मराठी साहित्यातील भयकथा आणि चित्रपट

Submitted by therising on 9 February, 2022 - 06:15

नमस्कार,
मराठीत भरपूर भयकथा लेखन झालं आहे. पण त्यावर काही अपवाद वगळता अजूनही चित्रपटनिर्मिती झाली नाही.
मायबोलीवर असणाऱ्या भयकथा वाचकांकडून अशा काही कथांची माहिती मिळू शकेल का ज्यावर अत्यंत चांगला भयपट बनू शकतो?
धन्यवाद!

Group content visibility: 
Use group defaults

चंद्रकांत काकोडकर यांच्या कथा पण भीतीदायक असतात.
गाल आरक्त झाले वगैरे ट्रान्सफॉर्मेशन च्या सुरूवातीलाच भय वाटू लागते.

तुंबाडचे खोत
कादंबरीची साईझ भयप्रद आहे.

दंशकाल >> ही भयकथा नाही वाटली. पुढे पुढे तर थोडी कंटाळवाणी पण वाटली होती. यावर हॉरर पिक्चर बनेल असं नाही वाटत. त्यापेक्षा त्याच्या 'दैत्यालय' गोष्टीवर चांगला हॉरर पिक्चर बनू शकेल.

निव्वळ हॉरर या प्रकाराला लोक कंटाळलेत. हॉरर + गूढ / रहस्य किंवा हॉरर + कॉमेडी + जमलाच तर एखादा संदेश हे बरं वाटतं बघायला. निव्वळ घाबरा, घाबरा घाऊक घाबरा यात काही वेताळ राहिलेला नाही.

दैत्यालय वर मस्त बनेल
पण फक्त ते सर्व दृश्यात आणणं कठीण पडेल.
मला प्रचंड आवडलेली कथा आहे ती.

दंशकाल फार बोअर झाली.

सर्वांचे मनःपूर्वक आभार. प्रत्येकाला स्वतंत्र उत्तर कसे देता येते हे कळले नाही म्हणून ही एकच प्रतिक्रिया.
मिळालेल्या प्रतिसदांमध्ये भरपूर माहिती आणि पुस्तकांची नावे मिळाली, वाचून परत येतो.
पुन्हा एकदा धन्यवाद.

शांत माणूस असहमत.

हॉरर कॉमेडी हे मला फक्त कॉमेडी वाटत. हॉरर हवं असेल तर ओल्ड स्कूल हॉरर !

हृषीकेश गुप्ते लिखित "सर्पकाल' " ही नवी भय कादंबरी. अजून पब्लीश झाली आहे कि नाही कल्पना नाही. मी ऐसी अक्षरेवर २०२५ दिवाळी अंकात कर्टन रेझर वाचला, आवडला,
https://aisiakshare.com/index.php/node/9402 इथे वाचू शकता.