टेल मी यू आर 'समथिंग' विदाऊट टेलिंग मी यू आर 'समथिंग' !

Submitted by अमितव on 19 January, 2022 - 14:06

तुम्ही टिकटॉक बघत असाल तर हे काय आहे तुम्हाला माहितीच आहे. 'टेल मी यू आर समथिंग विदाऊट टेलिंग मी यू आर समथिंग', अर्थात घिसेपिटे ते नाविन्यपूर्ण असे स्टिरिओटाईप्स सांगून हसायचा धागा. टिकटॉकवर या प्रकारचे व्हिडिओ साधारण एकही अक्षर न बोलता नुसत्या दृष्य (व्हिज्युअल्स) परिणामांत केलेले असतात. इथे आपण तेच शब्दांतून करू शकतो. प्रताधिकारमुक्त अशी चित्रे मिळाली आणि त्यातून तुम्हाला ते सांगता आलं तर सोन्याहुन पिवळं.

प्रतिसादांत साधारण खालील प्रमाणे लिहा.

'टेल मी यू आर < >, विदाउट टेलिंग मी यू आर < > ' असं प्रतिसादात '< >' च्या जागी योग्य शब्द घालून लिहा आणि मग तुम्ही स्वतः करत असलेली गोष्ट किंवा तुम्ही बघितल्या असलेल्या गुणदोषांचं न लाजता सार्वत्रिकरण करुन लिहा.

हा स्टिरिओटाईप्सना हसायचा धागा आहे, आपल्या सर्वांत ते थोडे बहुत असतातच. नसले तरी बाहेरचं जग आपल्याकडे ग्रूप म्हणून हसतच असते. काहीही शिकण्यासाठी, बदलण्यासाठी हा धागा नाही. निखळ मनोरंजन आहे. फक्त पर्सनल होऊ देऊ नका, आणि आपल्या अंगाला लावुन घेऊ नका.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेल मी यु आर ए देसी ऑन शॉर्ट टर्म एच वन..
एका रात्री पार्टीसाठी विकत क्रॉकरी आणायची , वापरायची ,कार्टन्स जपुन ठेवायचे दुसर्‍या दिवशी परत करुन फुल रीफंड घ्यायचा )हे सगळे ऑफशोरला जाउन फुशारक्या मारत सांगायचे)
इथे एका रात्री ऐवजी ३ ते ६ महिने आणि क्रॉकरी ऐवजी कपाट गाद्या काही पण चालेल.

टेल मी यु आर ए देसी ऑन ६ इयरस एच वन..
असतील नसतील त्या सगळ्या बँकांचे क्रेडिट कार्डस गोळा करायचे , सगळे कॅश बॅक ,फुकट ट्रिपा वसुल करायच्या आणि आपण खुप डोके चालवुन खुप पैसा वाचवला, कशी हुशारी दाखवली हा आनंद साजरा करायचा.

सगळेच! Biggrin
ताकाला जाऊन भांडे लपवणे पॅसिव्ह अग्रेसिव्ह सिच्वेशन वाचणे पण महाफनी असेल. Happy

>>>>
टेल मी यू आर अ पुणेकर विदाउट...

माबोवरचा एक गप्पांचा बाफ
१९ जानेवारी २०२२ १३:००: "अरे आज कोणीच नाही इथे?"

१९ जानेवारी २०२२ १६:०५: "मी आहे की"
<<<<
Rofl

टेल मी यू आर ऑस्ट्रेलियन विदाउट .....
१. संत निकोलस यांच्यासाठी बिअर ठेवणे
२. शॉर्ट्स आणि हाल्फ स्लीव्ह शर्ट घालून ऑफिस ला जाणे हे अतिशय नॉर्मल असणे
३. पाणी दिसलं कि पोहायची उर्मी होणे

हे प्रकरण माहीत नव्हतं. मजेशीर आहे.
टेल मी यू आर फेमिनिस्ट विदाऊट टेलिंग सो.
नवा घेतलेला रुंबा चालू केला की मला चार्ज करा, माझ्या वाटेतले अडथळे उचला टाईप बडबड स्त्री च्या आवाजात ऐकू यायला लागते. की ती पुरुषी आवाजात कॉन्फिगर करयचा प्रयत्न करणे. ते शक्य नाहीसं दिसलं की सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मना ते लिहिणे, तेवढ्यावरुन प्रॉडक्ट रिटर्न करणे. पण अलेक्सा मात्र स्त्री आवाजातच ठेवणे, रादर तो स्त्री आवाजात आहे हे विचार केल्याशिवाय माहितीच नसणे.>> Lol अमितव.
इतरही सगळे टेल मी मस्त.

अमितव, हे भारी आवडलं.
रुंबा आमचाही बाई म्हणूनच बोलतो.पण हे लक्षात आलं नाही.
आमची पत्ता सांगणारी जीपीएस पण आम्हाला बाईच आवडते.पुरुष माणूस जरा फास्ट बोलतो आणि गोंधळलेला वाटतो.(दोघेही कोकणे चौक ला कोकेन चौक म्हणतात हे दुःख वेगळंच आणि.)

हर्पेन, ग्रेट. तुझा (तू ही मला अरे, तुरे म्हण) आदर्श ठेवून माझे पाय ठीक करण्याच्या प्रयत्नात मला प्रेरणा मिळत रहाते. (मी काही मॅरेथॉन वगैरे करणारा नाही, फक्त एक हौशी ट्रेकर.)

टेल मी यू आर तेलुगु ..

सतत रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत राहणे, जमीन, घर घेणे, त्याबद्दल अत्यंत उत्साहाने बोलत राहणे.

टेल मी यू आर साऊथ इंडियन विदाऊट...
ऑफिसमध्ये असलेली छानशी सोयीस्कर रित्या केलेली आणि एक सारखी रचना मोडून आपली टेबल / खुर्ची विसंगत दिशेने मांडून बसलेले असणे.

टेल मी यु आर जूना/जूनी माबो कर..

ही चर्चा आधीच चाऊन चोथा झालेली आहे../

आले वाटतं कपडे (आयडी बदलून)/

आईने अकबरी/

कोतबो वर समस्या मांडली म्हणजे एक तर समस्या मांडणारा/री फेक आयडी आहे नाहितर समस्या काल्पनिक आहे/ ह्या चर्चे तून साध्य काय होतं??

Lol

स्कूल डेमोग्राफिक>>>>> Lol जबरी आहे.

टेल मी यु आर देसी पॅरेंट

उठसुठ कसलेकसले पेटिशन उघडणे.. सह्या घेणे

वावेच्या तेलगू पोस्ट वरुन..
टेल मी यू आर इन बे-एरिआ क्राऊड....
कुठल्याही वयाच्या, रंगाच्या, लिंगाच्या. प्रोफेशनच्या व्यक्ती एकमेकांशी बोलताना घरं किती महाग आहेत किंवा स्थावर मालमत्ता/ रिअल्टेर विषय हा एकदा तरी निघालाच पाहिजे.

तुम्ही बर्‍याच काळाने कागदावर छापलेलं पुस्तक वाचायला घेता.
एखादा शब्द अडला तर त्यावर बोटाने आपटून 'लुक अप' करायचा प्रयत्न करता.
अक्षरं लहान वाटली तर अंगठा आणि तर्जनीने पुस्तक 'मोठं' करायचा प्रयत्न करता.
तर तुम्ही कोण? Happy

हो आणि टेकटॉक.
हर्पेन! /\

टेल मी यू आर विथ अ तेलगू..
भाजलेलं कणिस तोंडाशी नेऊन दातानेच दाणे तोडून न खाता अंगठ्याच्या नखाने एकएक दाणा सुटा करुन खाणार, आणि आपण तसं नाही खाल्लं की आपल्याला तसं खाता 'येत नाही' असा ग्रह करुन आपल्याला त्यात कशी गंमत आहे आणि आपण कुठल्या आनंदाला मुकतोय अशा थाटात शिकवणार.

>>> टेल मी यू आर फेमिनिस्ट विदाऊट टेलिंग सो.
अमित, रुम्बाच्याही कारच्या नॅव्हिगेशन इन्स्ट्रक्शन्स! Happy

तर्जनीने झूम वरुन आठवलं... Proud
टेल मी यू अलवेज ड्राईव्ह कार/ टू व्हिलर (विदाउट चेकिंग ब्लाईंड स्पॉट) विदाऊट टेलिंग मी...
कधी काळी रस्त्यावर चालायची, किंवा आईस स्केट करायची वेळ आली की आपली चालण्याची (स्केट करण्याची) लेन बदलताना मागे कोणी आहे का हे मान १८० अंशात मागे करुन न बघता किंचित उजवी/ डावी कडे आरसा आहे समजुन बघणे.

मला अजूनही खात्री नाही की मी ब्लाईंड स्पॉट चेक करते की चेक केल्यासारखे करते. Lol

टेल मी यू आर विथ अ तेलगू..
>>>तुमच्या ब्लेजरला सांबारचा घमघमाट

टेल मी यू आर विथ अ देसी इन US/Canada
>>>पहिल्यांदा घरी आलेल्यांना 'काय मगं डिरेक्शन बरोबर होत्या की नाही' हे अभिमानाने विचारणे जणू काही यांनीच रस्ते बांधलेत. (आता हे कमी झाले असेल.पण प्रि जिपिएस काळात होते. )

टेल मी यु आर सेलिब्रेटी विदाऊट टेलींग मी....
इतर सेलिब्रेटींना अरेतुरे संबोधायचे, खुपच आतल्या गोटातली बातमी असल्यासारखे एखादे गॉसिप फेकून द्यायचे आणि एकदम कुणाला कळेल नकळेशी रिक्षा फिरवायची Wink

टेल मी यू अलवेज ड्राईव्ह कार/ टू व्हिलर (विदाउट चेकिंग ब्लाईंड स्पॉट) विदाऊट टेलिंग मी... >>> हो मी पण हटकून स्टॉप साइन ला अगदी रेषेच्या मागे थांबते ( चालताना!)

Pages