चवीनुसार मीठ

Submitted by क्षितिज on 8 February, 2022 - 11:19

कुठलीही पाककृती असो, त्यात जर मीठ योग्य प्रमाणात असेल तरच ती पाककृती स्वादिष्ट लागते.

आपण Online recipes ची मदत घेतो. त्यात बऱ्याच वेळा 'चवीनुसार मीठ टाका' असे mention केलेले असते.
तर हे चवीनुसार मीठ म्हणजे मिठाचे प्रमाण कसे ठरवावे?


काही पदार्थामध्ये आपल्याला प्रमाण माहित असते कि समजा १ वाटी तांदूळ असतील तर पाऊण चमचा मीठ लागेल.
पण काही पदार्थामध्ये मिठाचे प्रमाण कसे ठरवावे कळत नाही. त्यात पातळ पदार्थामध्ये correction करण्याची मुभा असते. पण काही solid पदार्थामध्ये तसे करण्याचा scope नसतो.

तर आपण सर्व मिठाचा अंदाज कसा घेता? हे जाणून घ्यायला आवडेल.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@पुरुष आयडी @मानव पृथ्वीकर Yes.. time limit दिसते आहे तिथे..आणि ह्याच धाग्याला edit करायचे होते so तो issue नाही

मिठाचा वास येतो??? मला फोडणीचा, तिखटाचा, मसल्यांचा, तळणाचा, विविध पदार्थांचा वास येतो. मिठाचा वास असू शकतो हेच कधी डोक्यात नाही आलं. आता विथ मीठ आणि विदाऊट मीठ अशा दोन भाज्या करुन कंपेअर करणे आले.

भरत Lol

हो, वासावरून अंदाज येतो - पण तो बहुतांशी नेहमी केल्या जाणार्‍या पदार्थांच्या बाबतीत.
तसाच एकूण पदार्थाच्या वॉल्यूमवरूनही येतो - मग चव घेऊन 'फाइन ट्यून' करता येतं.
पण या सरावानेच साधणार्‍या सिद्धी आहेत.

नवीन शिकणार्‍यांनी आधी थोडंच (आपल्या अंदाजापेक्षा कमीच) मीठ घालून नंतर चव पाहून अ‍ॅडजस्ट केलेलं बरं.
किंवा मग मान मोठ्ठी वेळावून 'मला नं कमीच लागतं - कमीच खावं म्हणतात नं डॉक्टर?' असं म्हणायची आरशासमोर प्रॅक्टिस करावी. Proud

मीठ जास्त होण्यापेक्षा कमी झालेलं परवडलं. Happy

<<तसाच एकूण पदार्थाच्या वॉल्यूमवरूनही येतो>> Uhoh पदार्थाच्या वॉल्यूमवरून त्यात मीठ कमी किंवा जास्त आहे असा अंदाज येतो???

आता वाकांडामधे >> ? समजलं नाही.
वासावरुन घातलंय का नाही अंदाज येतो का कमी झालंय हा पण अंदाज येतो?

नाही घातलेलं हा कमी होण्याचाच सबसेट नाही का? Proud
कमी किंवा जास्त झाल्याचा - मीठच नव्हे, गोड/तिखटाचासुद्धा - एकूणच 'बॅलन्स'चा अंदाज येतो.
पण नवीन स्वयंपाकी किंवा नवीन पदार्थ असेल तर त्यावर विसंबू नये.

हुशss! सॉरी, मला वासा वरून मिठ कमी/जास्त अंदाज येतो हेच गुगली गेलं. त्याच ओघात वॉल्यूम बद्दल वाचून असंही शक्य आहे की काय वाटुन गेलं.

क्षितिज, स्वयंपाक सुरू करण्या आधीही, घरात एखाद्या पदार्थात मीठ घालायचं राहून गेलं आणि मग आपण मीठ घालून घेतलं, मीठ कमी पडलं तेव्हा आपण घालून घेतलं, असं कधी झालं नाही का कधी? त्यावरूनही अंदाज आला असेल ना, निदान न आळणाऱ्या पदार्थात किती मीठ घालावं.
--
<<नवीन पदार्थ असेल तर त्यावर विसंबू नये.> राईट, कुठला पदार्थ + त्याचा वॉल्युम किती हे बघुन ठरवायला चांगला अनुभव हवा.

आता वाकांडामधे >> ? समजलं नाही.
<<
(संत्र्यांना सोलवटायला मला आवडतं.) तेव्हा संत्रं सोलून सांगतो. Wink

वाकांडा हा एक फँटसीलँड देश आहे. Wakanda man you are not knowing the latest marvel movie?

एक मिसळपौ नावाची साईट आहे. त्यात रेस्पी टाकली, की 'यात अंडं घालून' कसं करायचं? अन 'आता इथे अमुक देशी अमुक इन्ग्रेडियंट शोधणं आलं' अश्या कामेंटी असतात.

मानव आणि अमित, ललिताने लिहिल्यानुसार वास हा पदार्थ शिजत असतानाच्या त्याच्या वाफेचा वास आहे. गार झालेल्या भाजीचा वास घेऊन ते कळणार नाही.

(आता (नाकाने) संत्री सोलतोच आहोत तर एक मेरी तरफ से! Proud )

हो! ते एक नशिबच म्हणायचं! Proud
मला मामीची का इतर कुणाची तरी (का जीएंची आहे?) वासावरुन नजिकच्या भविष्यात मृत्यू प्रेडिक्ट करणारी कथा आठवली.

>>> माया आटली माझी आता. याला च माया पातळ होणे असेही म्हणतात
हे रत्न निसटलं होतं. Lol

एकूण माया लिक्विड असते तर. नाहीतर आळली असती. Proud

वासावरुन नजिकच्या भविष्यात मृत्यू प्रेडिक्ट करणारी कथा आठवली.
<<
वासावरून पार्किन्सन्स की कोणतातरी आजार डायग्नोज करायला कुत्र्यांना शिकवण्याचंही काहीतरी वाचण्यात आलंय.

एकूण माया लिक्विड असते तर. नाहीतर आळली असती.
<<
नाही.
कापडासारखी असते. मायेचं पांघरूण असतं.
त्यामुळे आटते.

रच्याकने,

'माया' हा शब्द ब्लाऊजच्या (प्यांटीच्याही) शिवणी वारंवार घट्ट्/ढिल्या करण्यासाठी सोडलेल्या कापडाच्या भागासही वापरतात. ती माया लहान मोठी केली, की (वाढत्या मापानुसार, किंवा ज्या मैत्रीण्/भावजयीला उसना दिलाय तिच्या मापानुसार) ब्लाऊज घट्ट-ढिला करता येतो.

- अतीज्ञानी. पुआ.

आणि नाशकात म्हणे नक्षबंदी की कुणीतरी बाबा आहेत.
ते लोकांच्या वापरातल्या कपड्याचा वास घेऊन भविष्य/भूतकाळ/उपाय वगैरे सांगतात.
आता कळलं. कपड्याचा खारट वास आला की व्यक्ती जास्त मीठ खाणारी ओळखून हिला बीपी/हार्ट अटॅक समस्या होणार, आयोडीन युक्त वास नाही म्हणजे थायरॉईड प्रॉब्लेम होणार, फार कमी मीठ खाते म्हणजे अगोदरच बीपी/ हृदयरोग समस्या आहे (म्हणुन मीठ कमी केलंय) असे सांगत असतील.

शिळा पदार्थ प्रमाणात खाल्ला तरी तेच होतं.

एनीवे. जाताजाता ज्ञानमौक्तिक.

"वास ही दूरून घेतलेली चव आहे."

आणि बर्‍यावाईट मार्गाने जोडलेली माया विसरलात. ती गादीत वगैरे दडवतात ती. Proud

(आता 'माया कमीजास्त कशी ओळखावी' असा धागा निघेल की काय! Proud )

>>> वासांसि जीर्णानि
Lol

पु. आ., काही लोक रंगांधळे असतात तसं इतर ज्ञानेंद्रियांच्या बाबतीतही घडू शकतं का? म्हणजे अमुक एकच चव कळत नाही, बाकी कळतात - असं?

वासावरुन जेवणात काय आहे ओळखू शकतो.
<<
अहो, मी नशीबात ताटात 'काय वाढून ठेवल असेल' याचा विचार करतोय Lol
***
ती गादीत वगैरे दडवतात ती.
<<
'हिरवी माया'

म्हणजे अमुक एकच चव कळत नाही, बाकी कळतात - असं?
<<
असू शकते. नक्की माहिती नाही. आमच्या ईएन्टी वाल्याला विचारून सांगतो

एक ओळखीचा स्पेक्ट्मवर आहे. तो प्रत्येक गोष्टीचा आधी वास घेतो. मला फार नवल वाटतं. त्याची घ्राणेंद्रिये नक्की जास्त प्रगत असणार असं वाटतं.

धूम्रपानामुळे काही चवी (आणि वासही) ब्लॉक होतात/ तीव्रता कमी होते असा अनुभव आहे.

स्मोकिंग सोडल्यावर अन्न इतके चवदार लागू लागले, आणि दूर कोणी काडी पेटवली त्याचा वास आला (आधी इतक्या अंतरावरुन येत नसे). खास करून काही जळल्याचा वास जास्त (म्हणजे नॉन स्मोकर्सना येतो तसा व्यवस्थित) येऊ लागला.

वास घेऊन मिठाचा अंदाज? हाऊ ऍमॅच्युअर... खऱ्या सुगरणीला नुसतं पाहून मीठ घातलय की नाही सांगता आलं पाहिजे.

क्षितिज, स्वयंपाक सुरू करण्या आधीही, घरात एखाद्या पदार्थात मीठ घालायचं राहून गेलं आणि मग आपण मीठ घालून घेतलं, मीठ कमी पडलं तेव्हा आपण घालून घेतलं, असं कधी झालं नाही का कधी? त्यावरूनही अंदाज आला असेल ना, निदान न आळणाऱ्या पदार्थात किती मीठ घालावं.>>>>>>>
होय मानव जी, असं झालं आहे आणि नेहमीच्या पदार्थांमध्ये मिठाचा अंदाज घेता येतो हो. पण नवीन पदार्थ असेल, त्यात quantity ही बदलली असेल तर थोडं confuse व्हायला होतं. आणि मला स्वयंपाक बनवताना चाखणे आवडत नाही. मग जेवतांनाच काय ते correction करावे लागते.

आणि नाशकात म्हणे नक्षबंदी की कुणीतरी बाबा आहेत.
ते लोकांच्या वापरातल्या कपड्याचा वास घेऊन भविष्य/भूतकाळ/उपाय वगैरे सांगतात.
आता कळलं. कपड्याचा खारट वास आला की व्यक्ती जास्त मीठ खाणारी ओळखून हिला बीपी/हार्ट अटॅक समस्या होणार, आयोडीन युक्त वास नाही म्हणजे थायरॉईड प्रॉब्लेम होणार, फार कमी मीठ खाते म्हणजे अगोदरच बीपी/ हृदयरोग समस्या आहे (म्हणुन मीठ कमी केलंय) असे सांगत असतील.>>>> Lol Lol Lol

वास घेऊन मिठाचा अंदाज? हाऊ ऍमॅच्युअर... खऱ्या सुगरणीला नुसतं पाहून मीठ घातलय की नाही सांगता आलं पाहिजे.
<<
हो.
रमजानचा उपवास सोडायचा स्वयंपाक करणार्‍या सुगरणी अन बल्लव या क्याटेगरीत येतात. अजिबात न चाखता स्वयंपाक करायचा असतो.
***
@ मानव

बिड्या सोडल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. फार कठीण सवय आहे ती.

रच्यकने,

नशिबात पावभाजी वाढून ठेवलेली होती. अन सुंदर झालेली होती.

वास घेऊन मिठाचा अंदाज? हाऊ ऍमॅच्युअर... खऱ्या सुगरणीला नुसतं पाहून मीठ घातलय की नाही सांगता आलं पाहिजे >> Lol

>>रमजानचा उपवास सोडायचा स्वयंपाक करणार्‍या सुगरणी अन बल्लव या क्याटेगरीत येतात.>> आपल्यात देवाचा नैवेद्य अळणी म्हणूनच करतात की काय? Wink Proud

>>> रमजानचा उपवास सोडायचा स्वयंपाक करणार्‍या सुगरणी अन बल्लव
वाससुद्धा घेत नाहीत? कसं काय ते? Proud

नैवेद्याचा स्वयंपाकही चव न घेताच रांधायचा असतो.
(अमित, हे 'आपल्यात' काय आहे अं? Proud )

मला एक उपवास आठवतोय ज्यात २१ मोदकांपैकी एक मोदक आई मीठाचा बनवायची.. मग तो मोदक इतर मोदकांबरोबरच वाढला जायचा.. ज्याच्या वाट्याला तो येणार त्याला पुन्हा उपवास घडायचा..
मला तर तेव्हा नुसत्या स्पर्शानेही मीठाचा अंदाज म्हणजे मीठाच्या मोदकाचा अंदाज यायचा Proud

वास घेतात. पण इतर अनेक बावळट रेस्ट्रिक्शन्स स्वतःच इन्व्हेंट करून फॉलोही करतात. थुंकीही गिळू नये वगैरे.

सोवळ्यातला स्वयंपाक करताना चव घेताना पाहिलं आहे मी :=प

बाकी नैवेद्य देण्याआधी चव पाहू नये, वाहण्याआधी फुलाचा वास घेऊ नये हा व असे नियम व्हर्जिन सॅक्रिफाईस सारख्या इक्वल विकृतीचे आहेत असे माझे मत आहे.
पण ते एक असो.

शुभ रात्री, प्लस तुम्हाला शुभ दिवस.

(चव घेऊन बोरे देणार्‍या शबरीसारखा)

Pages