सगळ्यांनाच,
द्वेष हा शब्द इतका स्वस्त झालाय, की एखाद्या आवडत्या नेत्याविरुद्ध समोरचा पूर्ण तारतम्य बाळगून सभ्य भाषेत व्यक्त झाला तरी तो थेट दवेष्टा ठरवला जातो. समोरच्या व्यक्तीला पुरावे देणं बंधनकारक असतं, त्याने त्याच्या एकेका शब्दाला पारखून घेऊन त्याची तज्ञ ( ? ) लोकांकडून शहानिशा करून मगच लिहायचं असतं पण त्याच्याकडून ही अपेक्षा ठेवणारे मात्र मोकाट सुटू शकतात, काहीही लिहू शकतात आणि वैयक्तिक पातळीवर गलिच्छ शब्दात अतिशय असंवेदनशील शब्दात काहीबाही लिहूही शकतात....
कालपासून प्रतिक्रियांमधून काही स्वघोषित जागले ज्या पद्धतीने पद्धतशीरपणे चिखलफेक करत आहेत ते बघून एक जाणवलं, की चार गोष्टींची माहिती मिळवून त्यावर लिखाण करण्याचा अट्टाहास करणं ही स्वतःची शक्ती आणि वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. आयुष्यात झुरळसुद्धा न मारू शकलेले लोक सावरकरांना वाट्टेल ते बोलू शकतात ( आणि तेही पुरावे ना देता ) , बाजीरावांबद्दल अफगाणी माणूस चार चांगले शब्द बोलत असेल तरी काहींच्या पोटात कालवाकालव होते आणि ते लोक थेट अफगाणी लोकांना तोंड सोडून बोलण्याइतके खालच्या पातळीवर येतात, स्वतः चार पुस्तकं वाचण्याची तसदीही न घेणारे समोरच्याकडून निर्लज्जपणे पुरावे मागत राहतात ( सगळं हातात आयतं हवं हा कोडगेपणा आणि ते मिळूनही शेवटी दुसरी बाजू बघायची इच्छा नाहीच....) , विकिपिडिया/व्हॉट्सॲप/फेसबुक नामक महाविद्यालयांमधील माहितीवर उड्या मारतात पण चार पैसे खर्च करून एखाद तास वाचनालयात घालवत नाहीत आणि शेवटी हेच उपटसुंभ ' आपल्याकडे चांगले लेखक नाहीत, आपल्याला साहित्यातले आंतरराष्ट्रीय सन्मान मिळूच शकत नाहीत ' असले अकलेचे तारे तोडतात.
असो, मायबोली वर यापुढे मला लिहिण्याची इच्छा नाही. काल माझ्या अफगाणी मित्रांबद्दल ' अफूचा चहा पिऊन बरळणारे ' अशा गलिच्छ शब्दात बोलणाऱ्या विकृत लोकांसाठी मी यापुढे लिहू शकत नाही. आजवर मी जे काही इथे लिहिलं, तेही मायबोलीच्या admin ने delete करावं ही माझी त्यांनाही विनंती आहे! अलविदा.
शांत माणूसजी, बरोबर आहे तुमचे
शांत माणूसजी, बरोबर आहे तुमचे म्हणणे.
मायबोलीवर लाईक डिसलाईक ची
मायबोलीवर लाईक डिसलाईक ची सुविधा असावी...
लेखाला प्रतिसाद दिला तर तो प्रथम लेखकाला दिसावा, त्यांनी approve केला तर जनतेला...
लेखकाला प्रतिसाद डिसेबल करण्याची सुविधा असावी...
बऱ्याच दिवसांनी माबो वट आलो,
बऱ्याच दिवसांनी माबो वट आलो, तुमचे लिखाण वाचले नाही, पण लेखन टॅब खाली विपुल लेखन केलेले दिसत आहे,
आणि मी जातो सांगणाऱ्या धाग्याला 75 80 प्रतिसाद मिळतात म्हणजे चांगले लिहीता याची पावती आहे.
पण मग "मी जातो " म्हणून सांगायची गरज का वाटावी?
म्हणजे नक्की हेतू काय?
- तुम्हाला ट्रोल करणाऱ्या id ला बघ मी किती लोकप्रिय आहे हे ठणकावून दाखवणे हा हेतू आहे का?
-की तुम्ही माबो वर बरीच व्हॅल्यू अडिशन केली आहे म्हणून अडमीन ने तुमची बाजू घेऊन त्या id ना उडवावे/समज द्यावी असे वाटते?
- की केवळ इगो स्ट्रोकिंग?
"मी मेले की कळेल" म्हणणारी गांजलेली गृहिणी, " मी रिझाइन करतो म्हणजे कळेल" म्हणणारा कर्मचारी, आणि "मी माबो वर लिहिणे थांबवतोय" म्हणणारा सभासद जवळपास सारखेच वाटतात.
लिहिणे थांबवायचे की नाही, हा सर्वस्वी तुमचा निर्णय , तो तुमचा तुम्ही घ्यावात, आणि त्यावर ठाम रहावे, तुम्हाला योग्य निर्णय घेण्यासाठी शुभेच्छा.
सगळ्या शक्यता एकाच बाजूच्या
सगळ्या शक्यता एकाच बाजूच्या आणि नकारात्मक लिहून त्यावरूनच निष्कर्श का मांडत आहात सिंबा? ते देखील त्यांचे लिखाण वाचले नसताना आणि काय झाले हे माहीत नसताना...
कदाचित जाताजाता आपल्यावर जो अन्याय झालाय असे त्यांना वाटते त्याविरोधात आवाज उठवावा, मी नाही लढू शकलो पण ईतरांनी सावध व्हावे वगैरे विचारही असू शकतो एखाद्याचा.
हे मी या प्रकरणाबाबत असे म्हणत नाहीये पण ""मी माबो वर लिहिणे थांबवतोय" म्हणणारा सभासद" असे आपण सरसकटीकरण केले म्हणून म्हटले.
समस्त मायबोलीने ट्रोल म्हणून
समस्त मायबोलीने ट्रोल म्हणून हिणवल्यानंतर जुन्या जुन्या मित्रांना मदतीला बोलावले जात आहे
मला "हा मी चाललो..." म्हणून
मला "हा मी चाललो..." म्हणून पब्लिकली सांगायची आवश्यकता काय हे जाणून घेण्यात इंटरेस्ट आहे फक्त,
त्यांना xyz id ने वाईट ट्रोल केले असे समजून चालू,
ज्या अर्थी xyz अजून माबो वर आहे त्या अर्थी त्याने वैयक्तिक लिहिले नसावे अन्यथा अडमीन नि id उडवला असता.
आणि भले अडमीन ने xyz उडवला तरी तो abc बनून परत येऊन दुप्पट ट्रोल करू शकतोच.
सो one has to live with that troller
मग आपल्या फॅन बेस कडून ट्रोल id वर दबाव आणायचा प्रयत्न आहे का? की या नका जाऊ म्हणणाऱ्या लोकांपैकी कुणी पुढे येऊन xyz बरोबर नो ट्रोल्लिंग चा करार करून देणार आहे?
तुम्हाला ट्रोल झाल्याबद्दल वाईट वाटतेय, ok, मी समजू शकतो,
थोडे दिवस शांत रहा, लोकांनी खरेच मिस केले तर चौकशी करतील,
इकडचे लोक वाईट्ट आहेत, आणि म्हणून मी चाललोय हे सांगणे is very childish.
*लिखाण वाचले नाही = सगळे लिखाण वाचले नाही, अफगाणिस्तान लेख त्यावर झालेली झकाझकी वाचली आहे
मी जातो सांगणाऱ्या धाग्याला
मी जातो सांगणाऱ्या धाग्याला 75 80 प्रतिसाद मिळतात म्हणजे चांगले लिहीता याची पावती आहे. >>> हो
लिहिणे थांबवायचे की नाही, हा सर्वस्वी तुमचा निर्णय , तो तुमचा तुम्ही घ्यावात, आणि त्यावर ठाम रहावे, >>> ठाम वगैरेचीही गरज नाही. हा काही लग्नाचा, घर घेण्याचा वगैरे निर्णय नव्हे. वाद झाले त्यावेळेस आता मी तेथे जाणारच नाही असे वाटले. नंतर पुन्हा विचार केल्यावर, लोकांचे प्रतिसाद पाहून निर्णय बदलला - यातही काही चुकीचे नाही
तसेही सोडून गेलेले अनेकजण पुन्हा आयडी बदलून येतातच की
>>>>. नंतर पुन्हा विचार
>>>>. नंतर पुन्हा विचार केल्यावर, लोकांचे प्रतिसाद पाहून निर्णय बदलला - यातही काही चुकीचे नाही Happy>>>
यालाच उद्देशून होते ते,
इतके लिखाण करणारा माणूस, लिखाण थांबवतो म्हणतो तेव्हा ते विधान त्याने पुरेश्या विचाराने, सर्व बाजूचा विचार करून केलेले असते असे मी मानतो. प्रतिसादातून एखादा नवीन मुद्दा समोर यायची शक्यता खूप कमी असते.
त्यामुळे प्रतिसाद वाचून/लोकांचे प्रेम बघून विचार बदलला या सारखे cute वाक्य दुसरे नाही.
निर्णयावर ठाम राहा म्हणजे तुम्हाला जे वाटतंय तेच करा, निदान time being तरी.
तुम्हाला मनस्ताप झालाय, तर तो निवे पर्यंत time आऊट घ्या, लोकांनी "जाऊ नका म्हंटले " म्हणून अस्थिर मन घेऊन थांबू नका, त्याने जास्त कोंडमारा होईल. मनात कडवटपणा ठेऊन तुम्ही उद्या ट्रोल id बरोबर भांडत बसलात तर आज थांबवणारे id कामाला येणार नाहीयेत, त्या भांडणात तुमचाच id उडेल.
Time आऊट घेणे is perfectly alright,
फक्त तो "मी लिहिणे थांबवतोय " वगैरे स्टँड न घेता घेतला तर परत येणे त्यांच्या साठी सोपे जाईल.
आणि अर्थात सोडून गेलेले /उडवले लोक ID बदलून येतातच लिहायला, त्यावरअजून तरी उपाय सापडला नाहीये.
आणि हो, हे मागचे 2 3 प्रतिसाद
आणि हो, हे मागचे 2 3 प्रतिसाद फक्त या id ला उद्देशून नाहीयेत
"हा मी चाललो..." स्टँड घेनाऱ्या सगळ्याच id बद्दल आहे.
100
100
अफगाणिस्तान झकाझकीबद्दल पण
अफगाणिस्तान झकाझकीबद्दल पण चार शब्द येऊद्या की सिम्बा
इकडे चाललीये तितकी पुरे नाही
इकडे चाललीये तितकी पुरे नाही का?

उगा बायडेन , मी चाललो म्हणतो त्याच्यावर कशाला घसरायचे
तसं नव्हे पण तुला बराच वेळ
तसं नव्हे पण तुला बराच वेळ दिसतोय असं वाटलं म्हणून म्हटलं
*लिखाण वाचले नाही = सगळे
*लिखाण वाचले नाही = सगळे लिखाण वाचले नाही, अफगाणिस्तान लेख त्यावर झालेली झकाझकी वाचली आहे Happy
>>>>>
बरेचदा एखाद्या धाग्यात फायनल चकमक घडली असते, पण त्यामागे ईतर धाग्यांवर घडलेल्या घटनांचीही पार्श्वभूमी असू शकते.
बरेचदा फायनल चकमकीत धाकाकर्ता आपला संयम गमावलेल्या स्थितीत सापडतो, पण त्या आधी तो ईतर धाग्यांवर ट्रोल झाले असताना त्याने संयम बाळगले असण्याची शक्यता असते.
हे याच केस बद्दल नाही तर ईन जनरल म्हणतोय की तात्कालिक घटना बघून कोण चूक आणि कोण बरोबर याचा निर्णय घेऊ नये.
ज्या अर्थी xyz अजून माबो वर आहे त्या अर्थी त्याने वैयक्तिक लिहिले नसावे अन्यथा अडमीन नि id उडवला असता.
>>>>>>>
हे अजून एक गृहीतक सिम्बा
वैयक्तिक न लिहीताही ट्रोल करता येते हे जर मायबोलीवर ईतक्या काळाने समजले नसेल तर काय समजले
असो,
तुम्ही लिहिलेल्या शक्यता मी नाकारत नाहीयेच, पण त्या एकच बाजूच्या वाटल्या. विचार दोन्ही बाजूंनी व्हावा ईतकेच.
धागाकर्त्याने त्या धाग्यावर गांधी-सावरकर प्रतिसादांत आपला राजकीय कल देखील दाखवला आहे. त्यामुळे आता सिमिलर राजकीय कल असणारे त्याच्या बाजूने तर विरोधी विचार असणारे विरोधात जाणे हा प्रकार देखील या धाग्यावर बघायला मिळण्याची शक्यता आहे.
मी सामान्य वाचक आहे. महात्मा गांधी तसेच गांधीगिरी यांना मी स्वतः प्रचंड मानतो. त्यामुळे धागाकर्त्यांचे तेथील विचार मलाही पटले नव्हतेच. पण मला त्या वादात रस नव्हता. अफगाण मालिका वाचायची ईच्छा होती. म्हणून हा वाद झाल्याने लेखमालिका थांबली त्याचे वाईट वाटले ईतकेच.
आणि हो, चूक कोणाची का असेना पण ईथे सक्रिय असणारा आणि लेखनातून योगदान देणारा एखादा आयडी जात असेल तर त्याने जरूर जाताना धागा काढूनच जावे, आणि त्याच्या जाण्याच्या कारणांवर जरूर चर्चा व्हावी असे मला एक मायबोलीकर, मायबोली परीवाराचा हितचिंतक म्हणून वाटते. जर धागाकर्ता चुकला असेल तर त्यातून ईतर धागाकर्ते काही शिकतील, जर प्रतिसादक चुकले असती तर आपण सर्वच आत्मपरीक्षण करू. हे दरवेळी व्हायला हावे.
ऋन्मेष.... बुल्स आय!
ऋन्मेष.... बुल्स आय!
Time आऊट घेणे is perfectly
Time आऊट घेणे is perfectly alright,
जे लोक मुळात एक दोन दिवस "स्टेप बॅक" करून विचार करण्यातले असतात ते मुळात असे सोडून बिडून जात नाहीत. त्यामुळे हा मी चाललो म्हणणे व नंतर शांत झाल्यावर फेरविचार करणे हे एकदम नॉर्मल आहे.
फक्त तो "मी लिहिणे थांबवतोय " वगैरे स्टँड न घेता घेतला तर परत येणे त्यांच्या साठी सोपे जाईल. >>> माझ्या दृष्टीने "हा मी चाललो" ही त्या टाइम आउट मधलीच रिअॅक्शन आहे
आणि अर्थात सोडून गेलेले /उडवले लोक ID बदलून येतातच लिहायला, त्यावरअजून तरी उपाय सापडला नाहीये. >>> मी ही तो प्रॉब्लेम आहे अशा अर्थाने लिहीलेले नाही. येउन नुसतेच ट्रोलिंग करणारे सोडले, तर बाकीचे येउ देत आले तर. माझा पॉइण्ट हा आहे, की तुम्ही निर्णय घेतलात, तो इथे लिहीलात, लोकांनी प्रतिक्रिया दिल्या. यावर थांबायचे, कायमचे जायचे, की जाउन दोन महिन्यांनी ही मजा इतरत्र नाही असे लक्षात आल्यावर पुन्हा यायचे - यातले काहीही करणे हा पूर्णपणे त्या त्या आयडीचा निर्णय आहे. फक्त हे करणारा आयडी त्याचा जितका मोठा समारंभ करेल तितके ते इतरांच्या दृष्टीने मजेदार होते.
हे द अर्बन नोमॅड यांच्याकरता स्पेसिफिकली नाही. त्यांनी मायबोली वर लिहीणे सुरू ठेवावे असेच मी इथे व त्या लेखावरही लिहीले आहे. हे वरचे गेल्या काही वर्षांमधल्या राजीनामा पॅटर्न्स बद्दल आहे.
चांगली मालिका आहे. लिहा
चांगली मालिका आहे. लिहा उरलेले भाग. ‘जायचं तर जा‘ म्हणणार्यांकडे लक्ष न देता ‘थांबा थांबा‘ म्हणणार्यांकडे लक्ष द्या.
बाजारू लोकांच्या कंमेंट्स
बाजारू लोकांच्या कंमेंट्स मनावर घेऊ नका,
पुरावे मागणारे हे कोण लागून गेले आहेत?
प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असू शकते, म्हणून काही विरोधी विचारसरणी ला जाती वर जाऊन हिनावणे ह्यात काही मोठे पण नाही. या बाजारू लोकांची लायकी काय आहे हे त्यांच्या कंमेन्ट वरूनच कळते.
बाजारू लोकांना ह्यात मोठे पणा वाटत असेल तर बोंबलत बसू द्या, नाही तरी तेच काम आहे त्यांचं.
वाद-प्रतिवाद नक्की करा , पण बाजारू लोकांना इग्नोर करा.
बाकी यांना घाण करण्याची जन्मजात सवय आहे, त्या मुळे तुमच्या धाग्यावर ते घाण करणारच, एकदा हाड म्हणायचं नाही तर बसू द्यायचं भूकत
चांगल्या लेखकांनी बाजारू लोकांना इग्नोर करावे व स्वतःचे लेखन चालू ठेवावे हि विनंती.
>>>>>फक्त हे करणारा आयडी
>>>>>फक्त हे करणारा आयडी त्याचा जितका मोठा समारंभ करेल तितके ते इतरांच्या दृष्टीने मजेदार होते.>>>
नेमके बोललात.
आहेत का अजून?
आहेत का अजून?
Pages