कॅलिग्राफी

Submitted by बोकलत on 1 November, 2021 - 00:20

नमस्कार, या दिवाळीत बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही. तर हि सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी कॅलिग्राफी शिकण्याचे मनावर घेतले आहे. सध्या युट्युबवर एक दोन चॅनेल फॉलो करतोय. जास्त फोकस देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यावर राहणार आहे. सुरवात कशी कोठून करावी हे समजत नाही. काही जण सांगतात कि मार्कर वापरा काही जण सांगताहेत पेनने सुरवात करा. मार्करमध्ये जास्त प्रकार नाहीत पण पेनात भरपूर प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या निबचे पेन ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच हे जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचे पेन आहे ते त्यांनी स्वतः बनवलेत कि कुठून आणलेत देव जाणे. यामध्ये गोंधळून जायला होतंय. नक्की कोठून कशी सुरवात केली पाहिजे? आणि कसा कुठल्या पेपरवर सराव केला पाहिजे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

एक गम्मत करुन पहा.
देवनागरी अक्षरांसाठी इंग्रजी निब वापरून पहा कसं दिसतं ते. वेगळा अन सुंदर फाँट बनतो.

फॉरवर्ड स्लॅश नी बॅकवर्ड स्लॅश म्हणा की.
ह्या हिशोबाने विंग्रज मागासलेले नी देवनागरी पुढारलेले म्हणायला हरकत नाही.

भारतीयांकडे असणाऱ्या प्राचीन कला इतरांना न सांगितल्याने जशा लुप्त झाल्या तशीच कॅलिग्राफी कला लुप्त होणार आहे.

फा वरचा अनुस्वार चुकून पुसला गेला आणि त्याला तोफगोळ्याचा आकार आला Happy
IMG-20211211-WA0000.jpg

सर्वच कलाकारी आवडते आहे. अप्रतिम वाटते आहे वाचायला. गणेश हस्तलेखन स्पर्धेतील आपले अक्षर आठवते. कसलं वळणदार होते/आहे. कीप इट अप.

छान लिहीले आहे वरचे वाक्य. अक्षर, हास्यलहरींवरती हिंदोळत आहे असे वाटते. मज्जा आणि नर्व्हस शब्द वेगळ्या रंगात लिहीण्याचीआयाडिया आवडली. त्यामुळे जोक पटकन कळतोय Happy

असे जोक असे वेगळ्या रंगातच लिहिले जातात.. जोक मस्त आहे.. मागेही वाचलेला.. पण अक्षर मात्र कमाल आहे.. या धाग्यावर पहिल्यांदाच आलोय. कारण मी कोंबडेचे पाय वाला. मागे त्या सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत तुम्हीच विजेते होता का बोकलत?

पुलंच्या सोबत हस्ताक्षराचे श्रेय घेणारे तुमचेही नाव वा वॉटरमार्क टाका आणि व्हॉटसपवर फिरवा. जोकसह बोकलत हे नावही वायरल होईल Happy

धन्यवाद सामो आणि ऋन्मेष. हो मीच विजेता होतो Happy
पुलंच्या सोबत हस्ताक्षराचे श्रेय घेणारे तुमचेही नाव वा वॉटरमार्क टाका आणि व्हॉटसपवर फिरवा. जोकसह बोकलत हे नावही वायरल होईल>>> हो व्हाट्सअप्प वर टाकतो माझं नाव Happy पण माझ्यापेक्षा भारी अक्षर लिहिणारे कितीतरी आहेत सोशल मीडियावर. त्यांचं अक्षर बघितलं की मला माझं खराब वाटायला लागतं.

बोकलत जमायला लागलं. मज्जा संस्था परफेक्ट.
मराठी पाऊल मधे पावलासारखे ठसे दिसले किंवा अजून काही करता आले तर ?
एक्स्प्रेशन्स किंवा प्रतिमा दिसल्या तर बेस्ट.

धन्यवाद शांत माणूस Happy हो, तुम्ही बरोबर बोलताय जे लिहिलंय त्यानुसार चित्रांचा समावेश केला तर अजून छान दिसेल. प्रयत्न करतो.

खूप छान बोकलत Happy

माझे नांव कॅलिग्राफी करुन द्याल का?

Pages