Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57

आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सुन्या मी पण!
सुन्या
मी पण!

He basically just took a bow and can be seen smiling. It was just a nice and light moment.
मन जिंकले, सर्व भारतीय क्रिकेटप्रेमींच्या भावना आज त्याने व्यक्त केल्या वगैरे म्हणजे आपला देशी व्यक्त होत असताना नेहमीच होतो तो भावनांच्या वोरलोड, दुसरं काही नाही
आता उद्या धोनी के जबरदस्त बॅटिंग को देख रो पडे जाडेजा! उन्होनी भरे मैदानमे सर झुकाकर किया धोनीका सम्मान! अशा बातम्या चमचमतीलच साईटांवर.
खरय स्वरुप. धोनी मध्ये अजून दम आहे आणि मॅच फिरवू शकतो हे दिसून आलेच पण बघायला गेलं तर तसं त्याची शॉट्सची रेंज खुप कमी आहे. I will not say Dhoni is an intuitive batsman but his ability to somehow remain cool under pressure makes him valuable.
पुर्वी मला कोहली इन्ट्युटिव वाटायचा आणि सध्या प्रकर्षाने हे जाणवत असेल तर ते सुर्यकुमार यादव विषयी. शॉट प्लेसमेंट बघून त्याच्या डोक्यात कोण कुठे उभं आहे आणि आलेला बॉल कसा बरोबर त्यांना चकवत बाहेर पाठवायचा ह्याचा प्रचंड उपजत सेन्स आहे त्याला.
काल प्रकर्षाने जाणवले की जर
काल प्रकर्षाने जाणवले की जर २०१९ वर्ल्डकप सेमीला धोनी धावबाद झाला नसता तर...
विल्यमसनला सुद्धा याची कल्पना होती.
एज ईज जस्ट नंबर.. गेल्या आयपीएलला मलाही वाटत होते की धोनी फलंदाज म्हणून संपला आहे. पण धोनी तर धोनी आहे.
आज आयपीएलला जर कोणता खेळाडू सर्वाधिक टीआरपी मिळवून देत असेल तर तो धोनी. कालच्या त्याच्या खेळीनंतर तर नुसता जाळ उडालाय सोमिवर. आज व्हॉटसप स्टेटस चेक केले मित्रांचे. दर दुसरे स्टेटस तेच
इतका at will जर तो मारु शकतो
इतका at will जर तो मारु शकतो तर जरा आधी सुरु करायला काय हरकत आहे??
>>>>>>>
जेव्हा विकेटची लाईन लागली असते. मोमेंटम गेले असते तेव्हा तो त्या लाईनीत ऊभा न राहता आधी डावाला स्थिरता द्यायचे काम करतो. काऊंटर अटेक तिसऱ्या चौथ्या नंबरच्या प्लेअरला शोभतो. पण मागे कोणी नसताना नाही हे तो बरोबर जाणतो. त्या नादात तो बाद झाला तर मॅच संपलीच. म्हणून तो आधी समोरच्याला रिस्क घेऊन मारायला लावतो. कित्येकदा आपण हे बघतो की समोर धोनी आहे या विश्वासावरच समोरचा खेळून जातो. बरेचदा तो समोरचा मॅचही जिंकवून देतो. तेव्हा कोणाला लक्षातही येत नाही की त्यात धोनीचा वाटा काय होता. जेव्हा तसे होत नाही तेव्हा तो शेवटी धावा मारायचे काम स्वत:कडे घेतो. आपण मोजताना फक्त अश्याच मॅच मोजतो आणि आपल्याला वाटते की धोनी हिरो बनायला मॅच शेवटच्या ओवरला नेतो. पण त्याने नॉनस्ट्राईकरला ऊभे राह्त कृष्णासारखे किती मॅचेस जिंकवून दिल्या हे गिणतीत येतच नाही
एकदिवसीय विंग चेसमध्ये उगाच नाही त्याचा एवरेज शंभर आहे.
धोनी जगातला सर्वोत्तम फलंदाज नाहीये. तो सचिन आहे. तो विराट आहे. झाल्यास तो सुर्यकुमार यादव आहे असेही म्हणायला हरकत नाही... पण धोनी हा क्रिकेटच्या ईतिहासातील सर्वोत्तम फिनिशर आहे. बुमराहला मारायची रिस्क घेताना आपली विकेट गेली नाही पाहिजे हे कळते बरेच जणांना. पण ते अंमलात आणायला जे टेंपरामेंट आणि त्यात डॉट आणि सिंगल आले तरी मग नंतरच्या ओव्हरला आपण हे कव्हर करू हा आत्मविश्वास जो त्याच्याकडे आहे ते त्याला ग्रेट बनवते.
आता उरलेल्या मॅचेसमध्ये
आता उरलेल्या मॅचेसमध्ये मुंबईने आपली उरलीसुरली बेंचस्ट्रेंथ आजमवावी..... पोलार्डला बसवून इतरांना संधी देऊन बघावी!!
बुमराहचे अपयश डोळ्यात खुपण्यासारखे आहे..... बोल्ट असताना त्याने तयार केलेल्या प्रेशरचा बुमराहला फायदा व्हायचा..... आता दुसऱ्या बाजुने पुरेसा सपोर्ट नसल्यामुळे बुमराहच्या ओव्हर्स आरामात खेळून काढल्या जातायत.... तो थोडासा प्रेडिक्टेबल झाल्यासारखा पण वाटतोय.
बोल्ट ऐवजी पोलार्डला रिटेन करायचा इमोशनल निर्णय मुंबईला नडतोय.
हृतिक शोकीनच्या ऑफस्पिनने काल इंप्रेस केले.... त्याला खेळवत राहिले पाहिजे.
अर्जुन तेंडूलकरलाही खेळवून बघा एखाद दुसरी मॅच आता म्हणाव!
काल तुम्ही लोकांनी एक गोष्ट
काल तुम्ही लोकांनी एक गोष्ट ऑबजर्व्ह केली का?
लास्ट ओवरच्या सुरुवातीला त्याने प्रीटोरीयसकडे स्ट्राईक जाऊ दिला.
जुन्या धोनीने हे कधीच केले नसते. स्वत:कडेच स्ट्राईक घेत पुर्ण ओवर स्वत: खेळला असता. त्याला ईतका विश्वास असतो की मी सहा बॉल खेळलो तर तीन चार पोहोचवणारच. ज्याला काही लोकं हिरो बनायला बघतो असे म्हणतात. पण तो नेहमी संघाच्या विजयाचाच विचार करत असतो.
आणि काल हे पुन्हा जाणवले. त्याला कल्पना होती की वयोमानाने आपले रिफ्लेक्सेस कमी झालेत. तर प्रीटोरीयसला संधी देऊया. जातोय त्याकडे स्ट्राईक तर जाऊ दे. तो सुद्ध आपला विजयाचा बेस्ट चान्स राहील. पण प्रीटोरीयसला ते जमले नाही. आणि अखेर धोनीलाच कार्य तडीस न्यावे लागले
जडेजा मात्र बॅटींग, बॉलिंग,
जडेजा मात्र बॅटींग, बॉलिंग, फिल्डींग, कप्तानी सगळ्यातच गंडलेला वाटतोय!!
कप्तानीचे प्रेशर त्याचा खेळ बिघडवतय हे नक्की!!
फाफ ज्या प्रकारे RCB ची कप्तानी करतोय ते बघता फाफला सोडल्याची चूक चेन्नईला महागात पडतीय
कप्तानीचे प्रेशर त्याचा खेळ
कप्तानीचे प्रेशर त्याचा खेळ बिघडवतय हे नक्की!!
>>>
त्याचे बॅडलक. त्याला धोनीच्या बूटात पाय घालायचा आहे.
अय्यर वा पांड्यासारखी नवीन टीम मिळाली असती जिथे आधीच्या कोणाशी तुलना नाही तर फ्रेश स्टार्ट करणे सोपे गेले असते त्याला..
पांड्याचे माहित नाही पण अय्यर
पांड्याचे माहित नाही पण अय्यर कॅप्टन्सी मटेरियल आहे हे सहजी दिसते पण तेच जडेजाच्या बाबतीत म्हणता येत नाही!!
Wrong Choice by CSK
हो, जडेजा कप्तान म्हणून योग्य
हो, जडेजा कप्तान म्हणून योग्य नाहीच आहे. जसे मोठ्या वृक्षाच्या सावलीत छोट्या झुडपांची वाढ खुंटते तसे जडेजा वा रैनाचे झाले. तरीही जडेजाला कर्णधार केले यामागचा विचार वेगळा असावा. धोनीच्या ब्रांड वॅल्यूने जी चेन्नईलाही एक ब्रांड वॅल्यू मिळालेली तिला धोनीपश्चात कसा कमीत कमी फटका बसेल हे बघितले असावे. त्यामुळे जडेजा या भारतीय आणि आणि चेन्नईसोबत कैक वर्षे असलेल्या खेळाडूला कप्तान केले.
अन्यथा डुप्लेसीलाच रिटेन करून त्यालाच कर्णधार करायचाही पर्याय होता.
ह्या वेळी बोल्ट , बुमराहची
ह्या वेळी बोल्ट , बुमराहची धार नाही जाणवली. खलील, उमरान मलिक, नटराजनच्या भारी वाटल्या बॉलिंग. सिराजपण पेस पॅक करु शकतो पण इतका डेडली नाही वाटत आहे. ऑस्ट्रेलिया दौर्यातला सिराज वॉज डेंजरस.
अबाबाबाबाबा! बटलरला बॉल
अबाबाबाबाबा! बटलरला बॉल फुटबॉल येवढा दिसतोय वाटतं! टोटल डॉमिनेशन सुरु आहे! १०७ मिटर सिक्स! ठाकूरला.
he is just dealing in 4s and
he is just dealing in 4s and 6s!
आता एक १०५ मिटर हाणली!
हे भगवान! आता जर विकेट नाही गेली तर मर गये कॅपिटल्स!
काही दिवसांपूर्वी मला सरांनी
काही दिवसांपूर्वी मला सरांनी सल्ला दिला होता की सोशल मिडीयावरच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नये. पन आज सरांने मात्र, सोशल मिडीयाच्या पोस्ट्स चा हवाला देत स्वतःच्या लाडक्या (नाही, नाही, अखिल जंबुद्वीप क्रिकेटरसिकांच्या) लाडक्या धोनीचं गुणगान गायलंय.
तेवातियाने २ बॉल्समधे १२ रन्स केल्या की 'फिक्सिंग' आणि धोनी ने ४ बॉल्समधे १६ रन्स केल्या 'ग्रेटेस्ट फिनिशर'!!!
सकाळपासून ते 'इस रंग बद्लती दुनियामें' गाणं लागतंय माझ्या रेडिओवर.

"उनाडकट पेक्षा एखादा हुशार - अगदी नवखा जरी बॉलर असता (आठवा कुलदीप सेन वि. स्टॉयनिस) तरी एका रिटायर झालेल्या, इतरत्र कुठलीहे मॅच प्रॅक्टीस नसलेल्या धोनीला ४ बॉल्समधे १६ रन्स काढण्यापासून रोखण्याची शक्यता होती." - असं कुणाचं तरी स्टॅटस होतं.
सकाळपासून ते 'इस रंग बद्लती
सकाळपासून ते 'इस रंग बद्लती दुनियामें' ...
आता मोमेंटम जायला नको. २०० + पाहिजेच!
बटलर च्या लागोपाठ २
बटलर च्या लागोपाठ २ सेन्च्युरीज!! कमाल फूटवर्क आणि हँड-आय को-ऑर्डिनेशन आहे. पण रॉयल्सच्या भक्याकरता तो शेवटपर्यंत टिकला तर बरं होईल. अशा परिस्थितीतून स्ट्राँग फिनीश न करण्याची रॉयल्स ना खोड आहे.
दमलाय आत थोडा बटलर.
दमलाय आत थोडा बटलर.
सॅमसन ला ड्रॉप केला! :तौबा:
संजूला बॉल लागल्यावर त्याने
संजूला बॉल लागल्यावर त्याने इनोव्हेटीव्ह शॉट्स चा नाद सोडून प्रॉपर क्रिकेटींग शॉट्स खेळत खलीलला २ सिक्सेस आणि २ फोर्स मारल्या. हे ज्याला जमतं त्याने कशाला उगाच रँप शॉट्स वगैरे गोष्टींच्या नादी लागावं?
सकाळपासून ते 'इस रंग बद्लती
सकाळपासून ते 'इस रंग बद्लती दुनियामें' ... >>
पण धोनी गेल्या सीझनपेक्षा चांगला खेळतोय हे नक्की आहे. कदाचित कसलेच टेंशन नाहीये ह्याचा परीणाम असेल.
बोल्ट असताना त्याने तयार केलेल्या प्रेशरचा बुमराहला फायदा व्हायचा..... आता दुसऱ्या बाजुने पुरेसा सपोर्ट नसल्यामुळे बुमराहच्या ओव्हर्स आरामात खेळून काढल्या जातायत.... तो थोडासा प्रेडिक्टेबल झाल्यासारखा पण वाटतोय. >> स्वरुप, मुंबई कडे बुम्रा वगळता दुसरा हुकुमी बॉलर नाही हे समोर दिसत असताना समोरचा संघा बुमरा च्या बॉलिंग चे टेंशन न घेता खेळणार नि जरुर वाटली तर नुसते खेळून काढणार कारण त्यानंतर सगळाच आनंद असणार आहे हे माहित आहे ह्याचा भरपूर परीणाम होतोय.
एकंदर रोहित च्या बॅटींग वर झालेला परीणाम नि त्याची कप्तान म्हणून देहबोली पण भयंकर निराशाजनक वाटतेय. - मला माहित असते तर फिक्स नसते का केले ? अजून काय वेगळे होणार वगैरे भाषा रुमाल (किंवा रोहित साठी टॉवेल) टाकल्याचे लक्षण वाटतात . होप हे फक्त आयपील पुरतेच मर्यादित राहील
कॅपिटल बॉलिंग चा एकदम कोअर
कॅपिटल बॉलिंग चा एकदम कोअर डंप झाला शेवटच्या चार ओव्हर्स मधे .
गेल्या वर्षीही धोनीने एक
गेल्या वर्षीही धोनीने एक फिनिश केलेला. दिल्ली विरुद्ध. आणि त्याला मारायला शॉर्ट बॉल दिलेले. तेव्हा सुद्धा मी ईथे येऊन त्या सामन्याला स्क्रिप्टेड म्हटलेले
पण ते सोयीने विसरायचे
असो, ज्या मॅच संशयास्पद वाटतात त्यांनाच मी हे म्हणतो. ज्या नाही वाटत त्यातील फिनिशरचे कौतुकच करतो. काल उनाडकट घाबरलेला तरी जीवतोड मेहनत करत होता. यॉर्कर ठिकाणेपे टाकत होता. पण त्याच्या दुर्दैवाने समोर धोनी होता.
बाकी ज्याची ईण्टरनॅशन सामन्यात विनिंगचेस करताना १००+ सरासरी आहे त्याला काय सिद्ध करायची गरज आहे.. २०११ चा वर्ल्डकप आणला आहे त्याच्या जबर्रदस्त फिनिशर खेळीने
तुम्ही लोकं हिंदी कॉमेंटरी नाही ऐकत का. तिथेही धोनी एके धोनीचे गुणगाण चालू असते. अगदी आजही हॅंगओवर उतरला नाहीये त्यांचा
शेवटचे चार? अख्ख्या २० मध्ये
शेवटचे चार? अख्ख्या २० मध्ये बटलर आणि पडिक्कल सुद्धा कोणालाच एकला /बधला नाही. सब्को ठोका!
रोहितचा सध्याचा फॉर्म पाहून
रोहितचा सध्याचा फॉर्म पाहून आणि त्याची आनाकलनीय कप्तानी पाहून गल्ली करंडक पण तो मिळवू शकणार नाही.देशाला एका नव्या कॅप्टनची गरज आहे. वर्ल्ड कप निवडताना IPL हा निकष लावला तर रोहित आणि विराट दोघेही बाहेर.
बटलरला बघून त्याने आडनाव बुचर करून घ्यावं. येऊन गोलंदाजांची कत्तल करत असतो.
ह्या वेळी बटलर आयपिएल गोट
ह्या वेळी बटलर आयपिएल गोट असणार बहुतेक. कैच्या कै फॉर्म!
बाकी आयपिएल मध्ये कोणी कितीही चांगलं खेळलं तरी शेवटी जेव्हा देशा करता खेळतात तेव्हा ते एक युनिट म्हणून कसं काम करेल, त्यांचे जेलिंग, मोराल कसे आहे त्यावरुन ओवरॉल टीमचा फोर्म ठरतो. त्यामुळेच कॅप्टन कोण हा फार मोठा मुद्दा आहे. धोनी समहाऊ नीट करायचा मॅनेज. कोहलीत ते टेंपरामेंट, स्कील मला तरी नाही वाटली. रोहितची स्टाईल माहित नाही. इथलं जाणकार पब्लिक कोणाला वोट करेल भारताचा कॅप्टन म्हणून? ५० आणि २० फॉर्मॅट ला?
बाकी वॉर्नरचा गेम पण बहरत आहे. आज शॉ आणि तो टिकले तर काही सांगता येत नाही.
ो. काल उनाडकट घाबरलेला तरी
ो. काल उनाडकट घाबरलेला तरी जीवतोड मेहनत करत होता. यॉर्कर ठिकाणेपे टाकत होता. >> हिंदी कॉमेंट्री बरोबर अल्टरनेट जगामधली मॅच दाखवतात का ?
17.2 Unadkat to Pretorius, SIX runs
what a shot! Full ball outside leg at 128 kph, Pretorius reaches out and flicks this cross-seam ball flat and fine over long-leg well over the rope.
१७.४ Unadkat to Dhoni, FOUR runs
Dhoni turning back the clock! Length ball angled across seventh stump, Dhoni reaches out to drive through cover and slashes this high over short third man backspinning away to the rope.
१९.३ Unadkat to Dhoni, SIX runs
in the slot on fifth stump and over the ropes at long-off! Unadkat gets the length terribly wrong at 127 kph with a cross seam delivery, Dhoni shows no mercy punishing him down the ground.
१९.४ Unadkat to Dhoni, FOUR runs
slower bouncer goes wrong now! Rohit pulls his cap over his eyes! Unadkat bangs this in on leg stump at 120 kph, Dhoni shuffles well across and flicks a pull very deftly over fine leg, one bounce over the rope.
१९.६ यॉर्कर होता. धोनी ने उनाडकट्च्या चूकांचा पुरेपूर फायदा उठवला एव्हढेच म्हटल्याने धोनीच्या खेळीची किम्मत कमी होते का ?
बुवा पूर्ण मॅचभर ठोकलेच हो पण शेवटच्या चार ओव्हर्स मधे वाईड, आउट साईड ऑफ वर लेंग्थ बॉल्स, फूल टॉस चा कहर सुरू होता .
"पण धोनी गेल्या सीझनपेक्षा
"पण धोनी गेल्या सीझनपेक्षा चांगला खेळतोय हे नक्की आहे. कदाचित कसलेच टेंशन नाहीये ह्याचा परीणाम असेल." - हो, हे खरंय. he has nothing to lose हे त्याच्या खेळात जाणवतंय.
"अख्ख्या २० मध्ये बटलर आणि पडिक्कल सुद्धा कोणालाच एकला /बधला नाही." - एकदम स्ट्रॅटेजिक अॅटॅक होता. शार्दूलची एक ओव्हर मेडन होती आणि खलील च्या एका ओव्हरमधे ३ च रन्स काढले होते हे लक्षात सुद्धा येणार नाही स्कोअरबोर्डकडे बघून.
"तुम्ही लोकं हिंदी कॉमेंटरी
"तुम्ही लोकं हिंदी कॉमेंटरी नाही ऐकत का. तिथेही धोनी एके धोनीचे गुणगाण चालू असते." - नाही. त्यापेक्षा टीव्ही म्यूट करून मॅच बघेन मी. अत्यंत उथळपणा चालतो हिंदी कॉमेंट्रीत. कट्ट्यावरचे मित्र मॅच बघताना गप्पा मारतायत असं वाटतं. मला तर इंग्लिश कॉमेंट्रीतसुद्धा मुरली कार्तिक वगैरे कंटाळवाणे वाटतात. ते 'सनी जी' वगैरे (गावसकर च्या G श्लेश करत आणि रिस्पेक्ट म्हणून 'जी' चं काँबिनेशन) खूप cheesy वाटतं. किंबहूना ती व्यक्तिपूजा उबग आणणारी आहे.
"धोनी ने उनाडकट्च्या चूकांचा
"धोनी ने उनाडकट्च्या चूकांचा पुरेपूर फायदा उठवला एव्हढेच म्हटल्याने धोनीच्या खेळीची किम्मत कमी होते का ?" - यू नेल्ड इट!
"तुम्ही लोकं हिंदी कॉमेंटरी
"तुम्ही लोकं हिंदी कॉमेंटरी नाही ऐकत का. तिथेही धोनी एके धोनीचे गुणगाण चालू असते." - नाही. त्यापेक्षा टीव्ही म्यूट करून मॅच बघेन मी. अत्यंत उथळपणा चालतो हिंदी कॉमेंट्रीत.>>>>>> अग्री! सब्स्टन्स आणि नॅचरली फ्लोईंग अशी कॉमेंटरी नसते कधीच. आजिबात एंजॉय नाही करत मी हिंदी कॉमेंटरी.
शॉ, सर्फराज आणि पंत - यह
शॉ, सर्फराज आणि पंत - यह दिल्लीवाले अपने प्लेयस को कौन चक्की का पीसा आटा (बटर चिकन, बटर नान, रबडी) खिलाते हैं रे?
बुवा पूर्ण मॅचभर ठोकलेच हो पण
बुवा पूर्ण मॅचभर ठोकलेच हो पण शेवटच्या चार ओव्हर्स मधे वाईड, आउट साईड ऑफ वर लेंग्थ बॉल्स, फूल टॉस चा कहर सुरू होता>>> ओके ओके.
काय गावठीपणा लावलाय रियॉन पराग नी!
फेकी बॉलिंग. एकदम मस्त प्रसाद दिला पंत नी त्या बॉल वर. साजेसा.
Pages