मास्कमुक्त महाराष्ट्र ! कोरोनाचे सारे निर्बंध हटवले.

Submitted by ऋन्मेऽऽष on 31 March, 2022 - 11:33

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रीमंडळाने गुढी पाडव्यापासून अर्थात २ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही
https://www.loksatta.com/maharashtra/corona-restrictions-removed-complet...

गोड बातमी!
आता सुटकेचा निश्वास घेता येईल
Happy

आता बिनधास्त बागडता येईल, उगाच ते मास्क कानाला, हनुवटीखाली लटकवायचे नाटक करायला नको, नो मास्क नो एंट्री बोर्ड वाचून चरफडत मास्क चढवायला नको. ऑफिसला जाताना मास्क घ्यायचे विसरले तर पुन्हा गेटवरून परत फिरायला नको, पोरांना विकेंडला फिरायला नेताना आपल्यासोबत त्यांचेही मास्क सांभाळायची झंजट नाही. अचानक शिंक आली तर घाईघाईत मास्क खाली सरकवायला नको, आता आवडीची व्यक्ती समोर दिसली तर तिलाही आपण दिसावे म्हणून ऐनवेळी मास्क बाजूला सारायला नको. एकमेकांना दिसत राहूया. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकारचा निर्णय झालेला असला तरी शारूक सरांचे यावर काय म्हणणे आहे हे पाहून मास्क लावायचा कि नाही ते ठरवूयात.

शारूक सर हे जागरूक सेलेब्रिटी असल्याने त्यांनी मास्क लावला नाही तर कोरोना गेला असे बिनधास्त समजावे. पण त्यांनी मास्क लावला तर आपण न लावणे बरं दिसणार नाही.

अरे काय प्रत्येक धाग्यावर शारूक !
उद्या केंद्र शासनाने बंधन काढत खुले मे शौच कीजिए असं आबाहन केलं तर तुम्ही सर गेले कि नाही खुले मे हे हुंगत फिरणार का ?

सोन्याचं टॉयलेट ?
तुमच़ काय सांगता येत नाही. साफ करायला जात असाल तर खरं असेल !

असेही आधीही कोण इतकं पाळत होतं
>>>>

आधी काही लोकं पाळायचे, काही नाही. त्यामुळे माझ्यासारख्या ज्यांना पाळायची ईच्छा नव्हती त्यांचे अवघड व्हायचे. समोरच्याने कायदा दाखवताच नाईलाजाने पाळावे लागायचे. म्हणजे मी तरी तसे करायचो. कायदा आहे तर उद्दामपणे मी नाही मास्क घालत काय करायचे ते कर असे समोरच्याला सुनवावे असा स्वभाव नाही. माझ्यासारखा स्वभाव आणि प्रॉब्लेम असलेले सर्वच या निर्णयाने खुश झाले असतील. जरा रात्री फुरसत मिळाली की लिस्ट च काढतो या मास्कने किती छळले होते ते Happy

जागोजागचे सॅनिटाईझर फवारणी आणि टेंपरेचर चेकींग ह्या प्रक्रिया धार्मिक विधींसारख्या झाल्या होत्या..!! उद्देश हरवून गेलेल्या पूर्णपणे निरर्थक प्रक्रिया..!!
मास्क वगैरेही कोविडपासून वाचण्यासाठी कमी, हवालदारांपासून वाचण्यासाठीच जास्त होते..! कोण फुकटच्या फाकट शंभर दोनशेचा झब्बू लावून घेणार..!! Happy
पण आता अधिकृतरित्या हे सगळं बंद झालं, हे बरंय..

मास्क चे बंधन सरकार नी काढले असले तरी मास्क वापरणे हा गुन्हा आहे असे आदेश दिलेले नाहीत.
ट्रेन किंवा बाकी गर्दी च्या ठिकाणी असंख्य रोगांनी ग्रस्त लोक असतात.
मुंबई मध्ये पूर्ण देशातील लोक जमा आहेत

कोणाला tb असेल किंवा कोणाला बाकी कोणता तेरी दुसरा संसर्ग जन्य रोग असेल .
मी तरी कायम स्वरुपी गर्दी मध्ये मास्क वापरणार च.

भारत ही संतांची आणि जंतांची भूमी आहे ... आमचे एक गुरुजी

त्यामुळे कापडी मास्क वापरून टीबी टळणार नाही

शारूक सर ऑलराऊंडर आहेत. मन्नत तर ते सोबत घेऊन फिरत नाहीत. >> या कमेण्ट मधे जी लिंक दिलेली आहे, त्यात कपिल शर्मा शो शाहरूख खानला आचरट प्रश्न विचारताना दिसतो. या प्रश्नाला उत्तर न देणे शाहरूख कानाला सहज शक्य होते. कारण ऋन्मेष सारखे बिनबुडाचे पेंदे त्याला आपला आदर्श मानतात आणि इतरांवर असे आदर्श थोपवत असतात. या प्रश्नाला बॉलिवूडच्या तथाकथित देवाने बीभत्स असे उत्तर दिले आहे. हे असे आदर्श जर कुणाचे असतील तर ती चिंतेची गोष्ट आहे. अशा वक्तव्याचा तीव्र निषेध ! तरूण पिढी जर या खानाला आपला देव मानत असेल तर सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार सुरू होतील. त्यातून रोगराई किती प्रमाणात वाढेल याची कल्पनाही करवत नाही.

अशा सेलेब्रिटीचे प्रमोशन मायबोलीसारख्या ठिकाणी केले जाऊ नये. जे करत असतील ते ही विकृत बुद्धीचे म्हणावे लागतील. जोपर्यंत हा खान आपले म्हणणे मागे घेत नाही तोपर्यंत पठाण, लायन अशा सर्व आगामी सिनेमांवर बहीष्कार !

एक मास्क लावला नाही म्हणून लास्ट मंडे ला आमच्या ऑफिसच्या एका कर्मचारीणीचे आणि बिल्डिंग लेडी सेक्युरिटी चे भांडणाचे रुंपांतर हातापायी होऊन दोघीनी एकमेकांना चांगलेच बोचकारले। ऑफिस कर्मचारिणी आपल्या पोजीशनच्या गुर्मीत उद्धट वागली आणि सिक्युरिटी आपल्या गुर्मीत।

काही दिवस मास्क वापराच.. काळजी घ्या.
मुंबई सारख्या megacity मध्ये देश विदेशातील लोक आहेत.
त्या मध्ये अनेक रोग ग्रस्त असण्याची प्रचंड शक्यता आहे

काही दिवस मास्क वापराच.. काळजी घ्या. >> स्वतःच्या आणि कुटुंबियाच्या सुरक्षेसाठी मास्क वापराच

*निरोप देतो मास्क तुला*

मास्क दादा मास्क दादा
छोटी तुझी होती जरी मूर्ती
केलेस तू असे कार्य महान
गाजली तुझी जगी किर्ती

आले जगी संकट कोरोनाचे
गेले सारे तेव्हा हादरून
अस्तित्त्वाने घेतले तुझ्या
साऱ्या जगाला सावरून

राहून तुझ्या पदराखाली
घेतला आम्ही मोकळा श्वास
रक्षिलेस आम्हां तू पदोपदी
खाऊ शकलो सुखाने घास

होती वस्त्रे किंमती कपाटात
नाही आली अजिबात कामी
द्रौपदीच्या चिंधी परि तुझा
उपाय ठरला या काळी नामी

होता तुझ्या आड लपून बसला
आमचा चेहरा असा गुपचूप
दिसले फक्त डोळे एकमेकां
भाव तयांतून कळले खूप

ढाल बनूनि रक्षिलेस तू आम्हां
नाही विसरणार कधी तुला
मोकळा श्वास घेण्याचा मार्ग
तुझ्यामुळेच झाला आज खुला

मनी ठेवून चिरंतन आठवणी
देतो आता निरोप तुजला
पाळू सारे नियम स्वच्छतेचे
तोच मार्ग आहे खरा भला

©️ छाया राजन पाडलोसकर
१ एप्रिल २०२२

काही दिवस मास्क वापराच.. काळजी घ्या
>>>>
बाकीच्यांचे माहीत नाही. पण मी तरी मास्क वापरणारच.
१) अतिगर्दीच्या ठिकाणी
२) रिक्षाने प्रवास करताना. पोल्युशनचा त्रास होऊ नये. नाकात वारा जाऊन सर्दी होऊ नये म्हणून.
३) जवळची एखादी व्यक्ती खोकताना दिसल्यास.
४) क्रिशसारखी ओळख लपवायची असल्यास

पण आता हे ऐच्छिक असेल. माझ्या मनाविरुद्ध गरज नसताना कोणी मला कायदा दाखवून दटावून मास्क घालायला लावणार नाही याचा आनंद झालाय.

अन्यथा ईथे ऑफिसला दुपारी जेवल्यावर फिरायला गेले, जवळपास कोणी नसले तरी सिक्युरीटीवाले शिट्टी मारून मास्क घालायला लावायचे. त्यांचीही काही चूक नव्हती म्हणा..

आता निर्बंध काढले तर लोक हौसेने मास्क घालुन फिरतील... Wink
जेव्हा मास्क सक्ती होती तेव्हा "मास्क ची दाढी" घालुन फिरायचे लोक....

नवीन Submitted by Ajnabi on 1 April, 2022 - 15:29>>> अजनबी , सेम टू सेम प्रसंग माझ्या ऑफिसात पण घडलाय . तुमचं ऑफिस कोणतं ?

सेम टू सेम डिटेलमध्ये न पडल्यास हा प्रसंग कॉमन असावा. माझ्याही बघण्यात बरेच आलेत.

काही लोकं तर दुसऱ्याची अक्कल काढायचे त्यांनी मास्क न घातलेले दिसल्यास. भले ते कोणाच्या अध्यातमध्यात नसेना..

हे निर्बंध हटवल्याने घरी वाद सुरू झालेत.
मला मास्क घालायचा नसतो. बायकोला अजूनही घालायचा असतो. मुलगीही घालते. आता आम्हा तिघांनाही आपली स्वतंत्र मते आहेत आणि त्यानुसार आम्ही वागतो.
प्रॉब्लेम होतो लहान पोराने मस्क घालावा की नाही. ते पालक म्हणून आम्हालाच ठरवायचे असते.
बायकोचे मत आहे, मी घालतेय तर त्यानेही घालावा. माझे मत आहे, चल हवा आन दे. तसेही तो मुलगा घरातच असतो, कुठे जातोय तर तेवढीच त्याला मोकळी हवा मिळू दे.
यावर मग काही झाले तर तू जबाबदारी घेणार आहेस का असे ऐकायला मिळते.
पण मग मायबाप सरकारनेही निर्बंध हटवलेत त्यांना कोणी विचारते का जबाबदारी कोण घेणार?
पुढची लाट पुन्हा कधी येईल कल्पना नाही. या मधल्या काळात जी छोटीशी खिडकी उघडलीय ती वापरूया ना...