आयपीएल २०२२

Submitted by भास्कराचार्य on 26 March, 2022 - 05:57
आयपीएल

आयपीएल २०२२ आली आहे हो!

२ नवीन संघ, दणक्यात झालेला लिलाव, सर्व सामने महाराष्ट्रात, धोनीने सोडलेले कप्तानपद ... होऊ द्या महाचर्चा! रंगू द्या खेळ!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यंदा आजच्या तारखेला तरी आयपीएलबद्दलची उत्सुकता कमी वाटतेय.
पहिले कारण धोनी कप्तान नाहीये. अन्यथा पाचवी ट्रॉफी मिळवतो का ही उत्सुकता पुर्ण आयपीएल राहिली असती.
दुसरे म्हणजे शर्मा भारताचा कप्तान झाल्यापासून जो विजयाचा धडाका लावलाय त्यासमोर आता त्याचे आयपीएल जिंकणे फिके वाटू लागलेय. लवकर आयपीएल संपावी आणि शर्माच्या कप्तानी ईंटरनॅशनल सामने सुरु व्हावेत असे वाटतेय.
तिसरे म्हणजे चुम्मा. त्याने आयपीएलमध्ये जीव काढण्यापेक्षा पुढच्या आंतरराष्ट्रीय महत्वाच्या सामन्यांसाठी फिट राहावे असे वाटतेय.

अर्थात हे आज वाटतेय. कदाचित आयपीएल सुरू झाल्यावर रोज सवयीनेच बघितले जातील एकूण एक सामने...

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 March, 2022 - 12:40

*.....आयपीएलबद्दलची उत्सुकता कमी वाटतेय.* -
उत्सुकता वाढेल असंही एक कारण - राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्यासाठी आधी आयपीएलमधे केलेली धडपड व राष्ट्रीय संघात स्थिरावल्यानंतरचा त्याच खेळाडूचा आयपीएल मधला आताचा खेळ, यातील बरा/वाईट फरक अभ्यासणे.

Submitted by भाऊ नमसकर on 26 March, 2022 -

शर्माबाबत हे नेहमीच वाटत आलेय की तो आयपीएलमध्ये फलंदाजी फारच कॅज्युअली करतो. मला तर हे एका अर्थी बरेच वाटते जर भारतीय संघात स्थिरावलेले आणि आपले राष्ट्रीय संघातील प्रमुख खेळाडू उगाच आयपीएलमध्ये दमछाक करून घेत नसतील तर.

पण यावेळी एक बघण्यासारखी गोष्ट असेल ती म्हणजे पंत आणि अय्यर यांच्यात कोण कप्तानीत बाजी मारते. शर्मानंतरचा कप्तान यातून निघायची शक्यता आहे. मला प्रमुख दावेदार पंत वाटतो. आवडीचा म्हणून नाही. तर गेले काही सामने शर्मासोबत जसे त्याचे बॉन्डींग जमलेय आणि तो जसे चर्चेत ईन्व्हॉल्व होऊ लागलाय हे संकेत आहेत की तो शर्मा-कोहलीसोबत तयार होतोय.
याऊपर दिल्लीच्या कप्तानीमुळेही पंत अय्यर क्लॅश आहेच. पांड्याने नवीन दुकान मांडले म्हणून शर्मा-पांड्या क्लॅश बळेच दाखवायची मार्केटींग सुरू आहे.

वा वा काढला का धागा. सालाबादप्रमाणे यंदाही सुरूवातीला कमी इंटरेस्ट व जशी स्पर्धा रंगत जाईल तसा इंटरेस्ट वाढेल असे वाटते.

आपले बॅकिंग मुंबई नेहमीप्रमाणेच.

सर्वच संघांना शुभेच्छा!!
आपला संघ राजस्थान रॉयल्स (नेहमीप्रमाणेच) Happy
चेन्नई, दिल्ली आणि मुंबई इतर आवडते संघ!!

पहिला सपोर्ट दिल्ली
दुसरा सपोर्ट मुंबई

धोनी कप्तान नसल्याने यंदा चेन्नईचा सपोर्ट काढून घेण्यात येत आहे.

धोनी चांगला खेळला..... सुरुवातीला चापडतोय असे वाटत असतानाच रसेलच्या ओव्हर मध्ये दोन बाउंड्रीज आल्या आणि एकदम धोनीचा नूरच पालटला Happy
जडेजा का कोषात गेलेला म्हणे!!

जिंकून जिंकून जिंकणार कोण ?? मुंबई शिवाय आहेच कोण ?? Proud
मुंबई नंतरचे फेव्हरीट केकेआर.. श्रेयसमुळे आणि त्यानंतर दिल्ली.. पंतमुळे.

केकेआरकडून रहाणे सलामीला.

रहाणे पण बऱ्या टचमध्ये दिसला काल..... at least त्याला संधी तरी मिळाली.!!
रहाणे धोनी उमेश यादव ब्राव्हो एकुणात जुने जाणतेच चमकले काल!!

श्रेयस पक्का कॅप्टन मटेरिअल आहे यावर शिक्कामोर्तब करणारी आणि जडेजा धोनीची लिगसी खरच पुढे चालवू शकेल का याबद्दल शंकेला वाव निर्माण करणारी होती कालची मॅच!!

मुंबई दरवेळी पहिला सामना हरते..
आज जिंकतेय कशी हा प्रश्न पडलेला. तर अक्षर पटेल आणि ललित यादव यांनी बुमराहला चोपत ३० बॉल ७५ धावांची भागीदारी केली.

बुमराहसाठी ऑफ डे असावा आज.... कदाचित सॅम्सची १८ वी ओव्हर जरा बरी पडली असती तर ओढली पण असती मुंबईने मॅच!!
पण अक्षर आणि यादव चांगलेच खेळले!!

मोठी ओव्हरसीज नावे यायच्या आत मिळालेल्या संधीचा जे नवीन प्लेयर फायदा उठवतील ते टिकतील टीममध्ये!!

फाफ कोहली आणि Dk..... कमाल बॅटींग केली सगळ्यांनीच!!
DK ने काय फिनिश केलीय इनिंग आज.... मज्जा आली!

मुंबई ला अक्षर पटेल चा सोडलेला हलवा catch फार महागात पडला.

बुमरा आणि सम्स दोघांनीही खूपच टुकार bowling केली.

मुंबई साठी जमेची बाजू म्हणजे थंपी आणि मुरुगन या दोन unknown खेळाडूंनी फार चांगली गोलंदाजी केली.

२०६ चेस झाले. ते ही आरामात.. शेवटी किती प्रेडीक्टेबल लाईन लेंथला बॉलिंग चालू होती. त्या ओडीअन स्मिथची कॅच सोडली. एक रन आऊटही सोडला. तिन्ही सामने चेस करणारा संघ जिंकला. हा पॅटर्न आता पुढच्या सामन्यात तसाच राहतो का बघायला हवे..

अरे लखनौच्या जर्सीचा कलर एकदम झटॅंग आहे Happy
खेडेगावातल्या घरांना जुन्या काळी डिस्टेंपर द्यायचे त्या कलरची आठवण आली लखनौची जर्सी बघून!!

शमीची खतरनाक बॉलींग!!!!

शामी चा पहिला स्पेल आणि शुभमन चा कॅच दोन्ही जबरदस्त होते. टेस्ट असो किंवा टी-२०, शामीची सीम पोझिशन अतिशय सुंदर असते.

खेडेगावातल्या घरांना जुन्या काळी डिस्टेंपर द्यायचे त्या कलरची आठवण आली
>>>

मी सुद्धा घरी हेच बोल्लो.. पेंटर वाटताहेत Happy

Pages