व्यसन आणि मुक्ती : अनुभव

Submitted by DJ....... on 4 October, 2021 - 07:53

माणसाला जीवनात कोणत्या ना कोणत्या गोष्टिंचं व्यसन हे असतंच. एखाद्याला वाचनाचं, लिहिण्याचं, गाण्याचं, खाण्याचं, खाऊ घालण्याचं, खरेदीचं, हॉटेलिंगचं, सहलीचं, वाहन वेगाने चालवण्याचं, जीमचं व्यसन लागतं.. तर एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागतं.

वाचण्याचं, लिहिण्याचं, गाण्याचं व्यसन लागलं तर शारिरीक तोटा होत नाही... त्यामुळे या कॅटेगरीतील व्यसनं लागलेली माणसं प्रतिभासंपन्न होत जातात असा माझा तरी समज.

खाण्याचं, खाऊ घालण्याचं, हॉटेलिंगचं व्यसन लागलं तर जीभ आणि मन अत्यंत आनंदी होतं परंतू खिसा रिकामा होऊ लागतो अन योग्य व्यायाम न केल्यास वजन किलो-किलोने वाढण्याची तसेच आरोग्य बिघडण्याची शक्यता वाढते असं मला वाटतं.

सहलीचं व्यसन लागलं तर मन आनंदित, प्रफुल्लीत होतं परंतू खिशाला चाट बसू लागते हे माझे मत.

वेगाने वाहन चालवण्याचं व्यसन लागलं तर अपघात होण्याची, कोर्टकचेर्‍या अन दवाखाने मागे लागण्याची शक्यता अधिक बळावते असा माझा तर्क.

तरिही वर उल्लेख केलेली काही व्यसने प्रत्येकात थोड्याफार फरकाने असतातच.. त्याने घरातल्यांच्या कपाळावर निदान आठ्या तरी पडत नाहीत.

परंतु एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर मात्र तो घरच्यांच्या तसे समाजाच्या नजरेत उतरू लागतो. समाज त्यांना चांगलं समजत नाही असे आजुबाजुचे काही अनुभव बघितल्यावर लक्षात आलं (कदाचित मध्यम वर्गीय मानसिकतेच्या वस्तीत राहिल्यामुळे हे अनुभव आलेले असू शकतात****)

एखाद्याला तंबाखू, दारू, धुम्रपान, ड्रग्ज यांचं व्यसन लागलं तर शरिराची हानी तर होतेच वर भरपूर पैसाही त्यात वाया जातो.

-----------------------------------------------
मला स्वतःला एका टॉफीचं भयंकर व्यसन लागलेलं अजुनही स्मरतंय. ४ वर्षांपुर्वीची गोष्ट. मला ऑफिसने क्लएंट लोकेशनवरील एका प्रोजेक्टसाठी क्लाएंट ऑफिसमधे पाठवलं. तिथं आमच्या कंपनीतील इतरही कलिग् माझ्या आधीपासून कामं करायचे. त्यातल्या काहींना सिगारेटचं भयंकर व्यसन. दिवस्भरात ते कमीतकमी ८-१० सिगारेट्स ओढायचे अन त्यांच्या सोबतीला आम्हाला नुसते बोलायला/चहा प्यायला घेउन जायचे. ऑफिस मधे जवळ जवळ ६-७ हजार एम्प्लोयी असतील. ६ व्या मजल्यावर प्रशस्त कॅटीन अन तिथेच एका बाजुला भव्य गॅलरी मधे सिगारेटचं आउटलेट. शेजारीच चहाचं आउटलेट. मी त्यांच्यासोबत जाऊन कधीतरी चहा घ्यायचो परंतु एकदा एकाने मला पल्स नावाची कँडी दिली. त्या आधी मी कधीही ती कँडी खाल्ली नव्हती. पहिल्यांदा चव घेतली तर मला ती आजिबात आवडली नाही.. पण दुसर्‍याने दिलेली कँडी अशी फेकुन तरी कशी द्यायची ना? त्याला वाईट वाटेल म्हणुन मी ती तशीच अनिच्छेने चघळत राहिलो एका क्षणी त्या गोडसर कँडीतून चटकदार तिखट्+खारट्+आंबट्+तुरट अशा चविंचं भन्नाट मिश्रण जिभेवर पसरलं अन मी अंतर्बाह्य शहारून गेलो. मला खुप भारी काहीतरी वाटलं. त्या आधी मी कधीही अशा चवीची भन्नाट कँडी कधीही खाल्ली नव्हती. झालं.. मी पुन्हा एकदा नाव विचारून घेतलं. घरी जाताना काही कारण नसताना सिगारेट ऑटलेटवर गेलो अन ५ रुपयांच्या ५ पल्स कँडी खरेदी केल्या. बस मधे बसल्यावर घर येईपर्यंत २ संपवल्या. उरलेल्या बायको अन मुलांना दिल्या.
तो पहिला दिवस.
त्यानंटर मी रोज सिगारेट आउटलेटवर जाऊन तीच कँडी घेऊ लागलो. रोज १० रुपयांच्या दहा कँडीज घेऊन जेवणाच्या आधी २.. जेवल्या नंतर २.. बस मधून घरी जाईपर्यंत २ अन घरी गेल्यावर रात्रीच्या जेवणानंतर सर्वांसोबत १ असं करु लागलो. त्या कँडीला गिर्हाईकही फार. कधी कधी ती त्या सिगारेट ऑटलेटवर मिळायचीच नाही. मग ऑफिसमधून मेनगेट मधून तंगडतोड करत रोड साईड टपर्‍या धुंडाळात फिरायचो. २-३ महिन्यापर्यंत हे व्यसनच लागलं. शनिवार-रविवार ऑफिसला सुट्टी म्हणुन शुक्रवारी २०-२५ रुपयांच्या कँडीज घेऊ लागलो. हे असं वाढत जाणारं व्यसन बघून घरातल्यांच्या भुवया वर जाऊ लागल्या अन माझी चूक मला उमजू लागली.

त्यानंतर मला कँडी खाण्याची सवय सोडण्यासाठी खूप मनोनिग्रह करावा लागला. इतका की मी कँटीन मधे जेवायला जाणंच बंद केलं. पँट्रीत एक-दोन मित्रांसोबत जेवण करू लागलो. प्रसंगी एकटाच जेवत राहिलो परंतु दीड-दोन महिने कँटीन कडे फिरकलोच नाही. त्यामुळे कॅंडीज घेताच आल्या नाहीत. नेमकं मूळ कंपनीने मूळ ऑफिसला दुसर्‍या एका प्रोजेक्टसाठी परत बोलावल्याने थोडा ब्रेक मिळाला. या परिस्थितीचा फायदा घेत मी त्या तसल्या चंट कँडीच्या व्यसनातून मुक्त झालो. आता आठवलं तरी हसु येतं. Bw
------------------------

तुम्हाला कधी कोणते व्यसन लागले आहे का..? त्यावर कशी मात केली..??

Group content visibility: 
Use group defaults

ते सोया वाटी प्रिंगल्स इतकंच ऍडीक्टिव्ह आहे.प्रिंगल्स निदान भारतात महाग असल्याने जास्त खाल्लं जात नाही.(प्रिंगल्स सारखंच बांगलादेशी प्राण पोटॅटा बिस्कीट अमेझॉन वर मिळतं.पण 150 रु शिपिंग असल्याने सुदैवाने मागवलं जात नाही.)

ही व्यसनं सोडवण्याचा एकमेव मार्ग हे पदार्थ घरात न ठेवणे.(किंवा घरातल्या सर्वात खडूस माणसाच्या कपाटात कुलूप लावून ठेवून त्याच्या हाती किल्ली देणे(आता खडूस माणूसच मोहाला बळी पडला आणि कपाट रिकामं केलं तर कठीण आहे. Happy )

उकडलेली ब्रोकोली, उकडलेली गाजरं पण मस्त लागतात(पण उकडायला वेळ लागतो.)

फुल्ल डिस्क्लोजरः आय हॅव नो इंटेंशन्स टु बिलिटल दोज हु डिसायडेड टु क्विट; इफ यु डिड, गुड फॉर यु. ऑल आय हॅव टु से इज - यु चोज ए राँग पॉयझन...

>>दारूबाबत दारू पिणारे बरेच मिथ फिरवतात. यात त्यांचा काही दोष नसतो. एक गिल्ट असते पिणार्‍यांच्या मनात.<<
ऋन्म्या, असं नसतं रे बाबा. तुला समजेल अशा भाषेत लिहितो. दारु/सिगरेट्/गुटखा/माती इ. वर तुम्हि स्वार व्हायचं असतं; त्यांना तुमच्यावर स्वार होउ दिलंत कि पुढचे परिणाम भोगावे लागतात. आता हे सगळ्यांनाच जमतं असं नाहि, पण अशी उदाहरणं आहेत... Wink

माती इज एक्स्ट्रीम, बट इफ यु हॅवंट लर्न्ट टु एंजॉय सिंगल माल्ट ऑर सिंगल कॅस्क बर्बन - आयॅम अफ्रेड टु से, यु हॅव वेस्टेड योर लाइफ दॅट यु गेट टु लिव ओन्लि वन्स...

<< यु हॅव वेस्टेड योर लाइफ दॅट यु गेट टु लिव ओन्लि वन्स...>>
Indeed, that's how I started smoking. Uhoh

<< बट इफ यु हॅवंट लर्न्ट टु एंजॉय सिंगल माल्ट... >>
LOL, I wonder if it's just elitism. I wonder how many connoisseurs are able to differentiate between single malt vs blended whiskey in a blind testing. Lol

<< सिगरेट सोडल्यावर पहिल्या काही महिन्यात सिगरेट ज्यांच्याबरोबर ओढायचा ते मित्र, जिथे ओढायचा त्या जागा हे टाळणे सर्वात महत्वाचे. >> सहमत.

<< एअरपोर्टवर ५० युरोचा झिप्पो लायटर एका पाठोपाठ एक अश्या कदाचित ५-१० सिगरेटी ओढून कचर्‍यात टाकून दिला. त्याबरोबर अर्धे भरलेले
सिगरेटचे पाकिटपण कचर्‍यात टाकले. >> हे प्रकार मी स्वतः: अनेकदा केले होते, उपयोग झाला नाही. पण तरीही प्रयत्न थांबवले नाहीत, त्याचा उपयोग झाला.

अजून एक लिहायला विसरलो होतो. एकदा रुमाल सिगरेट फिल्टरवर ठेवून त्यातून कश घेतला की रुमालावर निकोटिनचे पिवळे डाग पडतात. रुमाल कितीही धुतला तरी ते डाग जात नाहीत. मी तो रुमाल मुद्दाम वापरायचो, तेव्हा प्रत्येक वेळी माझ्या फुफुसावरचे ते निकोटिनचे डाग दिसायचे.

<< एका पन्नाशीतल्या गृहस्थांनी सांगितले होते की ते २० वर्षांनंतर पुन्हा लॅप्स झाले. >> खरं आहे, त्यामुळे तशी रिस्क घेण्याची अजिबात इच्छा नाही आता.

<< चहा कॉफी चे व्यसन कोणालाच नाही का? >>
चहा-कॉफी एकवेळ परवडले, त्याने एकाच व्यक्तीला त्रास होईल फारतर. तुषार नातू यांचे "नशायात्रा" पुस्तक वाचा, नुसते वाचूनही हादरायला होते, इतके भयानक अनुभव आहेत. ज्या व्यसनामुळे कुटुंबातील इतरांना पण त्रास होईल असे कुठलेही व्यसन वाईटच.

मला पण सिगरेटचे व्यसन होते.

कॅालेजला असताना सहज गंमत म्हणून ओढली आणि त्याची सवय लागली. पण मी दिवसाला एक दोन पाकिटे अशा लेव्हलला गेलो नाही. दिवसातून जास्तीत जास्त पाच सहा होत आणि कमीत कमी एक. ती एक जर ओढली नाही तर काही तरी चुकल्या चुकल्या सारखे वाटत असे. काही ना काही कारण काढून मी घरातून कल्टी मारून एक का होईना ओढतच असे. मधे एकदा जवळ जवळ आठ महिने सोडली, पण परत प्यायला लागलो. आपल्याला व्यसन लागलं आहे आणि ते सोडायला हवे असं वाटायला लागलं होतं. लग्नानंतर बायको सिगरेट सोड म्हणाली. तिला सांगितलं,मी स्वत: सोडेन, पण तू कधी कटकट करू नको. कटकट केलीस तर कदाचित कधीच सुटणार नाही. ती त्यानंतर कधीच काही बोलली नाही.

माझ्या प्रोफेशन मधे फिटनेसला फार महत्व दिलं जातं. माझी किमान दर सहा महिन्याला मेडिकल होतच असते, त्यामुळे काहीही झालं असेल किंवा होणार असेल तर लवकर लक्षात येईल हे मनात कुठेतरी होतंच. एकदा एका टेस्ट मधे हिमोग्लोबीन जरा जास्त आलं. कंपनीच्या मेडीकल मधे ते चालून गेलं पण माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजली. हे सगळं जानेवारी २०१८ मधे झालं. फेबमधे म्हणलं बास आता सोडायची. आता घरात आहे हे पाकिट शेवटचं. आणि ते अजूनपर्यंत तरी शेवटचंच आहे. आता आजिबात तल्लफ होत नाही. सिगरेटचा वास सहन होत नाही. पार्टीमधे कोणी ओढत असलं तर मी ऊठून दुसरीकडे जाऊन बसतो.
पहिल्यांदा सोडली होती तेव्हा लॅप्स झालो होतो. आता परत होणार नाही.

पिण्याच्या बाबतीत, प्यायला जाम आवडते.

मला पिणं सोडायची ईच्छाच होत नाही. पिण्याचं आपल्याला व्यसन नाही, लिमिट मधे आहोत असे वाटत राहते. सरासरी आठवड्याला तीन पेग होतात. कामा निमित्त अनेक ठिकाणी तीन तीन चार तार महिने राहणे होते. तेव्हा अनेकदा पिण्यापासून लांब राहिलो आहे. एकदा कामानिमित्त सहा की आठ महिने बाहेर होतो. त्यात एकदाही एक थेंबही प्यायलो नाही. सिगरेट सारखे काहीही करून दिवसाला सेवन झालेच पाहिजे असे वाटत नाही. तल्लफ होत नाही. प्यायलो नाही तर चुकल्या चुकल्या सारखे वाटत नाही. प्यायची कारणे शोधत नाही. ठराविक दिवशी, ठराविक प्रसंगी हवीच असे नाही. वेळ असेल, सोय असेल, मी निवांत असेन तेव्हाच घेतो. बराच काळ न पिता राहिलो आहे, ते पण एकदा नव्हे अनेकदा. त्यामुळे पिणे सोडावे असे अजून डोक्यात नाही.

सिगरेट सोडल्यामुळे फुल्ल (ओव्हर?) कॅान्फिडन्स आहे. कि सिगरेटचं व्यसन असून ती सुटली तर पिणं किस झाड की पत्ती? ठरवलं तर सोडू शकेन असे वाटत आहे.

सध्या हे पिणे सोडून दुसरेच एक व्यसनाच्या व्याख्येत मोडेल अशा पिण्याची सवय लागली आहे. कोल्ड कॅाफीची…..कोल्ड कॅाफी आधीपासून आवडते. साधारण दोन वर्षांपुर्वी दुकानात मिळते तशी कोल्ड कॅाफी घरी कशी बनवायची हे लक्षात आलं. तेव्हापासून रोज अर्धा किंवा पाव लिटर कोल्ड कॅाफी पितो(च). प्यायलो नाही तर चुकल्या चुकल्या सारखे वाटते. रोज अर्धा ते पाव लिटर कच्चं दूध, दोन तीन चमचे कॅाफी, सहा सात चमचे साखर पोटात जात आहे. सगळेच हानीकारक. या सवयीवर कसा ताबा मिळवावा हा विचार करत आहे.

उत्तम पोस्ट अंतरंगी

दारू च्या बाबतीत ditto
घरी फुल स्टॉक असतो कायम माझ्या
पण म्हणून उगाच पीत बसलोय असे होत नाही
मूड आणि वातावरण असेल तरच तेही दोन पेग पेक्षा जास्त नाही

मला ते कोल्ड कॉफ़ी ची निमित्ताने असा प्रश्न पडलाय की व्यसन कशाला म्हणायचं नक्की

कारण रोजच्या जेवणात प्रचंड गोड खाणारे लोक बघितले आहेत, काही नसेल तर दही साखर खातात
यालाही व्यसन म्हणायचं का

मला ते कोल्ड कॉफ़ी ची निमित्ताने असा प्रश्न पडलाय की व्यसन कशाला म्हणायचं नक्की
>>>>>

व्यसन या शब्दाचा अर्थ एखादी गोष्ट वारंवार करावीशी वाटणे, करणे, तशी सवयच लागणे. त्यावाचून न करमणे, वगैरे वगैरे..
जसे खाण्याचे पिण्याचेच नाही तर वाचनाचेही व्यसन असू शकते. पण ते असेल तर चांगलेच.
आता एखाद्याला चहाचे व्यसन असेल. तो चहा भरमसाठ पित असेल. तर दुसऱ्याला दारूची आवड असेल. वरील व्याख्येनुसार व्यसन नसेल. लिमिटमध्ये पिणे होत असेल. तरीही या दोन्ही केसेसची तुलना करता ती लिमिटमधील दारू चहाच्या व्यसनापेक्षा शरीराला घातक ठरण्याची शक्यता जास्त असते.
कारण चहाचे व्यसन असले तरी जेव्हा कळते की त्यातला एखादा घटक जसे साखर आपल्या प्रकृतीसाठी घातक आहे तर कमी वापरला जातो, टाळला जातो, झाल्यास चहाच बंद करता येते. हे सहज शक्य होते. पण दारू सिगारेटचे व्यसन समोर मरण दिसत असूनही सोडणे जमत नाही कित्येकांना. किंवा लिमिटमध्ये पिणाऱ्यांनाही हे पेय घातकच आहे आणि कमी प्रमाणात का होईना आपला घातच करतेय हे समजूनही सोडणे सोपे जात नाही.

मला कोल्ड्रींकचे म्हणजे फसफसणाऱ्या पेयांचे बेक्कार व्यसन होते एकेकाळी. रोज म्हणजे रोजच अर्धा पाऊण लीटर प्यायचोच. मग बदलत्या परीस्थितीनुसार व्यसन सुटले. पण आवडीनुसार चारचोघांसारखे वा किंचित जास्त पिणे होतेच. एकदा लक्षात आले की हे प्यायलो की आपला पोटाचा/आतड्याचा आजार त्या दिवशी बळावतो. याचे काहीतरी कनेक्शन आहे. बस्स, तो दिवस शेवटचा होता. ना डॉक्टरला हे विचारले, ना कोणाचा सल्ला घेतला, ना गूगल करत बसलो ना मायबोलीवरचे सल्ले अनुभव घेत बसलो.. आता पुन्हा हे पांचट पाणी प्यायचे नाही एकदाच ठरवले आणि आरामात पाळले. पण हेच दारू बाबत सहजी जमले नसते.

राज, आय वुड रिस्पेक्टफुली डिसअ‍ॅग्री.
मला अल्कोहोल चे वावडे नाही. सोशल सेटींग मध्ये एखादी बियर, वाईन, किंवा स्कॉच, हिबाची ( एकदम छान जपानी व्हिस्की, मला तर स्कॉच पेक्षा जास्त आवडते), संटोरी, वगैरे चा आस्वाद घेतो. पण ज्यांनी अल्कोहोल ला स्पर्शही केलेला नाही व करणार नाहीत त्यांनी फार काही मिस केले असे मी म्हणणार नाही. गूड फॉर देम. तेच तंबाखू बाबतही म्हणता येइल. पोटभर जेवण झाल्यावर १२० -३०० शेकेली सुपाची, किमाम वगैरे पानाची लज्जत तुम क्या जानो असे काही नाही.

एखाद्याने वूडहाउस वाचलाच नाही, हापूस आंबा खाल्लाच नाही, वगैरे असेल तर निदान एकदा तरी चव घ्या असेच म्हणेन पण दारू व तंबाखु बाबत नाही.

<<<राज, आय वुड रिस्पेक्टफुली डिसअ‍ॅग्री.>>> एकदम सहमत.

<<< बट इफ यु हॅवंट लर्न्ट टु एंजॉय सिंगल माल्ट ऑर सिंगल कॅस्क बर्बन - आयॅम अफ्रेड टु से, यु हॅव वेस्टेड योर लाइफ दॅट यु गेट टु लिव ओन्लि वन्स...

Submitted by राज on 9 October, 2021 - 04:07 >>>>
हे उदात्तीकरण मला तरी पटले नाही.

चहा कॉफ़ी सोबत लोकांना गोडाचे पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट, तेलकट पदार्थ, लोणची आणि पापड यांचेही व्यसन असते
आता यामुळे काय हानी होते ते वाचल्यावरच कळेल

गोडाचे पदार्थ, बेकरी प्रोडक्ट्स, चहा , कॉफी, लोणची अन् पापडाने कदाचित सिगारेट अन् दारू एवढीच हानी होत असावी... फक्त त्यामुळे हनी पोचणारां शरीराचा भाग वेगळा असावा..

खरे तर दारूसिगारेट आणि ईतर खाद्यपदार्थ वेगळे ठेऊन धागा काढायची गरज होती. अन्यथा ईतर खाद्यपदार्थांच्या अतिरेकालाही दारू सिगारेटच्या पंक्तीत बसवून काहीही अति प्रमाणात सेवन केले की त्रास होतोच असे म्हणत दारू सिगारेटचे छुपे समर्थन वा एकप्रकारे उदात्तीकरणच केले जाते.

जे दारू सिगारेट सोडण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना कळकळीची विनंती आहे की त्यांनी अश्या प्रचाराला बळी पडू नये. तसेच ईतर सभासदांनाही विनंती आहे की त्यांनीही अशी भाबडी तुलना थांबवावी. कोणीही आपल्या मुलाला प्रेमाने दारू सिगारेट भरवत नाही. हे पदार्थ शरीराला घातकच आहेत. जेव्हा एखादी आई अभिमानाने म्हणते, आमचा पोरगा निर्व्यसनी आहे हो. तेव्हा तिच्या डोळ्यासमोर जे जे पदार्थ येतात त्यांचीच ईथे चर्चा व्हावी. _/\_

तुला वाटतं म्हणून भाबडी काय?
ओबीज बालके आणि त्यांच्या अभिमानी आया बघितल्या नसणार याची खात्री आहेच
आणि मुळात तुला धागा आपल्याला हव्या असलेल्या अजेंड्यावर नेण्याचे व्यसन आहे त्याचं काय करावं
दारू पिणारा आपल्या कर्माने मरेल
तसाच अतिगोड खाणाराही
पण तुझ्यासारखे भाबडे गोड खाऊन मरा पण दारूपिऊन नको असेच म्हणत राहणार

गेल्या वर्षी मला रात्रीस खेळ चाले २ बघण्याच व्यसन लागलं होतं... इतकं की मी एकही एपिसोड चुकवला नव्हता (त्याकाळी माझ्याकडे स्मार्ट टिव्ही नव्हता म्हणून रोज न चुकता बघायचो). हे व्यसन इतक्या लेव्हल पर्यंत पोचल की मी त्यांचा सेट कुठं आहे याची माहिती काढून तिथं जाण्याचा प्लॅन बनवलं.. जाऊन शूटिंग पाहून आलो.. आण्णा नाईकांचा वाडा आटून बाहेरून मनसोक्त फिरून आलो. आता मात्र सिझन ३ मध्ये मी इतका इंव्होलव कसा नाही याचं आश्चर्य वाटत.

मुळात तुला धागा आपल्याला हव्या असलेल्या अजेंड्यावर नेण्याचे व्यसन आहे त्याचं काय करावं
दारू पिणारा आपल्या कर्माने मरेल
तसाच अतिगोड खाणाराही
>>>>>

माझा अजेंडा अचूक ओळखला. होय हे खरे आहे की कोणी दारूच्या आहारी गेला असेल तर त्याला सावध करणे हा माझा नेहमीच अजेंडा राहिलाय. कारण मी दारूने दोन माणसे मरताना आणि दोन संसार उध्वस्त होताना फारच जवळून पाहिले आहेत. त्यामुळे तुम्ही माझ्यावर कितीही टिका करा मी हा अजेंडा त्यागणार नाही.
जर धाग्यावर कोणी दारू सिगारेटच्या व्यसनापासून मुक्ती मिळतेय याबद्दल लिहीत असेल तर त्यात चहामिठाईचे व्यसन मुद्दाम अश्या प्रकारे आणायचे की व्यसन तर काय कश्याचेही असू शकते. दारूनेही लोकं मरतात तर अति गोड खाऊनही मरतात. हा एकंदरीत मला बुद्धीभेदाचा प्रकार वाटतो. दुर्दैवाने ते या धाग्यावर होतेय असे मला वाटल्याने मी धागाकर्ता यांनाच विनंती केली की अश्या दोन व्यसनांचे दोन वेगळे धागे काढले असते तर बरे झाले असते.
असो, वाद वाढवण्यात अर्थ नाही. अवांतर पोस्ट वाढवण्यातही अर्थ नाही. जे ज्याला योग्य वाटेल _/\_

दारु, ड्रग्ज, सिगारेट - विष आहेत. तेव्हा त्यापसून शहाण्या माणसाने दूरच रहावे याबद्दल दुमत नाही.

>><< बट इफ यु हॅवंट लर्न्ट टु एंजॉय सिंगल माल्ट... >> LOL, I wonder if it's just elitism. I<<
नोप. आयॅम नो इलिटिस्ट फ्रॉम एनी अँगल. आय स्टिल डु माय यार्डवर्क, डु लाँड्री, अँड लोड डिशवॉशर... Proud

>>राज, आय वुड रिस्पेक्टफुली डिसअ‍ॅग्री.<<
अंडरस्टुड. लेट मी मेक इट क्लियर - आयॅम नॉट सेलिंग एनिथिंग हियर, इट्स जस्ट माय ऑनेस्ट ओपिनियन. यु डोंट हॅव टु बाय इट... Wink

<< इफ यु हॅवंट लर्न्ट टु एंजॉय सिंगल माल्ट ऑर सिंगल कॅस्क बर्बन - आयॅम अफ्रेड टु से, यु हॅव वेस्टेड योर लाइफ >>

This does sound like elitism. आणि हो, elitist हे यार्ड वर्क किंवा लॉन्ड्री करत नाहीत, असं काही नसतं. पण जाऊ दे, फार पर्सनल होईल त्यामुळे तुम्ही म्हणता तेच बरोबर.

इतरांसाठी:
इफ यू हॅव नेव्हर ट्राईड सिगरेट्स ऑर ऍल्कोहोल इन योर लाईफ, यू हॅव नॉट मिस्ड एनिथिंग इन योर लाईफ. हॅव फन. मोस्ट लाईकली, यू विल हॅव द लास्ट लाफ.

उबो +१.
अमुक केलं नाही म्हणजे जीवन व्यर्थ याची यादी खूप मोठी होईल. धागा काढण्याच्या हौशी लोकांना "काय केले नाही म्हणजे जीवन व्यर्थ?" असा धागा काढण्याचे पोटेन्शियल आहे आणि ज्यांना आपण जीवनात काही मिस करून जीवन व्यर्थ तर घालवत नाहीये ना अशी शंका असेल त्यांना तो उपयोगीही पडेल.

ज्यांना साखर, चहा, कॉफी, लोणचे, पापड यांचे व्यसन जास्त हानीकारक आहे असे वाटते त्यांनी कृपया त्याबद्दल लिहावे आणि लोकांना ते कसे हानिकारक आहे हे पटवून द्यावे.

ते हानीकारक आहे म्हणुन सिगरेट दारू बद्दल काही लिहू नका, कोणतीही गोष्ट प्रमाणात चांगली म्हणुन सिगरेट दारू व्यसनाबाबत लिहु नका हे कसले लॉजिक?

ज्यांना दारू सिगरेटचे व्यसन नसून मर्यादेत पितात त्यांना ज्यांनी ते व्यसन अनुभवलेय किंवा पाहिलेय त्याबद्दल लिहिलेले मनाला का लागावे? निकोटिन आणि अल्कोहोल हे दोन्ही प्रचंड ऍडिक्शन पोटेन्शियल असणारे पदार्थ आहेत, ज्यामुळे ते कित्येकांना नियंत्रणात ठेवणे शक्य होत नाही आणि सुटतही नाही. तुम्हाला असे अजून दुसरे पदार्थ माहीत असतील तर त्यावर सविस्तर लिहा. त्यात ते पण हानिकारक आहे आधी ते सगळे बंद करा मगच निकोटिन अल्कोहोल बद्दल बोला असा सूर नसावा.

ज्या प्रमाणे अती प्रमाणात निकोटिन घेतले तर श्वासनासंबंधी रोग होतात अन् अती अल्कोहोल मुळे यकृत खराब होते हे आपणाला माहित असते तसेच अति गोडाने नंतर मधुमेह होतो तसेच पापड लोणची अती प्रमाणात सेवन केल्याने ब्लड प्रेशर वाढून हृदय रोग होतो हे तर आपण नाकारू शकत नाही.

कुठलंच व्यसन शरीराला चांगलं नसतं. अति वाचनाने/टिव्ही/मोबाईल बघण्याने डोळ्यांवर ताण येऊन त्यासंबंधात आजार उद्भवू शकतात.. अती लिखाणाने मणक्याचे विकार जडू शकतात.. अती गायनाने अन् अती ऐकण्याने शरीराची काही हानी होत असेल तर माहित नाही.

अर्थात अल्कोहोल किंवा निकोटिन कमी प्रमाणात घेणं योग्य असा याचा अर्थ नव्हे. ड्रग्स घेतल्याने चेहऱ्यावर तेज येतं, आत्मविश्वास काही प्रमाणात वाढल्या सारखं वाटतं अन् कितीही काम केलं तरी थकवा येत नाही असे अनुभव "हिरोईन" अन् "फॅशन" मुव्हीत बघायला मिळाले आहेत.. अशा प्रकारचे ड्रग्स घेणारे कोणी आजूबाजूला नसल्यामुळे त्याबद्दल काय काय अपाय होतात हे मला काही माहित नाही.

ते हानीकारक आहे म्हणुन सिगरेट दारू बद्दल काही लिहू नका, कोणतीही गोष्ट प्रमाणात चांगली म्हणुन सिगरेट दारू व्यसनाबाबत लिहु नका हे कसले लॉजिक?>>>
कारण दारू सिगरेट बद्दल मोप लिहून झालेलं आहे, इथे मायबोलीवर धगविभू ने पण भरपूर लिहून झालं आहे
हा धागा सगळ्या व्यसनाविषयी आहे
वरती कुणीतरी म्हणलं तसं माता लहान मुलांना दारू सिगरेट देत नाहीत
पण कौतुकाने चिप्स, गोड, कोल्ड्रिंक्स आणि बेकरी प्रॉडक्ट खाऊ घालतात आणि वर आमचा बाब्या हेच खातो हो, पोळी भाकरी ला नकोच असते असे कौतुकाने सांगतात
मी खुद्द सिंहगडावर एक माऊली आपल्या चिरंजीव खत नाहीत म्हणून मँगोला मध्ये भाकरी बुडवून चारताना पाहिले आहे

ओबीज बालकांचे भारतातले वाढते प्रमाण अतिशय चिंताजनक आहे

"मला आवडते / फक्त माझी ईच्छा आहे म्हणूनच मी दारू पितो, तंबाखू / गुटखा खातो " असे प्रामाणिकपणे काबुल करणारी एकतरी व्यक्ती कोणाच्या पाहण्यात आहे का? इतर विविध करणे सांगणारी शंभर टक्के सापडतात.

एक माऊली आपल्या चिरंजीव खत नाहीत म्हणून मँगोला मध्ये भाकरी बुडवून चारताना पाहिले आहे>> हद्द आहे ही तर..!! Uhoh

मला आवडते / फक्त माझी ईच्छा आहे म्हणूनच मी दारू पितो, तंबाखू / गुटखा खातो
- हो मी करतो की कबूल
सिगरेट मी कधी ओढली नाही कारण कधी जमलीच नाही
पण दारू तंबाखू ने मिळणारी किक क्षणिक आहे, त्याचे लॉंग टर्म मध्ये शरीरावर परिणाम होत आहेत हे माहिती असूनही मी घेतो
डबल ब्लॅक किंवा सिंगल malt घेणे हे खरोखरच अप्रतिम आहे
आणि मला ते मनापासून आवडते घ्यायला

थोडा विरुद्ध सूर लावते.
पोळी भाकरी सोडून रोज चिप्स कोल्ड्रिंक्स हे वाईटच(सध्या किराणा दुकानावर किती आईबाप कौतुकाने सारखे आईस्क्रीम फॅमिली पॅक घ्यायला येतात? 'आईस्क्रीम चांगलं.त्यात दूध असतं.चॉकलेट नाही.त्याने दात किडतात' किंवा 'बोर्नव्हील पेक्षा फलेरो चांगलं.त्यात फळांचा रस असतो' वगैरे.जे दात एखाद्या चॉकलेट ने किडतील ते फलेरो किंवा आईस्क्रीम ने मजबूत होणारेत का?)

पण माऊली च्या पुढे त्या क्षणी 'मँगोला मध्ये भाकरी बुडवून, नाहीतर पोर उपाशी' असे दोनच ऑप्शन असतील तर भाकरी मँगोला पण क्षम्य आहे.किंवा मुलांना अजिबात जंक फूड न देऊन, दुसऱ्या कोणाच्या तरी बर्थडे पार्टी मध्ये त्यांनी खाणे हाही फार चांगला ऑप्शन नाही.हळूहळू तो ग्राफ चांगलं, ताजं, रुचकर खाणं 95% आणि वेफर्स वगैरे जंक 5% किंवा कमी कडे न्यायचा आहे.आजची कोणीही गुगल साक्षर माता मुद्दाम पोराला रोज मॅगी किंवा रोज चिप्स हौसेने देणार नाहीये.
'योग्य प्रमाणात','घरात काही नाही आणि योगायोगाने खाणे बनवणारी व्यक्ती बाहेर कुठे अडकली' किंवा 'प्रवासात,बाहेर काहीच ऑप्शन न मिळाल्यास, अश्या टोकाच्या परिस्थितीत जंक फूड' इतके मात्र त्यांना नीट समजावून ठेवावे लागते.

बेकरी फूड, विशेषतः ब्रेड ला(योग्य प्रमाणात,चांगले होल व्हिट ऑप्शन बघून, काही हेल्थ कंडिशन नसताना) आपल्या इथे इतके वर्ज्य का समजले जाते हे मला फार पटत नाही.

(माझ्या साबा अतिशय चांगल्या स्वयंपाक करणाऱ्या.कमीत कमी इन्स्टंट प्रॉडक्ट, कोणत्याही भाजीला रेडिमेड मसाले वापरायचे नाहीत वगैरे.पण त्यांनी प्रवासात(म्हणजे स्टे मध्ये) इतर पोळी रोल वगैरे नॉर्मल पदार्था बरोबर 1 मॅगी पॅक बॅकप म्हणून घेतलेला पाहून मला जवळजवळ चक्कर यायची बाकी होती.हे म्हणजे शिंजो आबे किंवा शि जिनपिंग ने सोवळं नेसून महारुद्र केल्या सारखं. पण 'अडचणी ला, प्रवासात घाईत वेळ नसताना पोर त्रास न देता जे खाईल ते खाऊ द्यावं, चांगल्या सवयी लावणं चालू असतंच' असं म्हणणं.
आजही कुठेही स्टे ला जाताना एक इलेक्टरीक छोटी पाव लिटर केटल, मॅगी, कप, चमचा, खाकरे हे बरोबर असतातच.अगदी नंतर तसेच्या तसे घरी आणले तरी चालेल.)

आहेत अहो अशीही उदाहरणे कित्येक
माझा मुलगा लहान होता तेव्हा शाळेत काही मुले रोज डब्यात केक, वेफर्स नैतर असलेच काही आणत असत, ते बघून बाकी पोरांनी पण हट्ट सुरू केला की आम्हलाही
शेवटी मग आम्हाला पेरेंट मिटिंग मध्ये हा मुद्दा मांडावा लागला आणि मग शाळेने फक्त एकच दिवस खाऊ बाकी दिवस पोळी भाजी किंवा घरचे पदार्थ आणावे लागतील असा नियम केला

आणि त्या पोराला माहिती होते की आई आपल्याला मँगोला काय अजूनही काही खाऊ घालेल आपण जर हट्ट केला आणि उपाशी राहिलो तर

आमच्या आई समोर असले काही हट्ट करायची टाप च नव्हती, ती म्हणाली असती खायचं तर हे नैतर उपाशी राहा
विषय संपला

आजचे पालक गुगल साक्षर असतीलही पण त्यांचे पाल्य आपल्या आईवडिलांना कोळून प्यायलेत त्याचं काय

आणि हे मी नाही सगळेच म्हणत आहेत की भारतात लठ्ठ मुलांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे

https://pudhari.news/latest/14330/%E0%A4%B2%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%A0%E...

Pages