चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भूतपटांमधे भूतांपेक्षा अँटिसीपेशन जे तयार करू शकतात ते अधिक भितीदायक बनतात असे वाटते. मग ते जमवायला डायरेक्शन, बॅकग्राऊंड म्युझिक नि अभिनय हे जमवावे लागतात. मूळ ओमेन नि रेवतीचा रात पटकन आठववात. रात मधे तर फक्त मोजकेच दोन-तीन सीन आहे भूत म्हणता येतील असे पण रेवथी चा अभिनय नि ओमेन मधल्या त्या छोट्या मूलाचा अभिनय - आठवा शेवटचा एकमेव सीन - भयंकर अंगावर येतात - अगदी शहारे आणतात.

रैनीचा इव्हिल डेड कल्ट क्लासिक आहे ह्या जॉनरचा. त्यातून किती फ्रँचाईजी निर्माण झाल्या हे फक्त देवालाच ठाऊक.

भूत, राज हे मीपण बघितलेत थिएटरमध्ये तेव्हा. भूतमध्ये फक्त एकदा उर्मिला मातोंडकर जिन्याने वर गेल्यावर ती भूत असलेली मनजीत खाली उभी राहून तिच्याकडे बघते तेव्हा अंगावर काटा आला होता. राजमधला असा कुठला सीन लक्षात नाही. 'कौन' मात्र डेंजर होता. भुताचा नसूनही. त्यात सतत भीतीचं वातावरण आहे.
मी वर हॉरर सिनेमे बघत नाही लिहिलं होतं खरं, पण भूत आणि राज तेव्हा आठवले नाहीत. पण 'तुंबाड'इतकी भीती अजिबातच वाटली नव्हती तेव्हा.

रात खूपच भीतीदायक वाटला होता. विशाल थेटरला बघितला होता, बाल्कनीत एकदम मागची सीट होती जिथे साउंड सिस्टीम असे. जामच टरकली होती. त्यात एका सिन मध्ये रोहिणी हट्टंगडी मिक्सर चालू करते त्या आवाजानेच असला घाबरलो होतो. परत एका सिन मध्ये रेवती आणि तिचा पंटर फिरायला जातात , जिथे तिच्या अंगात भूत शिरते तो सिन पण टेरर होता. नंतर एवढी भीती तुंबाडला वाटली होती. भूत, काल आणि राज ओके होते.

आम्ही "भूत" इरॉसला बघितला. ऑफिसच्या कलीग्ज बरोबर. त्यामुळे थोडं कमी घाबरायला झालं.
पण भूत मधली उर्मिला सेम माझ्या धाकट्या बहिणी सारखीच दिसत होती. त्यामुळे मला सारखा तिचाच भास होत होता. Lol मला कितीतरी दिवस रात्री डोळे उघडायला भिती वाटायची. ( वाक्य confusing आहे Lol )

धनुडी Lol
मी पण राज थिएटरमध्ये पाहिलेला पण घाबरल्याचे आठवत नाही.
तमिळ- मम्मी (जास्त च भयावह),डिमॉन्टे कॉलनी बघून भीती वाटलेली खरी,टिव्हीवर पाहिले होते तरी, दुपारी पाहत होते एकटी मग शेजारीण मैत्रिणीला बोलवून घेतले होते सोबत बघू म्हणून Lol

41बी बघून पण घाबरले होते.तसे खूप भीती वाले सीन्स नाहीत पण तरी भीती वाटते
डायन पण डोळे बंद करून सर्व कोकणा सीन पाहिलेत

'कौन' मात्र डेंजर होता. भुताचा नसूनही. त्यात सतत भीतीचं वातावरण आहे. >>> टोटली! मी तो थिएटरमधे बघितला होता. त्यात भुताबद्दल काही नाही, चित्रपटात उगाच, रात्र, धुके, पाऊस वगैरे वातावरणनिर्मिती नाही ("कथेतील प्रोटॅगॉनिस्ट्स च्या मनाच्या अवस्थेचे प्रतिबिंबच असलेले धुके, वातावरणातील गूढता वगैरे"). लक्ख दिवसा कथानक घडते. पण तरीही पाहताना भीती जाणवते.

आणि आज बहुचर्चित बळी पाहिला. ओके आहे. ह्याचं शूटिंग बघितलं होतं 2020 ला जानेवारी / फेब्रुवारी मध्ये, डेक्कन कॉलेजमध्ये चालू होतं (पहिल्या लॉकडाऊन च्या जस्ट आधी). ते हॉस्पिटल म्हणजे डेक्कन कॉलेज चे लिंगविस्टिक डिपार्टमेंट Proud माझा पर्शियनचा क्लास असायचा शनिवार, रविवार तेंव्हा साधारण दुपार ते संध्याकाळ पर्यंत चालू असायचे शुटिंग. एकदा दोनदा तर क्लास झाला नाही कारण त्यांना पूर्ण डिपार्टमेंट मध्ये शूटिंग करायचे होते. आज पिक्चर बघताना लक्षात आलं की स्व जो चं शुटिंग वाला हाच तो बळी Happy डेक्कन कॉलेजचे आर्किटेक्चर फार भारी आहे , कसलं जुनं आहे आणि. कुणाचं काय तर कुणाचं काय Proud

४१बी आम्ही इ-स्केअरला बघितलेला. गडबडा लोळणं बाकी होतं. Proud अर्थात हापिसमधल्या टवाळक्या कंपूबरोबर बघितलेला.

मलाही १३ बी माहीत आहे. तो सुद्धा भयपटच होता. पुर्ण पाहिला नव्हता. टीव्ही की लिफ्ट वगैरे मशिनीत भूत शिरते ना.. कोणी सांगतले कसा आहे तर बघेन एकदा.

बाकी हे ४१ बी काय आहे? टायपो झालाय की १३ बी चा ओरिजिनल साऊथ ईण्डियन वा ईंग्लिश मूवी होता?

दहावी फ

रात एकदम च सोल्लेड होता..अनेक दिवस रात्र दहशत कायम होती..डोळ्यांनी अभिनय करायची रेवती.
भूत आणि कौन मस्त होते..कौन थियेटर ल पाहिलेला, थरार इतका की मैत्रिणीचा हात ईतक्या जोराने धरला होता की बस्स रे बस्स!
अजून १ म्हणजे सिक्स्थ सेन्स..अफलातून भिती आणि परीणाम अनेक दिवस राहतो..अजून ही बेड खाली बघताना भिती वाटते हाहा..
तुंबाड चे २ प्लस पाँईंट्स भिती चे वातावरण तयार करण्यात १००% यशस्वी, म्युझिक आणि स्टोरी एकदमच कॅची आहे..खूप च आवडला हा खूप वर्षांनन्तर!

इथली चर्चा वाचुन रात्री डरना मना है बघायचं ठरवलं. सुरु केला तर पैलच चित्र विवेक ओबेरॉयच खोबणी वाले डोळए. मुलं बघुनच नको म्हणाली. बंद केला.

आम्ही लहान असताना एव्हिल डेड बरोबर, 'द ओमेन,' 'द एक्झोर्सिस्ट' हे भयपट चर्चेत होते .
एक्झोरसिस्ट तर कोण पिक्चरहॉलमधे बसुन एकटे पाहुन दाखवेल अश्या पैजा लावायचे लोक.

मला स्वतःला सुश्मिता सेनचा वास्तुशास्त्र सिनेमा बघतांना भिती वाटलेली... स्पेशली तो लहान मुलगा त्याचा बॉल खेळता खेळता कॉटखाली जातो तेव्हा बेडशीट उचलुन खाली बघतो तेव्हा.. ती ३ लहान मुलांची भुते कॉटखाली लपलेली असतात ते पाहुन फार घाबरले.

ईव्हील डेड 1 आणि 2 फार भयानक आहेत
3 विनोदी आहे.भुतं शवपेट्यातून गुडघे चेपत(नीट आठवत नाहीये असंच आहे का पण त्यावेळी विनोदी वाटलं होतं) उठून बसतात वगैरे.
कोरियन हॉरर तर अजून बघतच नाहीये.उगीच डोक्याला ताप नको. Happy आपल्या कुवती नुसार उडी मारावी माणसाने.

@ सस्मित, डरना मना है ची विवेक ओबेरॉय - नाना पाटेकर वाली स्टोरी छान होती. त्या आफताबचीही एक कॉमेडी होती. एक सफरचंदवाली तर जाम बंडल होती. बाकीच्या आठवत नाहीयेत चटकन, चेक करायला हवे एकदा..

डरना मना है थोडासा बघितला होता पण कंटाळा आला होता. सहा गोष्टी आहेत ना वेगवेगळ्या?

आफताबची स्टोरी डमहै की डजहै? आठवत नाही. सफरचंदवाली आता बकवास वाटते तेव्हा भिती वाटली होती.

हो सहा स्टोऱ्या,
डरना मना है सुद्धा काही मित्र चित्राला बघून आलेले. मी गेलो नव्हतो. कारण नुकताच भूतचा ताजा अनुभव होता. म्हणजे बहुधा हा चित्रपट भूतनंतरचा त्याच वर्षातील असावा..दोन्ही राम गोपाल वर्मा..

आफताबची स्टोरी डमहै की डजहै?
>>>
डमहै.. कारण डजहै मी पाहिलाच नाही. कसा आहे तो डमहैच्या तुलनेत?

Pages