अलविदा !

Submitted by Theurbannomad on 18 August, 2021 - 02:28

सगळ्यांनाच,

द्वेष हा शब्द इतका स्वस्त झालाय, की एखाद्या आवडत्या नेत्याविरुद्ध समोरचा पूर्ण तारतम्य बाळगून सभ्य भाषेत व्यक्त झाला तरी तो थेट दवेष्टा ठरवला जातो. समोरच्या व्यक्तीला पुरावे देणं बंधनकारक असतं, त्याने त्याच्या एकेका शब्दाला पारखून घेऊन त्याची तज्ञ ( ? ) लोकांकडून शहानिशा करून मगच लिहायचं असतं पण त्याच्याकडून ही अपेक्षा ठेवणारे मात्र मोकाट सुटू शकतात, काहीही लिहू शकतात आणि वैयक्तिक पातळीवर गलिच्छ शब्दात अतिशय असंवेदनशील शब्दात काहीबाही लिहूही शकतात....

कालपासून प्रतिक्रियांमधून काही स्वघोषित जागले ज्या पद्धतीने पद्धतशीरपणे चिखलफेक करत आहेत ते बघून एक जाणवलं, की चार गोष्टींची माहिती मिळवून त्यावर लिखाण करण्याचा अट्टाहास करणं ही स्वतःची शक्ती आणि वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. आयुष्यात झुरळसुद्धा न मारू शकलेले लोक सावरकरांना वाट्टेल ते बोलू शकतात ( आणि तेही पुरावे ना देता ) , बाजीरावांबद्दल अफगाणी माणूस चार चांगले शब्द बोलत असेल तरी काहींच्या पोटात कालवाकालव होते आणि ते लोक थेट अफगाणी लोकांना तोंड सोडून बोलण्याइतके खालच्या पातळीवर येतात, स्वतः चार पुस्तकं वाचण्याची तसदीही न घेणारे समोरच्याकडून निर्लज्जपणे पुरावे मागत राहतात ( सगळं हातात आयतं हवं हा कोडगेपणा आणि ते मिळूनही शेवटी दुसरी बाजू बघायची इच्छा नाहीच....) , विकिपिडिया/व्हॉट्सॲप/फेसबुक नामक महाविद्यालयांमधील माहितीवर उड्या मारतात पण चार पैसे खर्च करून एखाद तास वाचनालयात घालवत नाहीत आणि शेवटी हेच उपटसुंभ ' आपल्याकडे चांगले लेखक नाहीत, आपल्याला साहित्यातले आंतरराष्ट्रीय सन्मान मिळूच शकत नाहीत ' असले अकलेचे तारे तोडतात.

असो, मायबोली वर यापुढे मला लिहिण्याची इच्छा नाही. काल माझ्या अफगाणी मित्रांबद्दल ' अफूचा चहा पिऊन बरळणारे ' अशा गलिच्छ शब्दात बोलणाऱ्या विकृत लोकांसाठी मी यापुढे लिहू शकत नाही. आजवर मी जे काही इथे लिहिलं, तेही मायबोलीच्या admin ने delete करावं ही माझी त्यांनाही विनंती आहे! अलविदा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवाजी महाराजांच्या मृत्यू नंतर महाराष्ट्रात आलेला औरंगजेब तब्बल 27 वर्ष इथे होता , त्या काळात त्याने संभाजी महाराजांची हत्या केली तरी त्याला महाराष्ट्राचा घास गिळता आला नाही . सहज घास गिळता आला असता तर तो केंव्हाच दिल्ली ला परत गेला असता , पण एका असंतुष्टचें जीवन त्याच्या नशिबी आले .
एवढे बलिदान देऊन कमावलेलं स्वराज्य मग कोणी घालवले? इंग्रजांची चाकरी आणि पेन्शन मिळवून बिठूरला कोण स्थायिक झाले? इंग्रजांची पेन्शन मिळवून पण इतिहासात सेनानी म्हणून प्रसिद्ध दोन व्यक्ती कोण आहेत? सांगा बरे. इतिहासाचे दाखले मागितले की लगेच ट्रोल म्हणून ट्रोलवणाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी उत्तरे द्यावीच लागणार. म्हणूनच चुकीचा इतिहास सांगू नका आणि सुखानी जगा.
कसें Lol

पानिपत ह्या विषयावर इतिहासात भरपूर लिहिले गेले आहे. एखाद्या पुस्तकाला चाळीस एक वर्षे झाली की त्याच्याकडे नव्या आणि प्रचलित दृष्टीने पाहिले जाऊन मुद्द्यांची खाडाखोड, मजकुराची फेरमांडणी करून नवे पुस्तक लिहिले जाते. शेजवलकरांचे पुस्तक चांगले मानले जाते पण त्यावरही टीका झालेली आहे. इतिहासावर लिहिणाऱ्या व्यक्तीने उपलब्ध असे शक्य तितके लिखित पुरावे, पुस्तके, दोन्ही बाजूंची मते वाचून कालनिरपेक्ष होऊन एखादे विधान करावे. नाहीतर समकालीन विचारांच्या प्रभावाखाली येऊन लिखाण दर्जेदार उतरत नाही. शिवाय मराठीव्यतिरिक्त अन्य भाषांतील पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत. मराठ्यांविषयीची उर्वरित देशातली प्रतिमा, त्यांची मते वगैरेही विचारात घेतले गेले तर लिखाण अधिक सकस आणि सखोल होते.
पण एव्हढे करायचे तर आपणच इतिहास संशोधक होऊ. त्यापेक्षा संस्थळ लेखक आहोत तेच बरे.
त्यामुळे संस्थळावर वावरणाऱ्या आमच्यासारख्या व्यक्तींनी विधाने करताना काळजी घ्यावी इतकेच.

एवढे बलिदान देऊन कमावलेलं स्वराज्य मग कोणी घालवले? >>>>>>>>>
मग असाही प्रश्न उपस्थित होतो !
बापजाद्यानी उभे केलेले साम्राज्य कपट कारस्थान करून बळकवलेल्या आणि नंतर ऐका ही लढाईत भाग न घेता तथाकथित सम्राट बनलेल्या औरंगजेब चे शासन कोणी घालवले Happy

बापरे.. धागा बदलून इथे एवढी चर्चा झाली..? मी ग्रुप मधेच होतो सकाळपासून त्यामुळे नवीन मधे पाहिलंच नाही. Bw

Dj यांना फुकटचा सल्ला आहे , त्यांनी पण अलविदा चा लेख टाकून तुला करून घ्यावी म्हणजे आमच्या सारख्या वाचकांच्या निर्मळ प्रतिक्रिया कळतील>> @ नगरवाले, तुमच्या सारख्या ड्यु आयडींच्या निर्मळ प्रतिक्रिया घाऊक दरात घेऊन मला इथे हलवून खुंटा बळकट करण्याची आजिबात गरज वाटत नाही. Bw

वैनी पडल्या......? लागलं कै.......??
चांगली खुर्ची घ्या एखादी.. नैतर खबरदारी म्हणुन लेख वाचताना खोलीच्या मधोमध फरशीवर बसून वाचत जा.

नाही लागले.
https://www.loksatta.com/explained-news/explained-why-are-the-taliban-af...

दररोज पेपर मध्ये नवीन वाचायला मिळते. आश्चर्य या गोष्टीचे वाटते की तालीबानींना प्रगती नको आहे का? पोलीओ व बाकी लसीकरणा विषयी वाचायला मिळाले. जे सामान्य लोक ( तालीबानी नाही ) तिथे रहाणार आहेत, त्यांना या साठी विरोध पण केला जातोय.

आणि हो, तुमची मते prejudiced आहेत, त्या धाग्यावर विषयांतर झाल्यामुळे वाद झाला.. आणि गंमत म्हणजे विषयांतर करणारे- अफगाणिस्तानात गांधी आणि सावरकर आणणारे तुम्हीच होतात!>>>
अगदी सहमत

सध्याच्या दिवसात कुणी कुणाशीही वाद घालुन स्वतःची इम्युनिटी कमी करू नये.
जर समोरचा म्हणाला की हत्ती उडतो तर आपण सरळ म्हणावे की आज सकाळीच आमच्या बाल्कनीत बसलेला पाहिला.

इथे इतके रामायण वाचून धागा पाहिला. शेवटच्या भागात वाद होऊन मग मालिका बंद पडली असे न होता त्या आधीच्या भागावर वाद होऊन मग शेवटचा भाग आला हे काही समजलं नाही.
मानबिंदू / उपक्रम स्थळावर अशा चर्चा खूप चालत. काय दर्जा राखला होता त्यांनी. तिथे नितीन थत्ते हिंदुत्ववाद्यांची मतं खोडून काढत असत. त्यांनी कधीही पातळी सोडली नाही. फक्त मुद्दा मांडत. त्यांचा अभ्यास सखोल असायचा. अभ्यासोनि प्रकटावे या त्यांच्या वृत्तीमुळे मूळ धाग्यात जरी चूक असेल तरी प्रतिसादातून लोकांना उत्तम माहिती मिळायची. कुठेच हमरातुमरीवर येत नसत. मॉडरेशनला सुद्धा पैकीच्या पैकी गुण द्यायला हवेत. भावनिक लोकांना तिथे अजिबातच वाव नव्हता. कित्येकदा तर चुकीच्या गृहीतकांवर आधारीत चर्चा सुरू झाल्यानेच नेमकी माहिती बाहेर येत असे.

इथे पण उदय, ब्लॅककॅट, आ.रा.रा. , भरत., झम्पू दामलू, कंसराज वगैरे मंडळींनी खूप संयत आणि माहितीपुर्ण प्रतिसाद देऊन आजवर खूपदा खोट्यांच्या माथी गोटा हाणला आहे अन त्यामुळे इतरांसमोर खोट्याचा किटाळ दूर होऊन खर्‍याचा झळाळ दिसला आहे.

तसेच जिज्ञासा, फारएण्ड, वीरू, हर्पेन वगैरे मंड्ळींनीही वास्तवाचे भान बर्‍याच जणांना करून दिले आहे.

आडनावाचा फायदा घेऊन थातुर-मातुर ठिकाणी पाट्या टाकण्यासाठी चिकटलेल्या महान कार्य करणार्‍यांपेक्षा ते उच्चच आहे म्हणा..!! Proud

पण मूळ आयडीने संयत प्रतिसाद देऊन खरे रूप ड्युआयडीद्वारे काढण्याची सोय उपक्रम व मानबिंदू वर नव्हती. खरे तर ड्युआयडी काढलाच तर चिखलफेक हा उद्देश तिथे साध्यच होऊ शकत नव्हता म्हणून प्रशासनाला शंभरपैकी शंभर गुण द्यावे लागतात.

"दुसऱ्याने माझ्याशी जसे वागणे मला आवडते, तसे मी इतरांशी वर्तन करणे" आणि "इतरांनी माझ्याशी जसे वर्तन केलेले मला आवडणार नाही, तसे वर्तन मी इतरांशी करणार नाही" हा विवेकी मानवी व्यवहाराचा निकष असतो. - डॉ. दाभोळकर

^^^ असे सुविचारमय वातावरण मायबोलीवर आहे काय ?
कथेच्या क्षेत्रातल्या ज्या आयड्यांनी राजकारणात भाग घेतलेला नाही त्यांना मग त्रास नव्हता व्हायला पाहीजे.

"दुसऱ्याने माझ्याशी जसे वागणे मला आवडते, तसे मी इतरांशी वर्तन करणे" आणि "इतरांनी माझ्याशी जसे वर्तन केलेले मला आवडणार नाही, तसे वर्तन मी इतरांशी करणार नाही" हा विवेकी मानवी व्यवहाराचा निकष असतो. - डॉ. दाभोळकर>>>>>>>> हेच तर लोकांना आवडत नाही. मग ते लेखक असो वा वाचक. मान्य आहे टाळी एका हाताने वाजत नाही. अफगणिस्तानच्या धाग्यावर गांधी नेहेरु यांना लेखकाने आवताण देऊन आणले तसे दुसर्या पार्टीने ( यात एकच व्यक्ती समाविष्ट आहे, अख्खी मायबोली वा या बाफावरचे वाचक नाहीत) लेखकाच्या हेतू व मित्रांवर संशय घेऊन लेखका वर अविश्वास दाखवला हे पाहीले गेले नाही का? की मुद्दाम दुर्लक्ष केले गेले?

गांधी व नेहेरु ना या धाग्यावर आणणारे लेखक जितके जबाबदार तितकेच प्रत्येक ठिकाणी दुसर्‍यावर अविश्वास दाखवणारी व्यक्ती पण जबाबदार ! कसे ते सांगते.

एका वाहत्या बाफावर मी म्हणजे रश्मीने लिहीले की मा वसंतदादा पाटील हे कसे चांगले, प्रामाणीक व लोकमान्य नेते होते. त्यांनी आपल्या पदाचा अहंकार न बाळगता आपल्या गावच्या व इतर जुन्या मित्रांची जाण ठेऊन त्यांना मदत केली. तर मला विचारले गेले की फडणवीसांनी अशी कधी मदत केली आहे का? तर मी लिहीले की हो पेपर मध्ये बातमी होती की वर्ध्याच्या एका व्यक्तीला बेड मिळत नव्हता, परीस्थिती गंभीर होती. तेव्हा त्याच्या मित्राने फडणवीस व एका नगरसेवाकाचा नंबर शोधुन काढुन त्यांना फोन केला, तेव्हा फडणवीसांनी संबंधीत हॉस्पिटलला फोन करुन विनंती केली की त्या माणसाला अ‍ॅडमीट करुन योग्य ते उपचार द्या. हे वाचल्यावर मग बघा, बघा, फडणवीसांनी कसा त्यांच्या पदाचा गैरवापर करुन त्या माणसाला मदत केली. त्यांची चौकशी केली पाहीजे. त्या प्रकरणा ची चौकशी केली पाहीजे की लोकांना बेड मिळत नाही, मग याला कसा मिळाला ब्ला ब्ला ब्ला..

मी वाचुन थक्क झाले. इतका डब्बल ढोलकी पणा? पाटील म्हणले की समाजाचा माणुस म्हणजे त्याच्या बाजूने आणी फडणवीस म्हणले की तो तडफडणवीस, बामन वगैरे वगैरे? अरे इतक्या खालच्या पातळीवर जाता तुम्ही लोक? लोकप्रतिनीधी हा कोणत्याच जाती धर्माचा नसतो, त्याला लोकांसाठी रात्री अपरात्री जावे लागते. त्याच्या कडे मदत मागणार्‍या लोकांची तो लोकप्रतिनीधी कधीच जात पहात नाही, आणी पाहु पण नये. तुला याच श्रीमंत गरीब लोकांनी निवडुन दिले आहे ना? हा फरक तुमचे मित्रच करतात आणी वरुन इथले मायबोलीकर वाचक लेखकाला दोष देतात, लेखात गांधी नेहेरु का आणता म्हणून ! अरे लेखक चूकला, त्याने पण त्याची बाजू सांगीतली. आणी मला वाटते लेखकाने पण झाले गेले विसरुन पुढे लिहायला पाहीजे.

अरे इतक्या खालच्या पातळीवर जाता तुम्ही लोक?
तुम्ही कुठे कुठे, किती किती आणि कसे कसे खालच्या आणि एकदम हीन पातळीवरचे लिहिले आहे हे भरपूर ठिकाणी ह्याधीच सांगून झाले आहे. इथे ही उत्साहाने सांगितले असते पण लेखक आधीच मायबोली सोडून गेला आहे तर त्याचा धागा कशाला धगधगत ठेवायचा.

दुसऱ्याने माझ्याशी जसे वागणे मला आवडते, तसे मी इतरांशी वर्तन करणे" आणि "इतरांनी माझ्याशी जसे वर्तन केलेले मला आवडणार नाही, तसे वर्तन मी इतरांशी करणार नाही" हा विवेकी" मानवी " व्यवहाराचा निकष असतो. - डॉ. दाभोळकर

- सहमत.

तुम्ही कुठे कुठे, किती किती आणि कसे कसे खालच्या आणि एकदम हीन पातळीवरचे लिहिले आहे हे भरपूर ठिकाणी ह्याधीच सांगून झाले आहे. इथे ही उत्साहाने सांगितले असते पण लेखक आधीच मायबोली सोडून गेला आहे तर त्याचा धागा कशाला धगधगत ठेवायचा.>>>>>>> बाळ झंपु, जरुर लिही. त्या आधी हे पण लक्षात घे की उत्तराला प्रती उत्तर मिळाले आहे.. सुरुवात ज्याने केली त्याला ते उत्तर दिले गेले आहे. तुला झोंबायचे काहीच कारण नाही. जिथे चूक आहे तिथे मी बोलणार. माझे च्कले तर तू उदाहरणा सकट दाखवुन दे. आणी तसेही मी लोकप्रतिनीधीविषयी बोलतेय. हे फडणवीस, वसंतदादा सोडाच, अजून एक पाटील साहेब आहेत ज्यांनी सरकारी वाहनाचा देखील स्वतःसाठी वापर केलेला नाही. बातमी मिळु दे मग लिहीन योग्य ठिकाणी. हे एकमेव असे लोकप्रतिनीधी असावेत पं शास्त्रीजींनंतर.

असो.

कधी कधी मला आश्चर्य वाटतं कि इथे दोन चार वाक्याने मनःशांती भंग होणारे, रुसून फुगून लेखन बंद करणारे खऱ्या आयुष्यात समस्यांना कसे तोंड देत असतील.

सहमत!

कधी कधी मला आश्चर्य वाटतं कि इथे दोन चार वाक्याने मनःशांती भंग होणारे, रुसून फुगून लेखन बंद करणारे खऱ्या आयुष्यात समस्यांना कसे तोंड देत असतील.
सहमत

कदाचित अगदी हा असाच अनुभव खर्‍या आयुष्यात येत नसेल. खर्‍या आयुष्यात एक ईज्जत मिळत असेल. खर्‍या आयुष्यात आपल्या मताला एक मान असेल. खर्‍या आयुष्यात कोणाला आपले मत पटले नाही तरी समोरच्याने ते खोडून काढतानाची पद्धत वेगळी असेल. वा तुझे मत तुझ्यापाशी, माझे मत माझ्यापाशी म्हणून सोडून देत असतील.

ईथे मायबोलीसारख्या पब्लिक प्लॅटफॉर्मवर काही लिहील्यावर त्यावर अनोळखी लोकांकडून बेपर्वाईने होणारी टिका झेलणे आणि फेसबूक फ्रेंडलिस्टसारखे तू मला लाईक कर, मी तुला लाईक करतो यासारखे समोरून एकमेकांशी गोडगोड बोलायचे जे खरे आयुष्य असते त्याची तुलना करणे अयोग्य आहे असे मला वाटते.

ईथे आपल्या ईमेजची पर्वा न करता प्रतिसादांत कचाकचा भांडणारे देखील आपल्या खर्‍या आयुष्यात कोणाशी असे कचाकचा भांडत असतील याची शक्यता कमीच.

यावर एक वेगळा धागा काढतो. सध्या त्या पुरणपोळीच्या धाग्यावरून एक विचार डोक्यात घोळत होताच.

ऋन्मेष, प्रतिसाद पटला.

इथून दहादहादा हाकलून दिलेला आयडी परत इथेच येतो..... प्रत्यक्षात तो इतका अपमान सहन करत असेल का? इतकी लाचारी दाखवत असेल का? नक्कीच नाही
त्यामुळे ही तुलनाच अव्यवहार्य आहे!

"दुसऱ्याने माझ्याशी जसे वागणे मला आवडते, तसे मी इतरांशी वर्तन करणे" आणि "इतरांनी माझ्याशी जसे वर्तन केलेले मला आवडणार नाही, तसे वर्तन मी इतरांशी करणार नाही" हा विवेकी मानवी व्यवहाराचा निकष असतो. - डॉ. दाभोळकर >>> हर्पेनजी कोणत्याही महान व्यक्तीचे महान वक्तव्य हे योग्य संदर्भातच मांडणे योग्य असते. संदर्भ सोडून किंवा असंबद्ध रित्या वक्तव्य पेस्ट करून जाण्याने नेमका काय परिणाम साधला जातो हे माझ्यासारख्या मूढ व्यक्तीला समजत नाही.

मग हे वक्तव्य ज्यांनी काहीही न करता त्यांच्या वाट्याला न आवडणारे प्रसंग आले तेव्हां कुठे आणि का लपले होते असे प्रश्न पडतात.
उदाहरणार्थ - इथे शशिराम, शक्तीराम, खान ९९ अशा नावांनी वैचारीक विरोधकांना शिवीगाळ झाली. मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. कारण त्याच व्यक्तीने मला अमूक एक आयडी आवडतच नाही असे सांगितले होते. या आयड्यांकडून सातत्याने शिवीगाळ होत असताना प्रशासनाने डोळे मिटून घेतलेले होते. जोपर्यंत तो आयडी अस्वस्थ होऊन प्रत्त्युत्तर देत नाही तोपर्यंत प्रशासन ढिम्म होते. आणि जेव्हां त्या आयडीने प्रत्त्युत्तर दिले तेव्हां दोन्हीकडे कारवाई करतोय असे दाखवत दोन्ही आयडी उडवले गेले. हे एक उदाहरण. असे अनेकदा झालेले आहे.

गंमत म्हणजे अशा वेळी तुमचे चुका दाखवून देण्यासाठी नेमणूक केल्याचा आव आणणारे भरत , व्यत्यय आणि फिल्मी गप्प होते. म्हणजे यांचा या शिवराळ आयड्यांना विरोध नाही किंवा सरळ पाठिंबा होता का ? कारण बथोवन या आयडीनेही इथे महिलांना अश्लील शेरेबाजी केली. तेव्हांही प्रशासन हलले नव्हते. तक्रार सुद्धा करायला लाज वाटेल अशा हीणकस कमेण्ट्स होत्या. तेव्हांही आपले भरत, व्यत्यय आणि फिल्मी गप्प होते. ज्या आयड्यांनी या बिथोवन च्या विरोधात तक्रार केली त्याच्या विरोधात मात्र भरत, व्यत्यय आणि फिल्मी यांनी आघाडी उघडली. हे मला अजूनपर्यंत समजलेले नाही.

असे प्रकार जिथे होतात तेव्हां आपणही कुठे नसता याचे वैषम्य वाटते. किंवा अशा प्रसंगात या वक्तव्याचा कसा अर्थ लावावा हे मला समजत नाही. बिथोवनच्या या कृतीचा कुणाच्या आवडीनिवडीशी संबंध होता किंवा कुणी काय केले म्हणून ते समर्थनीय ठरत होते ?

धाग्याच्या विषयासंदर्भात - बरेच दिवस मायबोलीवर नसल्याने नेमका प्रकार ठाऊक नव्हता. लेखकांची अनेक मतं पटण्यासारखी नाहीत. पण तिथे अचूक माहिती संदर्भासहीत देणे शक्य होते. त्यासाठी टोचून बोलणे गरजेचे नाही. लेखकाचे माहितीस्त्रोत दूषित असतील किंवा कदाचित त्याला ऐकूनही घ्यायचे नसेल. पण एकदा अचूक माहिती दिली कि सूज्ञ वाचक कोणती माहिती घ्यायची याचा निर्णय घेऊ शकतात. ज्यांची ओढ पूर्वग्रहदूषित माहीतीकडे आहे त्यांनी काय करावे हे सूज्ञांनी ठरवू नये. त्यासाठी सतत एकमेकांवर वैयक्तिक हल्ले करण्याची आवश्यकता काय आहे ?

लेखकानेही अचूक माहिती संयत शब्दात आल्यास ऑफेण्ड होऊ नये. अर्थात संयत शब्दात चुका दाखवून देणे दुर्मिळच झाले आहे. चावे काढून माहिती दिल्याशिवाय ती माहिती अचूक होत नाही असा समज इथे झालेला आहे.

मुळात इथे राजकीय कंपू आहेत आणि ते आपापल्या सोयीने सर्व धाग्यांकडे पाहतात. त्याप्रमाणे एखाद्याला नामोहरम करणे, एखाद्याला आमच्या मालकीच्या मायबोलीवर का आलास म्हणून बाद ठरवणे, राजकीयसामाजिअक्क, धार्मिक कारणे मिळाली नाहीत तर वैयक्तिक सवयींचे गुन्हेगारीकरण करून पेश करणे असे राजकीय पक्षांच्या आयटीसेल ने शिकवलेले धंदे इथे करत राहतात. टोळीमुळे एकेकट्या आयडींना एकटे पाडून त्यांना नामोहरम करणे सोपे जाते . या आयड्यांना खरंच सत्याची किंबा नीतीमत्तेची चाड असते तर शिवीगाळ करणा-या आयड्यांना त्यांनी त्याच वेळी थांबवले असते. महिलांना अश्लील शेरेबाजी करणा-या आयड्यांना थांबवले असते. पण तसे ते करत नाहीत. कारण त्यात त्यांना इंटरेस्ट नसतो.

Pages