चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> बंटी और बबली २ प्राईम वर आला आहे. पाहून रिव्ह्यू लिहीण्याचे करावे.

डोक्याला ताप आहे. BB1 ची कथा पुढे नेताना अभिशेक चा सैफ कसा झाला ते कळलच नाहि Happy

काल स्पायडरमॅन बघितला. थिएटरमध्ये.
तमिळ मधे. मला तमिळ 20% कळतं Wink पण 3D असल्याने एन्जॉय केला.
सिनेमा स्टोरी आणि डायलॉग ओरिएन्टेड आहे बराचसा. आधीचे संदर्भ माहित असतील आणि कळेल त्या भाषेत पाहिला तर 110% छान आहे सिनेमा.

बंटीबबली पहिला पण थोडाफार अपवाद वगळता पकावच होता. यावेळचे ट्रेलर पाहता तो अपवादही नष्ट झाला असावा असे वाटलेले. त्यामुळे कोणी फारच छान छान म्हटले तरच बघणार होते. वरच्या प्रतिसादांनी ती शक्यताही मावळली. आता स्वतःहून तरी बघणार नाही. घरी लावलाच तर बघावा लागेल.

काल बरीच सव्यापसव्य करुन मेट्रिक्स रेझरेक्शन एचबीओ मॅक्सवर बघितला. (आमच्याकडे दिसत नाही, म्हणून तेवढ्यासाठी व्हीपीएन सर्विस घेतली, एचबीओ मॅक्स घेतलं. लॅपटॉपवरुन टीव्हीवर बघताना एचबीलोला आम्ही ४९ पॅरलल नॉर्थच्या वरच्या अंगाला आहोत हे समजलं, फोनवरुन बघितला तर समजलं नाही, पण एचबीओ अँड्रॉईड अ‍ॅप मध्ये कास्ट हा ऑप्शनच नाही, अ‍ॅपलवर व्हीपीएन धड चालत नाही.... शेवटी फोनच्या स्क्रीन मध्ये डोळे घालून कानात इअर प्लग्स घालून बघितला... हुश्श्य! )

घोर निराशा! स्पॉयलर नाहीत. वाचायला हरकत नाही.
अती प्रचंड मोठा आहे जवळ जवळ अडीच तासांचा आहे, त्यामुळे काही ढासू बघायला मिळेल इ. वाटत असेल तर तसं अजिबात काही होत नाही. पहिला जवळ जवळ एक अख्खा तास... हो ६० मिनिटं... ३६०० सेकंद.. काही घडतच नाही. लाल गोळी घेतली पाहिजे, रॅबिटला फॉलो केलं पाहिजे... इ. आठवुन नॉस्टॅल्जिक व्हायला आलेलो का असं वाटू लागतं. अगदी वॉर्नर ब्रदर्स वरचे जोक ही आहेत (हो! मूव्ही मध्ये काही मिनिटांचा सीन आहे! एक क्षण मला हा स्पूफ मूव्ही आहे आणि आपण मनसोक्त हसावं, काय हे असं प्राण डोळ्यात आणि कानात आणून एकही संवाद चुकू नये म्हणून जीवाला त्रास द्यायचा! वाटू लागलेलं. हो! इतकं वाटून घ्यायला ही वेळ मिळतो. पहिल्या मॅट्रिक्स मध्ये आठवा, श्वास घ्यायला ही उसंत नसते, अर्थात पुढच्या दोन सारखी प्रणय प्रसंगांची रेलचेल आणि पीसी आहेच तर एखाद देसी वेडिंग सीन... नाही हेच आपलं नशिब)
मेट्रिक्स मध्ये फार कधी न वापरलेलं 'फन' एलिमेंट, सध्याच्या गेमिंग मधले क्वर्की रेफरंसेस, काही ओठावर हसू फुटतील असे संदर्भ इ. आहे. पण हेच 'बघायला' आलेलो नाही आम्ही, याचा बॅलन्स अगदीच गंडलेला आहे. सगळ्यात राग आला तो म्हणजे नायोबीची टोटल वाट लावली आहे. अरे ती दिलकी धडकन होती. तिला मराठी मध्यमवर्गीय आजीबाई करुन टाकली आहे. कुफेहीपा!
भारी ग्राफिक्स आहे, ट्रिनिटी आहे (पण तिला काही कामच नाही), स्मार्ट नावं... व्हीआर कॉफी शॉप इ. असं बरंच काही आहे. पण नवी काही स्टोरीच नाही. फॅन्स कडून पैसे उकळायला केलेला धंदा आहे. बस्स! गेल्या दोन पेक्षा बरा म्हणू का? गेल्या मूव्हीच्या शेवटी अँटी क्लायमॅक्स विश्व शांतीचा संदेश होता, यात काय आहे? ठेविले अनंते तैसेची रहावे चित्ती असू द्यावे समाधान??? नाही! तुम्हीच बघा!

मला पुष्पां बघाचा हाये

स्पायडरमॅन मार्व्हलचा असल्याने कटाप , नैतर गेलो असतो

83 उद्या रिलीज होत आहे. आज कुठे?
प्रिमियर ला बोलवलेय का कपिल पाजींकडे?

अरेरे, फार अपेक्षा होत्या मेट्रीक्स कडून , सव्यापसव्य केला असता तो वाचवल्याबद्दल धन्यवाद.

मी 'आवडून घ्यायचाच' या अपेक्षेने बघत होतो. ते करायचा खूप प्रयत्नही केला. पहिला अर्धातास तर फॅनफिक्शन लेव्हलचा आहे. ना काही स्टोरी, ना स्मार्टxx संवाद. पात्रांत काही इंटरॅक्शनच नाही, प्रत्येक जण स्वतंत्र आपलं आपलं काम करतात. अ‍ॅक्शन सीन्स मध्येही काही जान नाही. उंच इमारतीवरुन उडी मारताना पूर्वी खुर्चीवर पुढे सरकुन ठोके वाढायचे तसं काहीच होत नाही. मार आणि तरंग एकदाचा वाटू लागतं.
शेवटी त्यांना याचाही सिक्वेल करायचा आहे असं काही तरी ऐकल्यावर हसावं का रडावं कळेना.

मार आणि तरंग एकदाचा वाटू लागतं.>>> धैर्याची परीक्षा झाली की Lol
मी 'आवडून घ्यायचाच' या अपेक्षेने बघत होतो.>>> किआनु आहे , what's not to like म्हणून मीही हाच विचार करत होते , आता आहे त्या सबस्क्रीप्शनमधे येईल तेव्हा बघण्यात येईल.

मला पुन्हा एकदा ही सिरीज बघायची आहे. जेव्हा पहिला रिलीज झाला तेव्हा तो पूर्ण कन्स्पेट न समजताच तो पाहिला होता. त्यामुळे डोक्यावरून गेला होता. नंतरचे बघताना निदान थोडेफार माहीत होते. पण एकूणच माझ्या ऑटाफे मधे ही सिरीज नाही. नुकतीच एचबीओ वर पुन्हा बघायला सुरूवात केली आहे. बघू मत बदलते का

मी ओरिजिनल मॅट्रि क्स फॅन आहे. फॅन क्लब काढते दुसर्‍यातला कार चेस सीन व त्या आधीची मारामारी, संगीत फेवरिट. तिसृयातला डिस्को सीन छान आहे. पण हा टुकारच असणार आहे अशी खात्री आहे. जेव्हा प्रियांका चोप्रा सती असे ऐकले तेव्हा च कळला मामला काय आहे ते.
रिव्यु बद्दल धन्यवाद अमितव.

उद्या जमले तर स्पाइअडी बघणार आहे.

सत्यमेव जयते १० मिनिटांच्या आत बंद केला. कसला रद्दड सिनेमा. सुनील शेट्टीच्या जमान्यातले संघपुरस्कृत सिनेमे असायचे असे.

83 पाहिला. मस्त वाटला. बर्याच काळानंतर थिएटरमधे मूव्ही पाहिला. लोकांच्या शिट्ट्या, टाळ्या वगैरेमुळे मस्त माहौल तयार झाला होता. कास्टींग, गेट-अप्स, प्लेयिंग स्टाईल्समधलं साधर्म्य आणि वर्ल्डकप च्या बाहेरचा काहीही फाफटपसारा नसल्यामुळे मस्त वाटला. मोठ्या स्क्रीनवर बघायचा मूव्ही आहे.

वर्ल्डकप च्या बाहेरचा काहीही फाफटपसारा नसल्यामुळे >>> छे, काय हे.. प्लेअर्सच्या लव्हस्टोर्‍या नाहीत???

धन्यवाद फेफ - कोणाचातरी थेट रिव्यू हवाच होता. गेले काही दिवस तो ट्रेलर, त्या पब्लिकच्या शोज मधल्या मुलाखती आणि त्या मॅचेस चे हायलाइट्स पुन्हा पाहिले आहेत. खूप बिल्ड अप झाला आहे Happy

बहुधा कसलेही कमर्शियल इण्टरेस्ट्स नसताना सगळा संघ जे एकमुखाने कपिलला श्रेय देतात ते सच्चे वाटते. नाहीतर आजकाल कोण कोणाची तारीफ करतोय आणि त्यामागे बीसीसीआय च्या पॉलिसीज मुळे कॉमेन्टरी करणार्‍यांवर असलेल्या मर्यादा - पासून ते संघातील दिग्गज लोकांवर अगदी माफक टीका करणे वगैरे कॉमन आहे. कपिल मुळातच बीसीसीआय ला आयसीएल च्या काळापासून खटकलेला आहे. सध्याही त्याच्या मागे जाण्यात कोणाला काही आर्थिक किंवा बीसीसीआय शी संबंधित करीयर फायदा आहे असे वाटत नाही. तरीही प्रत्येकाच्या मुलाखतीत कपिलला निर्विवाद श्रेय आहे. सर्वच गोष्टींकडे सिनीकल नजरेने बघण्याच्या सध्याच्या काळात हे फार वेगळे वाटते बघताना.

बहुधा कसलेही कमर्शियल इण्टरेस्ट्स नसताना सगळा संघ जे एकमुखाने कपिलला श्रेय देतात ते सच्चे वाटते.
>>>>
+७८६
कपिल शर्मा शोमध्ये आलेले सारे प्रमोशनला तेव्हाही हे जाणवले.

मला हा वर्ल्डकप सेमी फायनल पासून आठवतो. मोठी माणसं टीव्हीपुढे बसलेली. त्यांच्या कमेण्ट्समधून समजून घ्यायचा प्रयत्न करायचो. ते आत्ता नीट समजलं. विंडीजशी त्या आधी दोनदा गाठ पडलेली हे माहिती नव्हतं. नेटच नव्हतं.
खूप दिवसांनी क्रिकेटवरचा उत्तम सिनेमा पहायला मिळाला. धोनी सुद्धा इतका आवडला नव्हता (धोनी आवडत असून). कपिल त्या वेळी महानायकापेक्षा कमी नव्हता. पण सिनेमात प्रत्येकाला न्याय दिला आहे. मोहिंदर अमरनाथ का बेस्ट होता हे छान दाखवलंय.

अभिनेत्यांनी सर्व क्रिकेट खेळाडूंचे मॅनरिजम्स किंवा बोलण्याची ढब इत्यादी छान आत्मसात केलं आहे. कपिलदेव, सुनील गावस्कर, संधू, श्रीकांत आणि किरमाणी मधे गोंधळ होत नाही. बिन्नीचं वेगळेपण ठळक आहे. पण मदनलाल, अमरनाथ यांच्यात गोंधळ होतो. कोठारेंच्या मुलाने कर्नल उभा केलाय. पण फारसे काम नाही त्याला. संदीप पाटील प्रत्यक्षात खूपच रूबाबदार आणि देखणा आहे. तसा अभिनेता सापडणे अवघडच.

रणवीर सिंग मात्र काही मिनिटात कपिलदेव वाटू लागतो. त्याने कमाल केली आहे. एरव्ही त्याची इमेज फारशी चांगली नाही. पण जेव्हां चांगला रोल मिळतो तेव्हां तो सोनं करतो हे बरेचदा झाले आहे. हॅट्स ऑफ !! तो फेव्हरिट नसूनही त्याच्या या गुणवत्तेला सलाम !

Pages