व्यसन आणि मुक्ती : अनुभव

Submitted by DJ....... on 4 October, 2021 - 07:53

माणसाला जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टिंचं व्यसन हे असतंच. एखाद्याला वाचनाचं, लिहिण्याचं, गाण्याचं, खाण्याचं, खाऊ घालण्याचं, खरेदीचं, हॉटेलिंगचं, सहलीचं, वाहन वेगाने चालवण्याचं, जीमचं व्यसन लागतं.. तर एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागतं.

वाचण्याचं, लिहिण्याचं, गाण्याचं व्यसन लागलं तर शारिरीक तोटा होत नाही... त्यामुळे या कॅटेगरीतील व्यसनं लागलेली माणसं प्रतिभासंपन्न होत जातात असा माझा तरी समज.

खाण्याचं, खाऊ घालण्याचं, हॉटेलिंगचं व्यसन लागलं तर जीभ आणि मन अत्यंत आनंदी होतं परंतू खिसा रिकामा होऊ लागतो अन योग्य व्यायाम न केल्यास वजन किलो-किलोने वाढण्याची तसेच आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते असं मला वाटतं.

सहलीचं व्यसन लागलं तर मन आनंदित, प्रफुल्लीत होतं परंतू खिशाला चाट बसू लागते हे माझे मत.

वेगाने वाहन चालवण्याचं व्यसन लागलं तर अपघात होण्याची, कोर्टकचेर्‍या अन दवाखाने मागे लागण्याची शक्यता अधिक बळावते असा माझा तर्क.

तरिही वर उल्लेख केलेली काही व्यसने प्रत्येकात थोड्याफार फरकाने असतातच.. त्याने घरातल्यांच्या कपाळावर निदान आठ्या तरी पडत नाहीत.

परंतु एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर मात्र तो घरच्यांच्या तसे समाजाच्या नजरेत उतरू लागतो. समाज त्यांना चांगलं समजत नाही असे आजुबाजुचे काही अनुभव बघितल्यावर लक्षात आलं (कदाचित मध्यम वर्गीय मानसिकतेच्या वस्तीत राहिल्यामुळे हे अनुभव आलेले असू शकतात****)

एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर शरिराची हानी तर होतेच वर भरपूर पैसाही त्यात वाया जातो.

-----------------------------------------------
मला स्वतःला एका टॉफीचं भयंकर व्यसन लागलेलं अजुनही स्मरतंय. ४ वर्षांपुर्वीची गोष्ट. मला ऑफिसने क्लएंट लोकेशनवरील एका प्रोजेक्टसाठी क्लाएंट ऑफिसमधे पाठवलं. तिथं आमच्या कंपनीतील इतरही कलिग् माझ्या आधीपासून कामं करायचे. त्यातल्या काहींना सिगारेटचं भयंकर व्यसन. दिवस्भरात ते कमीतकमी ८-१० सिगारेट्स ओढायचे अन त्यांच्या सोबतीला आम्हाला नुसते बोलायला/चहा प्यायला घेउन जायचे. ऑफिस मधे जवळ जवळ ६-७ हजार एम्प्लोयी असतील. ६ व्या मजल्यावर प्रशस्त कॅटीन अन तिथेच एका बाजुला भव्य गॅलरी मधे सिगारेटचं आउटलेट. शेजारीच चहाचं आउटलेट. मी त्यांच्यासोबत जाऊन कधीतरी चहा घ्यायचो परंतु एकदा एकाने मला पल्स नावाची कँडी दिली. त्या आधी मी कधीही ती कँडी खाल्ली नव्हती. पहिल्यांदा चव घेतली तर मला ती आजिबात आवडली नाही.. पण दुसर्‍याने दिलेली कँडी अशी फेकुन तरी कशी द्यायची ना? त्याला वाईट वाटेल म्हणुन मी ती तशीच अनिच्छेने चघळत राहिलो एका क्षणी त्या गोडसर कँडीतून चटकदार तिखट्+खारट्+आंबट्+तुरट अशा चविंचं भन्नाट मिश्रण जिभेवर पसरलं अन मी अंतर्बाह्य शहारून गेलो. मला खुप भारी काहीतरी वाटलं. त्या आधी मी कधीही अशा चवीची भन्नाट कँडी कधीही खाल्ली नव्हती. झालं.. मी पुन्हा एकदा नाव विचारून घेतलं. घरी जाताना काही कारण नसताना सिगारेट ऑटलेटवर गेलो अन ५ रुपयांच्या ५ पल्स कँडी खरेदी केल्या. बस मधे बसल्यावर घर येईपर्यंत २ संपवल्या. उरलेल्या बायको अन मुलांना दिल्या.
तो पहिला दिवस.
त्यानंटर मी रोज सिगारेट आउटलेटवर जाऊन तीच कँडी घेऊ लागलो. रोज १० रुपयांच्या दहा कँडीज घेऊन जेवणाच्या आधी २.. जेवल्या नंतर २.. बस मधून घरी जाईपर्यंत २ अन घरी गेल्यावर रात्रीच्या जेवणानंतर सर्वांसोबत १ असं करु लागलो. त्या कँडीला गिर्हाईकही फार. कधी कधी ती त्या सिगारेट ऑटलेटवर मिळायचीच नाही. मग ऑफिसमधून मेनगेट मधून तंगडतोड करत रोड साईड टपर्‍या धुंडाळात फिरायचो. २-३ महिन्यापर्यंत हे व्यसनच लागलं. शनिवार-रविवार ऑफिसला सुट्टी म्हणुन शुक्रवारी २०-२५ रुपयांच्या कँडीज घेऊ लागलो. हे असं वाढत जाणारं व्यसन बघून घरातल्यांच्या भुवया वर जाऊ लागल्या अन माझी चूक मला उमजू लागली.

त्यानंतर मला कँडी खाण्याची सवय सोडण्यासाठी खूप मनोनिग्रह करावा लागला. इतका की मी कँटीन मधे जेवायला जाणंच बंद केलं. पँट्रीत एक-दोन मित्रांसोबत जेवण करू लागलो. प्रसंगी एकटाच जेवत राहिलो परंतु दीड-दोन महिने कँटीन कडे फिरकलोच नाही. त्यामुळे कॅंडीज घेताच आल्या नाहीत. नेमकं मूळ कंपनीने मूळ ऑफिसला दुसर्‍या एका प्रोजेक्टसाठी परत बोलावल्याने थोडा ब्रेक मिळाला. या परिस्थितीचा फायदा घेत मी त्या तसल्या चंट कँडीच्या व्यसनातून मुक्त झालो. आता आठवलं तरी हसु येतं. Bw
------------------------

तुम्हाला कधी कोणते व्यसन लागले आहे का..? त्यावर कशी मात केली..??

Group content visibility: 
Use group defaults

एक माऊली आपल्या चिरंजीव खत नाहीत म्हणून मँगोला मध्ये भाकरी बुडवून चारताना पाहिले आहे
>>>>

मला एक कळत नाहीये, जर हा धागा व्यसनमुक्तीचा आहे. जिथे दारू सिगारेट सोडणारे आपला अनुभव लिहीत आहेत. तर तिथे प्रमाणात दारू पिणे काही वाईट नाही हे दाखवायचा अट्टाहास का? आणि त्यापेक्षा डेंजर लहान मुलांनी मॅंगोलात भाकरी बुडवून खाणे आहे हे ईथे कश्याला?

मी याला कमी महत्वाचे नाही म्हणणार पण हा स्वतंत्र धाग्याचा विषय नाही का वाटत?

जर या विषयावर स्वतंत्र धागा काढल्यावर यांनाही ऋन्मेषसारखे ऊठसूठ धागे काढायचे व्यसन लागले अश्या आरोपाची भिती वाटत असेल तर मी काढू का धागा? मला असले हजार आरोप मान्य आहेत. तिथे तुम्ही लिहू शकता.

नक्कीच.यात वादच नाही.(हे लिहीपर्यंत मध्ये एक प्रतिसाद आला हे उत्तर आशुचॅम्प ला आहे.)
मुद्दा हा होता अडी अडचणीला चालावे.आणि त्यावर योग्य लिमिट असाव्या.

हा धागा विविध प्रकारच्या व्यसनांसाठी काढला होता.. फक्त दारू-सिगारेट साठी नाही. आपणाला अचानक कुठलीतरी सवय लागते जी तेंव्हा आपणाला कळतही नाही परंतू त्या सवयीचं रुपांतर व्यसनात होतं तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण व्यसनाच्या आहारी गेलेलो आहोत. त्या क्षणी काहीतरी उपाय करून आपण ती लागलेली व्यसनं कशा प्रकारे सोडवली यावर चर्चा होण्यासाठी धागा काढला आहे. जेणेकरून इतरांना लक्षात येईल की कशा प्रकारची व्यसने लागू शकतात अन व्यसनांच्या आहारी असलो तर त्यातून बाहेर कसे पडु शकू.

सर्वांनीच आपापल्या परीने स्वतःछे अनुभव सांगितले... त्यातुन काही जणांना व्यसनमुक्त होण्यासाठी प्रेरणाही मिळाली असेल अशी आशा आहे. व्यसन कशाचेही लागु शकते त्यामुळे केवळ दारू-सिगारेट बद्दलच चर्चा व्हावी असा हेतू नव्हता अन नाही.

दारु, तंबाखू, यांना महत्व देतात पण चहा, कॉफी, साखर, इतर useless carbs यांचे अतिसेवन (=व्यसनासाठी गोड शब्द) धोकादायक आहेतच. उलट ही व्यसने लागण्यामागे अनेक वेळा घरच्यांचा हातभार असतो - लहानपणापासूनच्या खान्यापिण्याच्या सवयी वैगेरे. त्यामुळे लहानपणी आई देते त्या आणि नाही देत त्या गोष्टी हा काही differentiating parameter असू नये. आईवडलांना काळजी व प्रेम असतेच पण ज्ञान असतेच असे नाही. लहानपणापासून सकाळ संध्याकाळ भरपूर साखरेच्या चहात बेकरी products बुडवून खायची सवय असेल तर काय म्हणणार?
दुसरं म्हणजे "आमच्या मुलाला, मुलीला दारू तंबाखूची भारी आवड" अस कोणीही आईबाप म्हणणार नाहीत पण "आमच्या मुलाला मुलीला गोडाची फार आवड" हे कौतुकाने सांगतात. म्हणजे loss of self control दोन्हीकडे असेल तरी एकाला व्यसन म्हणून taboo तेच दुसऱ्या ठिकाणी "फार आवड" अशी समाजमान्यता मिळत रहाते. दुष्परिणाम दोघांचे होतातच की.  मग अश्या धाग्यांवर "दारू सिगारेट चे कौतुक आईबाप करत नाहीत, ते (जास्त) वाईट, इतर गोष्टी बुद्धिभेद आहेत" असले अर्गुमेंट करताना विचार केला पाहिजे.

इथे शेअर केलेली almost सगळे अनुभव substance abuse चे आहेत. या substance मधे पाटी पेन्सील, माती, इथपासून आयोडेक्स खाणे व हुंगणे ईत्यादी काहीही असू शकते. फक्त दारू तंबाखू एव्हढे च नाही. Most importantly, व्यसन म्हणजे फक्त substance abuse नाही. उदा-  जुगार, हस्तमैथुन, सेक्स, पोर्नोग्राफी यांची व्यसने असतात ती सुध्दा खूप serious असतात त्यात मानसिक, शारीरिक, आर्थिक ई सगळे नुकसान होते. या धाग्यावर असले अनुभव सुध्दा येऊ देत.

प्रचंड दारू पिण्याचे बरीच वर्षे व्यसन होते. ड्रिंक्स घेतलेल्या वेळी प्रमाणाबाहेर खाणे व्हायचे. रात्री कितीही पाणी प्यायले तरी लघवी होऊन निघून जायचे. पुन्हा मध्यरात्री किंवा पहाटे शरीरात पाणी कमी झाल्यामुळे जाग यायची. झोपमोड व्हायची. मग अतिरिक्त मद्यपान कमी केले. ड्रिंक्स घेतानाच वेळ सावकाश तिपटीने वाढवत नेला. खाणे देखील आपसूक कमी झाले आणि हळूहळू सगळाच प्रॉब्लेम गेला. दारूचे दुष्परिणाम इतर काहीही असतील किंवा नसतील मात्र खाण्या पिण्यावरील सेन्से्स हरविणे हेच जरा अधिक गंभीर वाटतात. या अनुभवाला व्यसनमुक्ती म्हणता येईल का? Proud

अजून एक. सगळ्या पफो'चे व्यसन सुटले केवळ माबो शिल्लक आहे. त्यावर काही उपाय? Wink

नाबूअबूनमा
एकझ्यातली, मला हेच म्हणायचं होतं
पण तो शेवटी धागविभू आहे, तो हरप्रकारे धागा त्याला हवा तिथेच नेणार
तुला काय आता चांदीच्या वाटीतून आमंत्रण हवंय का वेगळा धागा काढायला
काढ की बाबा, असेही पोत्याने धागे काढतोस त्यात अजून एक
त्यासाठी इतका मानभावीपणा कशाला

मुलांना दारू सिगरेट द्या पण गोड नको असे कोणी म्हणतंय का इथे
उगाच आपला टेम्भा सगळीकडे

सगळी व्यसनं प्रमाणाबाहेर डेंजरच.
बडीशेप चं पण ऐकलंय.
डोक्याला बाम/व्हीक्स लावल्या शिवाय झोप नाही हे पण.

हवाबाण हरडे नावाची पिवळ्या पाकीटात मिळणार्‍या पाचक गोळींचंही व्यसन लागेललं स्मरतंय... पण त्याचे भलतेच इफेक्ट जाणवायला लागल्याने ते व्यसन सुटलं..!

मुलांना दारू सिगरेट द्या पण गोड नको असे कोणी म्हणतंय का इथे
>>>>

असे तुम्ही म्हणताहात असे मी तरी कुठे म्हणालो आहे का? हे म्हणजे उगाच माझ्या पोस्टमधून आपल्याच मनाने निष्कर्श काढून मग तो चूक कसा हे दाखवणे झाले.

असो,
दारू प्रमाणात पिणे काही वाईट नाही. (मग ते प्रमाण कोणी ठरवायचे हा मुद्दा गौण) आणि अति प्रमाणात दही लोणी तूप साखर शेव फरसाण खारी बटर काहीही खाल्ले तरी ते घातकच. हा मुद्दा व्यसनमुक्तीच्या धाग्यावर घेऊन येणे हा एक बुद्धीभेद करायचाच प्रकार आहे. यावर मी ठाम आहे. तो कोणाच्याही हातून नकळत होऊ नये अशी माझी ईच्छा होती. सर्व प्रकारची व्यसने एकाच धाग्यात असण्याबाबत आधी हरकत नव्हतीच. पण याचमुळे अचानक दारूसिगारेट आणि ईतर खाद्यपदार्थांना एकाच तागडीत बसवून सो कॉल्ड प्रमाणातल्या दारूचे उदात्तीकरण सुरू होतेय असे वाटले म्हणून मग वेगळ्या धाग्याची विनंती केली होती. हि विनंती फेटाळली गेली तरी हरकत नाही. मी कोणावर काय लिहावे याची जबरदस्ती करू शकत नाही. पण व्यसनाच्या काठावर असलेल्यांना सावध करणे माझे कर्तव्य आहे. तुमचा एखादा मित्र अशी उदाहरणे देत तुम्हाला सो कॉल्ड प्रमाणातल्या दारूकडे वळवत असेल तर वेळीच टाळा.

साभार - https://www.facebook.com/tushar.natu.9
दारु अथवा मादक द्रव्ये प्रथमच सेवन केल्यावर वाटणारे हलकेपण, तणावमुक्ती, आत्मविश्वासाची भावना, उसने अवसान , धैर्य ..मनाचा मोकळेपणा हा सारा काही तासांचा अनुभव एकदा ब्रेन नावाच्या महा संगणकात सेव्ह झाला की..त्या अनुभवाची " मजा आली " नावाची फाईल तयार होते सेवन करणाऱ्या व्यक्तीच्या मनात ..मग आपोआप ही मजा पुन्हा पुन्हा मिळावी अशी ओढ जागृत होते ..
संयमी लोक स्वतःच्या ओढीला थांबवून ठेवु शकतात ..उतावळे व अती संवेदनशील अथवा मनस्वी लोक हा आनंद पुन्हा पुन्हा मिळावा म्हणून वेगाने व्यसनाच्या गुलामी कडे वाटचाल गुलामीकडे वाटचाल करतात व उध्वस्त होत जातात ..

छान पोस्ट सामो. दारू आणि सिगारेट या कुबड्या आहेत. त्यांची गरज पडू नये हे बघावे. चुकून कधी वापरल्यास त्या लवकरात लवकर फेकून कश्या देता येतील हे बघावे.

पण प्रत्येकाला त्याच्या/तिच्या नशीबावरती सोडून द्यावे. जोवर आपल्याला त्रास होत अनही तोवर कोणाला उपदेश करायला जाउ नये - हे माझे मत आहे. वरील फेसबुक पोस्ट आवडली म्हणुन शेअर केली. बाकी त्या पोस्टमुळे किं वा माझ्या शेअर करण्यामुळे कोणी दारु सोडतील या भ्रमात मी नाही. तशी त्यांनी सोडूदेखील नये. त्यांचा अनुभव त्यांचे आयुष्य.

प्रत्येका जगायचा व आपापले विष निवडायचा हक्क आहे.

सामो, छान माहिती आहे त्या पोस्ट मधे. सर्वांनाच उपयोगी पडेल.

मागे माझ्या एका मित्राच्या ८ वर्षं वयाच्या मुलाला व्हाईट इंक हुंगायचं व्यसन लागलं होतं... त्याला पार सायकेट्रीककडे पण नेलं होतं.. परंतू नंतर सगळं नॉर्मल झालं असं कळालं. व्हाईट इंक देखील व्यसन लाऊ शकते हे ऐकून कमाल वाटली.

येथील तमाम बंधू आणि भगिनींना मला एक प्रश्न विचारायचा आहे !
आपण दारू ,सिगारेटची किंवा इतर व्यसने करतो ती केवळ आपल्या मानसिक समाधानासाठी !

तर ! माबोवर काही महाभाग सतत ब्राह्मण जाती बद्दल घाणेरडे , मानहानीकारक लिखाण करत असतात . मग हे देखील एक प्रकारचे व्यसनच असेल का ?
व्यसन जर असेल तर बंद करायला काय मार्ग आहेत ?
तुम्हा सर्वांकडून निर्मळ अभिप्रायांची अपेक्षा Happy

हो, हे द्वेषाचे व्यसन झाले. याचा प्रॉब्लेम असा आहे की हे करणाऱ्याकडून कबूल होत नाही. यावर ऊपाय एकच. जी व्यक्ती द्वेष करते तिलाही प्रेम द्या. आता याने त्या व्यक्तीला फायदा होवो न होवो निदान आपण तरी त्या व्यसनापासून दूर राहतो. नाहीतर मै हू ना मध्ये शाहरूख सुनिल शेट्टीला म्हणतो तसे होते. जिनसे हम नफरत करते है एक दिन हम भी ऊन के जैसे हो जाते है.

आता कुणीतरी मला श्वासोछ्वासाचे व्यसन आहे असे लिहा, म्हणजे मी सुडोमी.

बाय द वे कोण कुठल्या ज्ञातीबद्दल घाणेरडे लिखाण करतो बरे माबो वर..?? >>>> तुम्हीच DJ.
विषय कोणताही असु दे, तो राजकारण आणि ब्राह्मण या दोन पॉईंट्सवर खेचायचं तुमचं कसब कमाल आहे.
ब्राह्मणांवर टीका करणारे तुम्ही आणि बाकी बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर सौम्य आणि सभ्य लिहिणारे तुम्ही, या दोन वेगळ्या व्यक्ती आहात का अशी शंका यावी इतपत तुम्ही जहरीलं लिहिता.

ते भाकरी आणि मँगोला वाचुन आठवलं, दूर तिथे फिजीच्याही पुढे एक टोंगा आयलंड आहे. तिथे शेजारीपाजारी लॉनवर उन्हात बसुन एक पदार्थ खाताना दिसायचे. आणि हॉटेलमध्ये सुद्धा लोक ऑर्डर करायचे,जसे आपण फ्राइज च्यावम्याव म्हणून ऑर्डर करतो.
तो पदार्थ म्हणजे बाहेरून अतिशय कडक असणारा मोठा ओव्हल शेप लोफ, तो आतुन पोखरून त्यात fanta किंवा मिरिंडासारखी गोडमिच्च पेय ओतुन तो पदार्थ खात फिरणारी मंडळी बरीच दिसायची.
सॉरी, हे विषयाला धरून नाही, पण गंमत म्हणुन सांगितलं

आशा रीतीने व्यसन धाग्यावर शरूख चे आगमन झाले आहे
याच्या या वागण्याचा इतरांना इरिटेशन/ त्रास होतो हे बघून त्याला मनात होत असलेला विकृत आनंद हे देखील व्यसनच म्हणावे लागेल

आणि त्यातून तो बाहेर कधीच पडू शकणार नाही

इतर धाग्यांवर ब्राह्मण जातीवर सतत टीका करणारे महाभाग व्यसनी म्हणावे तर ते स्वतःच्या धाग्यावर मात्र वरून कीर्तन आतून तमाशा ची भूमिका पार पाडतात .
मग इतरांच्या धाग्यांवरच टीका करण्याची त्यांची विकृती उफाळून का येत असते ?

बाय द वे कोण कुठल्या ज्ञातीबद्दल घाणेरडे लिखाण करतो बरे माबो वर..?? >>>>>>>>>>>>>
या स्टाईल वरून मला पुण्यात घडलेल्या जोशी अभ्यंकर खून खटल्याची आठवण झाली .
या गुन्ह्यातील आरोपींनी केवळ विकृत आनंदासाठी कुटुंबे च्या कुटुंबे संपवली होती .
तर त्यातील एक आरोपी पत्रकार असल्याचे भासवून वारंवार येरवडा पोलीस चौकीत जाऊन तपास कुठपर्यंत आला याची दम देऊन चौकशी करायचा !
त्याच्या या सतत च्या चौकशी मूळे पोलिसांनी त्याच्यावर पाळत ठेवून खात्री झाल्यावर सर्वात अगोदर त्याचीच गठडी आवळली Lol

विषय कोणताही असु दे, तो राजकारण आणि ब्राह्मण या दोन पॉईंट्सवर खेचायचं तुमचं कसब कमाल आहे.>> मीरा..बाई, मी कधीच कोणाता विषय या दोन पॉईंटस वर खेचला नाही. ज्ञातींची नाव्म घेऊन बोलणं हे बरं लक्षण नाही.. शिवाय ते आपल्या घटनेत बसत नाही. त्यामुळे काहीही आरोप करू नका प्लिज. अन खरेच तुम्हाला असं वाटत असेल की मी एका ठराविक ज्ञातीला टार्गेट करतो तर कृपया मला दाखवा की मी कुठं असं ज्ञातीवाचक लिहिलं आहे ते. तुम्ही दाखवून दिलंत तर मला कळेल की मी कुठे असं लिहिलं आहे.

ब्राह्मणांवर टीका करणारे तुम्ही आणि बाकी बऱ्याच वेगवेगळ्या विषयांवर सौम्य आणि सभ्य लिहिणारे तुम्ही, या दोन वेगळ्या व्यक्ती आहात का अशी शंका यावी इतपत तुम्ही जहरीलं लिहिता.>> वाईट माणसांवर लिहिलं असेल मी कधीतरी.. त्यांची ज्ञाती कोणती हे मला तरी माहित नसतं.. आता ते एका ठराविक ज्ञातीचे असतील तर त्यात माझा काय दोष..? असु शकतात एखाद्या ठिकाणी भरपूर वाईट लोकं म्हणुन काय त्यांची नावं घेऊन त्यांच्या कपट-कारस्थानी-समाजविघातक स्वभावांबद्दल सावध करू नये असं म्हणणं आहे का तुमचं?

बादवे, मीरा.. तुमच्या प्रोफाईलवरचं गुलाबी गुलाबांनी गच्च भरलेलं झाड (की वेल..?) मस्त आहे. खरोखरचं आहे का ते...??

व्हाईट इंक देखील व्यसन लाऊ शकते हे ऐकून कमाल वाटली. >>> व्हाइट इंक सोबत थिनर येत असे तेही व्यसनासाठी मुले वापरतात म्हणून हल्ली बॉटल मधील व्हाइट इन्क बंद झाले आहे आता पेन किंवा टेप मिळतात.

हो.. हल्ली ते व्हाईट इंक मिळत नाही. पेन मिळतात ज्यांचा तो थीनरचा वास पण येत नाही. कशाचं व्यसन जडेल काही सांगता येत नाही अन ते जडलं तर त्यातून बाहेर पडायला काय काय प्रयत्न करावे लागतात हे खरेच विचार करायला लावतं.

<< येथील तमाम बंधू आणि भगिनींना मला एक प्रश्न विचारायचा आहे !
आपण दारू ,सिगारेटची किंवा इतर व्यसने करतो ती केवळ आपल्या मानसिक समाधानासाठी ! >>

------- व्यसने करतो ती केवळ मानसिक समाधानासाठी? इथे मानसिक समाधान असे काही नसतेच.
व्यसनाधीन व्यक्ती समाधानासाठी व्यसन करत नसतो. व्यसनाच्या पुर्णत: आधीन झालेल्या व्यक्तीला त्या सवयी वाईट आहे याची पुर्ण कल्पना असते, बहुतेकांना त्यापासून खूप दूर जायचे असते.... पण मन कमजोर पडते. वरिल अनेकांना व्यसनापासून दूर जाण्यात यश आलेले वाचून मला आनंद झाला.

धुम्रपाना मुळे होणार्‍या आरोग्याच्या हानीची (तसेच आर्थिक ) कल्पना आलेलीच असते. सायंकाळ झाल्यावर जिव कासाविस होतो , तळमळतो, आणि पाय आपसुकच मदिरालयाकडे जातात. आज एकच पेग... त्यापेक्षा जास्त नाहीच. आणि झोकांड्या खातच घरी येतो... आज चूक झाली, पण आता उद्या तर स्पर्शही करायचा नाही. अनेकांच्या आयुष्यात हा उद्या येतच नाही... असो. Happy

<< माबोवर काही महाभाग सतत ब्राह्मण जाती बद्दल घाणेरडे , मानहानीकारक लिखाण करत असतात . मग हे देखील एक प्रकारचे व्यसनच असेल का ? >>
------- कुठल्याही जाती, धर्माबद्दल आकस बाळगणे चूक आहे. सर्वात पहिले/ शेवटी आपण सर्वच मानव आहोत. धर्म/ जाती या मानव निर्मीत भिंती आहेत, आपणच तयार केलेल्या आहेत आपणच त्या घट्ट किंवा सैल करु शकतो.

जे तुम्ही समाजाला दिले तेच परतून तुम्हाला मिळते. तुम्ही सद्भावना प्रेम दाखवा परतून तुम्हाला पण तेच मिळेल. जर द्वेष आणि द्वेषच मिळत असेल तर ते वाईट आहे.... पण आधी कळत/नकळत तुमच्याकडून ते दिले गेले आहे का हे मी तपासून बघेल.
" गावा बाहेर उकिरडा आहे... तिथे लोळा... किंवा वडारिण... भंगी... " असे उल्लेख मी येथे वाचलेले आहेत. अनेकदा. सौम्य भाषेत निदर्शनास आणून दिल्यावरही साधा खेद नाही का चूक झाल्याची जाण नाही. वाईट वाटते. आपण आज जे पेरत आहोत तेच उद्या उगवणार आहे हे लक्षात ठेवायला हवे. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी किती (अ)सुरक्षित वातावरण तयार करत आहोत?

<< व्यसन जर असेल तर बंद करायला काय मार्ग आहेत ? >>
----- माझ्यातर्फे मी कुठल्याही जातीचा/ धर्माचा द्वेष करणार नाही हे ठरविले आहे. Happy

Submitted by उदय on 13 October, 2021 - 00:38>>++++११११११११११११११

Pages