आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"बटलर हेटमायर असूनही धावगती मंदावलेली कारण मागे कोणी नाही." - ते दोघं जपून खेळत असल्यामुळे रनरेट स्लो झाला नव्हता. त्यांना मोठे शॉट्स खेळता येत नव्हते. बटलर नंतर म्हणाला तसं पीच शेवटी शेवटी शॉट्स खेळण्यासाठी अनुकूल झालं. आधी बॉल पीचवरून निघत नव्हता म्हणून मोठे शॉट्स बसत नव्हते (त्यांचे प्रयत्न चालू होते). तेव्हाच त्याने दवामुळे पीच अधिकाधिक सोपं होत जाईल अशी शक्यता वर्तवली होती.

अश्विन चा आज ऑफ-डे होता, पण परवा मुंबईविरूद्ध तलक वर्माची मॅच टर्निंग विकेट त्यानेच काढली होती.

एनी-वे.. वेल-डन आरसीबी! कार्थिक, शाहबाझ मस्त खेळले. कार्थिक २००+ आयपीएल मॅचेसमधे फक्त एक मॅच खेळला नाहीये (पहिल्या सीझनला, दिल्लीकडून) असं आज कॉमेंटेटर्स सांगत होते. काय जबरदस्त रेकॉर्ड आहे!

आधी बॉल पीचवरून निघत नव्हता म्हणून मोठे शॉट्स बसत नव्हते (त्यांचे प्रयत्न चालू होते).
>>>>

मॅच पाहिली नाही. त्यामुळे याबद्दल नेमके माहीत नाही. पण तरी बटलर हेटमायरमागे कोणी नव्हते हे फॅक्ट बदलत नाही. त्यामुळे प्रयत्न करतानाही एक्स्ट्रा रिस्क टाळणे हे स्वाभाविकपणे होतेच. माईंड गेम आहे क्रिकेट. आपल्यामागे कोणी नाही हे डोक्यात येतेच. चेस करायची वेळ येईल तेव्हा आणखी अवघड होईल. आता तरी ठिक आहे. पण हे असे कॉम्बिनेशन घेऊन कोणी नॉक आऊट सामन्यात ऊतरणे रिस्कीच आहे.

त्याऊलट बॅंगलोरला आज बॅटींग्ग डेप्थ कामात आली. शेवटी सहा विकेट गेल्या तरी मागे हसरंगा शिल्लक होता.

“ मॅच पाहिली नाही. त्यामुळे याबद्दल नेमके माहीत नाही. पण तरी बटलर हेटमायरमागे कोणी नव्हते हे फॅक्ट बदलत नाही. ” - बटलर - हेटमायर नंतर रियान पराग होता. पण तो मुद्दा नाहीये. रनरेट मंदावण्यामागे त्यांचा इंटेंट नाही तर पीच आणि आरसीबीची बॉलिंग कारणीभूत होती.

राजस्थान ने काँबिनेशन चेंज करावं आणि निशम / ड्युसेन / डॅरेल मिचेल ला खेळवावं रियान परागच्या ऐवजी.

अजुन एखादी मॅच फेल गेला तर यशस्वीला पण बसवावे; पडीक्कल ला ओपनिंग ला आणावे आणि रस्सी वॅन डर ह्युसेन ला खेळवून बघावे!!

किंवा रियान परागच्या ऐवजी नीशम किंवा मॅकॉयला खेळवावे!!

मुम्बई ला डीप फाईन लेग किंवा थर्ड मॅन ला फिल्डर लावायला बंदी आहे का ? किती वेळा तिथे मिस हिट गेल्यावर फिल्डर लावणार ?

मुम्बई ला डीप फाईन लेग किंवा थर्ड मॅन ला फिल्डर लावायला बंदी आहे का ? किती वेळा तिथे मिस हिट गेल्यावर फिल्डर लावणार ? >>>

हे विचारून तू आता काय येईल ते टॅकल करायची तयारी ठेव. Proud

हे विचारून तू आता काय येईल ते टॅकल करायची तयारी ठेव >> रोहित ला सगळी पापे माफ आहेत रे बाबा Wink

आज च्या सॅम नि मिल्स च्या बॉलिंग नंतर पण मुंबई ने सिलेक्शन ब्लंडर केले ह्या माझ्या मताला अजून बळकटी मिळत चालली आहे. सूर्या आल्याने मूळात बॅटींग चा नसलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. बॉलिंग चे काय होणार ? पुढच्या वर्षीची वाट पाहायची बहुधा.

कमिन्स एकदम जबरदस्त खेळला. प्रत्येक चुकीचा पुरेपूर फायदा घेतला.

कमिन्सने न मारता रसेलनेच मारले असते तर बरे झाले असते. उगाच आशा लावली आणि जेवण लांबवले...

असो,
यंदा ८ च्या १० टीम झाल्या असल्याने मुंबई चेन्नईला तीन-तीन सामने हरून कमबॅक अवघड वाटत आहे.

त्यामुळे या आयपीएल अखेरीस शर्मा ५ आणि धोनी ४ हे आकडे कायम राहणार असे वाटत आहे!

चुम्मा १ झाला तर मजा येईल. त्यांची स्ट्रेंथ वाढेल आता ओवरसीज प्लेअर येताच..

या आयपीएल अखेरीस शर्मा ५ आणि धोनी ४ हे आकडे कायम राहणार असे वाटत आहे! >>

ॲज अ कॅप्टन म्हणायचं असेल तर धोनी ते जिंकले तरी ४वरच राहील (सध्यापुरतं बघता तरी). ॲज अ प्लेयर म्हणायचं असेल तर शर्माच्या ६ आहेत.

तो तर रिटेन्ड होता ना? >> प्लेयिंग ११ मधे म्हणतोय रे. बेसिकली बॅटींग चा फारसा लोचा मूळातच नव्हता (मी रोहित खेळेल असे धरून म्हणतोय)

ॲज अ कॅप्टन म्हणायचं असेल तर...>>> हो ॲज ए कॅप्टनच म्हणत आहे. खरे तर धोनीचा उल्लेख करायची गरज नव्हती. कारण धोनीने कप्तानी सोडलीय. पण साला विश्वासच बसत नाही. धोनी म्हटले की चेन्नई आणि चेन्नई म्हटले की धोनी हे समीकरण फिट्ट आहे डोक्यात. त्यामुळे खरे तर मुंबई आणि चेन्नई बोलले असते वरच्या वाक्यात तर ते योग्य राहिले असते. पण धोनीसारखेच शर्मानेच मुंबईला सर्व ट्रॉफी मिळवून दिल्याने मुंबई म्हटले की शर्माच तोंडात येते.

पण येस्स ॲज ए प्लेअर शर्मा सहा आहे. आणि कमाल म्हणजे सहा फायनल सहाच्या सहा विजेता आहे हे विशेष.

अवघड काम केलं आज कमिंग्स नी. आला काय अन मॅच संपवली काय! खरं छान करत होते बॉलिंग इंडियन्स. शॉर्ट टाकत होते पण इतका पण नाही की तडाखा लावता येइल. रोहित, अय्यर (बहुतेक) आणि रसेल तसेच आउट झाले. अजून एक कोणीतरी तसाच शॉट मारला आणि कॅच आउट होता होता राहिला. कमिंग्स आल्यवर त्याने फटके लावून ह्यांची लाईन लेंत बिघडवली की कसं मला काहीच कळलं नाही. वादळच आलं जणू! खेळ खलास करुन गेलं! की दवामुळे काहीच होत नव्हतं बॉलचं? असं म्हणून क्रेडिट काढु नाही शकत खरं त्याचं. शेवटी इतके शॉट फ्लॉलेस बसले त्याचे. कमाल कमाल!

वैद्यबुवा +७८६
हो शॉर्ट ऑफ गूड लेंथचाच पिच होता. एक्स्ट्रा बाऊन्स आणि पेस. दिल्लीलाही गेल्यावेळी फर्ग्युसनने याच लेंथवर हरवलेले.
पण बहुधा बॉल जुना होता होता ती जान निघून गेली. त्यात कमिन्सचा अभ्यासही करून आले नसावे असे वाटले. प्लान बी दिसलाच नाही वा तो सुचायच्या समजायच्या आधीच सामना आटोपला.
कमिन्स स्पिनरला क्लीन हिटींग करतो वा करू शकला असता का कल्पना नाही पण मुरुगन आश्विनला त्याला बाद करायची संधी मिळायला हवी होती.

कमिन्सची हाईट चेक केली तर १.९२ मीटर दाखवत आहेत..

असो.. चला रात गयी बात गयी.. लवकर झोपूया.. उद्या आपल्या चुम्माचा सामना आहे.. शुभरात्री Happy

"आला काय अन मॅच संपवली काय!" - त्याची मॅच संपल्यावरची रिअ‍ॅक्शन मस्त होती. "I am more surprised [with that innings]! It just came off."

I think Cummins surprised everyone, including himself

फेफा Lol हे मी नाही बघितलं. सगळे शॉट्स मिडल ऑफ द बॅट होते. होपफुली हा फॉर्म पकडून राहिल तो. मला वाटतं स्कोअर जर चांगला केला पुढे केकेआर नी तर त्याला पुढेही पाठवतील अशी हिटिंग करायला. काय माहित कॅप्टन साहेब काय करतील.
बाकी रोहितचं नोट केलं का? दर वेळी काहीतरी चांगली विकेट निघाली की तो काहीतरी "म्हणलो होतो ना? म्हणलो होतो ना?" अशा टाईपचे हातवारे करतो. ह्यात खरच त्यानी सांगितलेलं असतं म्हणून बॉलरनी मुद्दाम काही केलेलं असतं की हा बळच आपलं....? Lol

मुरुगन आश्विनला त्याला बाद करायची संधी मिळायला हवी होती.>>>>> किंवा संधी निर्माण करायला हवी होती पण मुर्गन काय किंवा इतर कोणी काय, तो कोणालाच एकत नव्हता आज.

अशा टाईपचे हातवारे करतो. ह्यात खरच त्यानी सांगितलेलं असतं म्हणून बॉलरनी मुद्दाम काही केलेलं असतं की हा बळच आपलं....? >> बुवा रोहित बॉलर चे क्रेडीट लाटायला बघतो आहे असे म्हणता आहात का ? Lol

कमिन्स स्पिनरला क्लीन हिटींग करतो वा करू शकला असता का कल्पना नाही पण मुरुगन आश्विनला त्याला बाद करायची संधी मिळायला हवी होती. >> पण आधीच्या वाक्यानंतर पुढच्या वाक्याला खरच अर्थ आहे का ? अश्विन ला ज्या तर्‍हेने फुल लेंग्थ बॉल ला रसेल ने मारले तसेच शॉट्स कमिन्स खेळत होता असे नाहि वाटले ? त्याचे हिट्स एव्हढे क्लीन होते कि स्पिन समोर काही फरक पडला असता का ? परत समोर अय्यर होता जो स्पिन ला कःपदार्थ समजतो. नुसता स्ट्राईक रोटेट करून अय्यर ला स्पिन ला मारायला देता आले असते. मुरुगन अश्विन म्हण्जे रशिद खान किंवा सुनिल नरेन नाहिये कि हुकुमी विकेट घेईल ह्याची खात्री देता येते.

रोहित ( नि धोनी) ला इथे सगळी पापे माफ आहेत रे बुवा , नाहितर एकदम सगळे झोपलेले जागे होतात नि मायबोलीचा लोड वाढवतात. Wink

त्याचे हिट्स एव्हढे क्लीन होते कि स्पिन समोर काही फरक पडला असता का ?
>>>>>>

का नाही? मुरुगन दोन्ही बाजूला बॉल वळवतो, गुगली टाकतो. जर कमिन्सकडे बॉल कुठे वळतोय हे पिक करायची कला नसेल आणि तरीही मारायला गेला असता तर नक्कीच फसला असता.

फार लांब कश्याला जा.. आपलाच पोलार्ड घ्या. असेच क्लीन हिट फटकेबाजी तो सुद्धा करतो. कामचलाऊ फिरकीलाही धोपटतो. पण तेच दर्जेदार फिरकी गोलंदाज आले की त्याला बॉल कुठे वळणार हे कळत नाही. भले रिक्वायर्ड रनरेट १२ चा का असेना तो १५ चा होऊ देतो पण त्या स्पिनरला ईज्जत देत डॉट बॉल खेळून काढतो.

आता कमिन्सची टेकनिक कशी आहे स्पिनरसमोर हे मला माहीत नाही असे वर लिहिले आहे. कारण कोण कश्याला फॉलो करतेय त्याची फलंदाजी. पण त्याचे स्टॅटस चेक केले. ईंटरनॅशनल २०-२०, वन डे आणि कसोटीत त्याची सरासरी अनुक्रमे साडेसात, पावणे दहा आणि सतरा आहे. याचा अर्थ तो क्लीन हिटर असला तरी एखाद्या मॅक्सवेलसारखा प्रॉपर फलंदाज नाहीये. स्पिनरसमोर त्याला क्लीन हिटींग जमतही नसावी. वा फारशी टेस्टही झाली नसावी. कारण स्लॉग ओवरमध्ये फलंदाजीला येतो जिथे वेगवान गोलंदाजीच जास्त खेळला असेल.

बाकी वेगवान गोलंदाजांना क्लीन फटकेबाजी करणारे कैक टॉप ऑर्डर फलंदाजही पाहिले आहेत जे स्पिनसमोर गडबडतात. एक क्रिस लिन चटकन आठवणारा...

असामी Lol

एखाद्या प्लेयरचा एखादा दिवस असतो. त्या दिवशी तो हात लावेल त्याचं सोनं होतं. चुका सुद्धा मास्टरस्ट्रोक ठरतात. आजचा दिवस कमिन्स चा होता.

रोहित ( नि धोनी) ला इथे सगळी पापे माफ आहेत रे
>>>>

मागे एका चर्चेदरम्यान तुम्ही म्हणालेलात की गावस्करपेक्षा जास्त क्रिकेट आपल्याला कळते का?
त्याच धर्तीवर असे म्हणता येईल का की अनुक्रमे ५ आणि ४ आयपीएल जिंकलेल्या धोनी आणि शर्मापेक्षा जास्त आपल्याला कळते का Happy

Pages