चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कारखासनीसांची वारी बघतोय
सगळे तगडे कलाकार आहेत आणि मांडणी पण ग्लोबल सिनेमा सारखी केली आहे
पण कास्टिंग काहीतरी मेजर गंडले आहे
संवाद पणकाहितरी विचित्र आहेत

>>>>>ग्रीफ प्रोसेसिंग बद्दल सिनेमा हवा असेल तर कोलॅटरल ब्यूटी जास्त चांगला आहे. द शॅकला धार्मिक झालर आहे.
थँक्स सस्मित. मला शॅकमधील स्पिरिच्युअ‍ॅलिटी ही फार आवडली. बाकी पाण्यावर चालणारा येशु, बायबल हे सर्व दुर्लक्षणिय.
कॉलॅटरल ब्युटी पाहीन.

ग्रीफ प्रोसेसिंग बद्दल सिनेमा हवा असेल तर कोलॅटरल ब्यूटी जास्त चांगला आहे. द शॅकला धार्मिक झालर आहे.>>>> नेफिवर आहे का
कुठे पाहिला ते लिहीत जा न ...

काल चौदा फेरे पाहिला. क्रिती खरबंदा आणि विक्रांत मावशीचा. छान वाटला. आवडला. कलाकार दोघेही आवडीचे. पडद्यावरचा वावर छान असतो.

हा पिक्चर संपल्यावर थोडा वेळ शिल्लक होता. मग त्यात बायकोने दिल धडकने दो लावला. शेवटचा पाऊणेक तास. पुन्हा पुन्हा बघायला तो ही छान वाटतो. रणबीर प्रियांकाचे त्यांच्या फॅमिलीसोबतचे सीन मस्त आहेत शेवटच्या पाऊणेक तासात..

दिल धडकने दो मलापण आवडतो. संवाद सगळेच मस्त आहेत. कुत्र्याच्या मनातले विचार तर भारीच आहेत.

+1 for दिल धडकने दो..
+१ सीमंतिनी.. हा त्यातला the best सीन आहे..

कोणता?

मला तो झरिना वहाबचा "पर प्रॉब्लेम क्या है?" हापण आवडतो. आणि त्यावरचे रणवीरसिंगचे एक्सप्रेशन्स Lol

Wink ऋ, तू प्रतिक्रिया देशील वाटलंच होतं... मी वाट बघते आहे हं "आताच आणा रे तो फासाचा दोर.. मीच घेतो स्वत:च्या गळ्यात टाकून..." Lol

+1 ऋन्मेश Lol
सी Lol
हो वावे.. कमाल आहे तोपण.. aunty वो बटर नाईफ है.. Lol

पर प्रॉब्लेम क्या है? .. aunty वो बटर नाईफ है .. पासून अनिल कपूर उठून त्या पीसीच्या पतीचा गळा आवळतो तिथपर्यंतचा पुर्ण सीनच भारी आहे. आणि तो हॉस्पिटल रूमवालाही ज्यात तो सांगतो की जो लडकी डिजर्व्ह करती है उसको बिजनेस दे दो आणि आईबापाच्या चारीत्र्यावर टिप्पणी करून तिथेच ठिय्या मांडून बसतो.. आणि हा वरचा सी यांच्या लिंकमधीलही.. या तीन सीनमध्येच चित्रपटाचे सार सामावले आहे ! त्यामुळेच ते चौघे शेवटी एकत्र बोटीत बसलेले छान वाटतात आणि पोलिस मागे लागलेले असूनही निंश्चिंतपणे हसताना दिसतात.

@ सीमंतिनी, मी सुद्धा फासाचा दोर गळ्यात टाकून असाच निश्चिंतपणे हसत मायबोलीवर येतो. कोणी काही आवळत नाही हे माहीत असते Wink

बटर नाईफवाला वेगळा. तोपण छानच आहे.
हा म्हणजे सुरुवातीला दोन्ही आया 'तुम्हाला मूल होऊदे मग सगळं छान होईल' म्हणतात तो. त्या सीनमध्ये प्रियांका चोप्राला कुणीच सपोर्ट करत नाही. कबीर सोडल्यास.

aunty वो बटर नाईफ है >>> हा फार सुपरलोल डॉयलॉग आहे.

जिंनामिदो आणि दिल धडकने दो या दोन्ही चित्रपटांत असे काहीतरी आहे की समोर सुरू असेल तर कधीही कंटाळा येत नाही बघायला.

जिनामीदो - यस ..जबरदस्त एन्गेजिंग...
दिल धडकने - सुपर पकाऊ एक दोन सिन सोडले तर...

हो

वि वि चो

राजकुमार संतोषी चुकून लिहिले

Pages