चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ओह अच्छा Happy
सिलसिला ये चाहत का..
https://youtu.be/lpSgSaO5cNU

'पावनखिंड' मध्ये प्राजक्ता माळी गाणं म्हणत नाही, पण बाकी इतक्याच प्रेमाने तो दिवा सांभाळते.

Happy

ओह हे गाणे! थँक्स. हे गाणे ऐकले आहे. पाहिले नव्हते. एखाद्या साबण, शाम्पू किंवा क्रीमच्या जाहिरातीतील मॉडेल्स पेक्षा जास्त ओव्हरअ‍ॅक्टिंग करत आहे पब्लिक या गाण्यात Happy त्या दिव्यात फुलबाज्या लावल्या आहेत का? ठिणग्या तशाच उडत आहेत.

हे दिवा विझणे प्रकरण बरंच जुनं आहे, अनेक चित्रपटात. फिल्लमबाजीमध्ये शिरीष कणेकर म्हणतात, की मुळात माणूस जिवंत असताना तिथे दिवा कशाला लावला? Lol

(तो गेल्यानंतर लावायचा असतो - हे आता विनोद कळावा म्हणून एक्सप्लेन करावे लागते)

ते पाणी फ्लश वरून आठवले. तमाम हॉलीवूड वाल्यांना व आजकाल ही लागण झालेल्या बॉलीवूडवाल्यांना सूचना. एखादा हीरो किंवा हिरॉइन उलटी करत आहेत हा सीन दाखवायचा असेल तर तो/ती त्या सिंक/कमोड मधे वाकले व एक ठराविक आवाज काढला - इतपत बास आहे. >>>>>>>> अगदी अगदी. कोरियन सिरीजच याबाबती कौतुक कराव लागेल. म्हणजे उलटी करताना कमोड मध्ये वाकलेल ते दाखवतात पण इतर मटेरियल कधीच दाखवत नाही. बर्याच सिरिजमध्ये अस दाखवलय. बहुधा साऊथ कोरिया मध्ये तसा नियम असावा.

कोरियन चित्रपटाचे नाव घेऊ नका...
मी एक कोरियन चित्रपट पाहिला होता ज्यात एका तरुणी ला बंदी बनवून ठेवलेले असते आणि जिने बंदी बनवून ठेवलेले असते ती एका वाडग्यात उलटी करून ते तिला खायला देते असा सिन होता... आणि ती दुसरी तरुणी इतकी भुकेली असते कि ती उलटी खाते...

Lol

@ च्रप्स, मी लहानपणी एका ईंग्लिश चित्रपटात असा सीन पाहिलेला. ज्यात हिरो आणि मित्रमंडळी गपचूप एका राक्षसाच्या अड्ड्यावर जातात आणि त्याच्या ग्रूपमध्ये सामील होतात. जसे मिस्टर ईंडियामध्ये अनिल कपूर मोगँबोच्या अड्यावर जातो.

मग मेन व्हिलन राक्षस येतो आणि एका वाडग्यात ओकतो. ते ईतर सैनिक एकेक घोट पिऊ लागतात. हिरोमंडळी घाबरतात. कसे प्यायला जमणार याचे टेंशन येऊ लागते. आता आपण पकडले जाणार. पण एक घोट पिऊन बघतात तर ईतके आवडते की पुन्हा प्यायला जातात. बस्स, त्या दिवशी माझी उलटीबद्दलची किळस वाटायची बंद झाली Happy

उदमांजराच्या पॉटी मधून पडणाऱ्या बिया पूड करून त्याची सगळ्यात महागडी कॉफ़ी बनते आणि ती आवडीने पितात तर काय

मागणी वाढली की पुरवठा पण वाढवावा लागत असणार>>> त्यासाठी त्यांना पकडून ठेवतात व जबरदस्ती कॅाफी बीन्सच खायला देतात.
विषयांतरासाठी क्षमस्व.

व्यसनाच्या आहारी माणूस गेला की त्याला याचे काही वाटत नसावे.
असो. यावर वेगळा धागा काढा.
माझ्याकडेही अशी काही माहिती आहे ती तिथे खरी खोटी करून घेता येईल.
ईथे आता फारच अवांतर होतेय

आता राक्षस हे पूर्वीचे एलीयन होते असा किंवा आम्ही त्यावेळी सगळ्याच व्हिलन किंवा विचित्र प्राण्यांना राक्षस म्हणत होतो, किंवा आम्ही टेकडी जाळली तेव्हा असाच राक्षस तिथे पाहिला वगैरे स्पष्टीकरण येऊ घातले आहे Happy

छे हो, यात कमीपणा कसला. तो पिक्चर आठ दहा वर्षांचा असताना पाहिलेला. ईंग्लिश पिक्चर आणि ईंग्लिशमध्येच पाहिलेला. कोणाला तेव्हा ईतके ईंग्लिश कळतेय, मला तरी नाही कळायचे. ईंग्लिश सोडा, एलियन ही संकल्पनाही माहीत नसावी. आणि बाय चान्स कळलीही असावी तरी त्या वयातले सारे कोणाला आता आठवतेय, मला तरी नाही स्पष्ट आठवत.
एविल डेड म्हणजे जगातला सर्वात डेंजर भूताचा चित्रपट समजायचे वय ते. असतील कदाचित राक्षस वा एलियन, काय फरक पडतोय. मुद्दा ऊलटीचा होता ते आठवतेय हे पुरेसे आहे Happy

ई…

गंगुबाई काल पाहिला.आलिया सुरुवातीला फॅन्सी ड्रेस मधली लहान मुलगी वाटते 15 मिनिटं, पण तिने अभिनय खूप चांगला केलाय.नुसत्या संधी मिळून उपयोग नसतो, संधी चं सोनं करणारी मेहनत पण लागते.हिच्यात ती आहे.एखादं अवार्ड नक्की मिळावं.
बऱ्याच सीन्स ला डोळ्यांत पाणी आलं.
विजय राज ला अजून मोठा रोल देता आला असता.सैराट मधली आक्का आणि सुरुवातीला आंटी असलेली स्त्री यांनी चांगला अभिनय केलाय.
सिगारेट च्या सीन ला डिस्क्लेमर असतो तसा 15 वर्षाच्या मुलीच्या लग्नाच्या सीन ला पण हवा होता असं वाटलं.
आलिया चे डोळे बोलतात.भाषा कधीकधी मॉडर्न वाटते पण त्या काळात मुंबईत कसं गुजराती हिंदी बोलायचे ते माहीत नाही.त्यामुळे असूही शकेल.
अजय देवगण छोट्या रोलमध्ये धमाका.

Pondycherry मध्ये सई अप्रतिम दिसली आहे. सई fan ने चुकवू नका.
आणि लहान मुलाचे काम छान झाले आहे.
विषय पटकन आत्मसात नाही झाला. पण सुंदर आहे लोकेशन्स.

Chitrapat स्मार्ट फोन वर चित्रीत केला आहे, scene che color combination सुंदर आहे.

सिगारेट च्या सीन ला डिस्क्लेमर असतो तसा 15 वर्षाच्या मुलीच्या लग्नाच्या सीन ला पण हवा होता असं वाटलं.>> +१.

Pages