कॅलिग्राफी

Submitted by बोकलत on 1 November, 2021 - 00:20

नमस्कार, या दिवाळीत बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही. तर हि सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी कॅलिग्राफी शिकण्याचे मनावर घेतले आहे. सध्या युट्युबवर एक दोन चॅनेल फॉलो करतोय. जास्त फोकस देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यावर राहणार आहे. सुरवात कशी कोठून करावी हे समजत नाही. काही जण सांगतात कि मार्कर वापरा काही जण सांगताहेत पेनने सुरवात करा. मार्करमध्ये जास्त प्रकार नाहीत पण पेनात भरपूर प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या निबचे पेन ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच हे जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचे पेन आहे ते त्यांनी स्वतः बनवलेत कि कुठून आणलेत देव जाणे. यामध्ये गोंधळून जायला होतंय. नक्की कोठून कशी सुरवात केली पाहिजे? आणि कसा कुठल्या पेपरवर सराव केला पाहिजे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मला एक विचारायचं आहे की काही कॅलिग्राफी करणारे आधी एक पारदर्शक पाण्यासारख्या शाईने लिहितात आणि नंतर त्यात वेगवेगळे रंग भरतात तो प्रकार काय आहे? कसली शाई असते ती?

ते पाणीच असतं ,एक शब्द एकावेळी पाणी भरलेल्या निब ने लिहायचं, मग हवा असलेल्या दुसऱ्या रंगाचा मार्कर हलकेच टेकवायचा वरच्या बाजूस,किंवा निब,किंवा ड्रॉपर ने
दुरंगी हवं असेल तर मध्यातून दुसरा रंग सोडायचा,

दुसरा प्रकार म्हणजे
प्लास्टिक पेपर वर एक रंगाचा मार्कर घासायचा, थेंब थेंब जमा होतात, मग दुसऱ्या रंगाचा मार्कर त्यावर घासायचा, आणि लिहायचं, मिक्स शेड मिळते

अक्षर खूपच सुंदर आहे. छापील आहे असं वाटेल एखाद्याला. फक्त काही छोट्या सुधारणा सुचवू इच्छितो:
१. समप्रभः आणि देवः - असं नको. इथे वक्रतुण्ड, महाकाय, देव - इत्यादी सर्व संबोधन एकवचनी शब्द आहेत. त्यात विसर्ग नको. समप्रभ, देव असं पाहिजे.
२. सूर्यकोटिसमप्रभ - हा एक शब्द पाहिजे. कोटी सूर्यांच्या सम ज्याची प्रभा आहे असा तो - अश्या अर्थाचा तो एकच सामासिक शब्द आहे.

छान आहे. ह्यात थोडी चित्रकला करता आली तर चांगलं वाटेल का अजून? म्हणजे एखाद्या अक्षराचा पक्षी, एखाद्या अक्षराचा पिंजरा करता आला तर?

धन्यवाद mrunali.samad Happy
हरचंदजी धन्यवाद Happy , मला पण वाटतं चित्र काढावं पण माझी चित्रकला खूपच खराब आहे. पहिलीत मुलगा पण माझ्यापेक्षा चांगलं चित्र काढेल. शाळेत असताना चित्रकला या विषयात कधीच गोडी न्हवती. ईतर विषयांच्या तुलनेत रिलॅक्स असायचो म्हणून कदाचित थोडाफार आवडत असेल. तरीपण प्रयत्न करतो.

खूप सुंदर !
हे छानच आलंय म्हणावं तर पुढचं ही तसच सुंदर .

20211126_091735.jpg

हे माझ्या एका मैत्रिणीने हातानेच लिहून पाठवले होते माझ्या घरी. कदाचित आंतरजालावरून घेतले आहे.

छान लिहीताय बोकलत. अक्षरा व्यतिरिक्त पानावर डाग पाडु नका
(पण आवडत म्हणुन पेपराला लहान मुलांसारखा डाग का पाडताय, हे वय आहे का पेपराशी खेळायचं Wink Wink )

छान आहे सियोना तुमच्या मैत्रिणीचं अक्षर.
धन्यवाद जेम्स बॉन्ड.
अक्षरा व्यतिरिक्त पानावर डाग पाडु नका
(पण आवडत म्हणुन पेपराला लहान मुलांसारखा डाग का पाडताय, हे वय आहे का पेपराशी खेळायचं Wink Wink )>>>> :विचार करणारी बाहुली:

Pages