चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल रात्री लेकीसोबत चिल्लर पार्टी पाहिला. साधारण पाचव्यांदा. तितकीच धमाल आली.

आज रात्री तिच्याचसोबत जब वुई मेट पाहिला. साधारण सहाव्यांदा. तितकाच फ्रेश वाटला.

आता उद्या सकाळी उठल्यावर तिच्या आईच्या शिव्या खाव्या लागणार... कितव्यांदा त्याची गिणती नाही. पण तितक्याच सवयीच्या वाटणार Happy

बधाई दो पाहिला.
विषय छानच आहे, सगळ्यांची कामंही मस्त. ती पॅथॉलॉजिस्ट आवडली मला.
पण सिनेमा खूप लांबलचक आणि काही ठिकाणी जरा कंटाळवाणा वाटला.

हिरोच्या आईचं पात्र काही झेपलं नाही. आधी वाटलं, ती शेवटी काहीतरी ठामठोक भूमिका घेणार. पण ते ही दिसलं नाही. मग तिला आधी अशी का दाखवलीय काही कळलं नाही.
जॉइंट फॅमिलीतले काही धागे नंतर अर्धवटच राहिलेत.

आणखी क्रिस्प असता तर बघायला आणखी मजा आली असती.

काल बघाई दो पहिला
अमाप बोर आहे
म्हणजे अधे मध्ये ठीक आहे पण अगदीच स्टीरिओ टाईप रोल आहेत सगळ्यांचे
एका साच्यात बसवलेले
कन्फ्युज आई, एकदम प्रेमळ समजुतदार, प्रोग्रेसिव्ह बाबा, संशयी नातेवाईक
सगळं जसं च्या तसं अन्य सिनेमात होत
तोच पुढे चालू असावा अशी शंका यावी इतपत कॉपी आहे

अरे मला कुणी सान्गाल का की इथे ' काश्मीर फाईल' सिनेमाचा धागा होता तो कुठे गायब झाला?

अय्यो कसा व का उडाला ? तिथे शेवटी मी , डिजे, झंप्या, गांधी, सावरकर, मोदी आणी नेहेरु पण नव्हते. Uhoh

तिथे शेवटी मी , डिजे, झंप्या, गांधी, सावरकर, मोदी आणी नेहेरु पण नव्हते.>>> म्हणूनच उडाला असेल, राजकारणाच्या धाग्यावार विषयाला धरुन चर्चा चालु असेल तर तो फाउल पकडला असेल अ‍ॅड्मिननी.smiley2.gif

कुणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या मार्गी यांच्या आयुष्यात प्रथमच असे काही घडले असेल Happy

पण असे विषय घेऊन धागे का काढायचे? खेळाडू पण तेच. मजकूर पण तोच. डीरब्लॅभसिंआवज 1 असे नाव द्यायचे. यात ज्यांची आद्याक्षरे आहेत त्यांनी लगेच उडी घ्यायची. हेडर मधे फक्त हो जा शुरू इतकेच असावे.
पोस्टी कॉपी पेस्ट करत धडाधड सुरू.
मी तर म्हणतो कि मायबोलीने असा प्रोग्राम बनवावा की हे विशिष्ट सदस्य सध्या ज्या कुठल्या नावाने असतील, त्या नावाने आपोआप पोस्टी पडाव्यात आणि आजवरचे आल्गोरिदम पाहून कुणाच्या नंतर कुणाचे काय उत्तर येईल हे सेट करून ठेवावे.
2000 पौस्ट झाल्या कि पुढचा आकडा लावून आपोआप नवीन धागा यावा.
ब्लॉक पण आपोआप आणि नवीन आयडी पण आपोआप.

चिकवाला दिवस राहिले म्हणून मी बधाई दो चा वेगळा बाफ काढला व धावते परीक्षण लिहिले आहे. विथ स्पॉयलर आहे. पण

कुणाच्या अध्यात मध्यात नसलेल्या मार्गी यांच्या आयुष्यात प्रथमच असे काही घडले असेल Happy>>>>> सरळ मार्गी.

Happy

म्हणूनच उडाला असेल, राजकारणाच्या धाग्यावार विषयाला धरुन चर्चा चालु असेल तर तो फाउल पकडला असेल अ‍ॅड्मिननी.>>>> Proud

आमचा बेत फसला आता पुढल्या शनी किंवा रविवारी कश्मीर फाईल्स बघणार. जर शनीवारचे जमले तर रवीवारी मग झुंड. कारण चांगले सिनेमे नेमके एका लाईनीत आलेत. अजय अमिताभचा रन वे कसा आहे? रिलीज झालाय की व्हायचा आहे?

आहेत की दोन्ही धागे - मेधावि व मार्गी यांचे. दोन्ही दिसत आहेत. चालू घडामोडी- भारत मधे शोधा.

पुण्यात अलंकार सिनेमागृह आलिशान मधे मोडायचं. तिथे शेर ए पंजाब नावाचं रेस्तराँ कम बार होता. त्याची लोकेशन नेमकी पडद्याच्या पाठीमागच्या भागात येत होती. शेर ए पंजाब हे रेस्तरॉ आहे हे काही माहिती नव्हतं. सिनेमा बघणे हीच मोठी करमणूक असायची. इंटर्व्हलला समोसे सुद्धा कधी आणल्याचं आठवत नाही. शेर ए पंजाबच्या आत कधी गेलोच नाही. पण बसमधून ते दिसायचं. त्यात खाली जाणार्‍या पायर्‍या होत्या.

पडद्यावर चित्रं कसं दिसतं हे माहीत नव्ह्तं. बालनाट्य पाहील्यामुळे डोक्यात गोंधळ व्हायचा. मग असा समज झाला कि शेर ए पंजाब मधून नट नट्या पडद्यामागे जातात. त्यांच्या पाठीमागे दिवे लावल्याने त्यांच्या मोठ्या रंगीत सावल्या आपल्या दिसतात. विशेष म्हणजे हाच समज बहुतेकांचा होता. शेर ए पंजाब असेच नाव एण्ट्री पॉईण्टला का असेल अशी शंका विचारली तेव्हां कुणीतरी सगळे नट नट्या पंजाबी असतात म्हणून असे उत्तर दिले होते.

https://www.maayboli.com/node/81331#new
हा म्हणत असावेत
प्रिसिजन सर्जिकल स्ट्राईक आणि मधमाशांचं पोळं उठवणारा का फा. लेखक कोण होतं?

हो हा ही दिसतोय आणि तो मेधावि यांनी उघडलेलाही. सुलू_८२ कोणत्या धाग्याबद्दल विचारत आहे माहीत नाही.

जेव्हा धागा ज्या ग्रुप मध्ये काढलाय तो त्यासाठी योग्य/ त्या ग्रप पुरता सीमित नाही असे वाटले तेव्हा नियंत्रक ते योग्य त्या (त्यांच्या मते अर्थात) ग्रुप मध्ये हलवतात.

यामुळे ज्या ग्रुप मध्ये तो हलवला आहे त्या ग्रुपचे आपण सभासद नसू तर आपल्याला तो दिसणार नाही.
आणि जर त्या धाग्याची लिंक आपण बूकमार्क केली असेल त्यावर क्लिक केले तर एरर मेसेज येईल.

असा बदल धागाकर्ता स्वतःही करू शकतो किंवा नियंत्रक करू शकतात.

मूळ धागा काढताना तो सगळ्यांसाठी खुला असेल आणि मग ग्रुप पुरता मर्यादित केला असेल तरी सुद्धा असे होईल, ज्या ग्रुप पुरता मर्यादीत केला त्याचे आपण सदस्य नसल्यास वरील प्रमाणेच होईल.

हे फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने सांगत आहे याची कृपया नोंद घ्यावी.

हे फक्त माहिती देण्याच्या उद्देशाने सांगत आहे >>> पडू द्यात कि यावर पण पन्नासेक पोस्ट्स. ज्यांना वाहते धागे नसतात असं पब्लीक वाटच बघत असतं.

बधाई दो ची सुरुवात मजेशीर होती. रावने भारी काम केलंय काही महत्वाच्या प्रसंगात. उत्तम अभिनेता आहे ते त्यातुन पुन्हा सिद्ध होते. पण नंतर गंभिर करण्याच्या नादात लांबला व जरासा कंटाळवाणा झाला. मग पळवत पळवत पुर्ण केला.

उप्स!
बधाई दो म्हणजे राजकुमार रावचा का?
गोल गोलगप्पा गाणेवाला?

निदान राजकुमार राव/ गोलगप्पा असे तरी लिहायचे ना शीर्षकात!

"बधाई दो" असे शीर्षक देऊन काय उलगडा होईल?

कुणीतरी हिंदी माँबोली वर कुठेही शुभेच्छा देण्या ऎवजी "इथेच द्याना ज्या काही द्यायच्याय त्या !! " असे वैतागुन काढलेल्या धाग्याचे शीर्षक वाटते ते.

83 हॉटस्टारवर आलाय
ज्यांना बघायचा असेल लाभ घ्या Happy

Pages