कॅलिग्राफी

Submitted by बोकलत on 1 November, 2021 - 00:20

नमस्कार, या दिवाळीत बाहेर कुठे जायचा प्लॅन नाही. तर हि सुट्टी सत्कारणी लावण्यासाठी कॅलिग्राफी शिकण्याचे मनावर घेतले आहे. सध्या युट्युबवर एक दोन चॅनेल फॉलो करतोय. जास्त फोकस देवनागरी कॅलिग्राफी शिकण्यावर राहणार आहे. सुरवात कशी कोठून करावी हे समजत नाही. काही जण सांगतात कि मार्कर वापरा काही जण सांगताहेत पेनने सुरवात करा. मार्करमध्ये जास्त प्रकार नाहीत पण पेनात भरपूर प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या निबचे पेन ऑनलाईन उपलब्ध आहे. तसेच हे जे शिकवणारे आहेत त्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारचे पेन आहे ते त्यांनी स्वतः बनवलेत कि कुठून आणलेत देव जाणे. यामध्ये गोंधळून जायला होतंय. नक्की कोठून कशी सुरवात केली पाहिजे? आणि कसा कुठल्या पेपरवर सराव केला पाहिजे?

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

सुंदर! एखाद-दोन छोटे बदल केल्यास अचूक होईल हे लिखाण. - घुमवीत मध्ये घु पहिला पाहिजे, शेवटच्या ओळीत 'धराया हो' नको, 'धरा हो' पाहिजे.

धन्यवाद ऋतुराजजी _/\_ Happy
धन्यवाद अस्मिताजी _/\_ हो ते नंतर लक्षात आलं माझ्या. पुढच्यावेळी दुरुस्त करतो Happy

Pages