टेल मी यू आर 'समथिंग' विदाऊट टेलिंग मी यू आर 'समथिंग' !

Submitted by अमितव on 19 January, 2022 - 14:06

तुम्ही टिकटॉक बघत असाल तर हे काय आहे तुम्हाला माहितीच आहे. 'टेल मी यू आर समथिंग विदाऊट टेलिंग मी यू आर समथिंग', अर्थात घिसेपिटे ते नाविन्यपूर्ण असे स्टिरिओटाईप्स सांगून हसायचा धागा. टिकटॉकवर या प्रकारचे व्हिडिओ साधारण एकही अक्षर न बोलता नुसत्या दृष्य (व्हिज्युअल्स) परिणामांत केलेले असतात. इथे आपण तेच शब्दांतून करू शकतो. प्रताधिकारमुक्त अशी चित्रे मिळाली आणि त्यातून तुम्हाला ते सांगता आलं तर सोन्याहुन पिवळं.

प्रतिसादांत साधारण खालील प्रमाणे लिहा.

'टेल मी यू आर < >, विदाउट टेलिंग मी यू आर < > ' असं प्रतिसादात '< >' च्या जागी योग्य शब्द घालून लिहा आणि मग तुम्ही स्वतः करत असलेली गोष्ट किंवा तुम्ही बघितल्या असलेल्या गुणदोषांचं न लाजता सार्वत्रिकरण करुन लिहा.

हा स्टिरिओटाईप्सना हसायचा धागा आहे, आपल्या सर्वांत ते थोडे बहुत असतातच. नसले तरी बाहेरचं जग आपल्याकडे ग्रूप म्हणून हसतच असते. काहीही शिकण्यासाठी, बदलण्यासाठी हा धागा नाही. निखळ मनोरंजन आहे. फक्त पर्सनल होऊ देऊ नका, आणि आपल्या अंगाला लावुन घेऊ नका.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेल मी यू आर मध्यमवर्गीय विदाऊट टेलिंग मी यू आर मध्यमवर्गीय :
सगळ्या ब्रँडची माहिती ठेवणे पण घरी ऑफिसचे फुकटचे शर्ट घालणे, मुलांना कुठे कुठे मिळालेल्या (अमेरिकेत प्रसिद्ध) ग्रे/नेव्ही ब्लू टीशर्ट मधे लहानाचे मोठे करणे.

सामो , उर्दू Lol

टेल मी यु आर अ मेल रुमी विथ अ मेल रूमी
"अर्रे यार लेटस डिव्हाईड हाफ-हाफ"
विरुद्ध
टेल मी यु आर अ फिमेल रुमी विथ अ फिमेल रूमी
"हां मेरा हुआ $११:२५ और तेरा $१२:७५. ठिक है? (दुसरीने एक्स्ट्रा चटणी मागवलेली असते) बादमे कभी भी देना (लेकिन यादसे देना Wink हे मनात) "

पै न पै मोजणार व स्प्लिट करणार.

टेल मी यू आर ममव अमेरिकन विदाऊट टेलिंग मी यू आर ममव अमेरिकन

आयुष्य काॅस्टकोभोवती फिरत असल्याचा दाखला येणार्या पोस्टी टाकायच्या.

टेल मी यु हॅव्ह अ मायनर ओसीडी विदाऊट टेलिंग मी सो
बिल्डिंगच्या लाँड्री रुममधे जर वेळ मिळाला, यदाकदाचित तर सगळ्या ड्रायर्समधील लिंट काढून टाकणार Wink

सॉरी या मुद्द्याशी कोणी रिलेट करेलच असे नाही परंतु मी करते असे व क्वचित फुकटच्या वाईप्स्नी टेबल पूस कुठे वॉशरची रिम पूस .... Sad Sad

टेम मी यू आर कनेडीअन विदाऊट टेलिंग मी :
ऑफिसच्या किचन मध्ये कप विसळून पेपर टॉवेलने पुसला की तो पेपर टॉवेल कचर्‍यात फेकण्याआधी त्याने काऊंटर, सिंकच्या रिम वर उडलेले पाण्याचे थेंब पुसणार आणि ट्रॅशचा ड्रॉवर काऊंटरच्या दुसर्‍या टोकाला असेल तर हातासरशी उरलेला काउंटर पुसत पुसत त्या टोकाला जाऊन ट्रॅश फेकणार.

अमितव, म्हणजे माझी आई पण कनेडीअन असावी Proud
तीच्यातही आहेत हे गुण
का हे डोंबिवलीकरांचे गुण आहेत

टेम मी यू आर कनेडीअन विदाऊट टेलिंग मी :
ऑफिसच्या किचन मध्ये कप विसळून पेपर टॉवेलने पुसला की तो पेपर टॉवेल कचर्‍यात फेकण्याआधी त्याने काऊंटर, सिंकच्या रिम वर उडलेले पाण्याचे थेंब पुसणार आणि ट्रॅशचा ड्रॉवर काऊंटरच्या दुसर्‍या टोकाला असेल तर हातासरशी उरलेला काउंटर पुसत पुसत त्या टोकाला जाऊन ट्रॅश फेकणार. >>
हेच अमेरिकन असतील तर आधी रीयूझेबल कप वापरणार नाहीत. एकात एक असे दोन डिस्पोझेबल कप घेणार . पण लंच बॉक्स / कॉफी मग वगैरे धुताना २०-२५ गॅलन पाणी वापरणार आणि नंतर ४-६ पेपर टावेल वापरुन तो डबा / कॉफी मग पुसणार

>>>>>ऑफिसच्या किचन मध्ये कप विसळून पेपर टॉवेलने पुसला की तो पेपर टॉवेल कचर्‍यात फेकण्याआधी त्याने काऊंटर, सिंकच्या रिम वर उडलेले पाण्याचे थेंब पुसणार आणि ट्रॅशचा ड्रॉवर काऊंटरच्या दुसर्‍या टोकाला असेल तर हातासरशी उरलेला काउंटर पुसत पुसत त्या टोकाला जाऊन ट्रॅश फेकणार.

होय हे मीही करते. टॉवेल वाया जाउ द्यायचा नाही. Happy

टेल मी यु आर ममव विदाऊट टेलिंग इट सो

विटके कपडे एक तर टाकवत नाहीत. (जे की चूकीचे आहे. मान्य!) त्यात हिंमत करुन टाकलेच तर, आपण केले ते योग्य होते की उधळपट्टी होती - या विचारात पुढचे २ दिवस घालविणे Happy

टेल मी यु आर अ फॉक्सी वुमन विदाऊट टेलिंग सो
अतिशय नावडती कलीग विटका म्हणा किंवा न शोभेलसा ड्रेस घालून आली की त्या ड्रेसची त्या लुकची स्तुती करणे ;), की ती कन्विन्सच व्हावी मस्त दिसतेय Wink

मला नाही वाटत कोणी रिलेट होइल पण मी हे केलेले आहे Happy मग काय तर!!! ती मला हॅरॅस करायची. मी आले ना सकाळी की रोज विचारायची "आर यु नॉट वेल??? यु आर लुकिंग सो पेल. अमकं न टमकं"

>>>>>>>> नंतर ४-६ पेपर टावेल वापरुन तो डबा / कॉफी मग पुसणार
येस्स!! काय माईंडलेसली हे लोकं फरफरा टॉवेल ओढून , हात जरा पुसला न पुसला करुन ते टॉवेल्स फेकतात. पर्यावरण नको काटकसर नको , कशाची काळजीच नसते. Sad

टेल मी यु आर ममव विदाऊट टेलिंग इट सो
तुमच्या अपार्टमेन्ट रेंटमध्ये लाईट युटिलिटी(बिल) इन्क्लुडेड आहे तरी खोलीतून दुअसर्‍या खोलीत जाताना पंखे, दिवे बंद करणार. कटाक्षाने वीजबचत करणार.
हाडात मुरलेली सवय अन दुसरं काय Wink

टेल मी यु आर डोंबिवलीकर विदाऊट टेलिंग इट सो

सिनेमात कोणी नळ उघडाच ठेऊन दात घासायला लागलं की इथे जीव कासावीस

टेल मी यु आर हॅरी पॉटर फॅन विदाऊट टेलिंग मी सो
सोफ्यावर तंगड्या पसरुन बसलं आणि रिमोट दूर असला की 'अकिओ रिमोट' म्हणणार.
टेस्लाने कार 'समन' करायच्या फीचरला 'अक्यो फीचर' म्हटलं नाही म्हणून हळहळणार.

टेल मी यु आर मॅरीड विदाऊट टेलिंग इट सो.
विमानतळावर जाताना भांडण झालं कोणता रस्ता घ्यावा वगैरे. आणि नवरा म्हणेल तो रस्ता घेतला तर वाटेत ट्राफिक लागून विमान चुकावं अशी प्रार्थना करणार. फक्त सो दॅट "आय टोल्ड यु" म्हणता यावं म्हणुन Wink

विमान तिकीटाचे पैसे गेले तरी बेहत्तर पण नवर्‍याला त्याची जागा .... वगैरे वगैरे Happy

>>>>>सिरिअसली??? हू डझ धिस...
अमित टंडनच्या स्टँड अप शो मधुन उचललाय हो तो जोक.
नेमकी पकडले गेलेच Wink

टेल मी यू आर गोइंग टू वेस्ट माय टाईम विदाऊट गिविंग मी ऍन अपोरचुनिटी टू एस्केप, विदाऊट टेलिंग मी यू आर गोइंग टू वेस्ट माय टाईम विदाऊट गिविंग मी ऍन अपोरचुनिटी टू एस्केप - प्रवासावरून आल्यावर फोटो दाखवायला घेणे.

टेल मी यु आर "एन आर आय विसिटींग इंडिया फॉर व्हेकेशन" विदाऊट टेलिंग इट सो..
१. पाणीपुरी, भेळेच्या किमती तिप्पट झालेल्या बघून हैराण होणार
२. हॉटेलात गेल्यावर पण तेच "हैराण होणे" आणि मग वेटर वाढायला लागल्यावर ऑकवर्ड होणार, त्याला थँक यु म्हणणार
३. गर्दीच्या ठिकाणी गेल्यावर दोन हात अंतर ठेवून उभे रहाणार आणि लोक मधे घुसले कि हैराण होणार (नुसतेच चिडके चेहेरे बरं का)
४. अमेरिकेत असताना डॉलरला रुपये म्हणणार आणि भारतात येऊन रुपयाला डॉलर म्हणणार

माबोकर ह्या यादीत अजून बरीच भर घालतील ह्याची खात्री आहे मला :).

टेल मी अबाउट द स्कूल डेमोग्राफिक विदाऊट आस्किंग :
टीम स्पोर्ट्स अपडेट
फुटबॉल ट्राय आउट्स आर कॅन्सल्ड (अगेन) ड्यू टू लॅक ऑफ रिस्पॉन्स
रोबॉटिक्स - सॉरी नो मोर स्पॉट्स अवेलेबल.
सायन्स ऑलिम्पियाड - अ‍ॅप्लिकेशन्स आर क्लोज्ड ड्यू टू ओवरवेल्मिंग रिस्पॉन्स.
Happy

मै, Biggrin

टेल मी यु आर नु पॅरेन्ट्स विदाऊट टेलिंग इट सो.

" हल्ली बाथरूम मधे सुद्धा मी ' बेबी शाक् डु डू डु डू डू डू' गुनगुनतोय ".

Pages