे त्यावरून सहज कळते की तो पिंच हिटर क्षमतेचा खेळाडू नाहीये. तो प्रतिस्पर्धी गोलंदाजांची लाईन लेंथ बिघडवू शकत नाही. मग का ऊगाच स्कोअरबोर्डवर एक विकेट वाढवून स्वत:वरचेच दडपण वाढवायचे..

नीशम आयपीएलमध्ये आजवर नऊ इनिंग खेळला आहे.
त्याची सरासरी १० च्या आत आहे आणि स्ट्राईकरेट १०० च्या आत.. हे फक्त रेकॉर्डसाठी.. पण हे आकडे बघून त्याला वीक फलंदाज घोषित करायला हरकत नसावी Happy

नीशमचा रेकॉर्ड सोडा. कदाचित बोल्ट आल्यावर पुन्हा तो बसेल. बाकी फलंदाजांत तो वॅन डर डुसेन आयपीएलमध्ये नवा आहे. रियान पराग बालक आहे. पडीकल प्रॉमिसिंग आहे पण अजून शिखर धवन लेव्हलचा झाला नाहीये. सॅमसन बेभरवश्याचा आहे हे आपण लहानपणापासून बघत आहोत. पुढे बटलर तुडवतोय तोपर्यंत छान वाटते. पण तो गेला की मागे हेटमायरच्या तोंडाकडे बघावे लागणार. अजून एक दोनदा हे बॅटींग युनिट फेल गेले की चलबिचलता वाढेल. या आधीच्या चॅम्पियन टीम मुंबई वा चेन्नई घ्या. फलंदाजी कोणा दोघातिघांवर अवलंबून नव्हती. त्यांचे ऑलराऊंडर फलंदाजीतही मॅचविनर होते.

एखाद्या स्ट्राँग संघाचे नाव तुम्ही घ्या आणि खात्रीपुर्वक सांगा बघू >> "संघ वीक नाही" हे तुझे विधान आहे नि पुढचे स्क्रीन शॉट वगैरे तूच आणले आहेस तेंव्हा तुझ्या विधानांचे उत्तरदायीत्व तुझ्यावर असणे हे ओघाने आले. मी तुला 'इतकी' वीक नाही च मापदंड द ऊ शकतोस हे पण म्ह्टले होते पण सगळे रिझल्ट्स बघून तू सांगणार ह्या वाक्यांना काय अर्थ आहे हे तुझे तूच ठरव. मी कुठेही प्लेऑफ ला जाईल किंवा नाही ह्याबद्दल काहीही भविष्य वर्ततवले नाहीये ह्याची नोंद घे. हातातले सामने गमावून ही तळाला असलेला संघ वीक नाही तर अजून कुठला संघ वीक असणार भाऊ ? " या आधीच्या चॅम्पियन टीम मुंबई वा चेन्नई घ्या. फलंदाजी कोणा दोघातिघांवर अवलंबून नव्हती. त्यांचे ऑलराऊंडर फलंदाजीतही मॅचविनर होते." हे पुढच्या पोस्ट मधे लिहून त्या आधी मुंबई वीक नाही - तितकी वीक नाही आहे हे सगळे काय आहे नक्की ?

१) जेव्हा एखादा संघ जिंकतो तेव्हा त्यांचे दोष लपतात.

जसे हे राजस्थानबाबत होत होते. पण त्यांच्या फलंदाजीत डेप्थ नाही हाच दोष मी उघड करत होतो. मानो या ना मानो Happy

२) जेव्हा एखादा संघ हरतो तेव्हा त्यांचे दोषच हायलाईट होतात. तेव्हा त्यांनी त्यांचे गुण पक्षी स्ट्रेंथ शोधून त्यानुसार नव्याने प्लानिंग करायची गरज असते.

हेच गुण मुंबईच्या संघात मी शोधतोय. आणि बरेच मॅचविनर तसे प्रॉमिसिंग टॅलेण्ट अजूनही त्यांच्यात मला दिसतेय.

तुर्तास शुभरात्री Happy

थोडक्यात दिवसभर खंडीभर पोस्ट्स टाकून शेवटी मापदंड न देताच शब्बा खैर. सबगोलांकार विधाने केली कि हीच पंचाईत असते.

मापदंड Happy
मी आकड्यापलीकडचे क्रिकेट बघतो नेहमी
या स्पर्धेत मुंबईचे काय पॉईण्ट होतील वा किती सामने जिंकतील हे अंदाज म्हणजे निव्वळ एक जुगार असतो.. उदाहरणार्थ उद्या एखाद्या सामन्यात आश्विननेही येऊन १५ बॉल ३० वगैरे मारले तरी माझे मत बदलणार नाही. अश्यावेळी ते आकडे घेऊन कोणी चर्चेला आला तर थांबावे. काळच ऊत्तर देतो. शर्मा असो वा पंत, दोघे कारकिर्दीच्या सुरुवातीला स्ट्रगल करत होते तेव्हा मी त्यांच्यावर मायबोलीवर धागा काढलेला. लोकं हसलेले तिथे येऊन. पण पुढे उत्तर मिळालेच Happy

ऋन्मेष, नरिनला ओपनिंगला पाठवायचा प्रयोग पहिल्यांदा २०१६ मधे झाला आणि तोपर्यंत बरंच टी-२० क्रिकेट खेळलं गेलं होतं.

नीशम चा टी-२० चा स्ट्राईक रेट १५० आणि ड्युसेन चा १३० (३ टी-२० शतकं) आहे. तू तुला हवं ते मान्य / अमान्य कर पण फॅक्ट्स बदलत नाहीत.

नीशमचा स्ट्राईकरेट १५० आहे ते ईंटरनॅशनलमध्ये.
आयपीएलच्या ९ इनिंगमध्ये त्याची सरासरी १० च्या आत आहे आणि स्ट्राईकरेट १०० च्या आतच आहे.
ईंटरनॅशनलमध्येही जर तो भारत आणि बांग्लादेशच्या धरतीवर खेळलेले सामने पाहिले तर त्यातील ४ इनिंगमध्ये त्याची सरासरी ५ च्या आत आहे आणि स्ट्राईकरेट ५० च्या आत आहे.
म्हणून तर म्हटले आकडे फसवतात. जेवढे विश्लेषण करू तितकी रहस्य उलगडत जातात. मुलीच्या नजरेसारखेच असते हे. तिच्यात अडकाल तर फसाल. अंतःकरणात शिराल तरच तिच्या हृदयात काय आहेहे गवसेल Happy

अर्थात याचा अर्थ लगेच नीशमवर फुली मारायची गरज नाही. पण अजून त्याला आपल्याकडच्या खेळपट्ट्यांवरील टोटल १३ इनिंगमध्ये एकदाही स्वत: सिद्ध करता आले नाहीये ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

हे विश्लेषणच आयपीएलमध्ये करायला स्पेशल टीम असतात. त्यामुळे एखाद्या नारायणचा जो गुण देशासाठी खेळताना मागेच पाठवल्याने लपून राहिला तो कलकत्याने हेरला. पण आश्विनबाबत तसे नाहीये. ओढून ताणून त्याला पुढे आणून फलंदाजीच्या डेप्थवर उत्तर शोधणे चालू आहे.
किंबहुना नीशमलाचा पुढे नवीन बॉलवर आणायचा डावपेच प्रयत्न करून बघायला हवा होता. दिसूही शकेल...

असं फक्त आयपीएल चा रेकॉर्ड बघून टीम निवडायची असेल तर लिविंग्स्टन वर पंजाब ने विश्वास दाखवलाच नसता. असो. तू एकीकडे आकडे फसवे असतात (ते मुलींच्या हृदयात उतरून बघायचं वगैरे) म्हणतोयस आणि दुसरीकडे नीशम आणि ड्युसेन च्या आकडेवारीचा च हवाला देत, राजस्थानची बॅटींग डेप्थ नसल्याचाही दावा करतोस. दे घुमैके!!

उमरान मलिकने नाचवले रसेलला. बॉल शोधत होता त्याच्या पेसला. एक बॅटला लागत नव्हता. घाबरून कवर सोडत होता. एका बॉलने फॉलो केले तर मटकन खाली पडला. मजा आली बघायला.

दुसरीकडे नीशम आणि ड्युसेन च्या आकडेवारीचा च हवाला देत, राजस्थानची बॅटींग डेप्थ नसल्याचाही दावा करतोस.
>>>>

जर तुम्ही आजचे जगातले सर्वोत्तम पाच फलंदाज खेळवले आणि सहापासून कोणालाच फलंदाजी येत नसेल तर त्याला बॅटींगमध्ये डेप्थ नाही असेच बोलतात.

सुरुवातीच्या सामन्यात रियान पराग सहाव्या आणि आश्विन सातव्या नंबरवर येतो म्हणून म्हणालो होतो डेप्थ नाही.
नीशम आता आला. बोल्ट आल्यावर पुन्हा जाईलही. पण त्याचा तुम्ही मुद्दाम उल्लेख केल्याने तो आल्यानेही बॅटींग लगेच स्ट्राँग झाली नाही हे दाखवायला वरचे आकडे दिले.

उमरान मलिकने नाचवले रसेलला. बॉल शोधत होता त्याच्या पेसला. एक बॅटला लागत नव्हता. घाबरून कवर सोडत होता. एका बॉलने फॉलो केले तर मटकन खाली पडला. मजा आली बघायला.

तयार करा याला..

मी आकड्यापलीकडचे क्रिकेट बघतो नेहमी >> म्हणून क्रिकेट बाफावर जवळ जवळ प्रत्येक सामन्यानंतर निर्रथक आकड्यांनी भरलेल्या पोस्ट्स टाकत असतोस Lol

फे फ, राजस्थान फ्रंट लोडेड आहे म्हणून बॅटींग डेप्थ नसावी असे वाटत असेल का ?

असामी, आकड्यापलीकडचे क्रिकेट म्हणजे आकड्यांना अर्थ नाही असे नसून त्या आकड्यांचे विश्लेषण करता येणे गरजेचे. वर नीशमचे उदाहरण बोलके आहे. आज आयपीएलमध्ये तुम्ही बघत असाल. कोणाचा काय करीअर एवरेज आहे नि स्ट्राईकरेट आहे यासोबत एखाद्या फलंदाजाचा अमुक तमुक शैलीच्या गोलंदाजासमोर वा अमुकतमुक शॉट खेळताना काय रेकॉर्ड आहे हे आकडे त्यातून शोधून काढले जातात. ते याचसाठी. मग ती माहिती वापरून तिथे वेळेला फसवले तर मग तुमच्या ऑवरऑल आकड्यांचा त्या मॅच पुरता काही फायदा नसतो.

असो. बाकी आकडे नेहमीच मनोरंजन करतात. विश्लेषण करायची आवड असो वा नसो. एंजॉय करावेत. जसे की शर्माने सलग सामने जिंकायचा धडाका लावत विक्रम केला असला तरी त्याची खरी कसोटी लागलीच नाहीये. ती लागेल तेव्हा कळेल. हे कोणालाही कळते. तरीही सलग क्लीन स्वीपचा त्याने जो धडाका लावला ते आकडे एंजॉय करायचे नाहीत असे नाही ना Happy

आता ते आकड्यांचे पराक्रम शर्माचे आहेत म्हणून एंजॉय करावेसे वाटत नसेल कोणाला तर ती वैयक्तिक आवड नावड झाली. मी फॅन आहे तर मी एंजॉय करणारच ना Happy

परत तू रानोमाळ भरकटला आहेस. तू कशाला एंजॉय करावेस हा खरच तुझा प्रश्न आहे. पण जिथे तिथे आकडे कोट करणार्‍या व्यक्तीने आकडे फसवे असतात म्हणून पोस्ट्स ताकणे मला मनोरंजक वाटते. 'टीम इतकी वीक नाही' ह्याचा मापदंड मागितला तू टाळलास. मग 'त्यात आधीच्या टीम मने इतके सामने हरून जिंकले आहेत' असे म्हणतोस म्हणून 'ही टीम तसे करेल असे तुला का वाटते' हे विचारले तर 'तितकी स्ट्राँग नाही, पण इतकि वीक नाही म्हणतोस' तर 'किमान त्याचा मापदंड दे' विचारले तर आकडे फसवे असतात म्हणतोस. तुला काय वाटते ह्यापेक्षा स्पर्धेमधे कुठल्या स्थानावर आहे हे मह्त्वाचे कसे नाही हे मला समजत नाही.

"फे फ, राजस्थान फ्रंट लोडेड आहे म्हणून बॅटींग डेप्थ नसावी असे वाटत असेल का ?" - राजस्थान चे पहिले ५-६ बॅट्समेन चांगले आहेत आणि त्यांनी बॉलिंग बीफ-अप करण्यासाठी ४ इंटरनॅशनल बॉलर्स खेळवले आहेत (पहिल्यांदाच त्यांनी ऑक्शनमधे इतकी क्लॅरीटी दाखवली आहे). पराग / जैस्वाल पैकी कुणी एक क्लिक झाला तर टीम बॅलन्स चांगला वाटतो. अश्विन आणि चहल हे दोन्ही स्पिनर्स खेळवणं हे मला तरी अ‍ॅटॅकिंग वाटतं, कारण शेवटी क्रिकेट चा फॉर्म कुठलाही असला तरी विकेट्स घेणारे बॉलर्स बहुतांश वेळा मॅच जिंकून देतात. मुंबई / चेन्नई सारख्या टीम्स एकीकडे क्वालिटी बॉलर्सच्या अभावामुळे सफर होत असताना, केकेआर, गुजराथ सारख्या टीम्स चांगल्या बॉलर्समुळे जास्त प्रभावी ठरतायत.

अश्विन आणि चहल हे दोन्ही स्पिनर्स खेळवणं हे मला तरी अ‍ॅटॅकिंग वाटतं, कारण शेवटी क्रिकेट चा फॉर्म कुठलाही असला तरी विकेट्स घेणारे बॉलर्स बहुतांश वेळा मॅच जिंकून देतात. मुंबई / चेन्नई सारख्या टीम्स एकीकडे क्वालिटी बॉलर्सच्या अभावामुळे सफर होत असताना, केकेआर, गुजराथ सारख्या टीम्स चांगल्या बॉलर्समुळे जास्त प्रभावी ठरतायत. >> मान्य. फ्रंट लोडेड चा मुद्दा ह्यासाठीच की बटलर ओपन करतो. संजू ला चार वर आणून त्यांनि मधली फळी सांभाळायच प्रयत्न केला आहे - संजू साथ देत नाही हा भाग विरळा. रॉयल्स, टायट्न्स, जायंटस नी बॉलर्स वर घेतलेली इंवेस्टमेंट कामाला आली आहे असे दिसतेय. हार्दिक असाच मॅच्युअर इनिंग्स खेळत राहिला तर ........

रच्याकाने संपूर्ण भारतीय बॅटींग टीम - (रोहित, राहूल, मयांक, इशान, कोहली, अय्यर * २, जाडेजा ) , सूर्या चा नि ठोडाफर पंतचा अपवाद वगळता सातत्यासाठी झगडते आहे. जे आयपील गाजवत आहेत ते येण्याचे चान्सेस कठीण वाटतात. त्या मानाने बॉलिंग ठीकठाक वाटते आहे.

“ रॉयल्स, टायट्न्स, जायंटस नी बॉलर्स वर घेतलेली इंवेस्टमेंट कामाला आली आहे असे दिसतेय. हार्दिक असाच मॅच्युअर इनिंग्स खेळत राहिला तर ” - आमेन!

चला आजपण मुंबईने पराजयाची तयारी करून ठेवली आहे. IPL मधला पहिला संघ सीजन मध्ये एकही सामना ना जिंकण्याचा रेकॉर्ड करतील. रोहित शर्मा ने स्वतःहून आता निवृत्ती घेतली पाहिजे.

सध्या अवघड काळ आहे ऱोहित आणि मुंबई इंडियन्सचा. हेड्स विल रोल आफ्टर धिस सीजन. आणि व्हायलाच पाहिजेत.
ब्रेविस, स्काय, उनडकट रिटेन करतील टॉप डॉलर देऊन. बाकीच्यांचे माहित नाही.

Pages