आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धोनी, रोहित किंवा पंत असलेले सामने तर जास्त फिक्स होतात Happy
मुळात माझी प्लेअरबद्दल तक्रारच नाहीये. व्यावसायिक खेळाडू आहेत ते आणि देशासाठी नाही तर फ्रॅंचायजीसाठी खेळत आहेत.

गेले काही सीजन हे संशयास्पद प्रकार जास्त वाढलेले दिसताहेत. टीआरपीसाठी चुरशीचे सामने गरजेचे असतात. आजच बातमी वाचलेली की आयपीएल टीआरपी या आठवड्यात ३३ टक्के घसरला वगैरे.
गंदा है पर धंदा आहे. असा सामना गरजेचा होताच.
ईंटरनॅशनल बघताना जी आपली म्हणजे प्रेक्षकांची फिलींग असते ती आयपीएलबाबत असू शकत नाही. त्यासाठी शर्मा कोहली धोनी वगैरे ग्रूप करून. आवडीचे नावडीचे प्लेअर बनवून वाद घातले तरच आपण कुठेतरी त्यात जोडले जातो. आणि मग सोबत असे सो कॉल्ड थरारक सामने Happy

आता लोकं म्हणतील, ठरवून दोन बॉल दोन सिक्स मारायला देणे आणि मारणे हे स्क्रिप्टेड करणे सोपे नाही.

पण तीच तर मजा आहे. मारायला आधीपासून देतात. जेव्हा बसतील तेव्हा बसतील. अन्यथा नो वाईडची खैरातही वाटतात. आणि ईतके करूनही नाही बसले तर नाही बसले. लागला रिझल्ट वेगळा. सामना थरारक हमखास

पन्न संघांचे खेळाडू, कोचेस, सपोर्ट स्टाफ वगैरे मिळून १०० एक लोकांना लीक होउ न देता 'फिक्स' करायला किती मॅनेजमेंट लागेल ह्याचा विचार करा सर नि त्यांना सगळे निवांतपणे मॅनेज करता येईल असे बघा की.

सगळे सामने फिक्स होत नाहीत. वा त्यातही पुर्ण सामना फिक्स होत नाही. गिलची खेळी गिलचीच खेळी होती. सर्वांगसुंदर. त्याच्या पहिल्या दोन ओवरलाच जो त्याने टच दाखवला तेव्हाच त्याचे कौतुक केलेले. पुर्ण सामन्याला स्क्रिप्टेड म्हणून त्याचे श्रेय कसे हिरावून घेऊ शकतो मी Happy

असो, ज्याचे त्याचे निरीक्षण. मतभेद असणारच. निर्णाययक क्षणी नो बॉल टाकत फ्री हिट देणाऱ्या, फुलटॉस, लेगला वा स्लॉटमध्ये सातत्याने बॉलिंग करणाऱ्या, जिथे फिल्डर नाही तिथे बॉल टाकणाऱ्या, बाऊंडरीवर आत बाहेर उड्या मारत कॅच झेलायची क्षमता असणारे तरीही मोक्याला हातातले झेल सोडणाऱ्या, बॉल कलेक्ट करूनही रन आऊट करायचे टाळणाऱ्या सर्वांनाच माझा नमस्कार. शुभरात्री Happy

सगळे सामने फिक्स होत नाहीत. वा त्यातही पुर्ण सामना फिक्स होत नाही. >> हे खरय सर , म्हणजे तुम्ही त्यांचे धोतर खेचून काढणार पण अंगातल्या बंड्या ठेवणार म्हणजे श्रेयाचे श्रेय पण राहते नि अपश्रेय पण मिरवता येते. मान गये आपकी पारखी नजर और पारखी अंदाज को.

पण गिलनेही रंगतदार करायलाच विकेट फेकली असेल. ९०+ करणाऱ्याला १०० करता येणार नाही आणि मोक्याच्या वेळेस बॉल्स घालवून विकेट जाते हेही स्क्रिप्टेडच असणार.

पण गिलनेही रंगतदार करायलाच विकेट फेकली असेल. ९०+ करणाऱ्याला १०० करता येणार नाही आणि मोक्याच्या वेळेस बॉल्स घालवून विकेट जाते हेही स्क्रिप्टेडच असणार. >> तेही ज्युसी फुल टॉस वर - नि एकमेव फिल्डर शोधून त्यालाच कॅच दिला. तोही कप्तान. म्हणजे सगळ्यांच्या आशा पालवल्या. परत हार्दिक नेही तसेच केले एकदम. एकदम कडक शॉट्स मारता मारता चक्क ग्लव्ह्स घालून फेकलेल्या थ्रोवर रन आऊट झाला. ( धोनी सुद्धा असे थ्रो करत नाही - बॉल नि स्टंपपण फिक्स्ड असतील का ?) .

काय असामी आणि भा तुम्ही बोलताय? अरे नुसते स्टंप्स आणि बेल्स च काय, समुद्रावरून येणारे (खारे कि मतलई?) वारे सुद्धा ह्या फिक्सिंगमधे सहभागी असतात. तो रबाडाच्या हातात येणारा बॉल नाही का ऐन मोक्याच्या वेळी swirl झाला? तो काय उगाचच नाही झाला काही. सर नेमकं ओळखतात सगळं.

अरे कुडं लोड घेता मित्रहो. Happy
मी आधी गिलचे ५० झाले तो पर्यंत साईडला बघत होतो अन नंतर कॉल सुरु झाले. थोड्या वेळानी येउन पाहतो तर गिल ९२ अन १३ बॉल ३५ रन असं काहीसं एक्वेशन. म्हणलं हे तर अवघड करुन ठेवलं. मी आपलं बघायचं म्हणून बघत बसलो सहज अन जब्बरी धमाका! आय मीन, कमेंटेटर लोकं पण जरा सरसावून बसले पंड्या गेला अन टेवाटिया आला तेव्हा.
Don’t know who the commentator was but he was like, oh! Look whose come to the pitch! It’s Tewatiyaa! Who knows what he can do!
अन भौ सुरु झाला ना आल्या आल्या! What a treat it was to watch him. Thank goodness I was watching live!

स्टायरीस किंव सायमन डूल होता का ? तेवाटिया आल्या आल्या त्याने त्याने पंजाब किंग च्याच वेस्ट इंडीअयन बॉलर ला च कसे ४ सिक्स मारले होते ते आठवून सांगितले.

येस येस. सायमन डूल, स्टायरिस आणि भोगले होते आधी. तेव्हा तो मँगो संवाद झाला. नंतर भोगले जाऊ गावस्कर आला. तो म्हणाला की टेवाटिया पंजाब किंग्स च्या वेस्ट इंडियन बॉलरांचे काय हाल करतो दर वेळेस.

मला शंका आहे की सलमानने दारू पिऊन माणसे चिरडली.
पण पुरावा नसल्याने सिद्ध करू शकत नाही.
त्यामुळे जर कोणी म्हणाले की अपने भाई ने कुच नये किया तर हो बोलण्यावाचून पर्याय नाही Happy

असो,
या सिक्सवरून एक रोचक फॅक्ट आठवले.
आयपीएलमध्ये विसाव्या ओवरच्या लास्ट बॉलला सिक्स मारून जिंकवून द्यायचा पराक्रम रोहीत शर्माने सर्वाधिक ३ वेळा केला आहे जेव्हा तो मागे खेळायला यायचा.

ईंटरनॅशनल सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध सुपर ओवर मध्ये त्याने २ बॉल १० धावा हव्या असताना दोन सिक्स मारून सामना संपवलेला.
तो ईथे बघू शकता.

https://youtu.be/PJutG613i7E

साऊदी बॉलर होता.

धन्यवाद लिंक करता. एक नंबर!

बाय द वे, परवा सुर्यकुमारची सिक्स पाहिली क? ९८ मिटर! स्मॅक इन द मिडल ऑफ द बॅट! it felt like a dynamite went off his bat and propelled the ball to kingdom come!

काल तेवाटियाने दोन सिक्स मारल्यावरच वाटलेले की आज फिक्सिंगच्या पोस्टी पडणार आणि अर्थात अपेक्षाभंग झाला नाही Happy

साड्डा कुत्ता कुत्ता, त्वाड्डा कुत्ता टॉमी!! तेवातियाने किया तो फिक्सिंग, रोहित शर्मा ने किया तो रेकॉर्ड!! ए साहेब, यह जुल्म ना कर!! Happy

रोहीत शर्माचे तीन तीन लास्ट बॉल सिक्स फिनिश देताच आता यात फिक्सिंग नव्हती का हा मुद्दा येणे साहजिकच आहे.
तर असूही शकते. नसूही शकते. बघायला हवे ते सामने. जुनी गोष्ट आहे जेव्हा शर्मा मागे यायचा. हल्ली या संशयास्पद गोष्टी जास्त घडू लागल्या आहेत.

म्हणून मी ईंटरनॅशनल २०-२० मध्येही त्याने न्यूझीलंडला कसे २ बॉल १० हवे असताना दोन सिक्स मारले हे दिले आहेत. हिटमॅन नाव ऊगाच नाही.

अर्थात, आता हे मी सुद्धा म्हणू शकतो की रोहीत शर्मा नावडता असल्याने त्याच्या या कामगिरीचे कौतुकच नाही... पण मी असे म्हणणार नाही. क्रिकेटमध्ये आवडीचे नावडीचे खेळाडू असणे हे फार कॉमन आहे. यात काही गैर नाही Happy

अरे काय रोहित शर्मा .. संपला तो.. आता दुकान बंद त्याचे...
>>>>

अहो च्रप्स, आता जे काही असो त्याने आधीचे केलेले विक्रम बदलतात का? की त्यावर बोलायचेच नाहीत का?

आणि आता तर कप्तानीचे दुकान ऊघडलेय त्याचे ईंटरनॅशनलमध्ये. कैक सलग विजयांचा विक्रम केला आहे त्याने. नुसते क्लीन स्वीप चालू आहेत. अजून पराभवाची चव चाखली नाही त्याने. दुकान बंद कुठे करत आहात त्याचे..

स्लो सुरवात. ट्रायिंग टू मच असं वाटतय रायडूची बॅटिंग बघून. फ्री फ्लो नाही शॉट्स मध्ये.
खत्तरनाक बॉल नट्राजनचा! गायकवाड्ला खरं अवघड नव्हता एरवी खेळायला तसा बॉल. पण भस्स्कन गेट मधून गेला राव!
मोईन लूझन अप होतोय पण भौ आजिबात पाय हलवत नाही. शॉट छान बसतात पण ते दोन्ही पाय इतके जवळ बघून आपल्यालाच भिती वाटते. Lol स्कील आहे पण असे चोरट्या अंगानी शॉट मारणे!

“ रोहीत शर्मा नावडता असल्याने त्याच्या या कामगिरीचे कौतुकच नाही” - भगवद्गीतेत स्थितप्रज्ञाचं वर्णन करताना पाण्यात राहून ओलं न होणार्या कमळपत्राचं उदाहरण दिलंय. सरांचं काही वेगळं नाही. ते स्वतःला काही लावून घेत माहीत. त्यांच्या मताला विरोध म्हणजे डायरेक्ट रोहित शर्मा, धोनी, पंत वगैरे खेळाडूंविषयी नावड असं समीकरण मांडून ते समोरच्यालाच कानकोंडलं करतात आणि स्वतः नामानिराळे रहातात.

मी एक शर्मा नाव घेतले
धोनी पंत कसे आले आपल्या पोस्टमध्ये Happy
पंत खरे तर कोणाचा नावडता असणे अशक्यच आहे.. ईतका चुम्मा प्लेअर आहे

चेन्नईचा चौकार
धोनीच्या चपलेत पाय घालणे सोपे नाही हे जडेजाला आता समजले असेल..

ती चप्पल फाटली असल्याची कल्पना आल्यामुळेच धोनीने पाय काढून घेतला (ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट सिरीजमधे केलं तसं) अशी सोशल मिडीयावर एक वदंता आहे सर. आपलं काही म्हणणं नाही बुवा. पण म्हटलं सरांपर्यंत मसलत पोहोचवावी. Happy

“ धोनी पंत कसे आले आपल्या पोस्टमध्ये” - सर, खरं तर शाहरूख, स्वप्निल, सई वगैरे पण लिहिणार होतो, म्हणजे ऑल-इन्क्ल्युझिव्ह पोस्ट झाली असती. पण मोह आवरला. Happy

ती चप्पल फाटली असल्याची कल्पना आल्यामुळेच
>>>>

गेल्यावेळचे विजेते होते धोनीच्या कप्तानीत
अचानक चप्पल फाटली?

गेल्यावेळचे विजेते होते धोनीच्या कप्तानीत
अचानक चप्पल फाटली?
>>>+ 1
काही चप्पल फाटली नाहीय... टीम तगडी आहे पण कॅप्टन धोनी नाहीय त्यामुळे...

मुंबई दोन ओवरसीज प्लेअरवर आली
बेंगलोरमध्ये मॅक्सवेल आलाय
बेंगलोर चेस करतेय.
मुंबईचे गोलंदाज त्यांच्या फलंदाजीला नाही रोखू शकत.
मुंबई चेन्नई भाऊ भाऊ ४-०, ४-० होणार वाटते.

“ गेल्यावेळचे विजेते होते धोनीच्या कप्तानीत
अचानक चप्पल फाटली?” - सोशल मिडीयावरच्या लोकांच्या तोंडाला कुणी लागावं? पण त्यांचा असा दावा आहे कि ऑक्शनमधे टीम दुबळी झाली, महत्वाचे खेळाडू इंज्युअर्ड झाले आणि धोनी दृष्टा असल्यामुळे त्याने काळाची पावलं ओळखत काढता पाय घेतला.

मुळात धोनी असतानाच जडेजाला कप्तान बनवावे जेणेकरून तो कप्तान म्हणून तयार होताना त्याला सपोर्ट मिळेल असा चेन्नई मॅनेजमेंटचा हेतू असावा.
पण जडेजा स्वत:च दबावात वाटतोय. सामने हरतोय तसे दबाव वाढतोय. ते त्याच्या वैयक्तिक कामगिरीतही दिसतेय.
कितीही नाही म्हटले तरी धोनीने जे वैभव दाखवलेय ते राखणे अवघडच आहे आणि चाहतेही ती तुलना करणारच.

सोशल मिडीयावरच्या लोकांच्या तोंडाला कुणी लागावं?
>>>

फेरफटका +७८६ याबाबत एकदम सहमत..

चेन्नई चॅम्पियन टीम आहे. जितके चाहते आहेत तितके जळणारेही तयार होणारच..

भारतातर्फेही तिन्ही प्रकारचे आयसीसी चषक जिंकणारा धोनी एकमेवच.. ना त्या आधीच्या कोणाला एकही जिंकता आला ना त्याच्या नंतर अजून जिंकलो आहोत.
तेच त्याने आयपीएलमध्येही राखले..
संघ कोणताही असो.. धोनीचे यश नशीबानेच आहे असे म्हणणाऱ्यांची तोंडे तो आपल्या कामगिरीनेच बंद करत आलाय.

Pages