आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वरूप . +१

राजस्थान मस्तच खेळले आज. संजूने सोडलेला श्रेयसचा कॅच महागात गेला असता. थँक्स टू चहल! स्मार्ट बॉलर!! त्याचे व्हेरिएशन्स कमाल आहेत. डोन्ट फरगेट अश्विन. रसेल चा गोल्डन डक केकेआरसाठी धक्का होता. उमेश ने ऑल्मोस्ट फिरवली होती मॅच. पण प्रसिध आणि मकॉय ने धीर सोडला नाही. बोल्टच्या चार ही ओव्हर्स सलग संपवाव्या, कारण डेथ ओव्हर्स मधे तो लायेबिलिटी ठरतो बहूतेक वेळा.

मी बोल्टचा फॅन आहे. त्याचे बनाना स्विंग्ज जबरी असतात. इथे आयपीएल मधे बॅट्समन कंट्री मधे जे बोलर्स करामत दाखवतात ते अजूनच भारी वाटतात. परवा उमरान मलिकने २० वी ओव्हर मेडन टाकून तीन विकेट्सही काढल्या!

उमरान मलिकचा बॉल त्या दिवशी रसेलही शोधत होता. त्याचा ग्राफ वरच्या दिशेने आहे आणि ते सुद्धा पेस कॉम्प्रोमाईज न करता हे खूप चांगले लक्षण आहे. सध्या तो योग्य टीमसोबत आहे जिथे बॉलर्सना महत्व दिले जाते, त्यांना मॅचविनर म्हणून बघितले जाते. त्याला लवकरच तयार होत ईँटरनॅशनमध्ये बघायला आवडेल.

“ मी बोल्टचा फॅन आहे. त्याचे बनाना स्विंग्ज जबरी असतात.” >> सुरूवातीच्या ओव्हर्स मधे हे पण अ‍ॅड कर त्यात. अश्विनचा रसेलला टाकलेला फ्लिक बॉल अमेझिंग होता. प्रसिद्ध सातत्याने १४०+ असतो नि कंट्रोल तरीही चांगला आहे. एकंदर उमेशच्या कॅमियोमूळे तो बाद झाल्यावर 'जीव भांड्यात पडला' असा फील रॉयल्स च्या कँपमधे वाटत होता.

सुरूवातीच्या ओव्हर्स मधे हे पण अ‍ॅड कर त्यात >> हो पण ती कॉमेण्ट आयपीएल बद्दल नव्हती. इन जनरल. इव्हन तेथेही सुरूवातीच्या ओव्हर्स खरे आहेच म्हणा.

“ सुरूवातीच्या ओव्हर्स मधे” - मला हा प्रश्न नेहमी पडतो. सुरूवातीच्या ओव्हर्समधे त्याचा कंट्रोल जबरदस्त असतो. म्हणजे त्याचा लाइन आणि लेंथवर कंट्रोल आहे. मग शेवटी तो शॉर्ट बॉल वगैरे ट्राय करण्यापेक्षा हुकुमी यॉर्कर्स (स्लो / फास्ट, वाईड) वर भर का देत नाही?

कोहली आज गोल्डन डक वर गेला. अगदी कॅज्युअल खेळावे तसे कॅच काढून दिली. आणि मग हसला..
त्याचा हा नुसता बेडपॅच वाटत नाही. काहीतरी सिरीअस प्रॉब्लेम झाला आहे. कदाचित मंदावलेल्या रिफ्लेक्सेसनुसार त्याला आपला खेळ अ‍ॅडजस्ट करता येत नसावा, वा जे काही कारण असेल, पण त्याने आपला ईगो बाजूला सारत पुन्हा नव्याने बेसिकपासून सुरुवात करायला हवी.
दोन वर्षांपूर्वी वाटत होते कोहली सचिनचा विक्रम मोडेल.. आज ७० वरच अडकला आहे तर शिल्लक ३० हा आकडा अशक्यप्राय वाटत आहे.

थोडं रिकवर केलय आर सि बि नी पण आता कितपत जमतील माहित नाही. डुप्लेसी आणि शहाबाज दोघंही कडक खेळतात सो आशा आहे. पण विकेट टिकवून मारत राहणे अवघड आहे.

डुप्लेसी विकेट टिकवून मारण्यात एक्स्पर्ट आहे. नंतर कार्तिक आहे. झाल्यास त्यामागे हसरंगा, हर्शल पटेल. चांगला स्कोअर होईल असे वाटतेय.

अरेरे! परत हुकली सेंचुरी. पण बेस्ट ओढली. फायटिंग टोटल आहे!
संजत दत्त आणि रविना टंडन दिसले का? Lol मला दिसले.

डुप्लेसी ९६ वर बाद
लास्ट ओवरला फक्त ४ रन्स आल्या. ते सुद्धा कार्तिकची कॅच सोडून.
तरी १८१ स्कोअर झालाय.
सोपे नाही टारगेट.. राहुलला लवकर घेतले तर गेम ऑन आहे. हर्षल पटेल चालेल ईथे असे पहिली इनिंग बघून तरी वाटले.

बॉलिंग चांगली केली शेवटी. नाहीतर डु प्लेसी आणि डि के असताना ४ ओवर राहिल्या म्हणजे काहीही होउ शकतं.
जेल मधून सुटून पण बराच काळ लोटला की. मला वाटतं दोन वर्ष तरी झाले.

हे जरा वरातीमागून घोडे आहे पण कालची बटलरची बॅटिंग टोटली मॅजेस्टिक. पुन्हा पुन्हा बघण्यासारखी! फोर्स आणि सिक्सेस तसे सगळेच मारतात पण याच्या बॅटिंगमधे काहीतरी मॅजिक आहे. उचलून मारलेले ते एक दोन ऑफ ड्राइव्ह्ज!

आज बडोनीनी येऊन राडा केला पाहिजे.
फा Happy टोटली! मी लिहिलं आहे वर. अ‍ॅट विल मारत होता तो. जबरदस्त सेट होती नजर त्याची बॉल वर.

विराटला येत्या २०-२० विश्चचषकात घेऊ नका ईथवर चर्चा चालू आहे.
आठवा, पहिलाच वर्ल्डकप. तेव्हा २०-२० बाल्यावस्थेत असल्याने कोणी सिनिअर खेळले नाहीत.
आणि युवा नेता श्री माहीने युवा शिलेदारांची वानरसेना घेऊन पाकिस्तानदहन केले होते.
त्यानंतर पुन्हा हे कधीच घडले नाही.

आताही गरज आहे कोहली व झाल्यास कर्णधार शर्मालाही संघातून वगळा.
एखाद्या राहुल, अय्यर, पंतला कप्तानी द्या. सलामीवीर म्हणून पृथ्वी शॉ ला घ्या. फिनिशर म्हणून कार्तिकला घ्या. सोबत पांड्या आणि सुर्यकुमार आहेतच. फिरकीमध्ये जडेजालाही नारळ द्या. आश्विनचा विचारही करू नका. युझी चहलच्या साथीला एखादा बिश्नोई, सुंदर आणि बापूंना घेऊन जा. वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराहच्या साथीला दिपक चहर, नटराजन, उमरान मलिक, हर्षल पटेल वगैरे वरायटी बॉलर जमा करा.. आणि वर्ल्डकप घेऊनच या.

२००७ मधे जे झाले त्याच लॉजिक ने ह्यावेळीही होईल असे धरून टीम निवडणे मला व्यक्तिशः चुकीचे वाटते. तेंव्हा बर्‍याच टीम ना ती २० चा अनुभव नव्हता - वन डे चे अधिक संक्षिप्त स्वरुप ह्या प्रकारे खेळले जात असे. तेंव्हापासून आत्तापर्यंत झालेले बदल बघता फक्त नवे खेळाडू असा विचार करण्यापेक्षा ऑस्ट्रेलिया मधल्या मैदानांमधे उपयुक्त ठरतील अशी पॉवर हिटींग करु श्कणारे बॅटसमन, काम चलाऊ असली तरी चाले पण १-२ षटकांचा बॅकप देऊ शकतील असे ऑलराऊंडर हवेत. स्पिनर म्हणून लेगी हवाच. वेगवान गोलंदाजां मधे वरची लिस्ट योग्या वाटते. मी त्यात उमेश पण अ‍ॅड करेन .

गेल्या एक दोन सीझनमध्ये राजस्थानकडून चमकलेले कार्तिक त्यागी आणि चेतन सकारिया कुठे आहेत??
निम्मा सीझन संपत आला तरी त्यांना अजूनही संधी मिळालेली दिसत नाहीये!!
दिल्ली आणि हैद्राबादने त्यांना एकदोन मॅच तरी खेळवून बघायला हवे..... दोघेही प्रॉमिसिंग आहेत!

सकारीयाला लवकर संधी मिळणे अवघड आहे. मुस्तफिजुर आणि खलील दोघे चांगली कामगिरी करत आहेत तुर्तास, तिसरा लेफ्ट आर्म खेळवणे अवघड आहे.
नॉर्कियाला मार पडला तो बाहेर आहे. लुंगी आपल्या टर्नची वाट बघतोय. त्या लुंगीला मुंबईला भाड्याने दिला तरी मुंबई दुप्पट भाडे मोजून घेईन.

मला तर आता उत्सुकता आहे अर्जुन तेंडुलकर पदार्पण करतो कधी याची...
स्टेज सेट आहे. चेन्नई समोरच आणा म्हणजे माहौल बनेल. त्याचे पदार्पण मुंबईला भले विजय मिळवून देणारे असो वा नसो पण टीआरपी नक्कीच मिळवून देईल Happy

आठवा, पहिलाच वर्ल्डकप. तेव्हा २०-२० बाल्यावस्थेत असल्याने कोणी सिनिअर खेळले नाहीत.
आणि युवा नेता श्री माहीने युवा शिलेदारांची वानरसेना घेऊन पाकिस्तानदहन केले होते.//// हो ना नंतर२०-२० वल्डकप पण झाला नाही आणि श्री माही सरांना वानरसेना पण मिळाली नाही

Proud
रामाने रावणाचा वध केला. मग पुढे तो कुठले राक्षस मारत बसला नाही. कृष्णाने कंसाला मारले मग जास्त मारामारीच्या फंद्यात पडला नाही. महाभारतातही शस्त्र उचलले नाही. तसेच धोनीनेही केले. एक २०-२० चा आणि एक वन डेचा वर्ल्डकप जिंकला. एक आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा जिंकली. त्याच्या कप्तानीत भारत आयुष्यात पहिल्यांदा कसोटीत नंबर वन क्रमांकावर पोहोचला. त्याने सगळे काही मिळवून दिले. मग जास्त लोड घेणे बंद केले. तरी आपणच ग्रेट कप्तान आहोत हे दाखवायला म्हणून चेन्नईला अध्येमध्ये आयपीएल जिंकवून द्यायचा तेवढेच Happy

सुन्या Lol खुप मस्त आठवणी आहेत त्या पहिल्या वर्ल्ड कपच्या. मला कामा निमित्त बाहेरगावी जायला ट्रेन पकडायची होती आणि इथे मॅच एकदम खत्तरनाक सुरु होती. मॅच पुर्ण बघून मग जी धावपळ झाली ट्रेन स्टेशनला जाऊ पर्यंत त्याला जवाब नव्हता! पण ऑल वर्थ इट.
बाहेर जाऊन मॅच मारण्यात मजा काही औरच. मध्यंतरी रहाणे आणि यंग्स्टर्सनी चांगलीच धमाल केली ऑस्ट्रेलिया विरुद्ध. त्यात तो लो स्कोअर वगैरे झाला आणि त्यानंतर उफाळून आले ते भारी होते.

पंजाबचे लल्ले लागले...

Pages