Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57

आयपीएल २०२२ आली आहे हो!
२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>हरताना टेंपरामेंट समजेल
>>हरताना टेंपरामेंट समजेल Happy
तेही आहेच म्हणा!!
गुजरात लायन्स तिनात तीन सामने
गुजरात लायन्स तिनात तीन सामने जिंकले होते. आज एक सामना हरले. पहिल्या चारातही नाहीत.
आयुष्य सुद्धा आयपीएलसारखेच असते. कश्यालाही गृहीत धरू नका..
शुभरात्री !
एकदम थंड आज धागा? कालच्या मॅच
एकदम थंड आज धागा? कालच्या मॅच मधे एक दोन भन्नाट कॅचेस व एक दोन तितकेच गलथान ड्रॉप्स होते
दिनेश कार्तिक ला वर खेळायला
दिनेश कार्तिक ला वर खेळायला कधी पाठवणार...
खरंय.. कार्तिक मॅक्सवेल जोडी
खरंय.. कार्तिक मॅक्सवेल जोडी मिडल ओवरला एकत्र खेळली असती तर कदाचित बघता बघता सामना पलटला असता.
कोहलीची ती चेस करतानाची जिंकण्याची भूक हरवलीय हे आज पुन्हा जाणवले.
शिवम दुबे कात टाकतोय असे जे गेले काही सामने जाणवत होते त्यावर त्याने आज शिक्कामोर्तब केले.
शेवटी मात्र हातातल्या कॅच सोडणे. उगाच वाईडची खैरात करणे. मग त्यात लेग साईड वाईडही होते. फुलटॉस टाकणे. कार्तिकही फुलटॉसवरच बाद झाला. मिडऑफ आत ठेऊन बॉल पुढे टाकणे वगैरे बरेच प्रकार सामना जमेल तितका. क्लोज नेऊ यातले वाटले.
धोनीच फिल्डिंग सेट करत होता..
धोनीच फिल्डिंग सेट करत होता...
धोनी तर मास्टर आहे यात
धोनी तर मास्टर आहे यात
पुन्हा एकदा मुंबई पराभवाच्या
पुन्हा एकदा मुंबई पराभवाच्या छायेत , पहिल्या ६ ओव्हर्स मध्येच सामना गमावला आहे.
मयांकला स्पिन खेळताना बघणे
मयांकला स्पिन खेळताना बघणे हा एक मस्त अनुभव असतो.
मुंबई आज चेस करेल हा स्कोअर
मुंबई आज चेस करेल हा स्कोअर असे वाटतेय
किशनचा एखादा दिवस असतो तसे झाले तर एक ओवर राखूनही जिंकेल.
अन्यथा चेस करताना मिडल ओवरला विकेट फेकत गेम हरते मुंबई. ते आज सांभाळायला हवे. तिथे सुर्या महत्वाचा. तसेच पोलार्ड पॉवर सुद्धा दिसू शकते या पिचवर.. मुंबई फलंदाजांना आवडेल असा पिच आहे. आज नाही तर कधीच नाही..
ब्रेविस शो सुरू झाला.. ४६६६६
ब्रेविस शो सुरू झाला.. ४६६६६ .. वाट लावली राहुल चहरची..
समोर तिलक वर्मा आहेच.. दोघे फ्युचर आहेत मुंबई ईंडियन्सचे..
मुंबई पहिले स्थान सोडत नाही..
मुंबई पहिले स्थान सोडत नाही.. शेवटून पहिले..
उडाले MI.
उडाले MI.
मुंबई ला टीम मध्ये बदल करायची
मुंबई ला टीम मध्ये बदल करायची गरज आहे.. आधी कॅप्टन बदल...
मुंबई ला टीम मध्ये बदल करायची
मुंबई ला टीम मध्ये बदल करायची गरज आहे.. आधी कॅप्टन बदल... >> मुंबई मध्ये ४ फलन्दाज , ५ गोलंदाज आणि २(पोलार्ड , किशन) टीम भरायला असे खेळाडू असल्यावर पराजयाचा सातत्य असणारच.
मुंबई बरोबर भारतीय टीम चा पण कॅप्टन बदला.
ते पोलार्ड ला खेळवलंच पाहीजे
ते पोलार्ड ला खेळवलंच पाहीजे असं काही काँट्रॅक्च्युअल अॅग्रीमेंट आहे का मुंबईचं? गेले काही मॅचेस तो लायेबिलिटी ठरतोय. परत उनाडकट आणि थंपी आहेतच मार खायला. उनाडकटला कसं आणि का घेतात टीम्स?? केवळ स्टॅटिस्टीक्स म्हणून एक लेफ्ट आर्मर घेतला जातो त्या मधे उनाडकट, खलील अहमद ह्यांचा नंबर लागतो.
आजची दोन्ही रन-आऊट्स स्कूल लेव्हल च्या चूका होत्या. अगदीच अनावश्यक विकेट्स टाकल्या मुंबईने.
आजची दोन्ही रन-आऊट्स स्कूल
आजची दोन्ही रन-आऊट्स स्कूल लेव्हल च्या चूका होत्या. >> अशक्य प्रकार होते दोन्ही. शेवटचा क्रमांक का आहे ते अश्या क्षुल्लक चूकांमधून कळतंय. ब्रेवीस काय खल्लास खेळत होता आज. सूर्या चे पॉईंटच्या आसपास मारलेले दोन सिक्स नेत्रदीपक होते. मुंबईची शेपूट पांद्या बंधू नि बोल्ट नसल्यामूले जास्तच लांब वाटते.
उनाडकत हेर असेल अक्रमचा!
उनाडकत हेर असेल अक्रमचा! पानिपतच्या युध्दात..! - भाबुकाका खरे
जोक्स अपार्ट, २०१०च्या
जोक्स अपार्ट, २०१०च्या सुमारास अक्रमने उनाडकतचं जे गुणगान गायलं होतं (त्या बळावर त्याला तेव्हा टेस्ट डेब्युही मिळाला की काय असं वाटावं इतपत) तेव्हापासूनच मला ही शंका आहे की नक्की मामला काय आहे?!
पोलार्ड पासून मुंबईच शेपूट
पोलार्ड पासून मुंबईच शेपूट चालू होत , एक पण अष्टपैलू खेळाडू नाही आहे. एका वर १४ कोटी घालण्या पेक्षा ५-५-४ कोटीचे ३ अष्टपैलू आले असते.
“ उनाडकत हेर असेल अक्रमचा!
“ उनाडकत हेर असेल अक्रमचा! पानिपतच्या युध्दात..! - भाबुकाका खरे” - भा,
एक सीझन आयपीएल, एक अंडर-१९ आणि एक रणजी सीझन गाजवलेला उनाडकट वन टाईम वंडर आहे (त्याला ‘उनो’डकट का म्हणू नये?
)
पोलार्डच्या जागी फेबियन अॅलन ला एक संधी देता येईल मुंबईला. पण यंदा गोडाऊन सुद्धा रिकामंच आहे.
भाबुकाका खरे >> आता समजा
भाबुकाका खरे >>
आता समजा आर्चर असता तरी फरक पडला असता का ? दोन भारतीय बॉल्र्स तेच राहणार होते ना.
मुंबईची टीम ईतकी वीक तर
मुंबईची टीम ईतकी वीक तर बिलकुलच नाही जितके पॉईंट टेबल दर्शवतेय. बरेच मॅच विनर आहेत त्यांच्यात फक्त दुर्दैवाने बॉलिंगमध्ये एकच आहे.
भले ते गेले पाच सामने समोरच्या टीमला दोन दोन पॉईंट वाटत आहेत. तरीही अशी परीस्थिती नाही की सामन्याच्या आधीच समोरची टीम आपले दोन पॉईंट गृहीत धरेल.
मुंबई मागे पडू लागली की सोशलसाईटवर घमासान चालू होते कारण मुंबई चॅम्पियन टीम आहे. तिचे समर्थकही करोडो आहेत आणि सुप्त विरोधकही लाखो आहेत. त्यामुळे काय चुकतेय, कोणाला काढायला पाहिजे, कोणाला घ्यायला पाहिजे, कोण आहे मॅच का मुजरीम अशी चर्चा दर पराभवानंतर रंगते.
पण मला वाटते थोडे कॉम्बिनेशन गंडतेय, थोडा फॉर्म, थोडे बॅडलक आणि विनिंग मोमेंटम नसणे अश्या काही गोष्टी आहेत. पण हे प्रॉब्लेम ईतकेही नाहीत की मुंबईचे आता काय होणार याची चिंता पडावी.
याआधीही मुंबईच्या नेहमीच्या चॅम्पियन टीमने असे दिवस पाहिले आहेत. पण नुकतेच मेगा ऑक्शन झाले असल्याने ते कोणालाही चटकन नजरेत येणारे कारण बनलेय.
तरी मला वाटते काही फारसे जगावेगळे न करताही याच स्पर्धेत मुंबई तीनचार सामने सलग जिंकेल आणि तेव्हाही सोशलसाईटवर अशीच हिरीरीने मुंबईच्या यशावर चर्चा चालत राहील असे वाटते..
बरं किती सामने हरल्या नंतर तो
बरं किती सामने हरल्या नंतर तो संघ वीक आहे असे ठरवायचे ह्याचा मापदंड शेअर कराल का ? मेगा ऑक्शन सगळ्या संघांसाठी होते. मुंबई ने चार प्लेयर रीटेनही केले होते. किशन नि आर्चर च्या नादात डोमेस्टीक प्लेयर्स चा योग्य पॅक नि बॅकप उचलला गेला नाही हे उघड दिसते आहे. मुंबई नि चेन्नई ह्या दोनच टीम्स आहेत ज्या लेगी खेळवत नाहीयेत नि दोन्ही तळाला आहेत.
असे अडचणीत आणणारे प्रश्न
असे अडचणीत आणणारे प्रश्न विचारणं फाऊल आहे रे असामी. दोन्हीकडून बोलून संभ्रम निर्माण करून मुद्दा भरकटवता यायला हवा.
आज गुजराथ ने सॉलिड बॅटींग केलीय. शामी, रशीद, फर्ग्युसन समोर टारगेट चेस करणं राजस्थानसाठी चॅलेंजिंग असणार आहे.
बरं किती सामने हरल्या नंतर तो
बरं किती सामने हरल्या नंतर तो संघ वीक आहे असे ठरवायचे ह्याचा मापदंड शेअर कराल का ?
>>>>
मापदंड लावायचे झाल्यास मुंबईचा पाच टाईम चॅम्पियन संघ या आधीही पाच सामने सलग हरला आहे. तेव्हा तो वीक होता म्हणावे का?
जर मुंबै या पाचातले दोन तीन सामने जिंकला असता तर चर्चा वेगळी असती. जे शक्य होते त्यांना काही चुका टाळून जिंकणे. म्हणजे अगदी पहिलाच दिल्लीचा सामना हातात होता. तोच जिंकला असता तर आत्मविश्वासही वेगळा असता.
मुंबई नि चेन्नई ह्या दोनच
मुंबई नि चेन्नई ह्या दोनच टीम्स आहेत ज्या लेगी खेळवत नाहीयेत नि दोन्ही तळाला आहेत.
>>>>
मुंबई चेन्नई दोघांमध्ये मिळूनच नऊ कप आहेत ना.
आणि मुरुगन आश्विनला काय म्हणता येईल?
आज आर आश्विन तिसरा आलाय ...
आज आर आश्विन तिसरा आलाय ... आणि ही पोस्ट लिहिता लिहिताच राशीद खानला सिक्स मारला आहे
बहुधा विजय शंकर तिसरा येऊ शकतो तर मी का नाही असा हट्ट केला असावा त्याने
मापदंड लावायचे झाल्यास
मापदंड लावायचे झाल्यास मुंबईचा पाच टाईम चॅम्पियन संघ या आधीही पाच सामने सलग हरला आहे. तेव्हा तो वीक होता म्हणावे का? >> ते एकदा झाले आहे फक्त २०१४ किंवा २०१५ मधे. तो संघ नि आत्ताच संघ ह्यात तुला काय साम्य वाटते कि ह्या पाच नंतर बाजी पलटवतील ह्याचा विश्वास आहे ? अपवादाने नियम सिद्ध करू बघण्याचा आटापिटा का ? ते दोन सामने जिंकू शकले असते वगैरे ला शेवटी फायनल फोर ठरवताना धरणार आहेत का ? माझ्या मापदंडाच्या प्रश्नाचे उत्तर उलट प्रश्न न विचारता सरळ देऊ शकशील का ? देता येत नसेल उत्तर उघड आहे.
मुरुगन आश्विन ला लेग स्पिनर आहे नि मर्कंडे पण आहे. पण ते दोघेही चहर, बिश्नोई, चाल वगैरेच्या आसपास आहेत असे तुला का वाटते ?
अश्विनला बॅटींगमधे राजस्थान
अश्विनला बॅटींगमधे राजस्थान फ्लोटर म्हणून मस्त वापरतायत. आज जमून नाही आलं पण आयडिया चांगली आहे.
बटलर गेला. आज संजूला त्याची स्पेशल इनिंग खेळायला हवी. - गेला संजू
अनावश्यक रन-आऊट!!
Pages