चित्रपट कसा वाटला - ५

Submitted by ऋन्मेऽऽष on 12 December, 2021 - 15:18

चित्रपट कसा वाटला ५ व्या धाग्यात स्वागत

आधीचा धागा ईथे बघू शकता

https://www.maayboli.com/node/74596

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किळसवाणी / बीभत्स हा एक प्रकार झाला. पण भीतीचा ठाव मनाने घेऊन आपला मेंदूच भीतीचं सावट तयार करतो आणि मग चित्रपट भर आपण घाबरतो असे चित्रपट फार जास्त परिणाम कारक असतात ( मला आवडतात Wink ).
तुंबाड हे दुसऱ्या प्रकारचं उदाहरण. आत्ता हे लिहिताना ही कोकणातलं अंधारं घर, मुसळधार पाऊस, पैशाची हाव, तो खोल खड्डा, इम्प्रोवाईज करत काढलेला मार्ग, आणि सगळ्यात जास्त म्हणजे... ही हाव जेनेटिक असते हे रियालायाझेशन मनाला झाकोळून टाकते. आजही माझ्यातले वाईट गुण जेनेटिकली मुलात जातील का विचार करून घाबरायला होतं. त्या प्राण्याची फारशी भीती मनात रहात नाही.
तुंबाड इतका बळी नक्कीच चांगला/ परिणामकारक नाही. तुंबाड हिंदी होता का मराठी ते ही आठवत नाही आता. Proud

तुंबाड हे दुसऱ्या प्रकारचं उदाहरण >> मला अजिबात नव्हता आवडला तुंबाड.. अगदीच विचित्र वाटलेला.. पण सगळ्यांचे काम चांगले होते

नवीन जनरेशनमध्ये हॉरर सिनेमात एकही नवा सिनेमा राज ( बी ब , डी मो )ची उंची गाठू शकलेला नाही.

आणि सस्पेन्स सिनेमात गुप्त

तुंबाडचे नाव नका काढू...
बायकोने आधी पाहिलेला. तिला विचारले की खरेच भूत आहे का त्यात? तर चक्क नाही म्हणाली..
मग माझे बघून घाबरून झाल्यावर मी तिला झापायला गेलो तर म्हणाली की तो भूत नव्हता, देव होता Uhoh

आणि सस्पेन्स सिनेमात गुप्त >>>> गुप्तची गाणी मस्त होती. पण तेवढे लोकांनी उचलून घेतले नाही. सस्पेन्स मात्र उलट ओवरहाईप वाटला. काजलनेच गेम केलाय लोकांना याचेच कौतुक होते.
मला यापेक्षा लहानपणी ज्वेईल थीफचा सस्पेन्स आवडलेला. दुसरा देवानंद कोणी नसतोच मुळात हे जेव्हा समजले तेव्हा बालमनाला धक्काच बसलेला.

आहो, पण तो देवही घाबरवणाराच असतो ना. आपण लहान मुलांना म्हणतो मस्ती केली तर देवबाप्पा कान कापेल. पण खरेच असा देवबाप्पा येऊन कान कापू लागला तर लहान पोरं काय मोठेही घाबरणार नाहीत का Sad

मी थिएटरात पाहिलेला हॉरर चित्रपट म्हणजे भूत. त्या आधी मुळात थिएटरातच कमी चित्रपट बघणे व्हायचे. पण कॉलेजला गेलो, मित्र मिळाले, रात्री नऊ ते बाराचे शो सुरू झाले. कुठून अवदसा आठवली आणि भूत बघायला गेलो. कारण तेव्हा रामू, उर्मिला, नाना वगैरे नावांची खूप क्रेज होती. गेलोही अर्थात रात्री नऊ ते बाराचा शो, चित्रा टॉकीज.
रात्री थिएटरबाहेर येताच पाच मिनिटात परीसरात असला सन्नाटा झाला की बास.. मग तिथून सारे चालत कॉलेजला, व्हीजेटीआयला, स्टडीरूम्समध्ये झोपायला.. पण झोप येईल तर शप्पथ. पहाटेपर्यंत पत्ते खेळत जागलो आणि उजाडताच घरी पळालो.
पण घरी मात्र आणखी बिकट अवस्था झाली. कारण चित्रपटातले भूत घरातच दाखवलेले. त्यामुळे घरात भूत असते हे जे काही मनात ईतके घट्ट बसलेले की झोप यायलाच तयार नाही. मी तेव्हा बेड वर झोपायचो आणि आई वडील खाली गादी टाकून. पण जागा चेंज करून मी खाली आईच्या बाजूला झोपायला लागलो आणि वडील वर बेडवर. या वयात आईवडीलांना वेगळे करणे आवडले नाही, पण काय करणार, भूतासमोर सर्वांचाच नाईलाज.. रात्री तर रात्री दिवसाही आईवडील ऑफिसला गेल्यावर एकटा घरी असल्याने दरवाजे खिडक्या सताड उघडे टाकून झोपायचो Sad जवळपास महिनाभर हा दहशत का माहौल होता...
तेव्हापासून कानाला खडा लावला. थिएटरात भूताचा पिक्चर बघायला नाही.

दोन दिवसांपूर्वीच मुलांना जबरदस्ती "एक डाव भूताचा दाखवला".
मुलाने कल्टी मारली. मुलीने पाहिला. तिला आवडला.

एक डाव भुताचा टाईमपास चित्रपट होता. घाबरवणारा नाही हसवणारा होता. जसे की शाहरूख आणि नसीरुद्दीनचा चमत्कार. तो मी सुद्धा लेकीला दाखवलाय. तिचे एव्हाना शाहरूखचे ऑलमोस्ट सारेच पिक्चर बघून झालेत जे तिने बघण्यात काही गैर नाही..

लहानपणी सोसायटीत गणपतीच्या निमित्तानं ‘हा खेळ सावल्यांचा’ पाहिला होता. सिनेमा संपल्यावर अंधारात बिल्डींग पर्यंत चालत येताना वाटलेली भिती अजूनही लक्षात आहे.

होय लहानपणि, माझ्या मैत्रिणी ने सांगीतलेले 'हा खेळ सावल्यांचा' हा सिनेमा भीतीदायक सिनेमा आहे. मी नाही पाहीला तेव्हा पण येस त्यातील अंगाईगीत नेहमी चित्रपट संगीत कार्यक्रमात लागत असे.

नवीन जनरेशनमध्ये हॉरर सिनेमात एकही नवा सिनेमा राज ( बी ब , डी मो )ची उंची गाठू शकलेला नाही. >>> मला व्यक्तीशः भूत (अदे , उमा) best वाटतो.कुठलेही किळसवाणे visuals नाही. केवळ वेगळ्या शक्ती च जाणवणार अस्तित्व. मानसिक त्रासामुळे उर्मिलामध्ये होत जाणारे बदल , मध्येमध्ये eerie music - मस्तच भट्टी जमली होती. ती भीती जास्त परिणामकारक होती.

राज तर पहिले म्हणजे गाण्यांसाठी आवडीचा होता. त्यानंतर त्या वयात बिपाशा आणि ती दुसरी हिरोईन या दोघी हॉट वगैरे वाटायच्या. त्यातले भूत वगैरेचा नंबर त्यानंतर आला. बिलकुल भिती वाटली नाही तो पिक्चर बघताना. नेहमीचा रोमान्स बेवफाई ड्रामा विथ थोडाफार भूत तडका ईतकेच वाटले.

उर्मिलाचाच कौन चित्रपट आठवत असेल. त्यात भूत दाखवले असते वा नसते तरी काही फरक पडला नसता. जाम खिळवून ठेवलेले. जिथे घाबरवायचे तिथे घाबरवलेलेही..

मी लहान होतो तेव्हांचा सिनेमा आहे. उर्मिला आंटी थोड्या थोड्या लक्षात आहेत.
ऋन्मेष सर तुम्ही तेव्हांपासून आहात होय ?

>>>>त्यानंतर त्या वयात बिपाशा आणि ती दुसरी हिरोईन या दोघी हॉट वगैरे वाटायच्या.
बिपाशा डस्की आणि earthy आहे. तिच्यात एक - Earthy सेन्श्युअ‍ॅलिटी आहे. ग्राउंडेड आणि व्हेरी टँजिएबल. जवळजवळ स्पर्श करुन पकडीत येइल, अशी सेन्श्युअ‍ॅलिटी. तिच गोष्ट नंदिता दासकडेही आहे. दोघी मला अपीलच्या बाबतीत, अगदी सारख्या वाटतात.

लहानपणी ईव्हील डेड बघताना जी काय भीती वाटली तीच
त्यानंतर एकही हॉरर चित्रपटाने घाबरवले नाही
उलट मला हिंदी सिनेमातली आणि आजकाल इंग्रजी पण हास्यास्पद भूते बघून हसूच येतं
एकदम धनकन म्युझिक वाजवून काहीतरी अंगावर आल्यासारखा कॅमेरा हलवणे ही गिमिक आता फार जुनी झाली, त्याने दचकायला होते, भीती नाही वाटत
त्यामुळे माझ्यासोबत कोणी बघत नाहीत हॉरर मुव्ही

लहानपणी ईव्हील डेड बघताना जी काय भीती वाटली>>हायला.. मी ही आत्ता तेच लिहीणार होते.. मी बघितलेला पहिला हॅारर मुव्ही.. मैत्रिणीकडे VCR वर बघून रात्री घरी धावत आल्याचं आठवतंय.. खास करून तो भिंतीत गोळ्या मारायचा सिन जबरदस्त वाटलेला

ऋ, भुत मी पण चित्रालाच पाहिलेला. साउंड इफेक्टने जास्तच भितीदायक वाटलेला. भयंकर भिती बसलेली मनात.
जबरदस्त पिच्चर आहे तो.
राज पण चित्रालाच बघितलेला. तो पण भारी. तेव्हा पण जाम घाबरलेले. तेव्हामी भित्रीच होते. आता तेवढी भिती वाटत नाही.

म्हाळसा - हो आठवला
आणि तो तुटलेला हात सरकत सरकत येतो तो

बिपाशा डस्की आणि earthy आहे. तिच्यात एक - Earthy सेन्श्युअ‍ॅलिटी आहे. ग्राउंडेड आणि व्हेरी टँजिएबल. जवळजवळ स्पर्श करुन पकडीत येइल, अशी सेन्श्युअ‍ॅलिटी.
>>>>
आई ग्ग खतरनाक. याचमुळे तिची आणि जॉनची जोडीही मस्त सूट व्हायची. मला फार आवडायची बिप्स. तिचा रक्त चित्रपटही थिएटरला पाहिलेला. त्यातल्या वन लव्ह गाण्यात अभिषेक बच्चनही मस्त वाटलेला. ऐका ईथे - https://www.youtube.com/watch?v=p1gn_LiS4yA

लहानपणी ईव्हील डेड बघताना जी काय भीती वाटली>>हायला.. मी ही आत्ता तेच लिहीणार होते.. मी बघितलेला पहिला हॅारर मुव्ही..
>>>>
हायला सेम हिअर
पण तुम्ही तो हल्ली पाहिला आहे का? मध्यंतरी मी पाहिलेला तेव्हा बोअर झालो. उलट लहानपणी आपण कश्याला घाबरलेलो असे वाटले.
पण तेव्हा मात्र जगातला सगळ्यात नंबर वन हॉरर चित्रपट ईविल डेड आहे अश्या गप्पा चालायच्या.

ऋ, भुत मी पण चित्रालाच पाहिलेला. >>> हो, तुम्हाला ते जवळचेच. आम्ही विजेटीआयचे असल्याने तेव्हा आमचे सगळ्यात फेव्हरेट टॉकिज चित्र होते. तिकीटांच्या किंमतीचा विचार करता ते बेस्ट होते त्या काळात. ८०-९० टक्के चित्रपट तिथेच बघणे व्हायचे. नाहीतर मग त्याच्या शेजारचे प्रिमिअर, दादरचे प्लाझा, माटुंग्याचे अरोरा वगैरे नंबर लागायचे..

Pages