आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुनी गोष्ट आहे जेव्हा शर्मा मागे यायचा. हल्ली या संशयास्पद गोष्टी जास्त घडू लागल्या आहेत. >> सर, आपल्या ह्या अवताराच्या आधीच्या युगातली गोष्ट आहे. हॅन्सी क्रोनिये, गिब्स, प्रभाकर, अजय जडेजा वगैरे लोक होते म्हणे संशयास्पद गोष्टींमधे. शर्मा तेंव्हा डायपर मधे फिरत असेल.

पण पुरावा नसल्याने सिद्ध करू शकत नाही. >> ह्या मर्त्य जगात पुरावा देण्याची जबाबदारी आरोप (पक्षी : फिक्सिंग चा) करणार्‍यावर असते. 'मला वाटले - माझे मत - ज्याचे त्याचे निरीक्षण ' ह्याला नाही - आपण सर झालात तरी.

पुरावा देण्याची जबाबदारी आरोप (पक्षी : फिक्सिंग चा) करणार्‍यावर असते. 'मला वाटले
>>>

धन्यवाद.
फक्त धोनीशर्माबद्दल चालतात काहीही आरोप Happy

मुंबई
६ ओवर ४९-०
१० ओवर ६२-४
>>> मस्त... आता पटापट ऑल आऊट होऊन जाऊ दे...

"आधीच बॉलिंग वीक.. त्यात फलंदाजांनी हे असे केले" >> हे फिक्सिंग असावे असे सरांना वाटतेय का अशी एक बाळबोध शंका माझ्या मनाला चाटून गेली एव्हढेच.

छे. मला जेव्हा फिक्सींगची शंका येते ती मी बोलून दाखवतो सरळ. कोड्यात बोलत नाही. की सोशलसाईटवर लोकं असे म्हणतात वगैरे आधार वापरत नाही Happy

६२-५ चे ७९-६ झाले
सुर्या खेळतोय.. तो स्कोअर लावणार बोर्डावर.. ईज्जत वाचवणारा

ती मी बोलून दाखवतो सरळ. >> हे बाकी बरोबर आहे हो सर. पुरावा, लॉजिक, विरोधाभास अशा गोष्टींच्या मागे मर्त्य लोक असतात. आपले काय - आले मनात, टाईपले जनात.

की हेही नुसतं थरारक बनवण्यासाठी?
>>>
असू शकते
अन्यथा नाव घेऊन पुरावा द्यायला हवा.
अन्यथा ईतके वर्षांनी हे बोलण्यात पॉईट काय..

पोलार्ड असणार. एवढी ताकद कोणाकडे आहे? की हेही नुसतं थरारक बनवण्यासाठी? > मलाही तसेच वाटले कारण दुसर्‍या प्रसंगामधे त्याने रीटायर्ड प्लेयर्स ची नावे घेतली आहेत.

स्कायचा स्लिप च्या डोक्यावरून मारलेला शॉट भन्नाट होता . तेव्हढीच शेवटची ओव्हर.

सेहवागने ट्वीट करत लिहिले होते की, “दारूच्या नशेत चहलसोबत हे कृत्य करणाऱ्या खेळाडूचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. खरे असेल तर तो विनोद मानता येणार नाही. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काय झाले आणि काय कारवाई झाली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.”
मात्र, काही वेळानंतर त्याने आपले ट्वीट डिलीट केले.

“ सोशलसाईटवर लोकं असे म्हणतात वगैरे आधार वापरत नाही” - ह्याला म्हणतात नीरक्षीरविवेक!! सरांचे कित्येक धागे ‘आमच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रूप वर अमूक वाचलं‘, ‘फेसबूकवर तमूक पोस्ट्स आहेत‘ वगैरे गोष्टींनी मढलेले असतानासुद्धा असं विधान करणं मर्त्य लोकांच्या कपॅसिटीतल्या गोष्टी नाहीत

“ ना त्या आधीच्या कोणाला एकही जिंकता आला ना त्याच्या नंतर अजून जिंकलो आहोत”. - नशीब असतं एकेकाचं सर! धोनीच्या आधीच्या कॅप्टन्स च्या काळात टी-२० वर्ल्डकप नव्हता (१९९८ च्या आधीच्या कॅप्टन्स साठी तर चँपियन्स ट्रॉफी पण नव्हती). चँपियन्स ट्रॉफी मध्यंतरी डिसकंटिन्यू झाली होती.

ह्यामुळे धोनीचं यश झाकोळलं जात नसलं तरी इतर कॅप्टन्सचं अपयश सुद्धा म्हणता येत नाही. (पण तरी तुमचंच म्हणणं खरं आहे सर! जळतात लोकं)

कोहलीला आता बऱ्याच वेळा हातातून स्पिन वाचता येत नाही, ही काळजीची बाब आहे, असं वाटतं.

आजच्या दोन्ही सामन्यातील योगायोग

१) चेन्नई मुंबई दोन्ही दिग्गज संघ आपला सलग चौथा सामना हरले

२) दोघे टॉस हरले आणि पहिली फलंदाजी करावी लागली.

३) दोघांनी सुरुवात चांगली केली पण मिडल ऑर्डर कोसळली. पुन्हा सावरून साधारण दिडशे धावा केल्या.

४) चेस करताना प्रतिस्पर्धी संघातील भारतीय ओपनर्सनी म्हणजे अभिषेक शर्मा आणि अनुज रावत यांनी आपल्या आयपीएल करीअरमधील पहिले अर्धशतक मारले. दोघे डावखुरे होते.

५) त्यांचा सलामीचा जोडीदार विल्यमसन आणि फाफ डुप्लेसी या विदेशी दिग्गज उजव्या हाताच्या खेळाडूंनी मात्र संथ खेळी केली.

६) त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेले भारतीय खेळाडू अनुक्रमे त्रिपाठी आणि कोहली यांनी मात्र फटकेबाजी करत विजय सोपा केला.

७) अर्धशतक मारणारे सलामीवीर बाद झाले आणि चौथ्या क्रमांकावर निकोलस पूरन आणि दिनेश कार्तिक हे विकेटकीपर खेळायला आले.

८) अखेरीस दोन्ही संघ आरामात अनुक्रमे ८ आणि ७ विकेटने जिंकले. शेवटचा ८-८ विकेटने जिंकायचा योगायोग थर्ड अंपायरने संशयाचा फायदा कोहलीला न देता चुकवला.

आय पि एल आहे की WWF? Lol

हासारंगा इंग्लिश बोलताना रडतो आता असं वाटत होतं. Lol

स्कोअर आजिबातच ईनफ नव्हता. मस्त खेळला रावत अन कोहलीला थोडा सुर गवसला. जीवदान होतच एक.

बाकी सुर्या अक्षरशः वाया चाललाय.
Craps, it was very close and at one point it felt the ball deflected after hitting the bat but when the third umpire tried to zero in by rocking and rolling it was really difficult to determine. I think the umpire did the best he could.
I didn’t appreciate Kohli’s outrage though. Needs to mature up! He’s already at the tail end of his career so it’s a shame he still does that. It’s not passion, it’s downright immature.

बाकी सुर्या अक्षरशः वाया चाललाय. >> त्याचा एकंदर फॉर्म बघता तो तीन वर खेळणे जरुरी आहे. किशन ने पूर्ण इनिंग खेळायची नि रोहित ने सुरूवातीपासून सुटायचे असा एकंदार डावपेच दिसतोय. पण परत किशन पेस असेल तर आस्त चांगला फटकावतो हेही आहेच. मूलात बॉलिंग चा पूर्ण बोर्‍या वाजला असताना काय फरक पडणार आहे म्हणा दोनशे केले तरी.

किशन ने पूर्ण इनिंग खेळायची नि रोहित ने सुरूवातीपासून सुटायचे असा एकंदार डावपेच दिसतोय. >>> आणि तो गेम एक्सायटींग करायचा डावपेच? त्याचं काय?

'मुंबई रनरेटमुळे 10 ऐवजी 9व्या क्रमांकांवर राहिली म्हणून रोहित शर्मा व मुंबैचे पाठिराखे उत्साहित ' , हें वाचून हंसू आलं !!
फक्त हायलाईटसच पाहिले. रावत खूपच बरा वाटला.

मुंबईचे लिलावातच गंडलेले बॉलिंग युनिट आणि त्यांचा मैदानावरचा परफॉर्मन्स पाहता हि सर्व अर्जुन तेंडुलकरला खेळवायची चाल वाटतेय Happy

चुम्मा चुकीच्या वेळी बाद झाला
तो बाद झाला तेव्हा १२.५ ओवर १४८-२ झालेले.
आता २०० झाले तरी पुरे असे वाटतेय..

पृथ्वी शॉला चक्रवर्तीने चकवले तेव्हाच कलकत्ता आता फिरकीचे जाळे विनणार असे वाटलेले. पण चुम्मा पुढे येणे चांगली चाल होती. तो आला आणि चक्रवर्तीच्या ओवरला पहिल्या बॉलला सिक्स दुसऱ्याला रिव्हर्स स्वीप फोर मारून त्याच्यावर दबाव टाकला. स्पिनर बंदच झालेले. कमिन्सलाही समोर सिक्स मारून गाब्बाची आठवण करून दिलेली. समोर वॉर्नर होताच. कलकत्याचे ऑप्शन संपलेले. बॉलर दबावात होते. पण आता फलंदाज दबावात गेलेत..

तिन्ही वेळा चुम्मा ऑफच्या बाहेर शॉर्ट आणि एक्स्ट्रा बाऊन्स मिळालेल्या बॉलवर बाद झाला आहे .. पुढच्यावेळी तिथे काय होते हे बघणे रोचक राहील

Pages