तुमको देखा तो ये खयाल आया

Posted
16 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
16 वर्ष ago

तुमको देखा तो ये खयाल आया ह्या गजलेचा स्वैर अनुवाद

तुला पाहुनी वाटले त्या क्षणाला
तुझी सावली तप्त ह्या जीवनाला

मनी आज जागे नवी एक आशा
पुन्हा मीच खुडले नव्या अंकुराला

उमजले तुझी पावले दूर जाता
हरवल्या, गवसल्या किती स्वप्नमाला?

मला गायला जी न जमली कधीही
अशी काळ का गायला गीतमाला?

*सदा टोचुनी बोलती त्यास का रे?
कधी टोचला काय काटा फुलाला?

* हा मी घुसडलेला शेर Happy

प्रकार: 

छानच रे मिल्या दादा. नेहेमी प्रमाणे.

कसं काय सुचतं बॉ तुम्हाला हे सगळं?
घुसडलेला शेर पण perfect fit बसलाय... Happy

घुसडलेला शेर जास्त आवडला.
(आता आमची अभिरुचीच तसली. (म्हणजे नक्की काय ते मलाही माहित नाही पण असं लोक म्हणतात.)
पण स्वैर अनुवद मस्त जमलाय. असंच जमलं तर तुझसे नाराज नही जिंदगी चे पण भाषांतर कर ना..

बहुत चांगलं!

छानच जमलाय. शेर घुसडला आहे ते सांगितल्याशिवाय कळलेही नसते.
आता, तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, ची फर्माईश करावीशी वाटतेय.

खूप धन्यवाद.. खरे तर ह्याचा अजून चांगला अनुवाद करता आला असता.. ह्यात बर्याच त्रूटी आहेत... Sad

नंदिनी, दिनेशदा : अवघड आहे पण प्रयत्न करेन.

visit http://milindchhatre.blogspot.com

मिल्या, नेहमीप्रमाणेच मस्त जमलेय. आवडले!!!! Happy

नंदिनीला अनुमोदन, तुझा स्वतःचा शेर जास्त छान वाटतोय..:)

मिल्या

हा नवीन प्रांत?
अनुवाद आणि घुसडलेला शेर दोन्ही मस्त.

सुधीर

मिल्या,मस्त झालाय रे अनुवाद.... मी पण माझी फर्माइश सांगू का?:)

'जिंदगी धुप तुम घना साया'

कल्ला का?

अशी अस्सल मराठीतून दाद उमटली.........

जम्या रे मिल्या
सोल्लिड जम्या तुला
तुझा टकुरा तर लय झाक हाय र बाबा !
म्हन्जी कस त्यो घुसडलेला शेर हाय ना, त्यो तर झाकच !

मिल्या चांगला जमलाय रे स्वैर अनुवाद.

सही रे मिल्या!!!!!!!!!!!!!!!!!!!!
'अंकुराला' अगदी मराठीत आणलेस!

_________________________
-Man has no greater enemy than himself

मिल्या, तुम्हाला अनुवाद अगदी सुंदर जमलाय Happy त्यात त्रुटी आहेत असं निदान मला तरी जाणवलं नाही. मुख्य म्हणजे, मुक्त अनुवाद असुनही, गाण्याच्या मूळ
अर्थाला धक्का बसलेला नाही. Happy
तुम्हाला पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा!
*
*
दक्षिणा....

झकास, जिते रहो.
असं काहि वाचलं कि माय्बोलिवर आल्याचं समाधान मिळत.
*************************************************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल