मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गायत्री बायस्ड परीक्षक होती. मीनल चा जलेबी डान्स इतका मस्त होता तरी त्याला मिडीयम रेटिंग आणि जय ने मारलेल्या उड्या हाय रेटिंग. काहीही.
जिथे जिथे जय असेल तिथे तिथे हाय रेटिंग देत होती.
मीनल चा डान्स बघून मजा आली . बेस्ट नाचते पोरगी. मीरा नुसतीच उड्या मारत होती डान्स च्या नावावर.
सोना पण छान नाचते.
उतक्या ठीकठाक.
विवि च्या काल झालेल्या भांडणावर जास्त काही चर्चा झालेली दिसली नाही आज.
सोना ची किचन मधली भांडणं बास आता. किती सतत तेच तेच.. वैताग आलाय..

एक प्रोमो पाहिला ज्यात विशाल सोनाला विचारत होता की तू काय बोललीस ते तू सांगतेस की मी सांगू. मम्या पण केकटला तिच्या अंगावर तुला बाहेर काढीन म्हणून. इतकं मोठंकाय घडलं?

प्रोमो कसाही कनेक्ट करतात, मला वाटत विशाल बोलत असताना सोनाली सारखी मधे मधे बोलत होती वैतागुन ममा म्हटले असतिल तुला बाहेर काढेल,
बाकी टिम ए आता मान्जरेकराना भिक घालेनाशी झालिये अस वाटतय, अती धाकाने बिघडलेल्या मुलासारखी बेफिकिर भाव घेवुन बसलेली दिसतात.

सोनाचं प्रस्थ उगीचच वाढवलंय बिगबाॅसनं.
विशालची लाडकी एवढंच कारण दिसतं खरं तर.
बाकी किरकिरत असते सारखी. भांडताना जाम तिरळी दिसते. हसताना मात्र सोनाक्षीसारखी दिसते

बापरे...डोक्याचा पार भुगा झाला.... सोनालीच्या पर्सनल गोष्टींवर किती ती चर्चा ...विशाल च्या हातातून trophy पुर्ण निसटली आहे... परत सोनाली आणि विकास ला चुगली आली त्यात विशाल म्हणाला की हे दोघ माझ्या डोक्यावरचा भार झालेत.. आणि त्याने ते मान्य केल...या परिस्थीतीत पण विकास चा संयम आणि मुद्देसूद बोलण स्तुत्य होत... जय, उत्कर्ष तर आज चावडी वर होते की नाही कळालच नाही.

A टीम ने प्रत्येक वेळी शिव्या खाल्ल्या पण 90% वेळा त्या गेम बद्दलच होत्या पण आज b ग्रुप मध्ये जे काही झालं ते खूपच पर्सनल वर झालं आणि मांजरेकर सरांना ते थांबवता आलं असतं... या टप्प्यावर येऊन एवढी ugly fight झाली आणि तीही पर्सनल गोष्टींवरून.. हे जरा वाईट वाटलं

म मा एवढे का भडकले सोनाली वर ते कळलं नाही. एकदमच भडकले.
विकास चा संयम आणि मुद्देसूद बोलण स्तुत्य होत... >>>
+१
खरं सांगायचं तर तोच काय बोलतो ते नीट कळतं या सगळ्या लोकांत. उगाच फाफटपसारा न लावताच बोलतो.
बाकी सगळेच म मा म्हणाले तसं 'स्वल्पविराम, पूर्णविराम' न लावताच बोलतात.
विशाल एवढा बडबडला पण काही नीट कळालं नाही.

उदया सल्लू येणार असला तरी एकाला काढा आणि सोनाली गेली तर बरं होईल. फार कर्कश्श आवाजात सतत बोलत असते. तुपारेने योग्य न्याय केला असे कोणाकोणाला वाटले असे ममांनी विचारल्यावर विकास पहिले बघत होता कोणकोण हात वर करतोय आणि सगळे करताहेत हे दिसल्यावर त्यानेही हात वर केला Happy पण तुपारे खरंच जयच्या बाजूने निकाल देत होती. मीनलचा जलेबी डान्स छान असूनही तिने मिडीयम दिले.

तुपारेने योग्य न्याय केला असे कोणाकोणाला वाटले असे ममांनी विचारल्यावर विकास पहिले बघत होता कोणकोण हात वर करतोय आणि सगळे करताहेत हे दिसल्यावर त्यानेही हात वर केला >>> इथे विकासने केला नसता हात वर तर तमाम पब्लिकने अजुन डोक्यावर घेतलं असतं त्याला. इथे विकासचं चुकलं.

आज कोण पहीलं कोण शेवट म मां मते.

सलमान येतोय मग सिक्रेट रुम का यावेळी, किंवा नो एलिमिनेशन. दादुस नको आता.

म मा एवढे का भडकले सोनाली वर ते कळलं नाही. एकदमच भडकले.>>> ती खूप किरकिर करते. तुला बोलायला वेगळा वेळ देतो असे सांगितले तरी दुसरा बोलत असताना मधेच बोलत होती तेही एकदा नाही सतत. शेवटी तिला बेडरूम मधे पाठवले. बोलणे झाल्यावर परत बोलावले.
या टप्प्यावर येऊन एवढी ugly fight झाली आणि तीही पर्सनल गोष्टींवरून>>> विशालने तसे करायला नको होते. कॅमेरावर दिसत नाही पण मला फील होतात हे सांगायची काय गरज होती. बाबा अश्यावेळी आपण उठून दूर जावे, पण ती चीप वागते सांगायच्या नादात तो चीप विचार करतो ते दिसत होते. बाहेर आहे ना कुणीतरी तर घरात सोना-सोना कशाला करायचे. विकास थांबवत होता कि असे नको बोलू पण हा स्वत:ची प्रतिमा वाचवायला बोलतच सुटला.
सोनाली पण काही प्रमाणात दोषी वाटते. विशालला एक सांगितले आणि विकासला दुसरे. वर म्हणते कि विशालला सांगायचे राहून गेले असेल तर त्याने त्याचा इश्शू करायला नको. पण माझे लग्न ठरले हे एकाला सांगायचे आणि ज्याच्याशी गुलूगुलू बोलतो त्यालाच बरे सांगायला विसरायचे असे नाही होत. तिने मुद्दाम लपवले होते.

विशाल चढेल परत.

मीनल पहीली हे बेस्ट केलं. विकास का मागे.

थँक यु चंपा.

आजची चावडी म्हणजे विशालने स्वत:ला अजुन खोलखोल ढकलण चालू होत, इतक काय काय तो त्याच्या आणि सोनालीबद्दल बोलत होता त्यात सोनाली पण वाचाळस्पती बोलतच बसली ,बोलतच बसली त्यातुन ते फिरुन फिरुन त्याच त्याच मुद्द्यावर येत होते ते भयकर होत दोघासाठी , सोनाली किती बोलते पण मुद्दा काय हेच कळत नाही आणी स्पर्धेच्या या स्टेजला येवुन विशालचा अहकार उफाळुन आलाय एरवी मग मी तुझ्यासाठी रिस्पेक्ट ठेवतो, हॉनेस्ट आहे वैगरे रिव्हर्स दिसायला लागलय.
जिन्केल का नाही ते त्याने गेम बदलला तर कळेलच पण तो आता डिझर्व्हिन्ग वाटत नाही. विशालला हा गेम बिलकुलच कळला नाहिये वर तो त्याच्याबरोबर टिम बीची माती करतोय.
विकासचा गेम ममा किती वेळ फोडणार आहेत??? प्लिजच ह!
ज्याना पहिल्यापासुन हा गेम निटच कळला आहे ते म्हणजे जय्,मिनल,विकास पण सर विकासला नेहमी खाली खेचतात.
आज मिनलच कौतुक केल एकदम वेलडिझर्व्ह आहे ती, सगळ्यात सातत्याने उत्तम खेळ तिचाच आहे. गायत्री ज्यावेळेस म्हटली की मला पण सेल्फरिस्पेक्ट आहे त्यावेळेस माझा म्हणजे मोठ्ठा आ वासला गेला.
विशाल टास्क मधे लायली खेळला एवढ्या एकाच गोश्टीसाठि त्याला सरानी तिसरा नबर दिला नाहितर तो या विकमधे ३ नबर डिझर्व्ह करत नाही त्याने जे काय mudslingling केल ते अतिशय वाईट होत, चुगलिनतरही तो मीच कसा बरोबर हेच बोलत बसला होता.
याबाबतित जय-उत्कर्ष शहाणे ठरतात कारण तुम्ही बोललेल उघड पडल्यावर गुपचुप किवा हसुन मान्य कराव आणी गप्प बसाव हेच शहाणपणाच ठरत जितक तुम्ही ते जस्टीफाय कराल तितक ते अजुनच ठ्ळक होत.
विशालने एवढी बडबड केल्यावर सोनालीत चिमुटभर जरी शहाणपणा असता तर तिने सॉरी सर परत अस होणार नाही मी फक्त खेळावर फोकस करेल, माझा उद्देश तसा नव्हता पण तस प्रोजेक्ट झाल असेल तर मी सगळ्याना सॉरि म्हणते, विषय सम्पतो पण सोनालीची ती कुवतच नाही ते तर सोडा ती सतत मधेमधे बोलत होती ,ममा आधिच तापट त्यात ही त्याना भाण्डवल देतेय.

गायत्री ज्यावेळेस म्हटली की मला पण सेल्फरिस्पेक्ट आहे त्यावेळेस माझा म्हणजे मोठ्ठा आ वासला गेला. >>> हाहाहा.

विशाल आणि ममाने पर्सनल मॅटर फारच ताणल. विशालने तर सोनालीच कॅरेक्टर शेमिन्गच केल जे त्याने करायला नको होत.

सोनाली खरच मूर्ख वाटत होती. जाईल ती लवकरच.
आधी मीरा स्पेस मागत होती गादा ला, आता स्वतःच एकटी पडलीय. विकास बरोबर बोलला सोनाली ला ती ऐकूनच घेत नाही,असंबद्ध बडबड करते. विशाल ला नाही जिंकवायच आहे बिबाॅ ला.

ती खूप किरकिर करते. तुला बोलायला वेगळा वेळ देतो असे सांगितले तरी दुसरा बोलत असताना मधेच बोलत होती तेही>>>
हो. ते बरोबर. पण नंतर आत जाऊन ती रडली म्हणून पण किती बोलले!! एवढं झाल्यावर रडू येणं (तिची चूक असली तरीही) साहजिकच आहे. रडायचं नाही, कॅमेरा बघून बोलायचं नाही, सिम्पथी मिळवू नकोस वगैरे ते चूक वाटलं मला तरी. तिलाही आपली बाजू मांडता आली नाही. 'विशाल चूकीचा' हे सांगण्यापेक्षा आपली चूक नाही किंवा झाली असल्यास सॉरी एवढं पुरेसं झालं असतं.
विकास आणि मिनललापण विशाल बोलला ते आवडत नव्हतं हे दिसून आलं.
या सगळ्यात विशाल फार वाईट दिसलाय, सोनाली ला सिम्पथी मिळतेय आणि विकास मिनलचे कौतुक होते आहे सोमिवर.

गायत्री ज्यावेळेस म्हटली की मला पण सेल्फरिस्पेक्ट आहे त्यावेळेस माझा म्हणजे मोठ्ठा आ वासला गेला. >>>
अगदी. Lol

मीरा आणि गायत्रीला फक्त एक मेकींसमोर सेल्फ रिस्पेक्ट आहे.

सोनालीने तिच्या मूर्खपणामुळे विशाललाही खाली खेचलंय. विशाल स्वतःला उच्च , तत्त्वनिष्ठ सिद्ध करण्याच्या नादात वाहावत गेलाय.

यांच्या तमाशात ए टीमला मजा आली असेल. पण त्यांच्या तशा रिअ‍ॅक्शन्स दाखवल्या नाहीत. की तेही शॉकमध्ये होते?

मांजरेकरांना कोणाची जोडी दिसली की ते ताणत सुटतात. आधी जय स्नेहा, मग काल जय उत्कर्ष. काल विशाल आणि सोनालीचं तर एवढं मायक्रो अ‍ॅनालिसिस केलं की त्यांना बाहेरही एकमेकांशी बोलावंसं वाटणार नाही. या आठवड्यात सोनाली गेली तर ऑकवर्डनेस जरा कमी होईल.

विशाल स्वतःला उच्च , तत्त्वनिष्ठ सिद्ध करण्याच्या नादात वाहावत गेलाय... तो आई कुठे काय करते ही सिरियल दिवसातून तीनदा बघत असेल Lol
मीनलला द्या ट्रॉफी आणि वेळ वाचवा सगळ्यांचा.

मला वाटते वय हा फॅक्टर बघितला तर हे सगळे यंग लोक बावळट सारखी बडबड करत सुटतात. अपवाद मिनल.
त्यांना कळतच नसेल आपण बालिश आणि मूर्खपणा करतोय.
सगळे 35+ लवकर आवरते घेत होते. अगदी स्नेहा सुध्दा हसत हसत विषय बंद करायची.

सगळे 35+ लवकर आवरते घेत होते.>> सोनाली 34 ची आहे.. वय हा मुद्दा नसुन मेच्योरिटी चा आहे... काल तिला काय म्हणायचं आहे तिला नीट सांगताच आलं नाही .ऊगीच फाफट पसारा करत बसली... विशाल ला पण आपली बाजू सान्गतना एवढे डिटेल मध्ये सांगायची गरज़ नव्हती.. मोघम सांगून पण जमल असत..जे विकास ला तिच्या लग्ना बद्दल विचारल्यावर त्याने केल.. एवढ्या दिवसात विकास कडून कसं बोलाव हे तरी शिकले असते हे दोघ तरी आयुष्यभर उपयोगी आलं असत..

अजुन एक चांगल विश्लेशण:
50 शेड्स ऑफ ग्रे!!

दोन दिवसांपूर्वी मी लिहिलं होतं 'इंडिव्हिज्युअलीटी' जी गेले ५०-६० दिवस मिसिंग होती ती आता दिसायला लागलीय. ग्रुप फुटणे, नवीन ग्रुप बनणे, समोरच्याला वापरून फेकून देणे, प्रामाणिकपणाचा आव आणणे, एकमेकांच्या डोक्यावर पाय देऊन पुढे जाणे ह्या सगळ्या गोष्टी आता बहरतायत!! आजच्या चावडीने त्यावर शिक्कामोर्तब केला. वैयक्तिक गोष्टी ह्या वैयक्तिकच ठेवाव्यात, स्वतःच्या जखमा असो, सिक्रेट्स असो यु मस्ट किप इट ब्लाइंड फोल्ड, त्या ओपन केल्या तर कावळे, गिधाडं ही चोचीच मारणार!! मागच्या सिझनला वीणा-शिवानीमध्ये तेच झालं, अर्थात थोडं सौम्य प्रकारे ह्या सिझनमध्ये तेच विशाल-सोनाली मध्ये झालं अर्थात थोड्या अधिक प्रमाणात!! मानसशास्त्रात एक टर्म आहे त्याला म्हणतात ‘Exhibitionistic Disorder’ किंवा प्रदर्शनात्मक विकार!! एखाद्याला सेक्स्युअली किंवा इमोशली एक्सपोज किंवा उघडे पाडणे!! त्याचाच सौम्य प्रकार दिसला आज चावडीवर!!

ग्रे रंगातही शेड्स असतात, त्या छटा उठून दिसल्या तर मजा येते, नाही दिसल्या तर कधीकधी त्या एकतर बीभत्स किंवा मग चीप वाटु शकतात. आज ज्याप्रकारे विशाल-सोनाली एकमेकांवर तुटून पडले होते, आणि प्रतिस्पर्ध्यांवर लिटरली चोचा मारत होते ते एका लेव्हलनंतर चीप वाटु लागलं. दोन्ही बाजुने बरं का, विशाल म्हणजे तर त्याला एखादी मुलगी कधी लाईन देतेय, जवळीक साधतेय आणि कधी मित्र म्हणून वागवतेय ह्याचं बेसिक प्रशिक्षण द्यावं लागतंय की काय असं वाटत होतं, आणि सोनाली बद्दल काय बोलणार (boyfriend म्हणजे बॉय असलेला फ्रेंड) ह्या अशा अत्यंत वाईट्ट प्रकारे कसं एक्सपोज होऊ नये हे कुणाला दाखवायचं असेल तर सोनालीकडे बोट दाखवुन आजची चावडी दाखवायची. बरं ही दोघे ग्रे शेड्स नव्हतीच मुळी, ह्यात ग्रे शेड होता विकास!! त्याने सोनाली आणि विशालमध्ये भावनिक इमोशनच्या देवाणघेवाणीचा जो खेळ खेळलाय ना अहाहा त्याला तोड नाही!! मस्तच बरोब्बर पर्फेक्ट बोल्ट कसलेय त्याने, संपूर्ण आठवडा त्याच्यावरचा 'प्रोडक्टीव्ह फोकस' ढळु दिला नाहीय पट्ठ्याने ज्याचं रिफ्लेक्शन चावडीत बरोब्बर दिसलं!! बँग ऑन!! ऑल क्रेडिट गोज टू हिम, आणि गंम्मत म्हणजे विशाल, सोनालीला अजुन कळलंही नाहीय नेमकं डॅमेज कुठं झालंय ते!!

एक दोन गोष्टी ज्या मिसिंग आऊट होत्या त्या सांगतो एक म्हणजे गायत्री आऊटरेजियसली बायस्ड होती एस्पेशली माशांच्या टास्कमध्ये, संचालक असुनसुद्धा पैसे स्वतःकडे लपवून, त्यावर मांजरेकर बोलले नाहीत, दुसरं मांजरेकर ह्यांचा आजचा एकूण वावर आणि काही शब्द प्रयोग हे नक्कीच खटकणारे जसे की "नाही गं उलट मी गायत्रीची 'ठासली' तिथे" स्त्री दाक्षिण्य वगैरे धडे देणाऱ्या मांजरेकरांनी असले शब्द टाळावेत, काही लोकांना हे अपिलिंग वाटु शकतात पण सगळ्यांनाच पचतील असे नाही, माझ्या घरातल्या स्त्रियांनी आज आ वासला होता त्यांच्या ठासली शब्दावर!! असो... एकूण काय वैयक्तिक गोष्टी, विक पॉईंट्स, जमाखर्च बिग बॉसच्या घरात शेयर करणार असाल तर चोचा मारल्या जातील ह्याची तयारी ठेवा उगा वुमन कार्ड, इमोशनल फूल कार्ड वापरू नका, आणि एकमेकांवर वार करायचेच असतील तर स्वतःच्याच तलवारीच्या पातीने स्वतःलाच लागुन घेऊन जखमी होऊ नका, इट्स कृशअल टाईम नाऊ, थंड डोकं वापरा आणि ग्रे शेडमधील उठून दिसणारी एखादी शेड वापरा ज्याने किमान प्रेक्षकांच्या मनातून उतरणार नाही कारण शेवटी तोच मायबाप असतो सो नो वन शुड डोन्ट टेक हिम फॉर ग्रांटेड जसा तो डोक्यावर बसवतो, मतं देऊन सतत टॉपवर ठेवतो तसाच तो मतं न देता जमिनीवर देखील पटकु शकतो!!

#बिग_बॉस_मराठी_सिझन_३ #चावडी #विशाल_सोनाली

प्रसाद देशपांडे

काही पोस्टमध्ये दिसल की विकास ने कान भरले दोघांचे..मग मी म्हणेन विकास मानसशास्त्रा चे धडे घेउन आलाय किंवा ते त्याला उपजत आहे.. मग मान्य करुया की त्याला हे जमत मग तो बिग बॉस चा खेळ जिंकायला पात्र आहे..बाकी हलक्या कानाचे इन्फ्लएंज़र या गेम मध्ये हरलेत..हाच तर खरा गेम आहे.. बाकी शक्ती प्रदर्शन मिथ्या आहे इथे..

Pages