टेल मी यू आर 'समथिंग' विदाऊट टेलिंग मी यू आर 'समथिंग' !

Submitted by अमितव on 19 January, 2022 - 14:06

तुम्ही टिकटॉक बघत असाल तर हे काय आहे तुम्हाला माहितीच आहे. 'टेल मी यू आर समथिंग विदाऊट टेलिंग मी यू आर समथिंग', अर्थात घिसेपिटे ते नाविन्यपूर्ण असे स्टिरिओटाईप्स सांगून हसायचा धागा. टिकटॉकवर या प्रकारचे व्हिडिओ साधारण एकही अक्षर न बोलता नुसत्या दृष्य (व्हिज्युअल्स) परिणामांत केलेले असतात. इथे आपण तेच शब्दांतून करू शकतो. प्रताधिकारमुक्त अशी चित्रे मिळाली आणि त्यातून तुम्हाला ते सांगता आलं तर सोन्याहुन पिवळं.

प्रतिसादांत साधारण खालील प्रमाणे लिहा.

'टेल मी यू आर < >, विदाउट टेलिंग मी यू आर < > ' असं प्रतिसादात '< >' च्या जागी योग्य शब्द घालून लिहा आणि मग तुम्ही स्वतः करत असलेली गोष्ट किंवा तुम्ही बघितल्या असलेल्या गुणदोषांचं न लाजता सार्वत्रिकरण करुन लिहा.

हा स्टिरिओटाईप्सना हसायचा धागा आहे, आपल्या सर्वांत ते थोडे बहुत असतातच. नसले तरी बाहेरचं जग आपल्याकडे ग्रूप म्हणून हसतच असते. काहीही शिकण्यासाठी, बदलण्यासाठी हा धागा नाही. निखळ मनोरंजन आहे. फक्त पर्सनल होऊ देऊ नका, आणि आपल्या अंगाला लावुन घेऊ नका.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेल मी यु आर "Gemini/Virgo " विदाउट टेलिंग यु आर "Gemini/Virgo">>>> एटीएममधून पैसे काढून प्रोसिजर पूर्ण करून बाहेर पडतानाही दोन/तीनदा cancel बटण दाबणे
अथवा
घराबाहेर पडल्यावर गॅस/नळ बंद खरंच केलाय या शंकेने परत घरी जाऊन सगळं नीट चेक करणे

Tell me you are intern without telling me

First name policy कितीही वेळा समजावून सांगितली तरी चारचौघात हटकून सर/मॅडम म्हणूनच संबोधणार

टेल मी यू आर अ सिक्रेट स्मोकर विदाउट ...
१. जेवल्यावर शतपावली करायला जाणे, परत आल्या आल्या बाथरूम मध्ये जाणे, मग बाल्कनीत जाऊन काही वाचत बसणे अथवा मुद्दाम दूर रहात नाहीये असे भासवणे.
२. १० मिनिटाच्या बाहेरच्या कामाला तासभर लावणे.
३. लवंग, वेलदोडा, माऊथ फ्रेशनरचा वापर सुरू करणे/वाढवणे.
४. रात्रीच्या वेळी किचनच्या बाल्कनीच्या बाजूची खिडकी व दार आवर्जून बंद करणे सुरू करणे, बाल्कनीच्या दाराच्या बीजगिरीत तेल घालणे.
५. न सांगता संपण्यापूर्वी घरात आगपेट्या आणून ठेवणे.
६. संपलेली आगपेटी ज्यावर काडी घासतात तो भाग अर्धा काढलेल्या अवस्थेत कचरापेटीत आढळणे.
७. बाल्कनी साफ करायला घेतली असता तो तुकडा अडगळीत सापडणे.

टेल मी यू आर अ सिक्रेट स्मोकर विदाउट ...
१. जेवल्यावर शतपावली करायला जाणे >> आमच्याकडचं पब्लिक कचरा फेकायला जातं Proud

Pages