आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मॅच सुरू झाल्या-झाल्या, पॉवरप्ले संपायच्या आधी पहिला प्रतिसादः पृथ्वी शॉ ने फिटनेस सुधारायला हवा. त्याचं हँड-आय कोऑर्डिनेशन, नेत्रदीपक शॉट्स वगैरे वेल-डॉक्युमेंटेड आहेत, पण फिटनेस व्हिजिबली अंडर-पार आहे. वॉर्नर बरोबर धावताना तर ते अधिकच जाणवतंय.

शॉ गेला ६१ मारून
६७-१
वॉर्नर ४ वर खेळतोय. जर त्याने या सीजनला ॲंकर रोल निभावला तर त्याभोवती बाकीची मंडळी मारू शकतात...

पोस्ट टाईप करतानाच वॉर्नर गेला.. बिश्नोईचा गिर्हाईक??

अग्री फेफा. एकदम रणतुंगाच्या दिशेनी चालला आहे शॉ Lol वय तसं कमी आहे आणि भरपूर पुढे जाता येइल. फिटनेस सारखी गोष्ट जी एकदम सोपी आहे मॅनेज करायला, त्यात हयगय करायला नको त्यानी.

गेला! पॉवेल पण गेला. जबरी बॉलिंग बिश्नोई!

"एकदम रणतुंगाच्या दिशेनी चालला आहे शॉ" Happy हो ना.

"फिटनेस सारखी गोष्ट जी एकदम सोपी आहे मॅनेज करायला, त्यात हयगय करायला नको त्यानी." - सहमत

पंत स्पिनसमोर अगदीच बावचळतोय.

हो ना! एकंदरितच चाचपडत खेळणं सुरु आहे. सरफराझ पण मोठ्या हिव्स करतोय पण बॉल जातच नाहीये लांब. हे लोक मुद्दाम हळू टाकात आहेत. चांगली आहे स्ट्रॅटजी.

शॉ, पंत आणि सर्फराझकडे पाहून असं वाटतंय की दिल्ली कॅपिटल्स च्या मेन्यूवर बहूदा छोले-भटुरे, बटर चिकन, बटर नान वगैरे पदार्थ असावेत. Happy

लखनौ ची बॅटींग पहाता १५० चं टारगेट फारसं अवघड नसावं. पण दिल्ली ची बॉलिंग स्ट्राँग आहे. We may have a game at our hands.

शॉ, पंत आणि सर्फराझकडे पाहून असं वाटतंय की दिल्ली कॅपिटल्स च्या मेन्यूवर बहूदा छोले-भटुरे, बटर चिकन, बटर नान वगैरे पदार्थ असावेत. >>>>> Lol

ग्राऊंड मध्ये एक्स्ट्रा दव असेल तर आता जायंट्सना पण त्रास होईल. सुरवातीला बॉल नवीन आहे तेव्हाच काही तरी करता येइल. बघू आता.

त्याच धर्तीवर असे म्हणता येईल का की अनुक्रमे ५ आणि ४ आयपीएल जिंकलेल्या धोनी आणि शर्मापेक्षा जास्त आपल्याला कळते का >> सर "आपल्याला" मधे "आपण" असल्यामूळे नक्कीच उत्तर हो असे देता येईल. फक्त "तुला" असे मला उद्देशून म्हणाला असता तर "नाही" असे होईल. Wink

अग्री फेफा. एकदम रणतुंगाच्या दिशेनी चालला आहे शॉ >> Happy त्याला काही तरी मेडीकल प्रॉब्लेम आहे असे म्हणाला होता.

पण दिल्ली ची बॉलिंग स्ट्राँग आहे. >> डी कॉक ला सांगितले नाहि रे कोणी Happy

ओह! हो का असामी? मला नव्हत माहित.
बाकी बोअर सुरु आहे मॅच. आता राहूल गेला तेव्हा काहीतरी "झालं" एकदाचं Lol

आई शप्पत! बडोनी! एक नंबर पोर्‍या आहे! आता बघा, सगळे नुसते हापसत होते केव्हाचे. ह्यानी पाहिले का? दोन कडक शॉट! सोसाटत बाऊंड्रीच्या पार! तुफान टायमिंग!

क्रेडिट टू बिश्नोई! भारी केली बॉलिंग.

त्याला नकार दिला असेल तर मग सहाजिक आहे. हिर्‍याची पारख नव्हती म्हणावं त्यांना. Happy

गेला! धवन गेला. लिविंग्स्टन हय अभी लेकिन.

आज लिविंगस्टनने पुन्हा क्लीन हिटींग दाखवली.
१९० चे टारगेट आहे
पण शुभमन गिल पुन्हा सुरू झालाय. दोन ओवरमध्येच आपला फॉर्म आणि क्लास दाखवणारे काही फटके मारले.
हा सीजन शुभमन गिलच्या करीअरचा टर्निंग पॉईंट ठरेल असे वाटतेय.. गिल ईज द फ्युचर असे बरेच वेळा म्हणून झालेय. टॅलेंट परफॉर्मन्समध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरुवात झालीय असे वाटते.

असामी Lol

काय खाललं रे बाबा सुदर्शन आज? Lol

हा सीजन शुभमन गिलच्या करीअरचा टर्निंग पॉईंट ठरेल असे वाटतेय.. गिल ईज द फ्युचर असे बरेच वेळा म्हणून झालेय. टॅलेंट परफॉर्मन्समध्ये कन्व्हर्ट व्हायला सुरुवात झालीय असे वाटते. >> +१ टॅलेंट परफॉर्मन्समध्ये कन्व्हर्ट होत होता फक्त सातत्य नव्हते असे म्हणू शकतो.

सुदर्शन लय कडक शॉत मारतो, पहिलाच हुक कसला खतरा होता. कानफटात मारल्यासारखा. तमिलनाडू लीग मधे एव्हढा गाजावाजा का झाला होता ते दिसतेय.

तेवाटीया जोषात, पंजाब कोमात Lol स्मिथ ला कॉमन सेन्से कमी पडला. पांड्या नक्कीमिलर ला काय सांगत होता ? तो क्रीज मधेच राहायला हवे होते ? गिल साठी मस्त वाटले नि मयांक साठी वाईट वाटले.

अर्शदीप लुकडा दिसतो पण बॉलिंग जोषात करतो. स्पीडी वाटतो.

तिवातिया ने जिंकण्याइतकीच ओडेन स्मिथ ने घालवली मॅच. तो नॉन-स्ट्रायकर एण्ड ला केलेला थ्रो अगदीच अनावश्यक होता... absolutely amateur's mistake!

"अर्शदीप लुकडा दिसतो पण बॉलिंग जोषात करतो. स्पीडी वाटतो." - स्मार्ट बॉलर!! रबाडाच्या पहिल्या २ बॉल्स नंतर तो जाऊन रबाडाला काहीतरी सांगत होता. मस्त वाटलं ते बघायला.

स्क्रिप्टेड असेल का?

१२ बॉल ३२ हवे असताना रबाडा नो बॉल टाकतो तिथेच शंकेची पाल मनात चुकचुकलेली. (आदल्या ओवरला त्याने पांड्याची कॅचही सोडलेली)
मग पाठोपाठ दोन फुलटॉस आणि पांड्याचे दोन फोर..
गिलला सुद्धा फुलटॉस दिलेला. पण दमलेल्या गिलने कॅच काढून दिली..

३ बॉल १३ हवे असताना मिलरचा शॉट बॉलरच्या हातात आला. गरज नसताना त्याने थ्रो करून २ बॉल १३ होणारे ईक्वेशन २ बॉल १२ केले.. आणि बूम बूम .. दोन सिमिलर बॉल स्लॉटमध्ये दोन सिक्स !

त्यातला एक सिक्सही फिल्डरला वाचवता आला असता असे वाटले. बॉल हाताला लागलेला. आत ढकलायचा होता. पुन्हा बघावे लागेल.

रबाडाने नो बॉल टाकला तिथेच मी वरची पोस्ट लिहायला घेतलेली. एक निरीक्षण असे आहे की बरेचदा फिल्डींग करणारे हातातली कॅच सोडून वा अटीतटीच्या वेळी नो बॉलसारखा अपराध करून समोरच्या टीमला जणू सिग्नल देतात. ज्या लाईन लेंथला बॉलिंग करायची किमान अक्कल अर्शदीपला आहे ती ईंटरनॅशनल खेळाडूंना नाही.
कदाचित हे खोटेही असेल. पण आयपीएलवरचा विश्वास तसा उठलाच आहे. सवयीने बघणे होते Happy

येस. हर्षदिप मस्त फायर करत होता यॉर्कर्स. जमू नव्हता देत मारायला. रबाडा पण मॅनेज करत होता. स्मिथ ला पुरता ओळखला मात्र टेवाटियानी. कसला भारी क्रिकेटिंग ब्रेन आहे! आधीच ऑफ ला सरकला आणि दिला भिरकावून!

कदाचित हे खोटेही असेल. पण आयपीएलवरचा विश्वास तसा उठलाच आहे. सवयीने बघणे होते >> धोनी, रोहित किंवा पंत ह्या मॅच नसल्यामूळे मॅच फिक्स होती असे म्हणायला पूर्ण वाव आहे सर.

स्मिथ ला पुरता ओळखला मात्र टेवाटियानी. कसला भारी क्रिकेटिंग ब्रेन आहे! आधीच ऑफ ला सरकला आणि दिला भिरकावून! >> स्मिथ वाइड ऑफ स्टंपवर मारा करत होता नि जनरल पंजाबची तीच लाईन होती असे वाटले.

Pages