मराठी बिग बॉस पर्व तिसरे- २

Submitted by सूलू_८२ on 20 November, 2021 - 17:33

फायनलला थोडेच आठवडे उरले आहेत. स्पर्धा चुरशीची चालू आहे.

सो, हा आहे दुसरा धागा.

चला, चर्चा करुया!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजची चावडी आवडली. क्रम बदलून आतल्या लोकांना कन्फर्म काही कळु नाही दिले हे योग्य केले.
गायत्रीने जे लुक्स दिले ते बघता तिला काही फरकच नाही पडला असे वाटले.
विशाल आज नाही आवडला. ममा त्याला सांगत एक होते आणि हा मात्र मी प्रामाणिक आहे फेअर खेळतो हिच कॅसेट रिप्ले करत होता. फार इरिटेटिंग झाले ते. मी नक्की विचार करेल असे बोलून गप्प बसला असता तर जास्त चांगले दिसले असते. त्याच्या मनात स्नेहा साठी सॉफ्टकॉर्नर आहे असे प्रोजेक्ट होत आहे हे त्याला कळत नव्हते.
सोनालीने जयची नको ती तक्रार करुन सेल्फ गोल केला. तोंडावर आपटली.
विकासने पटकन सॉरी म्हणून , त्याला बसणारा मार निम्म्याहून कमी केला.

मास्तराने पोरांना किती ओरडायचं याच एक लिमिट असतं. त्या लिमिटच्या बाहेर ओरडलं की मास्तराची दया यायला लागते. असं वाटतं हा मास्तर स्वतःलाच त्रास करून घेतोय. पोरांना काहीही फरक पडत नाही. आम्ही नववीत असताना एका सरांकडे क्लासला जायचो ते असेच हायपर व्हायचे. एकदा क्लास घेता घेता एव्हडे हायपर झाले की स्वतःच्याच घरातून रागाने बाहेर गेले. काल ममांना बघून तो प्रसंग आठवला मला.

स्नेहा वाघ एलिमीनेट झाली अशी इंस्टा वर बातमी फिरतेय.
असं झालं तर आज मी एपिसोड नंतर आईस्क्रीम खाऊन तोंड गोड करणार Happy

अ‍ॅक्टरायडर वाला मन्दार म्हणतोय ९०% खात्रिने स्नेहाच गेली आहे.
दादुस कसले लकी आहेत त्याना सेफ करणारी,त्याच्यासाठी भान्डण करणारी मन्डळी आहेत जी हे सेफ व्हाबेत म्हणून सगळे प्लॅन करतात.
याना काहि एफर्ट घ्यावेच लागत नाहीत.

काल विशाल जरा अरोगंटली ममांशी बोलत होता ,अस वाटल.
सरळ सॉरी म्हणायच आणि गप्प बसायच.
ममांनी दहावा नंबर दिला आणि विकास, मीनल आणि सोनालीला आधीचे नंबर दिले म्हणून त्याचा इगो हर्ट झाला आहे अस वाटल.
असाच वागत राहिला तर ट्रॉफी पासून दूर जाईल.
कारण सोमिवर त्याच्याच बर्याच फँन्सना कालच त्याच वागण पटलेल पण नाही आणि आवडलेलही नाही.

मी आत्ता बघितला कालचा एपिसोड, योग्य सांगितलं सर्वांना. विशाल त्या स्नेहाला भुलतो, ती रिस्पेक्ट देत असेल पण चॅप्टर आहे. ती गेली असेल तर बरं नाहीतर जय विशाल तिच्यामागे.

विशालला फार लागलं सर्व. सोनाली जरा आगाऊपणे बोलते त्याच्याशी पण त्याने रिस्पेक्ट द्यायला हवा, सोना मोनाला. याने तोच उठून दिसेल.

सरळ सॉरी म्हणायच आणि गप्प बसायच. >>> अगदी अगदी.

जयला चांगलं सांगितलं, जाम कौतुक केलं. तो वागला असेल तसा गेल्या आठवड्यात तर कौतुक योग्य. गा दा ला वाटतंय आपण सेफ, पण तिला मुद्दाम केलंय, बघुया सर्व कळून ती पॉझिटीव्ह होते का. मीरा नेहेमीच बोलणी खाते, एरवी उगाचच पण यावेळी योग्य होते म मां.

विकास खरा मास्टरमाईंड आहे हे माझे म्हणणे तो वारंवार सिद्ध करतोय.
मीनल खरेच खुप हुशार, चतुर मुलगी आहे. स्नेहा तिला कॅप्टनशिपसाठी कन्व्हिन्स करायला गेली होती तेव्हा तिने खुप जबरदस्त डाव खेळला. गायत्रीला कॅप्टनशिपची उमेदवारी मिळण्यासाठी स्नेहाने मत का दिले असे तिने विचारले. स्नेहा उत्तर देत असताना तिने परत विचारले, नाही, गायत्री कॅप्टनशिपसाठी तुला का पात्र वाटत होती ते सांग. कडक!

अरे वा मीनल लय भारी.

विकासला एक नं दिला यावेळी, मास्टरमाईंड आहेच तो.

पहीले तीन दोन वि आणि मीनल हवेत खरंतर, मीनल दुसरी हवीच. पहीला विशालच येईल.

विशालचं चुकलंय असं मला वाटत नाही. सोनाली सतत कचकच करत असते. यापूर्वी तो तिच्या बाजूने बोलत असे तेव्हाही तक्रार करत असे.
स्नेहा शिक्षेसाठी नाव सांगायला वेळ घेत होती तेव्हा सोनाली किती बोलत होती. सगळे सांगताहेत की जरा गप्प बस तर थांबेच ना. या चारही मुलींना आपण आधी गप्प बसलो तर आपला पराभव वाटतो.
हल्ली तर टीम बी मधल्या चौघांचीही आपसात धुसफूस असते.

मीनलपण कधी कधी सुरू झाली की थांबत नाही. विशाल मीनलला बोलला ते व्हा तो संचालक होता ना? त्याही भूमिकेतून त्याचं बरोबर होतं.

गेल्या सीझनमध्ये वीणा आपल्या टीममेट्सचं पटलं नाही, तर तिथेच सांगायची. त्यात साथ द्यायची नाही. तिचे तर कौतुक होत असे.

>>काल विशाल जरा अरोगंटली ममांशी बोलत होता

काल सगळेच नेहमीपेक्षा जरा जास्त ॲग्रेसीव्ह वाटत होते (विकास सोडून).... उत्कर्षने पण दोनतीनदा काउंटर अर्ग्युमेंट केले..... मीरा नेहमीसारखीच डिनायल मोड मध्ये होती!!
ममांपण डायरी घेउन यायला लागल्यापासून त्यातली उस्फुर्तता गेलीय!!

सोनाली विशालबद्दल बरोबर बोलली होती.... हा राजा हरिश्चंद्र आपल्यात नको म्हणून..... शेवटचे तीन चार लोक राहतील तोपर्यंत आपल्या ग्रूपबद्दल लॉयल रहावे लागते.... नंतर खेळ म्हणाव काय एकटे एकटे खेळायचे ते!!

या आठवड्यात मी सगळे एपिसोड पाहिले नाही पण कालचा पहिला त्यावरून विशाल चुकीचा नाही वाटला...ममांनी मीनलला जे सांगितले त्यासाठीच विशाल तिला बोलला असेल तर त्याचं काय चुकलं? एकीकडे म्हणतात individual game खेळा ,fair खेळा. अन् दुसरीकडे म्हणतात ग्रुपला चिकटून रहा..काहीही...मला तरी विशाल correct वाटला.योग्य बोलून तो त्याची बाजू पटवून देत होता त्यात तो चुकला असे अज्जिबातच नाही वाटले. नंतर विकासशी बोलताना तर अगदी detail बोलला.

चावडिवर विकास कधिही लटके एक्स्प्लेनेशन द्द्यायला जात नाही,सॉरी म्हणतो आणी गप्प बसतो.काल विशालला जे सर सान्गत होते ते तो नेमक उलट्या पद्ध्तिने घेत होता. ग्रुप मधे कुणाच चुकल तर मि सान्गणारच म्हणे पण हे ठरवणारा हा कोण? याच चुकल आणी याला सान्गितल तर त्याला पटत का? विशाल मिनल-सोनालीला खुप स्नॅप करतो. एकदम फटकन काहीही बोलतो ,कबुल आहे की सोनाली फार बडबड करते काहिवेळा अगदी इरीटेतिन्ग वाटेल इतकी बडबड करते तरी एकदम स्नॅप करण बरोबर नाही.तेवढच सरानी सान्गितलय.
स्नेहा काकु गेल्यावर कुणी फार रीअ‍ॅ़क्ट झाल नाही, दादुसला सेफ करुन मिरा-स्नेहा मधे सरानी शेवटी निकाल दिलाय.

गेल्या का काकु खरंच. आज एक सुदिन माझ्यासाठी.

गा दा जाईल तो दुसरा सुदिन. तो यायला वेळ लागेल.

काकुच्या घरच्यांना हुश्श झालं असेल, काय काय बघायला लागेल अजून या चिंतेत राहीले असते नाहीतर.

स्नेहाला मेघापण तासेल. कमेंटस वाचल्या पाहीजेत स्नेहाने.

बिग बॉसने मीरा गा दा मधे मस्त काडी टाकली. गा दा ला वाटेल आता मीरा शेवटी. मीराला वाटेल अरे आपला अंदाज चुकला.

प्राजक्ता+1000
तो त्यांना अपमानास्पद पध्दतीने वागवतो ते प्रेक्षकांना बरोबर दिसत नाही हा साधा फीडबॅक त्याला ईतका का लागला?
आणि सोनाली कोणाला इरिटेट नाही करत? विकास कधीही तिला हाडत हुडत करताना दिसत नाही. अति चांगले दिसण्याच्या नादात तो मागे पडु शकतो. सगळे प्रेक्षक त्याचे पर्सनल व्होटस नाहीत, एक मेजर चंक ग्रुपचे फॅन्स असतात इनडिव्हिज्युलसचे नाही.
त्यालाही जय सारखा माज असणारे माझ्या शिवाय फिजिकल टास्क हे लोक खेळु शकत नाही. बोलत नसेल ईतकेच.
स्नेहा घराबाहेर आली आणि मस्त वाटली. मीरा पेक्षा जास्त ग्रेसफुल दिसत होती रिझल्ट ऐकताना. आय विश तीने हा डेकोरम आतमध्ये मेंटेन केला असता.

विकासला जयबरोबर खलनायक किताब का दिला (युट्युबवर समजलं). उत्क्या हवा होताना जयबरोबर.

विशाल टीमबरोबर रहाणार नाही म्हणतोय, ते चुक आहेना. मीनलने मागे त्याला सेव्ह केलं होतं. विकासने परफेक्ट सल्ला दिलेला हेअरकटचा. याचा फायदा गा दा, मीरा वगैरे घेऊ शकतात.

विकासला जयबरोबर खलनायक किताब का दिला (युट्युबवर समजलं). उत्क्या हवा होताना जयबरोबर.>>रविवारी टास्क खेळतात त्यात होत ते!
फार काही सिरियस नाही.काल्च्या चावडिनतर उत्क्याला विकासचा गेम कळला त्यामुळे आपण नाहितर कुणीतरी दुसराच मास्टरमाइन्ड आहे हे त्याला कळुन चुकल.खलनायक म्हणजे सुमडीत प्लॅन करणारा या अर्थाने.
सेल्समनच्या टास्क मधे बेस्ट उत्कर्श होता, तो खरच टॅलेन्टेड आहे पण माचिस बनुन ,जयच्या सावलित खेळुन त्याने स्वतःची वाट लावलिये .विकासने सेल्समनच्या टास्क मधे विशालला शभर नबरी सोन म्हटल,भारी होती ती मोमेन्ट, गेम असेल तर ग्रेट मुव्ह बाय विकास, जेन्युइअन असेल तर सॅल्युट त्याला.
जयला उचकवुन विकासने हे घडवुन आणल वैगरे सान्गितलेले विकासला पटल नव्हत, मधे ब्रेक मधे मिनल बोलत होती की परफेक्ट सान्गतात सर त्यावर तो हसत हसत " जरा जास्त सान्गतात त्याना( टिम ए ला )" त्याचा म्हणजे गेमच फोडून टाकला सरानी

हो उत्क्या ते दुधाणे जॅकेट मस्त विकत होता, एक नंबर. बघितला तो सीन.

विकासचं नाही बघितलं, बघायला हव. वरचा प्रोमो वेगळा होता, म्हणून दिसला.

खलनायक म्हणजे सुमडीत प्लॅन करणारा या अर्थाने. >>> अच्छा असं होय.

विशालने जे विकासला स्पष्टीकरण दिले ते तो म मां ना पण देऊ शकत होता. स्नेहाशी आदबीने आणि सोना मोनाशी अरेरावीने का बोलावं लागतं. त्याग करायची वेळ आली तर सोना मोनाच करतात विशालसाठी. अर्थात सोना अति किरकिर करते हे मलाही वाटतं, हेच तो सर्वांसमोर सांगू शकत होता.

बाकी स्नेहा आदबीने बोलत असेल त्याच्याशी तरी ती स्वार्थी आहे, हे त्याला समजलं नाही.

सुलू धागा काढल्याबद्दल धन्यवाद. पर्व ३ चालू आहे, तेवढा बदल करा फक्त. >>>>>>>> धन्स रेवा. मराठी बिग बॉस पर्व तिसरे- धागा क्रमान्क २ असे आहे ते.

हो उत्क्या ते दुधाणे जॅकेट मस्त विकत होता, एक नंबर. बघितला तो सीन. >>>>>>>>> +++++++११११११११

गायत्री- दादूस सहाय्यक अभिनेते- अभिनेत्री भारी होत हे! आणि हे मुर्खासारखे थॅन्कयु स्पीच देत होते. उपहास कळला नाही का त्यान्ना?

खलनायक म्हणजे सुमडीत प्लॅन करणारा या अर्थाने. >>> येस्स. विकासच्या डोक्यात सतत काही ना काही चालू असतो. सतत विचार करत बसलेला असतो. निरिक्षणशक्ती जबरी आहे त्याची. कोल्ड ब्लडेड गेम आहे त्याचा.

विकासने सेल्समनच्या टास्क मधे विशालला शभर नबरी सोन म्हटल, >>>>>>>>>> हो. त्याने दादूसला इनडायरेक्टली टोमणा मारला, ' नुसत अन्गावर सोन मिरवल म्हणजे तो माणूस शम्भर नम्बरी सोन नसतो.' कॅमेरा दादूसवर शिफ्ट झालेला तेव्हा.

बिग बॉसने मीरा गा दा मधे मस्त काडी टाकली. >>>>>>> काही उपयोग नाही झाला. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. ब्रेकमध्ये वॉशरुममध्ये टिम ए बरोबर बसली होती.

आर्या, तुमचे डान्स मस्त आहेत हो!

नेक्स्ट चावडीला सरप्राईज गेस्ट सलमान खान असेल.

सलमान कशाला येतोय, त्याला काहीही माहिती नसते मराठी bb चे. तो बोअर झालेला असतो येऊन, फार काही उत्स्फूर्त बोलत नाही आणि सगळेजण वॉव सलमान, भारी अस करतात.

त्या म मां नी तिकडे छान केलं anchoring, एक प्रोमो बघितला पण हा सलमान काही करेल असं वाटत नाही.

श्रेया बुगडे येणार आहे का वाइल्ड कार्ड म्हणून, कुठेतरी बघितलं. ती तिकडे झी मराठीवर फेमस आहे, ते सोडून येईल का.

काही उपयोग नाही झाला. पुन्हा ये रे माझ्या मागल्या. ब्रेकमध्ये वॉशरुममध्ये टिम ए बरोबर बसली होती. >>> हाहाहा. आता दादुस आणि त्यानंतर गा दा जायला हवी.

आता उत्कर्षच्या राजकारणी, अतरंगी डोक्याची खरी कसोटी:

१. तो आणि गायत्री या आठवड्यात सेफ आहेत. म्हणजे उरलेल्यांपैकी कोणी एक जाणार.
२. उत्कर्ष जीव तोडून प्रयत्न करेल की दादूस वाचावा. वाटल्यास हेच तो गायत्रीला पटवून देईल.
३. जर दादूस या आठवड्यात वाचला तर पुढच्या आठवड्यात जेव्हा उत्कर्ष नॉमिनेट होऊ शकेल तेव्हा दादूसला नॉमिनेट होऊ देईल तो.
४. गायत्री आणखी एका आठवड्याची सोय. नंतर मीरा.
५. गेम व्यवस्थित खेळले तर एकेक स्ट्राँग स्पर्धक कमी करत आरामात पहिल्या पाचात जाऊ शकतो तो.

ती सारंगी जाताना रडू नका म्हणून सांगत होती पण कोणीच रडत नव्हतं. फक्त दादूसचे डोळे किंचितसे ओले दिसत होते. (तसेही ते कायमच ओले दिसतात. त्यांना काहीही बोलले तरी त्यांचे डोळे ओलसर होतात).

मिरा-गायत्री सॉलिड खूष असतील सारंगी गेल्यामुळे.... आता त्या जयवर हक्क गाजवतील.

उत्कर्ष किंवा दुसर्‍या कुणीही दादुसच्या नादी लागु नये. त्याचे स्वतचे व्होटस आहेत. ग्र्रुपचे फॅन फॉलोइंग त्याला मिळत नाही. कारण तो ए टीमचा कोअर मेंबर कधीच नव्हता. त्यामुळे तो नॉमिनेशनला बरोबर असेल तर आपण वाचु शकतो ह्या भ्रमात कुणीही राहु नये. गायत्री,सोनाली,मीरा,उत्कर्ष हे एकाच पातळीवर आहेत. कुणीही उडु शकते.

Pages