चवीनुसार मीठ

Submitted by क्षितिज on 8 February, 2022 - 11:19

कुठलीही पाककृती असो, त्यात जर मीठ योग्य प्रमाणात असेल तरच ती पाककृती स्वादिष्ट लागते.

आपण Online recipes ची मदत घेतो. त्यात बऱ्याच वेळा 'चवीनुसार मीठ टाका' असे mention केलेले असते.
तर हे चवीनुसार मीठ म्हणजे मिठाचे प्रमाण कसे ठरवावे?


काही पदार्थामध्ये आपल्याला प्रमाण माहित असते कि समजा १ वाटी तांदूळ असतील तर पाऊण चमचा मीठ लागेल.
पण काही पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण कसे ठरवावे कळत नाही. त्यात पातळ पदार्थामध्ये correction करण्याची मुभा असते. पण काही solid पदार्थामध्ये तसे करण्याचा scope नसतो.

तर आपण सर्व मिठाचा अंदाज कसा घेता? हे जाणून घ्यायला आवडेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझा नेहमीचा प्रॉब्लेम Happy

भाजी , आमटी वगैरेत चालून जातं.
बिर्यानी , खिचडी , पुलाव वैगैरे रिपेअर करताना त्रास होतो .
त्यातही कधी कधी मध्येच एखादे वेळेस मीठाचा ब्रॅण्ड बदलला की आणखी गडबड .

१. शिकाऊ स्वयंपाकी असताना शिजवताना चव घेत शिजवा.
२. प्रत्येक स्टेपला जो इन्ग्रेडीयंट अ‍ॅड केला त्याला किती मीठ लागेल? त्या तुमच्या चवीनुसार चिमट्या अ‍ॅड करत जा.
३. रेस्पी नीट फॉलो करा. त्यात लिहिले तितकेच ग्रॅम्/चमचे/कण घाला.
४. तरीही, जेवढं लागेल असं वाटतंय/रेस्पीत लिवलंय त्यापेक्षा थोडं कमी मीठ घाला. वरतून घालता येतं. जास्त झालं की काढता येत नाही.
५. १० वेळा तेच शिजवलं की आपोआप 'चवीनुसार' किती ते समजतं.

६. काही भाज्या / पदार्थ शिजल्यावर खूप आटतात. तेव्हा शिजण्याआधी जेवढे आकारमान दिसते त्या अंदाजाने घातले तर खारट होईल, तेव्हा आकुंचन क्रिया पूर्ण झाली की घालावे.

प्रश्न रोचक आहे खरा.
ईथे कोणीतरी हे पण सांगा की जेवणात मीठ कमी पडलेय हे ओळखतात कसे?
म्हणजे मला अळणी चव ओळखताच येत नाही. कधीतरी मी पुर्ण जेवण जेऊन जातो. आणि मग मागाहून जेवणारा बोलतो की अमुकतमुक भाजी अळणी होती, तुला कळले नाही का...
खारट तर पहिल्याच घासाला कळते, मी़ठ जास्त पडलेय हे सहज ओळखता येते, पण कमी पडलेय हे कसे ओळखावे??

पदार्थ सुरुवातीपासून शेवट पर्यंत (बर्‍यापैकी)कोरडा रहाणारा असेल... उ.दा. चिवडा, दडपे पोहे इ. तर ओलसरपणाच्या अभावाने मीठ विरघळत नाही अशा पदार्थात मीठ (सेमी)सॉलिड फॉर्म मध्ये तोंडात गेल्याने जीभेवर मीठाची चव जास्त वेळ रेंगाळते, आणि कमी मीठ पुरते.
थोडक्यात, कुठेही टेबल सॉल्ट घालायचे असेल तर नेहेमीपेक्षा कमी लागते, तोच प्रकार कोरड्या पदार्थांत होतो.
बाकी आवड. पोहे, उपमा यात जरा मीठ पुढे आलेलं छान लागतं. भाताच्या प्रकारात कमी छान लागतं.

हे कोरड्या आणि ओल्या पदार्थांचं मला इतक्या दिवसांत लक्षात नव्हतं आलं अमितव! पॉइंट आहे.

@ऋन्मेऽऽष होय माझही होत असं कधी कधी. पण मला मुळातच जरा अळणी खायची सवय आहे. जराही जास्त मीठ झाले तर खाल्ले जात नाही.

आळतात म्हणजे आळतात>> मूग मटकी आळतात (शिजऊन झाल्यानंतर घट्ट होतात)
आटतात म्हणजे आटतात >> दूध आटतं (शिजवताना घट्ट् होतं)
फरक आहे

मुग मटकी नाही.
घमेलभर निवडलेली मेथी शिजल्यावर अगदी दोघाना पुरेल एवढीच होते. म्हणजे आळते.
पातेलभर पाणी घातलेली डाळ अर्धं पातेलंभर होईपर्यंत उकळली. म्हणजे आटली.
शब्बाखैर!

आटताना त्यातील पाण्याचे बाष्पीभवन होते आळताना अणूरेणूंची संरचना बदलून पदार्थ आकुंचन पावतात असे काही आहे का फरक..

कळत नसताना पिंका टाकणं हा लय भारी धंदा आहे.

एक्दं बेसिक.

सॉलिड्स : आळतात. आक्रसतात. आकारमान कमी होते. घनता वाढते.
लिक्विड्स : आटतात. आक्रसतात. आकारमान कमी होते. घनता वाढते.

आकारमान = व्हॉल्यूम.

घनता = डेन्सिटी. उर्फ, युनिट मास पर युनिट व्हॉल्यूम.

कापड आळते म्हणावे की आटते?
<<
अन्न वि वस्तू.

माया आटली माझी आता. याला च माया पातळ होणे असेही म्हणतात.

संताप सुरू होण्याच्या आत आवरतो. Lol

थोड्या वेळाने रात्रीचे ईथे अमेरीकेतून नासातले मायबोलीकर आले की आपण ब्लॅक होल संकल्पनेपर्यंत पोहोचू...

दारूबद्दलचा संताप आत्ता समजायला लागला आहे.

इट्स ओके टु अ‍ॅक्सेप्ट इट अ‍ॅज डिसिज. अँड सीक हेल्प.

हॅपी ब्लॅक होल्स.

नाही हो, पातळ म्हणजे डायल्यूट अशा अर्थी आहे. आणि आटली म्हणजे कमी झाली. दोघांचा मतितार्थ मायेच्या बाबतीत सारखाच. जोकची पार चिडफाड झाली Uhoh

आटून खाली तळाशी जाते म्हणजे पाताळात जाणे या अर्थाने माया पाताळवासी झाली म्हणत असावेत. त्याचे अपभ्रंश पातळ झाली असावे

माया आटून तळाशी जाते तेव्हा तिला पाताळमाया म्हणतात
ऊचंबळून वर येते तेव्हा तिला आभाळमाया म्हणतात..

पदार्थ करत असताना चव घेत घेत मीठ घालावं, हा उत्तम बेसिक मार्ग. सराव होत जातो तसा अंदाज यायला लागतो.

चांगला हात बसला की मग तर कधीकधी गंधावरूनही (वासावरून) समजतं.
म्हणजे समजा भाजी शिजत असताना मीठ घालायचं विसरलं किंवा कमी झालं, तर शिजलेल्या भाजीचा गंध नेहमीसारखा जाणवत नाही. (इथे कोव्हिडचे जोक्स मारू नयेत Lol )
तयार पदार्थाचा गंध नेहमीसारखा येत नसेल तर हमखास मीठाचं प्रमाण तरी चुकलेलं असतं किंवा जिन्नसांमध्ये गूळ-साखर असतील तर ते कमी झालेले असतात.

मुळात, पदार्थाला पहिली वाफ देऊन झाकण काढतो तेव्हा जरा पुढे झुकून त्या वाफेत न चुकता दीर्घ श्वास घ्यावा. जिन्नसांचं प्रमाण बरोबर झालंय की नाही याची अर्धी-अधिक चाचणी तिथे होतेच होते.
(हां, अर्थात त्यासाठी नाक चांगलं तिखट हवं Lol शाब्दिक कोटी नाही, खरंच! )

गंधावरूनही (वासावरून) समजतं.>>> हो मी हे असच करते नेहमी. वासावरून कळते कमी की जास्त झालेय मीठ / साखर वैगरे.

आळणे हे घन पदार्थांबाबत. आटणे द्रव पदार्थांबाबत. दूध आटतं. पाणी आटतं. मेथीची भाजी आळते.

मधले प्रतिसाद हे लिहिल्यावर वाचले. सस्मित, पुरुष आयडी यांनी आधीच उत्तर दिलं आहे.
---------
मला खारट नीट कळतं. अळणी म्हणजे पदार्थ बेचव लागतोय हे आता आता समजू लागलंय. नाहीतर इतकी वर्ष अळणी असलेल्या पदार्थात करताना काहीतरी चुकलंय असं समजून खात असे. मग दुसर्‍या कोणी सांगितल्यावर कळे की ते अळणी आहे.

मला माझे लिखाण edit करायचे आहे पण संपादन वर क्लिक केल्यावर फक्त title, शब्दखुणा, ग्रुप ऑडियन्स बदलण्याचा option दिसतो आहे. मूळ लेख/ प्रश्न edit करण्याचा option नाही येत आहे. मुख्य मजकूर दिसतच नाही. Can anyone help me out with this

भरत जी , मोबाइल app आणि लॅपटॉप browser दोन्ही वरून try केले. स्क्रोल केले तरी मजकूर एडिट करण्याचा option दिसत नाही :-/

मजकूर बदलायचा आणखी वेगळा पर्याय दिसत नाही. संपादन वर क्लिक केलं शीर्षकापासून मजकूर , ग्रुप इ. पर्यंत काहीही बदलू शकता.
मजकुराच्या विंडोत जाऊन टाइप करून पहा.

लिखाण संपादित करायला टाइम लिमिट आहे. त्या नंतर करता येत नाही.
दिनेशदा यांनी लिखाण उडवल्यानंतर झालेली सुधारणा आहे ही.

म्हणजे समजा भाजी शिजत असताना मीठ घालायचं विसरलं किंवा कमी झालं, तर शिजलेल्या भाजीचा गंध नेहमीसारखा जाणवत नाही. >>> अगदी अगदी . कमी झाल्याच कळत नाही , पण विसरले असेन तर ९०% वेळा कळत मला Happy .

नव्याने स्वयंपाक शिकताना मला हाच प्रश्न पडायचा. आता सरावानंतर अधूनमधून चव घेऊन आणि ललिता-प्रीती म्हणाली तसं वासावरून अंदाज येतो. आधी खूप कमी मीठापासून सुरूवात करावी. आता जवळपास योग्यच मीठ पडलेलं असतं माझं Happy
अजून एक म्हणजे पदार्थ खूप गरम असेल तर (विशेषतः आमटी) खारट चव किंवा एकूणच इतरही चवी कमी लागतात. त्यामुळे थोडा पदार्थ थंड करून मगच चव घ्यावी.

>> तर आपण सर्व मिठाचा अंदाज कसा घेता?

अंदाजाचं मोजमाप केलं तर तो अंदाज कसा राहिल? Lol

- (अळणी) सोकाजी

Pages