मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उमेदवार कोणीही असेना, कॅप्टन जय झाला पाहिजे. मग टास्क मध्ये एक टीम फार टिकत नाही.
मीराचे एक्सप्रेशनस नेहमीच विचित्र असतात. त्यातून काही निष्कर्ष काढता येत नाही.
मीनल व्यतिरिक्त आणखी एक व्यक्ती कंन्सिस्टंट आहे ती म्हणजे गायत्री दातार Lol
विशाल स्ट्रॅटेजी म्हणून भांडत असेल तर फार वाईट स्ट्रॅटेजी आहे आणि वैतागून भांडत असेल तर त्याचे इमोशनल कोशंट कमी पडतो हेच दिसते.

Bigg boss may not be scripted but it is a well edited show!!
पण आता हे सगळं अक्षरशः कृत्रिम वाटायला लागलंय... Mm नी सांगितल्यापासून सगळ्यांच्या तोंडी हे सतत यायला लागलंय की हे बाहेर वाईट दिसेल.. पब्लिकची sympathy मिळवा.. एकटं पडल्यावर सपोर्ट मिळतो... असं बोलून तुम्ही मला वाईट दाखवताय.. किंवा हिच्याशी बोलायचंच नाही म्हणजे ही दिसणार नाही वगैरे वगैरे.. मग म्हणजे एवढा विचार तुम्हाला करता येतो तर आजवर जे राडे केले आणि पब्लिकच एकमेकांशी भांडत बसली ते सगळं व्यर्थ झालं म्हणायचं.. काय माहीत पण बोर व्हायला लागलं आणि एकतर्फी सुद्धा.. म्हणजे नेहमी a टीम जिंकणार.. आणि तीच टीम ठरवणार आणि बाकीच्यांनी fair fair करत बसायचं.. श्या....

आजचा भाग बघितला नाही का कुणी. जयच्या टीमने तीन वेळा समोरच्या टीमला पकडून ठेवले. हा कसला गेम. विकासने अखंड बडबड करून विशालला जीव नकोसा केला. उत्कर्ष तर सुटण्याची धडपडही करत नव्हता.

उत्कर्ष तर सुटण्याची धडपडही करत नव्हता.>>कशासाठि करेल कारण त्याला कॅप्टन तर जयलाच करायचे होते . जयने उत्कर्श्ला जे काय पकडले होते ते म्हणजे आता लव्ह-सिनच सुरु करा असे होते. बाकी आज विशाल-विकास दोघाच चुकल, थोड आधिच बिल्ड अप होतच त्यात रात्री बसुन माचिसने विशालच्या डोक्यात भरपुर काड्या सारल्या हा आला चार्ज होवुन तरी बर दोन्ही उमेदवार टिम ए चे याचा काय फायदा त्यात ?कोणीही कॅप्टन झाले तरि? बसले एकमेकाच्या उरावर, जय उत्कर्श बसले गम्मत बघत.
जयने मागच्या चावडिनतर गेम छान घुमवला आहे , आधिच बी टिममधे रिफ्ट आहेत ते वाढवत नेले आहेत. विकेन्डला ममानी जयला नबर १ दिला तर अजिबात आश्चर्य नाही.

कंटाळवाणं होतंय आता.
विकास खरंच खूप धूर्त आहे. विशालच्या पुढे जाण्यासाठी काल खूप बडबड केली त्याने. त्याचे शब्द हेच त्याचे शस्त्र आहेत.
विशालची लोकप्रियता कमी होईल बहुतेक. पण अशात जय दोघांच्याही पुढे राहील.
उत्कर्ष मास्टर माइंड मधून एक्स्ट्राच्या रोलमध्ये गेल्यासारखा दिसतोय.
विशाल कुस्ती शिकलेला आहे. सगळ्या पकडी आणि पलटी तशाच दिसत होत्या. तरीही एकदा विकासने सुटायची चांगली धडपड केली.
सोनालीने विशाललाच चिकटून राहायचा निर्णय घेतलाय.
एका प्रोमोत विकास विशालचं भांडण सुरू असताना त्याच फ्रेममध्ये मीनल हसताना दिसली होती. कालच्या भागात हे मला कुठे दिसलं नाही. अर्थात मी टीव्हीसमोर बसून पाहत नव्हतो. पण यांच्या भांडणात न पडून ती शहाणी ठरली.

एक छान पोस्ट सापडली ती देतेय:
थंड डोक्याचा मामला!!

तसा माझा 'बिग बॉस मराठी' ह्या विषयावर ह्या ग्रुपमधलाच काय तर एकूणच ह्याविषयावरचा हा पहिला लेख!! 'बिग बॉस' शो बद्दल मला प्रचंड कुतूहल आहे. कारण राजकारणाचा एक विद्यार्थी म्हणून मला हा गेम शो कायम सर्वोत्तम राजकीय खेळ शिकण्याचा उत्कृष्ट मंच वाटतो. पहिला सिझन अप्रतिमच होता, दुसरा ठीक ठाक आणि तिसरा पहिले नुसता राडेबाज वाटला पण आता आवडायला लागलाय!! अर्थात तो आवडतोय कारण 'इंडिव्हिज्युअलीटी' जी गेले ५०-६० दिवस मिसिंग होती ती आता बहरतेय. ग्रुप फुटणे, नवीन ग्रुप बनणे, समोरच्याला वापरून फेकून देणे, प्रामाणिकपणाचा आव आणणे ह्या सगळ्या गोष्टी आता बहरतायत!! बिग बॉस लोकं फक्त आणि फक्त वर उल्लेखलेले मानवी भावभावनांचे पिन पॉईंटेड प्रकटीकरण ह्या एकमेव कारणांसाठी बघतात कारण डेली सोपमध्ये त्या तितक्या खुलत नाही, किंवा अंगावर येत नाहीत जितक्या त्या 'बिग बॉस' मध्ये येतात!!

टीम ए की टीम बी, जय-उत्कर्ष की विशाल-विकास, गायत्री-मिरा की मिनल-सोनाली की दादूस ह्यांच्या खेळाबद्दल मी मतप्रदर्शन करणार नाही. हा पण लेखाच्या शेवटी इनपुट्स नक्कीच देईन. कारण ह्या कुणाहीपेक्षा माझ्यासाठी गेमचं महत्व अधिक आहे. गेम, जो ह्या कुणाहीपेक्षा मोठा आहे!! ह्या गेममध्ये टिकायचं असेल तर थंड डोक्याने विचारपूर्वक खेळावं लागतं. समोरच्याला एक्सपोज करणं, त्याची स्ट्रॅटेजी उधळून लावणं, शक्ती/युक्ती दोन्ही वापरून टास्क जिंकणं आणि त्याचबरोबर टास्क आटोपल्यावर जो वेळ असतो त्यात आपले पत्ते टाकणं हाच सगळ्यात मोठा 'टास्क' असतो. कारण टास्क हे निवडणुकांसारखे असतात जे दर ठराविक कालावधीत येत असतात, तुमचा बेस स्ट्रॉंग केला की नॉमिनेशन, कॅप्टन्सी ह्याचं टेन्शन किंवा मोह येत नाही, आणि ह्याचं टेन्शन किंवा मोह आलं नाही तर 'इंडिव्हिज्युअल' खेळ खुलून येतो!! होस्ट महेश मांजरेकर जे दर आठवड्याच्या चावडीत सांगत असतात त्याचा गाभा हाच असावा!!

घरातल्या सदस्यांनी मी डोक्याने खेळतो किंवा समोरचा शारीरिक ताकदीवर खेळतो हे म्हणून उपयोग नसतो कारण ह्या खेळात सगळे ट्रम्प कार्ड्स ओपन करून नुकसानच होतं, तुमचा सगळा खेळ, तुमच्या सगळ्या स्ट्रॅटेजी ओपन करून प्रेक्षकांसमोर ठेवण्यात काय हशील?? कारण तुमच्याकडे उरलेल्या आठवड्यात प्रेक्षकांना दाखवायला काय उरणार?? तेंव्हा थंड डोक्याने, हळुहळु पत्ते ओपन करणारच हा गेम शो जिंकु शकेल.

विकास पाटीलचं म्हणाल तर त्याने समोरच्याला ओव्हर एक्सपोज करणे पहिले बंद करावे, बिट ओव्हबियस गोष्टी समजावून सांगितल्या तर त्यातली मजा तर जातेच, पण उलट तुम्हीच ओव्हबियस होत जाता जे आताच्या स्थितीत धोकादायक ठरू शकते. प्रेक्षक आहेत की समंजस ते स्वतः डोकं वापरून एक्सपोज करतील की त्यांच्या मनात!!

विशाल निकमने नाही डोक्याने तर किमान थंडपणे तरी गेम खेळावा, विकास ने मेहनतीने 'एक्सपोज' करून तयार केलेल्या शेतात त्याने फक्त पेरणी करायचीय ती देखील होत नसेल तर कठीण आहे!! अति चांगुलपणा एक तर खोटारडेपणा असतो किंवा मूर्खपणा हे त्याच्या जितक्या लवकर लक्षात येईल तितकं उत्तम!!

जयचं म्हणाल तर त्याने उत्कर्ष विशालला म्हणाला ते ए टीम नावाचं ओझं फेकून द्यायची गरज आहे, तेही थंड डोक्याने माकडचाळे न करता. कारण ही हॅज पोटेन्शियल, बट ही इज वेस्टिंग ऑन हिज अदर वेस्टेड इंटरेस्ट!!

मिनलचं म्हणाल तर पोरीला 'इंडिव्हिज्युअलीटी'चं इंजेक्शन देणं गरजेचं आहे, खरोखर फिनाले मटेरियल आहे पोरगी, जी विशाल विकासाच्या खुराड्यात अडकून पडलीय.

सोना पाटील ने आधी स्वयंपाकघरात आणि एकूणच घरात कर्कश ओरडणे बंद करावे, बाकी थंड डोकं, एक्सपोज हे तिच्या गावातही नाही, तिने मिराशी नडावं, ब्राउनी पॉईंट्स घ्यावे बास इतकंच ती करू शकते.

उत्कर्ष बद्दल काय बोलणार स्वतःच्या हाताने स्वतःचीच माती करून घेणारा खेळाडु, फार्फार तर जयला टॉप फाईव्ह/सिक्समध्ये स्थान मिळवुन देण्याची शिडी होऊ शकेल. कारण पुलाखालून इतकं पाणी वाहुन गेलंय की वापसी कठीण होऊन बसलीय. ह्या उपर जयच्या शॅडोमधुन बाहेर आलाच तर हू नोज??

मिरा ही खरंच चांगली स्पर्धक होऊ शकली असती. पण अगेन ती ज्यांचं बॅगेज होऊन बसलीय ते जोपर्यंत मिरा नावाचं बॅगेज उतरवून फेकत नाही तोपर्यंत मिराकडून इंडिव्हिज्युअलीटीची अपेक्षाच चुकीची आहे. अर्थात हे मिराच्या हातात नाही त्यामुळे आनंदी आनंदच आहे!!

गायत्री बद्दल मला काहीही बोलायचे नाही कारण सेल्फ रिस्पेक्ट ह्याचा गंधही नसलेली व्यक्ती कुठेच तरू शकत नाही.

दादूस आऊट ऑफ क्वश्चन इथून पुढच्या खेळासाठीच अपात्र आहे.

बिग बॉस गेम हा नक्कीच डोक्याचा आहे, राजकारणाचा आहे, मानवी उत्कट भावभावनांचा आहे, इथे तुम्हाला एक तर खरं राहावं लागतं नाहीतर राजकीयदृष्टया अत्यंत चाणाक्ष!! इथून पुढे फिनालेपर्यंत मजा येईल ही अपेक्षा!! हिंदी बिग बॉस सिझन १५ पेक्षा मराठी बिग बॉस सिझन ३ जास्त टीआरपी खेचतोय अर्थात त्याचं अधिकाधिक श्रेय महेश मांजरेकर आणि त्यांच्या सुपर भन्नाट चावडीला आहेच, पण काही श्रेय सदस्यांना देखील आहेच की!! बास आता मस्त खेळ सदस्यांकडून आणि बिग बॉस कडून दिसावा हेच काय ते प्रेक्षक म्हणून मागणे, अँड येस मे द बेस्ट प्लेयर विन्स!!

#बिग_बॉस_मराठी_सिझन_३
प्रसाद देशपांडे

मिनलचं म्हणाल तर पोरीला 'इंडिव्हिज्युअलीटी'चं इंजेक्शन देणं गरजेचं आहे, खरोखर फिनाले मटेरियल आहे पोरगी, जी विशाल विकासाच्या खुराड्यात अडकून पडलीय.... मुळीच नाही. ती एकटी अशी आहे की ग्रुपला लटकत नाही. विशाल कित्येक वेळा ए टीम समोर शस्त्र टाकून देतो. ती शेवटपर्यंत लढते. विकासची स्ट्रॅटेजी मांजरेकर बिंडोकपणे ओपन करतात. त्याला तो तरी काय करणार
मांजरेकरांच झालय असे की गेम त्यांनाच पहिल्यांदा नीट कळला असवा. त्यामुळे लहान मुलाच्या उत्साहाने सगळा फोडून टाकतात.
जयची अडचण आहे की ऍग्रेशन, बुलिंग हा त्याच्या व्यक्तीमत्वाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे तो जेव्हा जेव्हा शहाण्या बाळासारखा खेळतो तेव्हा तो दिसतच नाही.

>>मांजरेकरांच झालय असे की गेम त्यांनाच पहिल्यांदा नीट कळला असवा. त्यामुळे लहान मुलाच्या उत्साहाने सगळा फोडून टाकतात.

अगदी अगदी!!
म्हणजे यांच्या मनाप्रमाणेच सगळ्यांनी खेळले पाहिजेल आणि वरतून यात माझे काही नाही सोशल मिडियावर जे चालते ते तुमच्यापर्यंत पोहचवतोय म्हणे!!
अरे नका ना सगळे फोडू!! राहू दे जरा भ्रमात आतल्या लोकांना.... हलक्याश्या हिंट देणे हे होस्ट चे काम असते पण इथे तर चावडीवर २१ अपेक्षित घेऊन शिकवणीच चालू करतात.... आता गणित कुठलेही असूदे सगळ्यांचा एकच फॉर्म्युला घोटून घेतलाय की बाहेर चांगले दिसले पाहिजेल..... श्या!!

तुरु
उत्तम फॉरवर्ड आहे.
विश्लेषण चांगलय.
मांजरेकर बराच गेम ओपन करतात.
बिग बॉस देखील टीम ए कडे बायस वाटतात.
प्रत्येक वेळी फक्त 1 मत कमी असल्याने कॅप्टन A टीमचा होतो.

गेम संपूर्ण कळालेले कमी लोकं आहेत तिथे.
जय, विकास, मीनल हे तिघे गेम संपूर्ण कळालेले वाटतात.
उत्कर्ष आव आणतो पण बऱ्याच वेळा फुसस होतो.
विशाल शांत डोक्याने विचार करू शकत नाही काही वेळा. तिथे माती खातो. दिलेल्या inputs चा वेगळ्याच angle ने विचार करतोय.

जय ने थोडा फेअर प्ले दाखवला इथून पुढे तरी तो विनर होईल. त्याचे मूव्हज चांगले आहेत.
विशाल , विकास, मीनल त्याच्या मागोमाग आहेतच.

ह्या चारपैकी एकजण जिंकेल असं वाटतंय.

स्नेहा मिनिमम गारेंटी घेऊन आलेली वाटतं. खेळत नव्हती तरी खूप टिकली. आणि गारेंटी संपली की लगेच बाहेर. काढलं.

दादुस मात्र surprise करत आहेत.
खूप टिकलेत.

मीरा,
माजूरडेपणा आणि राग बिलकुल लपवू शकत नाही.
जरा भांडण झालं की ये चल निघ हेच शब्द आधी.
तिचा स्वभाव तसा असेल.

बाहेर वाईट दिसेल म्हणून घाबरून खेळत आहेत सगळे त्यामुळे पाणचट झाला खेळ.

सोनाली, डोकं वापरत नाही जास्त.
तिचं।लपवलेले, खोटं बोललेलं बाहेर पडलं तर खूप negative दिसणार आहे ती.

सगळ्यांचा एकच फॉर्म्युला घोटून घेतलाय की बाहेर चांगले दिसले पाहिजेल...>>> तेच तर अवघड आहे ना. समोरच्याला आपले पटेल असे नाही, समजून घेणे तर दूरच. आज ज्याला नॅामिनेट केले उद्या त्याच्याच मदतीची गरज पडेल. समोरचा खेळाडू आपल्यातले सगळे वाईट गुण हेरून ते बाहेर काढणारच. बाहेरच्या लोकांशी संपर्क नाही, घरात कोणतेच मंनोरंजनाचे साधन नाही, मन दुसरीकडे कुठे गुंतवता येत नाही, नावडती व्यक्ति सतत डोळ्यासमोर असणार त्याकडे दुर्लक्ष करणे शक्यच नाही. आपल्या बरोबरचा आपल्यामागे काय बोलतो हे चुगलीतून कळतेच. मग आपण काय बोलतो, काय करतो त्यावर सगळे जज करणार. तसेच आपण मागे बोलून, रणनीती आखून उपयोग नाही कारण ते चावडीत उघड होणारच. या सगळ्यात चांगुलपणाचा आव आणता येत नाही कि लबाडी करून चालत नाही.

खुप बोर चालु आहे हा विक. टिम ए तर काहि करत नाही, माहित होत की कॅप्ट्न्सी त्यान्च्याकडेच असनारे. टिम बी नेहमीप्रमाणे निरर्थक वाद घालत आहेत.
विशाल आधी आवडायचा, पण आताशा अगदी पाहवत नाही, नेहमी कपाळावर आठया. सोनाली, मिरा, विकास सोबत वाद. त्याला असा समज झालाय कि तोच टिम बी चा तारण्हार आहे. कदाचीत बिगबॉस टिमची ही स्ट्रॅट्जी असु शकते की, बाहेर विशालला असलेला सपोर्ट थोडा कंट्रोल करावा. म्हणुन सतत फोकस टिम बी वर, त्यातल्यात्यात विशालवर असतो. ते जे काही असेल, पण बिगबॉस नक्कीच यश्स्वी झालेत विशालची लोकप्रियता कमी करण्यात.
जयने ह्या आठवड्यात काहीही विशेष राडा न घालता कॅप्ट्न्सी मिळवीली. परत विशालसोबत डिल करताना तोच विशालला कंट्रोल करत आहे असे जानवले, विशाल फक्त हो हो करत होता. जय गॉट बिग ब्राउनी पाँइट्स
विकासला विशालचा या पुढील स्टँड समजला आहे, त्यामूळे त्याने उघड-उघड त्याच्या सोबत पंगा घेतलाय. बघू पुढेजाउन त्यांच्यात समेट होतोय का.
हा पहिला विक असेल जेंव्हा टिम ए, निगेटिव न दिसता, उजवी ठरली.

विशाल ने फार जास्त निराशा केली या आठवड्यात.
मासे टास्क मधे टीम बी ला उमेदवारी मिळवण्यासाठी त्याने काहीही मदत केली नाही. त्याच्या साठी टीम बी कितीही भांडणं झाली तरी नेहेमीच मदतीला आली होती. भांडणं करणार नाही,मारामारी करणार नाही ई ई नाटकं सुरु केली होती.
पण तेच जय साठी पाण्याच्या टास्क मधे घुसायला लगेच तयार झाला. त्यावेळी का नाही आठवलं त्याला फेअर खेळ वगैरे.... जय, मीरा कोणीही जिंकले असते तर काय फरक पडला असता टीम बी ला.... विकास ला राग येणं सहाजिकच आहे....

विशाल मार खाणारे चावडीवर.

हा पहिला विक असेल जेंव्हा टिम ए, निगेटिव न दिसता, उजवी ठरली. >>>>>>>>> अगदी अगदी

जयने उत्कर्श्ला जे काय पकडले होते ते म्हणजे आता लव्ह-सिनच सुरु करा असे होते. >>>>>>>> ++++++++१११११११ काय रोमॅण्टिक पोझेस देत होते एकेक. जयने स्नेहाला नक्कीच मिस केले असेल तेव्हा.

एका प्रोमोत विकास विशालचं भांडण सुरू असताना त्याच फ्रेममध्ये मीनल हसताना दिसली होती. कालच्या भागात हे मला कुठे दिसलं नाही. >>>>>> तिला हसायला वेळ कुठे होता? मीराशी झुन्जत होती.

आज मीरा-गायत्री मध्ये भाण्डण होणार आहे.

बी ग्रुप असाच आहे. तुझे माझे जमेना तुझ्यावाचून करमेना. कालचे टास्क मधले भांडण मला काही फार वेगळे वाटले नाही. विकास ची तर ही अटेन्शन आपल्याकडे घ्यायची स्ट्रॅटेजी असावी असे वाटले. मग ते निगेटिव का असेना. कारण तो एरवी असा चिडत वगैरे नाही. अर्थात त्यांच्या ग्रुप च्या कॅट माउस च्या गेम मधे पब्लिकचे प्रेम जरा कमी झाले असेलच. पण सगळे फुटेज बी ग्रुप ने घेतले हेही खरं.
जयला मात्र मार्क आहेत या आठवड्यात. मस्त खेळला. उत्क्या दिसलाच नाही फार. मीरा दिसते पण गायत्री दिसत नव्हती अजिबात. आता दादुस जर गेले तर खरा गेम सुरु होईल असे वाटते.

शेअर केलेलं फॉरवर्ड आणि इतर सर्वांच्या कमेंटस फार छान आहे.

स्वरुप यांची म मां बद्दलची कमेंट बेस्ट आहे. मीनलबद्दलची रेवाची कमेंट परफेक्ट आहे.

उत्कर्ष हाच एक खेळाडु आहे जो सुरुवातीपासुन डोक्याने खेळत आला आहे. त्याचे काहि फासे अचूक पडले, काहि नहि. हे सर्वांच्या बाबतीत होत असतं; चाणक्यनिती नेहेमीच यशस्वी होत नाहि. हि इज स्टिल वेरी मच इन द गेम...

विकासचे शस्त्र म्हणजे त्याची चुरुचुरू चालणारी जीभ. तो फिजिकल टास्क्समध्ये काहीच नाही करू शकत जय- विशालपुढे. म्हणून तो बोलून मोराल डाऊन करतो त्यांचे. ३९ वर्षांचा असूनपण लहान मुलासारखा इनोसंट वाटतो भांडताना. सध्या तरी तो जे वागतोय त्यात फार चुकीचं काही वाटत नाहीये मला तरी. विशालचे वागणे विचित्रच आहे मागच्या चावडीपासून. खरंच तो उत्क्या- जयशी प्रेमाने, अगदी अदबीने वागतो. आणि विमिसो ला हाडतूड करत असतो. सध्या तरी विकास- मिनल सगळ्यात आवडते आहेत.

जेव्हा विकास व्यापारी होता तेव्हा विशालकडे जास्त मासे असावेत आणि त्याला कॅप्टनशीपची उमेदवारी मिळावी म्हणून तो विशालला जाऊन राडा कर, मासे चोर असे सांगत होता. तेव्हा वैयक्तिक खेळणार, राडा करणार नाही असे सांगून हा गप्प बसला. दुसऱ्या दिवशी जयच्या गटात गेल्यावर गटासाठी खेळतोय, राडा करतोय सांगत होता. वर विकासला तू किती चूकीचा आहेस, काल मला राडा कर सांगत होतास पण आज शांत खेळायला सांगत आहेस असे बोलत होता.

तोच विशालला कंट्रोल करत आहे असे जानवले, विशाल फक्त हो हो करत होता. >>>+ १ त्यासाठी उत्कर्षने रात्रभर मनोरंजनाच्या शेकोटीसमोर बसून काड्या लावल्या असणार. मग पुन्हा जयने दिवसभर तुझा वापर करून घेतला जातो असे सांगत आग चालू ठेवली. हे सगळे ममां बोलून दाखवतील.
विशाल मार खाणारे चावडीवर.>>>+१ या विकांतला त्याला जेव्हा ममां ओरडतील तेव्हा पुन्हा रडेल तो, अजूनच बिथरेल. सोना-मिनल बरोबर सारखेच भांडतोय, आता विकासचे पण ऐकायचे नाही असे ठरवलेले दिसते. जय-उत्कर्षशी जे काही बोलत असतो तेही काही मनोरंजक नाही, त्यातून तो त्याच्या मित्रांशी एकनीष्ठ नाही असे दिसते. मग त्याचा खेळ पुन्हा पहिल्यासारखा होईल असे वाटत नाही.

बरेच जण टिका करतायेत सो मि वर विकासला पहीला नंबर दिला आणि विशालला शेवटी, म्हणून विशाल लगेच बिथरला. हाच तर गेम आहेना, असं होत असेल तर विशाल जिंकण्यासाठी योग्य आहे का. चॅनेलला किंवा मेकर्सना हेच अपेक्षित असेल तर ते यशस्वी झालेत, विशाल गंडला.

फुटेज घेण्याबाबत सहमत, कालचा गेमच टिम ए चा होता, कोणीही जिन्कले तरी टिम बीला नुसती ढोरमेहनतच होती त्यामुळेच विकास ने बडबड चालु केली .
सोनालीला काहिही फुटेज मिळु द्यायच नाही हे टिम ए ने ठरवलच आहे,
मान्जरेकरानी गेम फोडण्याबद्दल सहमत.

टास्कचं सूचनापत्र वाचताना उत्कर्ष कुठेही पूर्णविराम घेतो.
जयच्या जिम्नॅस्टिक्सपेक्षा विशालच्या लाठ्याकाठ्या प्रो वाटल्या. जय मध्ये मध्ये मेल स्ट्रिपटीज करतोय असं वाटलं.
मीनलने नाचात सर्प्राइज केलं.

जयच्या जिम्नॅस्टिक्सपेक्षा विशालच्या लाठ्याकाठ्या प्रो वाटल्या. >>> मी डोंबिवलीत होतो तेव्हा नेहरू मैदानात संध्याकाळी लाठ्या काठ्याची प्रॅक्टिस चालायची. मी पण जायचो. विशालने जे केलं ते दोन तीन आठवड्यात सहजशक्य आहे. तुलनेत जयचे जिमन्यास्टिक कठीण वाटले.

जयने केले ते शाळकरी मुलं कसल्याही ट्रेनिंग शिवाय करताना पाहिलंय.>>> अरे व्वा, असं असेल तर छानच आहे. ऑलिम्पिकमध्ये फक्त ब्रॉन्झ पदक पक्के का होत नाही याचा विचार करतो मी आता. Happy

जयच्या समरसॉल्टचे लँडिंग एकदाही स्मूथ झाले नाही. तो जे करत होता त्यावर फोकस करण्यापेक्षा बघा मी किती भारी करतोय हे दाखवण्यावर भर होता. तेच विशालने पूर्ण लक्ष त्या कृतीत देऊन केले. असो.

Pages