मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दुसरं मांजरेकर ह्यांचा आजचा एकूण वावर आणि काही शब्द प्रयोग हे नक्कीच खटकणारे जसे की "नाही गं उलट मी गायत्रीची 'ठासली' तिथे" स्त्री दाक्षिण्य वगैरे धडे देणाऱ्या मांजरेकरांनी असले शब्द टाळावेत,>>>
+१०० मला पण खटकले हे. एकंदरीतच फक्त मुलींसाठी नाही तर मुलांसाठी पण हे शब्दप्रयोग निदान होस्टने तरी टाळावेत.

बादवे, ते 'तुझं माझं जमेना आणि तुझ्या वाचून करमेना' वापरलं बरं का म मांनी पण. Lol

हे प्रसाद देशपांडे चांगले लिहतायत..... त्यांना बोलवा मायबोलीवर Happy
किंवा किमान youtube चॅनेल तरी काढा म्हणाव! काय एकेक youtubers असतात नग त्यांच्यापेक्षा हे नक्कीच खुप भारी करतील व्हिडीओज!!

बाकी काल सोनाली आणि विशालने स्वताहून वाट लावून घेतली.... सुरुवातीच्या दोन चार आठवड्यातच सोनालीने चाचपणी केलेली पण विशाल कडून हवा तसा प्रतिसाद नाही म्हंटल्यावर तिने नाद सोडून द्यायला हवा होता पण त्यावेळी विकास आणि मीनलने पण चिडवाचिडवी करत आगीला हवा दिली..... आणि सोनाली आणि विशालने पण नरो वा कुंजरोवा करत जिथे मिळेल तिथे फुटेज घेतले!!
आणि त्यामुळेच आता सगळे सोनालीवर ढकलून स्वता नामानिराळा राहायला बघणारा विशाल जास्त निगेटिव्ह दिसला!!
आणि तो तसा दिसावा यासाठी विकास आणि मीनल प्रयत्न करताना दिसले!!
एकमेकांची डिग्निटी राखून विशाल आणि सोनालीला हा विषय संपवता आला असता पण दोघांनाही ते जमले नाही!!

या आठवड्यात एकही एपिसोड बघितला नाही पण काय घडले असेल याचा अंदाज चावडीवर आला!!

बाय द वे सलमानला बोलावणार नाही त्यापेक्षा मराठीतल्याच कुणातरी दिग्गज माणसाला बोलवायला आवडेल वगैरे मांजरेकर याच सीझनमध्ये म्हणाले होते ना? लगेच घुमजाव? की यांना हिंदीला बोलावले म्हणून लगेच इकडे सलमान का?

दादूसला तर पूर्णच अनुल्लेखाने मारले कालच्या चावडीवर मांजरेकरांनी!! तरीही दादूस या आठवड्यात टिकला तर खरेच मत मिळत असतील त्यांना!!

मम्याला पार्लमेंटरी आणि अन्पार्लमेंटरी शब्द माहीत नाही का?
ते उडता तीर, ठासणे वगैरे शब्द अशा कार्यक्रमात वापरायचे नाहीत हे सांगावं लागेल का आता?

दुसरं मांजरेकर ह्यांचा आजचा एकूण वावर आणि काही शब्द प्रयोग हे नक्कीच खटकणारे जसे की "नाही गं उलट मी गायत्रीची 'ठासली' तिथे" स्त्री दाक्षिण्य वगैरे धडे देणाऱ्या मांजरेकरांनी असले शब्द टाळावेत,>>>> +१

विकास आहेच मास्टरमाइन्ड किबहुना मधल्या ब्रेक मधे जे सोनालीच्या मठ्ठ डोक्यात शिरल नव्हत तेहि त्याने सान्गितल अर्थात आपल्याला बघताना ते वाटल पण मुळात त्याला अगदी साधेपणाने पण सान्गायचे असेल काहीही असु शकत पण. विकासने ते सान्गुन एन्ड झालेला टॉपिक परत सुरु केला एवढ नक्की...सोनाली रडली ते ममानी फारच पर्सनली घेतल, तीला उगाच अजुन फायर करत होते, तेही बर्‍याच जणाना पटल नाही, ममानी सोनालीला फार हाडतुड केल पण युज्वली शो होस्टला रडून सिम्पथी घेतलेली आवडत नाही कारण एका मुलिला रडवले म्हणुन त्याची इमेज डॅमेज होते.
सोमीवर विशालचे फॅन म्हणतायत की बीबी टिम मुद्दाम विशालला -सोनालीला डाउन करण्यासाठी गेम खेळले , मला तस वाटत नाही, ममानी काहीही विचारु दे याना व्यवस्थित प्रश्नाना बगल देता आली असती , इतक्या डिटेल्स ची काहिही गर नव्हती पण विशाल स्वतःचा खरेपणा प्रुव्ह करण्याच्या नादात स्वतःच पायावर धोन्डा पाडुन घेतोय.
जयने स्नेहाला दारातुन बाय केल्यावर परत तिच नावही काढल नाही यावरुन तरी सोनाली-विशालने धडा घ्यायला हवा होता.

या आठवड्यात एकही एपिसोड बघितला नाही पण काय घडले असेल याचा अंदाज चावडीवर आला!!>>> मागच्या चावडीच्या डोसमुळे या आठवड्यात सगळे इतके साभाळुन खेळत होते की आठवडाभर काही खास घडलेच नाही त्यामुळेच टीआरपी मेन्टेन करायला शेवटी विशाल-सोनालीचा टॉपिक काढुन चावडीत हवा भरली यानी

विकास मीनलने एवढं समजावून सांगूनही सोनालीच्या डोक्यात प्रकाश पडलाच नाही. विशाल म्हणत होता की तिने त्याला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. ( हे मला ऐकू आलं नाही) . असं सांगितलं जाणं तिच्यासाठी वाईट आहे. त्यावर तिची गाडी सुटली ती नक्की कोणत्या स्टेशनला पोचली ते तिचं तिलाही माहीत नाही.

तू ऐकत नाही, आपण काय उत्तर द्यायचं याचाच विचार करतेस असं विकास म्हणाला ते अचूक आहे.

टीआरपी मेन्टेन करायला शेवटी विशाल-सोनालीचा टॉपिक काढुन चावडीत हवा भरली यानी---.
त्यात चॅनेलचे लोक यशस्वी झाले आहेत. आतापर्यंत ह्या विषयावर ईथे पन्नास एक कमेंट्स आल्या असतील. एका मराठी युट्युबनरने तर पॅनेल डिस्कशन पण होस्ट केला. Lol
मुला मुलीचे असलेले किंवा नसलेले लफडे कुठल्याही वयोगटासाठी गॉसिप करायला सर्वात जास्त आवडता विषय आहे. चॅनेल ने ते व्यवस्थित एनकॅश केले. ह्या सिझन मध्ये सर्वात चांगला खेळाडू कोण असेल तर चॅनेलची एडिटिंग आणि मार्केटिंग टिम.

सोनाली च्या जागी दुसरी कोणी असती.. फाडून खाल्ला असता विशाल ला असल्या चीप कमेंट बद्धल.. सोनाली ला खरेच समजत नाही काय बोलायचे ते... काहीही बोलते...

विकास चांगला वाटला...

आता पहिला कालच एपिसोड. विशाल तो गया अब.. कितीही काहीही असलं तरी सोनाली वर बेकार कमेंट केल्या त्याने. सोनाली ला पण विशाल ला योग्य उत्तर देऊन फेमस व्हायचा मोका होता पण तो तिने वायफळ बोलून घालवला.
विकास फारच मुद्दे पकडून बोलतो.
आता मीनल , विकास , जय पुढे जायचे चान्स वाढलेत

मला कालच्या एपिसोड मध्ये विशाल genuine वाटला...तो आधीपासून बोलत होता की काही गोष्टी मला बोलायच्या नाही आहेत..पण सोनाली आणि ममांनी provoke केल्यामुळे तो बोलला. म्हणजे तो काही ठरवून बोलला असं वाटलं नाही. शिवाय तो जे काही बोलला त्याला सोनाली proper उत्तर देऊच शकली नाही...आणि विकासने तिला सांगीतल्यावर पण तिची reaction normal होती म्हणजे तिची नक्कीच काहीतरी चूक असेल...एखाद्याला खोटे बोललेले आवडत नसेल आणि एखादी जवळची व्यक्ति सतत खोटं बोलत असेल तर खूप त्रास होतो. हा स्वानुभव आहे आणि तोच त्रास विशाल अनुभवतोय असं वाटलं....बाकी bb boss ने ठरवलंय की विशालला जिंकू द्यायचे नाही..म्हणुन गेल्या 2 आठवड्यापासून त्याला negative दाखवण्यासाठी अथक प्रयत्न चालू आहेत ..

<<मला कालच्या एपिसोड मध्ये विशाल genuine वाटला.<<मलाही!
खर तर तो सांगत नव्हता, पण ममांनी फार फोर्स केला अन त्याला बोलायलाच लावलं! तरीही नेलपेंट लावण्याचा विषय काढल्यावर पुन्हा तो गोल गोल घुमवत राहिला! सोनाबद्दल हे सगळं सांगणे हे त्याच्या गर्लफ्रेंड संबंधावर अन सोनाचाही सो कॉल्ड बॉयफ्रेंड असो की नुसता फ्रेंड असो हे सांगणे हितकारक नव्हते हे त्याला चांगले कळत होते!
तो इतके दिवस जे बिथरलेला होता, सारख एकट खेळेन अस स्वतःशी म्हणायचा त्याच कारण आज कळलं!
अन तो खरच भावनिक आहे, मनाने तो तिच्यात गुंतत चालला असावा, त्यामुळे त्याची घुसमट होत असावी! !
अन विकासने तिचा बॉफ्रे आहे की नाही हे अर्धवट सांगितल्याने त्याला सोना फसवतेय अस वाटायला लागलं! तर थोडंफार हे फ्लॅर्टिंग एन्जॉय करायला हवं होतं दोघांनी. जी सुरवातीला त्यांच्यात नोकझोक होत होती ,ती प्रेक्षकांनाही आवडत होतीच की.
खर तर ममांनी हा इश्यू चव्हाट्यावर मांडायची गरज नव्हती. सोनाली उथळ आहे, तिला कुठे काय बोलावं हे कळत नाही, मुद्देसूद बोलणं तिच्या गावीही नाही. त्यामुळे घसरणीला लागली.
विशाल मला आता अधिकच बिचारा वाटू लागलाय. चांगला प्लेअर वाया जातोय या भावनिक गुंत्यात अडकून!

सोनाली चं प्रकरण म्हणजे शांतता कोर्ट चालू आहे या नाटकात सारखेच वाटले.
विशाल मात्र मुळीच नाही आवडला.

मला बरचसं मी_आर्या ने लिहिलेय तसं वाटलं. साधारण कल्पना आली काय घडलं असावं. सोनाली विशालला सारखे म्हणताना दिसलेली आहे पूर्वी, की मी तुझ्यामधे टाइम इन्व्हेस्ट करते त्याचे तू रिटर्न्स देत नाहीस इ. विशाल ने ही पुर्वी क्लियर केले होते की त्याला तसले काही करायचे नाही. पण बहुतेक इतके दिवसात बोलून दाखवले गेले नसले तरी काही ना काही फीलिंन्ग्स दोघांकडून कळत नकळत डेवलप झाली असावीत आणि विशाल मुळात डोक्याने गरम असल्याने याबद्दल स्वतःचा आणि तिचाही राग त्याला येत असावा. त्यात तिच्या बॉफ्रे बद्दल अचानक कळल्यावर अजून भर पडली. सोनालीने हे का केले, तिचा खरंच बॉफ्रे आहे की नाही, ते त्याला सांगित्ले का नाही हे अजूनही संदिग्ध ठेवलेय किंवा तिचा निर्णय तरी होत नसावा. काहीही असो यामुळे दोघांच्या गेम वर निगेटिव परिणाम होत आहे हे नक्की.
सुरुवात विकास ने ती बॉफ्रे ची पिन मारली इथून झाली. जे फारसे इनोसंटली केलेले नसणार, विकास हुषार आहेच आणि एका पॉइन्ट ला विशाल काय किंवा अजून कोणी असेल त्यांचा गेम केल्याशिवाय पुढे जाता येणार नव्हतेच पण इतका स्फोट होईल हे बहुधा त्याच्या कॅल्क्युलेशन च्या पलिकडले असावे:)
विशाल एकूण जेन्युइन वाटला पण खरं असलं तरी सगळं भर पब्लिक मधे बोलायलाच हवं असं नसतं, हे त्याला जमले नाही. किंवा समजले नाही. ममांनी सोनालीचे कॅरेक्टर असासिनेशन केले असे नाही वाटले, त्या दोघांनीच एकमेकांना अन स्वतःलाही शूट करून घेतले असेच दिसले पण ममांना कदाचित हे प्रकरण कमी खेचता आले असते. मूव्ह ऑन करायला हवं होतं. ते कोणीच केले नाही.
काल इतका ड्रामा जास्त होता की ए टीम ला त्यात असुरी आनंद वाटण्यापेक्षा तेही जे ओझरते दिसले ते उलट शॉक मधे दिसत होते!
आता सोमि वर पाहिले तर फॅन्स पण कन्फ्युज्ड झालेत बहुतेक, आता काय करावे, कोणाला सपोर्ट करावे, की आता शोच बघू नये की काय इ. Happy
मज्जाच आहे सगळी.

की मी तुझ्यामधे टाइम इन्व्हेस्ट करते त्याचे तू रिटर्न्स देत नाहीस>>+१ ती जयला एकदा बोलली होती कि विशालपेक्षा तुझ्यात मी टाईम इन्व्हेस्ट केला असता तर आज वेगळे चित्र असते.

की मी तुझ्यामधे टाइम इन्व्हेस्ट करते त्याचे तू रिटर्न्स देत नाहीस>>+१ ती जयला एकदा बोलली होती कि विशालपेक्षा तुझ्यात मी टाईम इन्व्हेस्ट केला असता तर आज वेगळे चित्र असते... याचा अर्थ असा आहे का की स्नेहा जय विशाल बरोबर उघडपणे करायची ते हिला लपून छपून करायचे होते?
विकासने ठरवून केले असे आपल्याला वाटत आहे पण ईतके दिवस एकत्र एका घरात रहात असताना एकमेकांशी घरच्या लोकांबद्दल, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड बद्दल गप्पा होणारच की.
एक्स्ट्रा मसाला मध्ये तर जय सगळ्यांना खोदून खोदून विचारत असतो, लग्नाला किती वर्षे झाली, कसे भेटला?
हा विशालचा बावळटपणा नाही का, एकत्र राहताना कुठलीही नीट चौकशी न करता भावनिक गुंतवणूक करून गेमवरचा फोकस हलवला. बरं मांजरेकर ताणत होते कारण हा ढील देत असणार. मला हे फार ताणून नाही धरायचे असे बोलून पडदा पाडायचा
तो ओव्हर हाईप्ड आहे हेच खरे.

विकास बर्‍याच गोष्टी मुद्दाम करतो असं वाटतं मला...त्याच्या डोक्यात fix असतं ki आपण कॅमेऱ्यासमोर बोलतोय..हे सगळे बाहेर दिसतंय आणि कसं प्रोजेक्ट होईल हे तो बरोब्बर analyse करतो..शिवाय अजून details द्यायला मांजरेकर येतातच शनिवारी...पण त्यामुळेच विकासचं वागणं fake वाटतं मलातरी..

सोनाली सुरवातीला खोटं रडली असं कोणाला वाटलं?>>आजचं पाहिलं नाही अजून..पण काल इतकं सगळं झाल्यावर मुद्दाम कॅमेऱ्यासमोर जाऊन रडली..मांजरेकर अगदी योग्य बोलले तिला त्याबद्दल..

सोनाली सुरवातीला खोटं रडली असं कोणाला वाटलं?>>> मला नाही वाटल, एवढ सगळ झाल्यावर कुणालाही रडू येइल, सोनालिचा एकच प्रॉब्लेम आहे की ती खुप बोलते आणि त्यात फाफटपसारा खुप असतो, काल विशाल सगळा ब्लेम तिच्यावर ढकलुन मोकळा झाला त्यानतर तिने काय करण अपेक्षित आहे? ती डोक्याने तेवढि हुशार नाहिच आहे, तिला गेम शुन्य समज्त असणार
पण सोनाली आणि ममांनी provoke केल्यामुळे तो बोलला. <<<<< विशाल मला बोलायच नाहि बोलायच नाही अस करुन बरच बोलुन गेला, मागच्या आठवड्यात सरानी त्याला १० वा म्हणजे शेवटचा नबर दिला तसा तो हललाच त्यावेळेला सुद्धा आपण वाइट दिसतोय याला कारण ग्रुप मधले बाकिचे तिघ आहेत अशिच समजुत करुन घेतली. तरी ममानी स्प्श्ट सान्गित्ल की तु कुणालाही स्नॅप करतो काहीही बोलतो
परवा माशाच्या टास्कमधे मिनलला म्हटला तु मधे बोलु नकोस, तीच तर ह्याच्याशी सोनाली सारख काहिच नाही मग??, नेहमी कूणाच चुकल की मी खर बोलणार एवढी एकच टेप वाजवतो.
तो काल म्हणत होता की माझी कुणीतरि आहे त्यामूले मला हे करायच नाही मग सोनालीचा बॉयफ्रेण्ड आहे की नाही ,तिच लग्न ठरल की याने तुला कशाला फरक पडायला हवाय? बाहेर कुणितरी असताना हे कस दिसेल ह्याबद्दल सोनाच्या इमेजची काळजी असती तर कशाला एवढ बोलला?
असो सोनाली मठ्ठ आहेच आणि विशाल जेन्युइन असेलही पण स्मार्ट प्लेयर नाही विषय निघाला तर हा हरिश्चन्द्र सगळच ओकणार हे चॅनेलला समजुन गेल होत नाहितर ममाना या विषयावर काय बोलायची गरज होती? जय-स्नेहाचे मिठ्या, कडेअव्र घेणे ,पकडापकडी सगळ चालू असताना ममा फक्त म्हणायचे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, विशाल-सोनालीने यातल काय केल होत??
दादुस गेल्यावर दोन्ही टिमच पारड परत इक्वल होवु नये नेहमीसाठी जयची टिम जिन्कावी ह्यासाठिच बीबी टिमच सगळ चालु हे तर लक्ख दिसतय.
जयला विनर करण्यासाठी हे चालू आहे अशी सोमीवर जोरदार चर्चा आहे.

हल्ली मला डीजे दिसली नाही इथे. तिच्या कमेंट्स मिस करतेय मी.

जयला विनर करण्यासाठी हे चालू आहे अशी सोमीवर जोरदार चर्चा आहे. >>> तो झाला तर पुढच्या वर्षी trp कमी होईल. विकास किंवा मीनल चालतील विशालऐवजी. मीनल आवडेल मला.

फायनली दादूस बाहेर. चिमटा काढून कन्फर्म केले. >> खरच ज्याला पहिल्या २-३ विक मधे जायला हवे होते, ते आता गेले. ह्यांच्या ऐवजी तृप्ती, कुडची किंवा आदिश राहिले असते, तर गेम वेगळा रंगला असता.

काल ममांनी जरा जास्तच केलं सोनाली सोबत, ती तशी उथळ आहेच म्हणा. पण तो 'वरचा मजला रिकामा' असल्यागत वागणारा विशाल, तिला खुप खालच्या लेवलवर जाउन बोलत होता, तेंव्हा ममांना तो प्रसंग कंट्रोल करुन व्यवस्थीत हाताळता आला असता. पण नाही, चॅनलच्या टिआर्पी साठी काहिही करतात हि लोकं.
सोनालीनं "आता माझंहीं तुम्हाला ऐकावं लागेल!" म्हणुन शेपटावर पाय ठेवला, मग काय गडी काय थांबायचं नाव घेत नव्हता. परत 'का रडली म्हणून' अजुन दम दिला.
विशालच्या फॅन्सचं, भारतीय क्रिकेटटीमच्या हताश फॅनस सारखं झालय, हातात आलेली मॅच शेवट्च्या ओव्हर मधे घालवीली.

दादुसला मिराच नाव घेतल्यावर कसल हुस्श वाटल, चला आता घरी जायला मोकळे!
बाय द वे , सोमी वर एक भारी कॉमेन्ट आली होती
" एक दादुस टिम मधुन आउट आणी दुसरा अ‍ॅड झाला"

विकास सोनालीला सांगत होता की तिने विशालला चुकीचा स्पर्श केला वगैरे तसं तर विशाल काही बोलला नाही. विकास आणि मीनलला हे कसे ऐकायला आले जे तो बोललाच नाही किंवा त्या अर्थाचही काही बोलला नाही. सोनाली तर असंबद्ध बोलत सुटते.

तो काल म्हणत होता की माझी कुणीतरि आहे त्यामूले मला हे करायच नाही मग सोनालीचा बॉयफ्रेण्ड आहे की नाही ,तिच लग्न ठरल की याने तुला कशाला फरक पडायला हवाय?>>>+१११
काय ते नेलपेंट लावण्यासाठी हात धरला तर काय फील होतं ते मला माहीती पण कॅमेरात दिसत नाही म्हणे.
बरे, नेलपेंट लावत होता तेव्हा तर ती त्याच्याशी बोलत पण नव्हती. उत्कर्षचे गाणे ऐकत होती, त्याला काहीतरी सांगत होती. तेव्हा तो तिलाच ओरडला कि माझ्याकडे तू लक्ष देत नाहीस म्हणून. तिला पत्ता पण नसेल कि याला काय फिल होतेय ते.
तिने बॅायफ्रेंड ऊर्फ होणाऱ्या नवऱ्याबद्दल त्याला सांगितले नाही हे त्याच्या पथ्यावर पडले. त्याला बोलायला पॅाईंट मिळला कि मी तर आधीच क्लियर केले होते मी बाहेर गुंतलोय आणि इथे काही करणार नाही पण तू लपवलेस आणि तुझ्यामुळे मला त्रास होतो असे सांगून मला चूकीचा दर्शवतेस.
खरतर दोघेही चुकलेत. मागे २ दिवसापूर्वी वॅाशरूम मधे विशाल तिला हेच सांगत होता कि मी काही बोललो तर तू वाईट दिसशील तेव्हाही ही का, काय झाले हे विचारायच्या ऐवजी दुसरेच काहीतरी बडबडून निघून गेली.

जय-स्नेहाचे मिठ्या, कडेअव्र घेणे ,पकडापकडी सगळ चालू असताना ममा फक्त म्हणायचे तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, विशाल-सोनालीने यातल काय केल होत?? >>> ममा त्यांना नेहमीच ओरडायचे, त्यावर उपहासाने बोलायचे तेव्हा स्नेहा-जयने कधीच त्यावर उलट वाद घातला नाही. ती तर हसत-हसत दुर्लक्ष करायची.
विशाल-सोनालीची तर खाया-पिया कुछ नही ग्लास तोडा बाराना गत झाली. यांनी तसे काही केले नाही पण आपण काही हे करायला इथे आलो नाही असे बोलून झाले तरी आपल्यासाठी दुसरा स्पेशल आहे हे दाखवायचे, सतत भांडायचे मग गोड बोलायचे, दुसऱ्यामुळे आपल्याला कसा त्रास होतो ते दाखवायचे, मीच कसा/कशी बरोबर हे दाखवायचे हे वाढत त्याचा शेवट चावडीवरच्या वादात झाला.
याचा फायदा विकासला झाला. विशाल टोकाला जायला लागला तेव्हा त्या थांबवायचा प्रयत्न करून, सोनालीची बाजू सावरायला तिच्या बाजूने मुद्दे मांडून तो चांगला दिसला. त्याने जरी विशालला सोनालीबद्दल खरे सांगितले तरी तो सोनालीला एकदा सांगत होता कि तू काही लपवू किंवा खोटे बोलू नकोस. पण सोनाली तिथेच चूकली.

Pages