मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्नेहा कुठल्याच ग्रुप मधे नव्हती .... अलिप्त असायची ती तशी. माझं सगळ्यांशी चांगलं आहे असं म्हणत बसली नुसतच. कोणासोबत इमोशनल बाँडींग ही नव्हते. जय तिच्यासोबत टाइमपास करत होता तसं ती पण करत होती हे दोघांनाही माहिती होते.. त्यामुळे ती गेली तेव्हा कोणालाच फार काही वाटले नसावे.

तो बोअर झालेला असतो येऊन, फार काही उत्स्फूर्त बोलत नाही आणि सगळेजण वॉव सलमान, भारी अस करतात.>>+१
तसेही मांजरेकर एका मुलाखतीत म्हणत होते कि त्यांना सलमानला म बि बॅासमधे बोलावण्यात रस नाही त्यापेक्षा एखाद्या मराठी नेता/कलाकाराला पाहुणा म्हणून आलेला आवडेल.

स्नेहा जाताना कुणीच रडले नाहीत! नाही म्हटले तरी जरा आश्चर्य वाटलं Happy निदान जय तरी टिपं गाळेल, थोडा तरी ड्रामा करेल असे वाटले होते. पण छे! हा तर त्या कुडची, तृप्तींना जाताना बघून पण रडला होता Happy बाकीचेही उलट आपण वाचल्याच्या आनंदात दिसले सगळे.
गायत्रीला अ‍ॅज एक्सपेक्टेड कितीही चुगल्या केल्या तरी काहीही फरक पडला नाही. त्यात ममांनी चालूगिरी करून त्या बुटाचा वास प्रकाराचा फक्त मीराकडेच रोख वळवला.
काल पह्लियांदाच उत्क्या जरा सटपटलेला दिसला. कायम हिला उडवू तिला उडवू करणारा काल पहिल्यांदाच म्हटला आज मीच जातोय का काय. मी टास्क खेळतो ते दिसतच नाहीये का बाहेर? वगैरे. लगेच गायत्रीने अरे तुला ९९% पडले फक्त उरलेल्या १% साठी ममां ओरडतयात अशी मलमपट्टी केली: )

स्नेहाला काढल्याबद्दल बरेच पब्लिक सोमीवर खुश होते तरी दादुसला का सेफ करतायत तेच कळत नसल्याने काही चिडले होते.
तरी कुठलेही टास्क फेअरली होण कठिणच आहेत कारण ५ विरुद्ध ४ अस असल्याने परत काही बहुमताने करायच म्हटल की आहेच वाद

आत्ताच सोनल विशालला म्हणाली, की तुझ्यामुळे माझ्याकडून एक चूक झाली. के ते विचारल्यावर अगदी अस्पष्ट म्हणाली, स्मोकिंग. म्हणजे स्मोकिंग रूम आहे तिथे बहुतेक. काय माहीत, छोटा बार पण असेल.

टीम बीचे सगळे नॉमिनेट होतील असं दिसतंय.

विशाल आणि जय सेफ.
गायत्री , उत्कर्ष आधीच सेफ होते.
मीनल मुळे विशाल वाचला. नाहीतर पूर्ण टीम बी नॉमिनेशनमध्ये असती.

दादूस नॉमीनेटेड आहेत. त्यांचा स्वतः चा फॅन बेस असेल तर मीरा गेली आता.
मीनल कसली धावली शेवटच्या फेरीत. खरंच मस्त खेळते ती.

मला वाटतय, मिरी जातेय यावेळी!
सोनालीला विविमुळे लोक सेफ करतील, विकास, मीनलला धक्का लागत नाही
दादूसला त्यांचे फॉलोअर्स सेफ करतील.

मीराला वाटतंय तिला सोनाली कडूनच कॉंपिटीशन आहे. अजून पण मुलीमुलींतली स्पर्धा समजताहेत.

काउंटरवर जा असं जयने दादूसना सांगितलं आणि ते बुगू बुगू करत गेले. कारण तरी सांगितलं का ते मी पाहिलं नाही.

सिझन३ भयकर पॉप्युलर आहे, भरपुर फॉलोअर्स आहेत सगळ्याचे पण सोमिवर चर्चा आहे की दादुसचा असा कोणताही फॅन बेस सोमिवर दिसुन येत नाही तरी ते कस वाचतायत? ह्याचा अर्थ बीबी टिमच ठेवते आहे त्याना.
उत्कर्षच आणी दादुसच काहितरी बाहेर कनेक्शन असणार त्यामुळेच तो सतत प्रयत्न करतोय त्याना नॉमिनेशन मधेच न येवु द्यायचा पण त्याच्यामुले मिरा नको जायला, बरि-वाईट काहि का होइना ती थोडी तरी दिसते,स्वतःचे व्यु पॉइन्ट ठेवते. दादुस म्हणजे सबकुछ उत्कर्ष म्हणेल तस अशा प्लेयरला बघायला कोणाला आवडेल, गादा पेक्षा तर हेच जास्त बुगुबुगु आहेत.

उत्क्या त्याच्या टीम ची मेजॉरिटी जाऊ नये यासाठी दादुस ला सेव्ह करतो आहे. आता ते गेले तर दोन्ही टीम्स ४-४ राहणार ना.
त्याचे प्रयत्न चाललेत की सोनाली उडावी आणि दादुस रहावा.

सोनाली किंवा दादुस जातील. गा दा सध्या नशीबवान आहे, नाहीतर तिचाच नंबर असता.

मीराला घालवतील असं वाटत नाहीये.

बाय द वे जय काहीतरी भिकारी म्हणालेला ना मागे विकासला त्याबद्दल म मां काहीच बोलले नाहीत का त्याला, सो मि वर टीका होतेय यासाठी.

एक प्रोमो बघितला, गा दा उत्क्याला गायला सांगत होती, छान गातो तो. गा दा ह्या लोकांच्याच मागे मागे मात्र.

दादूस नॉमिनेट झाल्यावर मीराचा चेहरा साफ पडला होता.एवढ का घाबरतात हे लोक नॉमिनेशनला.
त्यामानाने मागच्या सिझनच्या लोकांना नॉमिनेशनच्या बाबतीत निगरगट्ट म्हणाव लागेल.
ममां एवढ सांगतात मीराला की तुझ्याशिवाय माझी चावडी कशी होणार,अशा कंटेस्टंटला काढत नाहीत हे माहित नाही का मीराला.
तुपारे फारच स्मोकिंग करते अस वाटत.
आता पण शेवटी बाकी मेंबर्स बोलत असताना बाहेर पडत होती,पटकन कँमेरा काढला तिच्यावरून.

आजचा एपिसोड पाहिला. सोनाली-विशाल समझोता बघायला मजा आली. विकास आणि मिनलने छान मध्यस्थी केली. सोनाली-विशालचं 'तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' असला प्रकार आहे.
विशाल कॅमेरा बघून जे एकटाच बडबडतो ते फार नाटकी वाटतं पण.

आता तरी बी टीमने जयला कॅप्टन करायचे मनावर घ्याव. आज तो कॅप्टन असता तर अख्खी ए टीम नॉमिनेशन मध्ये असती.
जर मिनल विकास ला बी टीम ची व्होटस गेली तर सोनाली नाही वाचत.
दादूस चे फॅन्स कोळी गीत ऐकणारे लोक आहेत. ते ट्विटर यु ट्युब नसतील वापरत. चॅनेल च्या हातात असते तर आदिशला वाचवुन दादूस ला काढले असते. मीरा वाचु शकते कारण ए टीम ची सगळी मते तिला एकटीला मिळणार.
टफी फाईट आहे.

ह्या वेळी तिसरा वाईल्ड कार्ड मिळत नसावा. कुणी तयार होत नसेल.
जय आज थोडा लॉस्ट नाही का वाटला? स्नेहा गेली म्हणून की चांगले खेळूनही पॉप्युलर नाही होत आहे बाहेर हे लक्षात आले आहे?

दादुस किंवा सोनालाच निरोप द्यावा आता. दादुस गेला तर जास्त आवडेल. मीराला इतक्या लवकर नका पाठवू. विकेंडला म मां घालून पाडून बोलणार कोणाला मग, हाहाहा.

जर मिनल विकास ला बी टीम ची व्होटस गेली तर सोनाली नाही वाचत.
<<<
NO , Sonali isn't going anywhere, Vishalians are going to vote for her again and she'll top in voting !
Meera has to go , she doesn't deserve staying!

आज स्मोकिंग रूममधून गादा बाहेर पडली का. काही सूक्ष्म सेकंदात कॅमेरा हलवला. सोना म्हणाली तिने स्मोक केलं आणि हाताने चार बोटं दाखवली बहुतेक. म्हणजे चार वेळा किंवा चार सिगारेट. विशाल म्हणत होता सोनाला पण बाहेर गेल्यावर काय, याचा अर्थ काय. त्याची तर आहे ना कोणीतरी बाहेर. मीरा म्हणत होती विशाल पण कमी सटक नाहीये, काहीही बोलत असतो Happy जय विशालला नॉमिनिट करताना म्हणत होता तो शीघ्रकोपी आहे (कोण बोलतंय बघा), मीनल भांडण लावते आणि विकास दुसऱ्याला इजा होईल असे वागतो. जय स्वतःला संत महात्मा समजतो बहुतेक. उतक्या गाणं म्हणत असताना गादा काय भयंकर हसत होती. विकासने आज मीराला खरंच कोपरा मारला का. मीरा किती मोठ्याने ओरडत होती. नोटंकी आहे एक नंबर.

विकास , मीनल चे फॅन्स त्यांना वाचवतीलच आणि सोनालीलाही मोठा फॅन बेस दिसतो आहे सोमि वर. शिवाय विशाल चे फॅन्स ही नक्कीच सपोर्ट करणार.
दादुस चे काही समजत नाही त्याला का ठेवलंय पण ते आणि मीरा दोघेही बांडगुळे आहेत. दादुस पेक्षा मीरा जास्त कन्टेन्ट देते तसे, पण बाकी फिजिकल टास्क काहीही खेळता येत नाहीत. इन्डिविजुअल गेम नाहीच आहे काही. जय अन उत्क्याला सपोर्ट करते फक्त.

ते प्रोमोमध्ये रात्री जाग राहण्याच्या टास्कच काहीच दाखवल नाही एपिसोडमध्ये. जय झोपला तेव्हा कोम्बडा वाजलेला दाखवला होता प्रोमोमध्ये. तेसुद्दा नाही दाखवल. मला वाटल जो कोणी झोपेल तो नोमिनेट होईल.

जय आज थोडा लॉस्ट नाही का वाटला? स्नेहा गेली म्हणून की >>>>>>> कसल काय? गायत्रीला मिठया मारत होता. ती सुद्दा खुश दिसत होती आज सारन्गे गेली म्हणून.

गा दा उत्क्याला गायला सांगत होती, छान गातो तो. >>>>>>> येस्स. मुझे नीन्द क्यू आए हा हा हा. त्याचा आवाज आनन्द- आदर्श शिन्देपेक्षा वेगळा आहे. रोमॅण्टिक गाणी गाऊ शकतो. आदर्श- आनन्द शिन्देन्चा आवाजही छान आहे.

सोनाली-विशाल समझोता बघायला मजा आली. विकास आणि मिनलने छान मध्यस्थी केली. सोनाली-विशालचं 'तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' असला प्रकार आहे. >>>>>>>> अगदी अगदी. पण सोनाली खर रडत होती अस वाटल नाही. बादवे, विशालचा एकट खेळण्याचा दावा फुसका निघाला.

विकासने आज मीराला खरंच कोपरा मारला का. मीरा किती मोठ्याने ओरडत होती. नोटंकी आहे एक नंबर. >>>>> स्नेहाचा आत्मा मीरामध्ये घुसला वाटत.

मीनल छान खेळली आज.

सोनाली आणी विशालने त्याची लुटूपुटू लढाई बन्द करावी ते फार बोअर होतय, त्याच त्याच पॉइन्ट वर भान्डत बसतात, शेन्डा ना बुडूख त्या भान्डणाला.

Pages