टेल मी यू आर 'समथिंग' विदाऊट टेलिंग मी यू आर 'समथिंग' !

Submitted by अमितव on 19 January, 2022 - 14:06

तुम्ही टिकटॉक बघत असाल तर हे काय आहे तुम्हाला माहितीच आहे. 'टेल मी यू आर समथिंग विदाऊट टेलिंग मी यू आर समथिंग', अर्थात घिसेपिटे ते नाविन्यपूर्ण असे स्टिरिओटाईप्स सांगून हसायचा धागा. टिकटॉकवर या प्रकारचे व्हिडिओ साधारण एकही अक्षर न बोलता नुसत्या दृष्य (व्हिज्युअल्स) परिणामांत केलेले असतात. इथे आपण तेच शब्दांतून करू शकतो. प्रताधिकारमुक्त अशी चित्रे मिळाली आणि त्यातून तुम्हाला ते सांगता आलं तर सोन्याहुन पिवळं.

प्रतिसादांत साधारण खालील प्रमाणे लिहा.

'टेल मी यू आर < >, विदाउट टेलिंग मी यू आर < > ' असं प्रतिसादात '< >' च्या जागी योग्य शब्द घालून लिहा आणि मग तुम्ही स्वतः करत असलेली गोष्ट किंवा तुम्ही बघितल्या असलेल्या गुणदोषांचं न लाजता सार्वत्रिकरण करुन लिहा.

हा स्टिरिओटाईप्सना हसायचा धागा आहे, आपल्या सर्वांत ते थोडे बहुत असतातच. नसले तरी बाहेरचं जग आपल्याकडे ग्रूप म्हणून हसतच असते. काहीही शिकण्यासाठी, बदलण्यासाठी हा धागा नाही. निखळ मनोरंजन आहे. फक्त पर्सनल होऊ देऊ नका, आणि आपल्या अंगाला लावुन घेऊ नका.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टेल मी तुम्ही रिव्यू लिहीत असलेला मराठी पिक्चर खतरनाक क्लिष्ट आहे विदाउट टेलिंग मी...

पहिले दोन पॅरा - "१९९१ मधे अर्थव्यवस्था खुली झाली. मध्यमवर्गाला... याच विषयावर फ्रेंच चित्रपटसृष्टीत ट्रुफो, रोमेर ई दिग्दर्शकांनी... तसेच इराणी मधेही मजिदी, फरहादी ई.नी...., कोरियन चित्रपटात होंग-जीन, चॅन-वू यांनी.....मराठी चित्रपटसृष्टीतील भवताल, अवकाश, साचलेपण.... प्रस्तुत चित्रपट याच तंत्राचा वापर करतो..."

मला वाटले आपण फक्त आपल्याबद्दलच लिहायचेय.

टेल मी यू आर फ्रॉम विदर्भ विदाउट टेलिंग...
मस्त वाटुन राहिला हा खेळ.

टेल मी यू आर फेमिनिस्ट विदाऊट टेलिंग सो.
नवा घेतलेला रुंबा चालू केला की मला चार्ज करा, माझ्या वाटेतले अडथळे उचला टाईप बडबड स्त्री च्या आवाजात ऐकू यायला लागते. की ती पुरुषी आवाजात कॉन्फिगर करयचा प्रयत्न करणे. ते शक्य नाहीसं दिसलं की सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मना ते लिहिणे, तेवढ्यावरुन प्रॉडक्ट रिटर्न करणे. पण अलेक्सा मात्र स्त्री आवाजातच ठेवणे, रादर तो स्त्री आवाजात आहे हे विचार केल्याशिवाय माहितीच नसणे.

टेल मी यू आर अ पुणेकर विदाउट...

माबोवरचा एक गप्पांचा बाफ
१९ जानेवारी २०२२ १३:००: "अरे आज कोणीच नाही इथे?"

१९ जानेवारी २०२२ १६:०५: "मी आहे की"

ऑनलाइन शॉपिन्ग करताना सॉर्टिन्ग नेहमी लो टु हाय पण कस्टमर रेटिंग फिल्टर एकदम पाच पैकी पाच हवं. >>>> आई ग्ग! अगदी अगदी.

म्हाळसा, तेलाची बाटली नुसतीच उपडी ठेवलिस श्या ..म्हणजे मॉनिशा लेवल नाही तुझ्यात. त्या बाटलीत पाणी ओतून त्या पाण्याने कणिक मळलीस तरच पास होशील मध्यम वर्ग परीक्षा. Wink

टेल मी यू आर अ हैद्राबादी :
चायनीज रेस्टॉरंटमध्ये फ्राईड राईस कडे बघुन' "ये सूखा राइस कैसे खाएंगे भैया, ग्रेव्ही नही तो साम्बार वगैराह नही है क्या?"

टेल मी यू आर द पेरेन्ट ( range of children age is 5 to 20 years ) विदाउट...

काय वाट्टेल तो गोंधळ घाला, नंतर मी पसारा आवरणार नाही....

हे मस्त आहे.
म म व - अरे कशाला काढली नवी टुथपेस्ट? ह्यात आहे अजुन. चालेल आजचा दिवस.
(फोटो देता येत नाहीये. पण सबको मालुम है क्या फोटो आनेका इधर)

Tell me you are punekar without telling me you are punekar

आम्ही टिकटॉक वापरत नाही आणि वापरणार नाही!

Tell me you are punekar without telling me you are punekar
दुपारी १ ते ४ बंद!

Tell me you are punekar without telling me you are punekar>>>>

तुळशी बागेत दहा दहा रुपयात मिळतात हे….

Pages