चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बळी पहिला. आवडला. पण शेवटच्या ५-७ मिनिटांत माती खाल्ली आहे असं वाटलं. हॉरर पिक्चर हॉरर न ठेवता सामाजिक का करावासा वाटावा? शिवाय सुरूवातीपासून 'बाळा बाळा' करत एलिझाबेथ सगळ्या बाळांना मारताना दाखवली आहे त्याला काही न्याय/क्लोजर दिलाय असं वाटलं नाही. त्या अँगलने पिक्चर डेव्हलप केला असता तर जास्त आवडलं असतं. निदान डॉक्टरांना पकडल्यावर एलिझाबेथ मुक्त झाली असं तरी दाखवायचं. तरीही वर अमितव म्हणतोय त्याप्रमाणे मराठीत असा खिळवून ठेवणारा पिक्चर काढला हे चांगलं वाटलं.

एलिझाबेथ सगळ्या बाळांना मारताना दाखवली आहे त्याला काही न्याय/क्लोजर दिलाय असं वाटलं नाही. त्या अँगलने पिक्चर डेव्हलप केला असता तर जास्त आवडलं असतं. >>> +१

बाळा बाळा' करत एलिझाबेथ सगळ्या बाळांना मारताना दाखवली आहे त्याला काही न्याय/क्लोजर दिलाय असं वाटलं नाही. त्या अँगलने पिक्चर डेव्हलप केला असता तर जास्त आवडलं असतं. निदान डॉक्टरांना पकडल्यावर एलिझाबेथ मुक्त झाली असं तरी दाखवायचं.

>>>

एलिझाबेथ कुठे बाळांना मारताना दाखवली आहे?
आणि एलिझाबेथ मुक्त व्हायला ती कुठे भूत दाखवली आहे?

कि मला काही वेगळे समजले?

एलिझाबेथ कुठे बाळांना मारताना दाखवली आहे? >>>> बंद दाराच्या भोकातून हात येतो आणि मुलांना आत ओढून नेतो असं दाखवलं आहे. तो हात त्या वॉर्डबॉय किंवा पूजा सावंतचा नक्कीच वाटला नाही.

एलिझाबेथ मुक्त व्हायला ती कुठे भूत दाखवली आहे? >>>
ही मुलं त्या बिल्डींगच्या कॉरिडॉर मधे असताना पलिकडच्या कॉरिडॉरमधे भूत दाखवलं आहे. स्वजो त्या दाराच्या भोकातून खोलीत पहात असतो तेव्हा त्याच्या मागे भूत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एलिझाबेथचं भूत त्या स्विचबोर्ड कडे हात करून स्वजोला क्लू देतं असंही दाखवलं आहे.

ती मारत नाही बहुतेक.म्हणजे भास्कर पण डायरेक्ट तिने मारलेला दाखवला नाही.तो ओ टी मध्ये मेलाय म्हणजे वेगळ्या धंदेवाईक कारणाने पण मेला असू शकतो.
शेवटचे संवाद पण धंदेवाईक कारणाकडे पॉईंट करतात.

ती मारत नाही बहुतेक.म्हणजे भास्कर पण डायरेक्ट तिने मारलेला दाखवला नाही >>> त्याच्या आधीच्या मुलाचं काय होतं ते दाखवलंच नाहीये. सुरूवातीच्या सीनमधला. मुलांना डायरेक्टली मारताना दाखवलं नसलं तरी ती मेली आहेत. आणि तोच माझा मुद्दा आहे की या पिक्चरचा प्रॉपर हॉररपट करता आला असता.

रमड +१. असे बरेच मुद्दे हाईंडसाईट मध्ये जाणवले.
चित्रपट चालू होतो तेव्हा एक मुलगा त्या कॉरिडॉर मध्ये आत जातो... मला तेव्हातरी तो मंदारच्या जन्माच्या वेळचा काळ वाटलेला. पण तेव्हा पूजा सावंत तर तिकडे असुच शकत नाही. मग कोणी बाळा बाळा म्हणणं शक्यच नाही. कारण एलिझाबेथ कांड अजुन घडायचं आहे. त्याची उकल झाली नाही. सुरुवात मी परत बघितली नाही सो माझ्या समजण्यात चुक असू शकते, आणि तो काळ प्रेझेंट काळ असू शकतो. पण नसेल तर ते ही झेपलं नाही.
तो मॅप टू फॉर्म ट्रान्सफॉर्मेशन, रक्त टू नो-रक्त, स्वजोचे त्या इमारतीत भास का आहेत/ नाहीत याल स्पष्टीकरण, स्वजोवर हेवी पाळत ठेवुनही... त्याचं मंदारला भेटणे मुश्किल करुनही तो काहीच करत नाही. असं बरंच समजलं नाही मला. पण अगेन लूज एंड ठेवुनही वेगवान कथा ठेवल्याने फार तक्रार नाही.

एलिझाबेथ बाळांना मारते असे चित्रपट बघून लोकांना वाटत असेल तर हे चित्रपटाचे अपयशच म्हणावे लागेल...

8 महिन्या पूर्वी चं दृश्य असतं ते.
म्हणजे स्वजोपुत्र जन्माचा काळ नव्हे.
एकंदर म्हणता पिक्चर चा 80 मिनिटं झाल्यावर लेखक चहा प्यायला गेला आणि त्याला एलिझाबेथ च्या खोलीत कोंडून दुसरा माणूस कथा लिहायला बसला.
मला पण rmd म्हणते तशी कथा अपेक्षित होती धारप थाटाची. पण तसं झालं नाही याचा आनंद पण आहे.

एलिझाबेथ नाही मारत. राधिका शेणॉय किंवा तो राजाराम मारत असणार. स्वजोला पण मारणारच असतात.

ते सारखं सारखं इंजेक्शन खुपसण्याचं दृश्य बघून 'बेबी' च्या शेवटची दृश्यं आठवली. तिथेपण त्या हफीज सईद इक्विव्हॅलन्ट माणसाला सारखंच इंजेक्शन खुपसून बेशुद्ध पाडतात.

भयाची झालर असलेला पण वैद्यकीय भ्रष्टाचारावर फोकस असणारा असा चित्रपट बनवण्याची एक संधी होती. पण वैद्यकीय भ्रष्टाचार हे चित्रपटात खूप जुने झाले आहे प्रकरण.
पर्यावरणाकडे लक्ष वेधून घेणारी भय / गूढ / मानसशास्त्रीय कथा असा एक प्रकार साऊथच्या एका मूव्हीत आहे. प्राईमवर आहे तो. निव्वळ भूतपट कंटाळवाणे होतात.

एलिझाबेथ आहे(गोलमाल रिटर्न सारखं गोपाल है, गोपाल है गोपाल है!)
पण ती तिची खंत व्यक्त करण्यापुरती, तिच्या मुलाशी सारखी परिस्थिती असलेल्या मुलांशी कनेक्ट करण्या पुरती आणि एकंदर प्रकरणाबद्दल संकेत देण्या पुरती आहे.

शेवटी शेवटी अजून चांगला करता आला असता पिक्चर.पण नो तक्रार.मला आवडला.

मला बळी प्राईम वर सापडला नाही, मराठी असे एक्स्टेन्शन टाकून पण नाही..बहुधा इथे (सिंगापोर) प्रक्षेपीत करत नसावेत.
शेवटी छोरी बघायला घेतला. अजून संपवला नाही.. ठीक आहे

आपण सर्वानी मिळून बळी ला बरेच स्पॉयलर दिले आहेत
(वेगळा धागा स्पॉयलर चा काढायला हवा होता.मराठी चित्रपटाचा बिझनेस नको मारायला)

हो, मी शक्यतो मराठी बहुचर्चित चित्रपटावर वेगळा धागाच काढतो. पण यावर ईतकी चर्चा होईल असे वाटले नव्हते. स्वप्निलचा चित्रपट असूनही नवा धागा काढला नाही हे चुकलेच Happy

बाकी ईथले स्पॉईलर काही कामाचे नाहीत. चित्रपट नव्याने बघणाऱ्यांना बघताना ईथले काही डोक्यात येणार नाही. आणि ते शांततेनंतर आता अचानक कुठल्याही क्षणी दचकवणार आहेत ही मजा तर हमखास येणार..

येथल्या ४ टाळक्यानी न बघितल्याने मराठी सिनेमाचा बिझनेस कसा काय बुडणार? तसाही हा सिनेमा प्राइमवर तर आहे.

>>>>>>>>पण वैद्यकीय भ्रष्टाचार हे चित्रपटात खूप जुने झाले आहे प्रकरण.
खूप लहानपणी, दूरदर्शनवरती 'नासूर' पाहीला होता. तेव्हाही गंभीरता जाणवली होती.

बुजुर्गांसोबत>> दचकवणारे सीन्स त्यांना चालणार असतील तर बघा. शिवाय मुलांच्या बाबतीत असं भीतीदायक दाखवलेलंही चाललं पाहिजे. वर अमितवने लिहिलंय पहा.
बाकी आक्षेपार्ह सीन्स नाहीयेत.

ओटीटी वर पण व्ह्यू काऊंट वर गणितं असतात
असो, आता माझ्या कडून तरी स्पॉयलर थांबवते(नाहीतर हिपोक्रीट ठरेन, इथे स्पॉयलर नको म्हणून सर्वात खतरुडपणे मीच ओरडत असते Happy )

बळी ज्ये ना बरोबर बघता येईल, हार्ट पेशंट नाहीत ना?तसा जास्त घाबरवणारा नाहीये.
हॉट सीन्स काही नाहीत.

तसा जास्त घाबरवणारा नाहीये.
>>>>
हे तुम्ही तीनचार वेळा म्हटलेय. पण मी घाबरलेलो बघताना. तर लोकहो, भित्रे असाल वा चित्रपटात घुसून त्यातील वातावरणाशी समरस होत बघणारे असाल तर तुम्ही घाबरू शकता. गाफिल राहू नका Happy

मी तर घाबरले.कारण जास्त हॉरर बघत नाही.वाचते खूप.
भास्कर चा सगळा भाग डोळे मिटुनच पाहिलाय
एकटीने पाहिल्याने.कोणालाच बघायचा नव्हता तो.रात्री एकटी किचनमध्ये आवरा आवर करताना घाबरगुंडी नको.

अनु मला वाटलं होतं तू निर्भयपणे हॉरर सिनेमे बघत असशील Lol
मी 'तुंबाड'पूर्वी कुठलाच हिंदी/इंग्लिश/मराठी हॉरर सिनेमा बघितला नव्हता. दचकायला होतं हे एक आणि किळसवाणी, बीभत्स दृश्यं असतील तरी मला आवडत नाही.

Pages