अलविदा !

Submitted by Theurbannomad on 18 August, 2021 - 02:28

सगळ्यांनाच,

द्वेष हा शब्द इतका स्वस्त झालाय, की एखाद्या आवडत्या नेत्याविरुद्ध समोरचा पूर्ण तारतम्य बाळगून सभ्य भाषेत व्यक्त झाला तरी तो थेट दवेष्टा ठरवला जातो. समोरच्या व्यक्तीला पुरावे देणं बंधनकारक असतं, त्याने त्याच्या एकेका शब्दाला पारखून घेऊन त्याची तज्ञ ( ? ) लोकांकडून शहानिशा करून मगच लिहायचं असतं पण त्याच्याकडून ही अपेक्षा ठेवणारे मात्र मोकाट सुटू शकतात, काहीही लिहू शकतात आणि वैयक्तिक पातळीवर गलिच्छ शब्दात अतिशय असंवेदनशील शब्दात काहीबाही लिहूही शकतात....

कालपासून प्रतिक्रियांमधून काही स्वघोषित जागले ज्या पद्धतीने पद्धतशीरपणे चिखलफेक करत आहेत ते बघून एक जाणवलं, की चार गोष्टींची माहिती मिळवून त्यावर लिखाण करण्याचा अट्टाहास करणं ही स्वतःची शक्ती आणि वेळ वाया घालवण्याचा प्रकार आहे. आयुष्यात झुरळसुद्धा न मारू शकलेले लोक सावरकरांना वाट्टेल ते बोलू शकतात ( आणि तेही पुरावे ना देता ) , बाजीरावांबद्दल अफगाणी माणूस चार चांगले शब्द बोलत असेल तरी काहींच्या पोटात कालवाकालव होते आणि ते लोक थेट अफगाणी लोकांना तोंड सोडून बोलण्याइतके खालच्या पातळीवर येतात, स्वतः चार पुस्तकं वाचण्याची तसदीही न घेणारे समोरच्याकडून निर्लज्जपणे पुरावे मागत राहतात ( सगळं हातात आयतं हवं हा कोडगेपणा आणि ते मिळूनही शेवटी दुसरी बाजू बघायची इच्छा नाहीच....) , विकिपिडिया/व्हॉट्सॲप/फेसबुक नामक महाविद्यालयांमधील माहितीवर उड्या मारतात पण चार पैसे खर्च करून एखाद तास वाचनालयात घालवत नाहीत आणि शेवटी हेच उपटसुंभ ' आपल्याकडे चांगले लेखक नाहीत, आपल्याला साहित्यातले आंतरराष्ट्रीय सन्मान मिळूच शकत नाहीत ' असले अकलेचे तारे तोडतात.

असो, मायबोली वर यापुढे मला लिहिण्याची इच्छा नाही. काल माझ्या अफगाणी मित्रांबद्दल ' अफूचा चहा पिऊन बरळणारे ' अशा गलिच्छ शब्दात बोलणाऱ्या विकृत लोकांसाठी मी यापुढे लिहू शकत नाही. आजवर मी जे काही इथे लिहिलं, तेही मायबोलीच्या admin ने delete करावं ही माझी त्यांनाही विनंती आहे! अलविदा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कृपया असे करू नका, तुमच्या सगळ्या लेखमालिका खूप चांगल्या आहेत, खूप नविन आणि चांगली माहिती मिळते. ट्रोलर्स कडे दुर्लक्ष करा आणि इथे प्लीज लिहीत रहा

खूप छान निर्णय. तुम्हाला तुमच्या बाकीच्या लेखामध्ये एवढ्या प्रतिक्रिया देताना पहिले नव्हते त्यामुळे तिथेही तुम्ही इग्नोर करू शकला असतात.

राजकारण/अश्या करंट विषयावर लेख आल्यावर त्यावर उलट सुलट प्रतिक्रिया येणारच.तो असा विषय आहे की प्रत्येकाच्या भूमिका ठाम आहेत.
तुम्ही लिहीत राहावे असे वाटते.तुमच्या लिखाणातून काहीतरी मिळते.मक्का वाली सिरीज वाचून बरीच नवी माहिती मिळाली.
कोण काय विचार करेल यावर आपला कंट्रोल नसतो, पण त्याने एक विचार मांडला म्हणजे सगळे लगेच ऐकतीलच असे नसते.आजच्या जगात every information is taken and received with pinch of salt.

Theurbannomad, तुमच्या मताशी सर्वजण सर्वकाळ सहमत असतीलच असे मानणेच भाबडेपणाचे आहे. गतकाळातील प्रत्येक महान व्यक्तीविषयी प्रत्येकाचे स्वतःचे असे मत असते. ते मत काय आहे यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यात काही फरक पडत नाही कारण ती व्यक्ती आपले विहीत कार्य करून गेलेली असते. दुसऱ्याच्या मतांनी विचलित होण्यापेक्षा आपण आपले विहीत कार्य निरपेक्ष बुद्धीने करत रहावे. हीरा यांनी लिहिलेल्या प्रतिसादात हे उत्तम पद्धतीने सांगितले आहे - प्राप्त काल हा विशाल भुधर, सुंदर लेणी त्यात खोदा!
तुम्हाला जर खरोखरच काही constructive लिखाण करायचे असेल तर आदराने व्यक्तीगत मतभेद मान्य करून पुढे जाण्यास शिकले पाहिजे. मी किती पुस्तके वाचली आणि म्हणून माझेच मत कसे योग्य आहे असे म्हणत argument करणार असाल तर you are already on the losing side! Try to be in a mental space where you can tolerate and coexist with opinions different from your own. जोपर्यंत व्यक्तीगत मते कोणालाही शारीरिक व मानसिक इजा पोहोचवत नाहीत तोपर्यंत ती मते असावीत असे वाटते. अशा अनेकविध मते आणि विचारधारांनी आपण समृद्ध होत असतो.
What kind of service are you doing to your Afgan friends by quitting? Take a break if you are too distracted by the arguments. If you leave Maayboli, know that it is your loss. याउप्पर तुमची मर्जी! शुभेच्छा!

कशाला असल्या ब्रिगेड्यांकडे लक्ष देताय? आणी त्यांच्या झिलतोड्यांना ते कधीच जातियवादी वाटत नाहीत. असल्याच प्रवृत्तीच्या लोकांनी दिनेशदा आणी जिप्सी सारख्या चांगल्या लोकांना मायबोली सोडण्यासाठी प्रवृत्त केले. ही चार- पाच सडकी टाळकी टोळधाडी सारखी येऊन इथे शिमगा करतात.

तुम्ही तुमची मालिका आमच्या साठी पूर्ण करा. या शेपुटघाल्यांना इथेच बसुन अरण्यरुदन करु दे.

https://www.loksatta.com/manoranjan-news/krk-tweet-on-afghanistan-crisis...

छे छे, असल्या बाजारबुणग्यांना वैतागून लिखाण का बंद करता? तुम्ही त्यांच्यासाठी लिहीत नाही, त्यांना उत्तरं देण्याची गरज नाही कारण त्यांना उत्तरं नको आहेत केवळ attention seeking करायचं आहे. असल्या उपद्रवींना शांतपणे टाळायचं.

जाण्याची अवशक्ता नाही.

पुरावे मागितले म्हणून अपमान वाटून घेण्यासारखे काही नाही. असतील तर द्यायचे, नसतील तर याला माझ्याकडे पुरावा नाही असे सांगायचे. वादग्रस्त विधानांना आधार ( पुरावा ) मागण्याचा वाचकांचा हक्क आहे आणि तो मान्य करणे कमीपणाचे नाही.

सावरकरांबद्दल मला पण एकेकाळी आदर होता... कारण मर्यादित वाचन होते. कालांतराने त्यांच्या बद्दलचे वाचन वाढले. अंदमानला पाय ठेवल्यानंतर केवळ दोन महिन्यातच माफी मागणे, पुढे अनेक वेळा माफी मागणे... आणि गांधी सारख्या महात्म्याला संपविण्याच्या कटांत सक्रिय सहभाग घेणे (" यशस्वी होऊन या ") . गांधी हत्येमधे त्यांच्या / महासभेच्या सहभागाबद्दल तत्कालीन गृहमंत्री वल्लभ भाई पटेलांचे लिखाण आहे, गोडसे यांनी केवळ ट्रिगर ओढले होते आणि (तात्यांना वाचविण्यासाठी) अपराधाची गुन्ह्याची संपुर्ण जबाबदारी स्विकारली होती. गांधी हत्येच्या कटांत आरोपी म्हणून फोटो बघितल्यावर मला मानसिक धक्का बसला होता (कारण कुणीही त्यांच्या माफीपत्रांबद्दल बोलत नाही - त्यांना माहित पण नसते).

जे जे सत्य आहे तेच पुराव्यांसकट लिहीत रहावे अशी विनंती.
माझ्या लिखाणामुळे तुम्हाला त्रास झाला असल्यास क्षमस्व.

मी म्हणतो की या विषयावर भरपूर लेख आणि माहिती जालावर येत आहे. पण ती इंग्रजीत आहे. मराठीमध्ये लिहिता आहे म्हणून वाचतो.
मी असं म्हणेन की जालावरच्या प्रकाशित झालेल्या लेखांच्या लिंकस देऊन ही लेख टाकता येईल. शिवाय गेल्या वर्षभरात आलेल्या पुस्तकांचा उल्लेख.
म्हणजे कुणाला काय अर्थ काढायचा तो काढू दे.

एकंदर ८० चाहते असणार्‍या आयडीने जातो.. जातो... करून हलवून खुंटा बळकट करण्याची काहीच गरज नाही.
आपले एवढे चाहते असताना अन स्वतः इतके अफाट लिखाण करत असताना अशा प्रकारे मायबोली सोडून जाणे उचित दिसत नाही. होतं कधीकधी वायव्यचं नैऋत्य. त्यात एवढं मनाला लाउन घेण्यासारखं काहीच नाही. तुम्ही मायबोली सोडून जाऊ नये हीच सदिच्छा.

Happy
Dj कस जमत बुवा तुम्हाला मी नाही त्यातली सारखं
Happy
मुद्दे पटले नाही तर गप्प बसा , धागे बंद पाडण्यासाठी अफूचा चहा कशाला करता ?

विकिपिडिया/ व्हॉट्सॲप/ फेसबुक नामक महाविद्यालयांमधील माहितीवर उड्या मारतात.
बरोबर.

पण पुस्तकात छापलं म्हणजे ते सगळं खरंच असं नाही. अनुज धर यांची पुस्तकं या गटात येतात. त्यांच्या लेखनाचाही प्रतिवाद झाला आहे.

काल माझ्या अफगाणी मित्रांबद्दल ' अफूचा चहा पिऊन बरळणारे ' अशा गलिच्छ शब्दात बोलणाऱ्या विकृत लोकांसाठी मी यापुढे लिहू शकत नाही. >> त्यांच्या साठी नका लिहु... इतर ८० जणांसाठी लिहा. काल त्याच धाग्यात कुणा मी_माणुस या आयडीने इतर आयडींना कुत्रा वगैरे बोललं आहे.. त्यांच्यासाठी तरी लिहा.. कदाचित ते विकृत वाटत नसावे.

जिज्ञासा आणि mi_anu यांच्या प्रतिसादांना अनुमोदन!
Theurbannomad, तुम्ही लिहित रहा. तुमचे लेख उत्तम असतात.
सर्वांनीच त्या त्या लेखाचा/ धाग्याचा विषय सोडून अवांतर प्रतिसाद दिले नाहीत तर चर्चा भरकटणार नाही.

मी अजून तुमची नवी मालिका वाचलेली नाही. पण ह्या लेखाचं शीर्षक वाचून मनात शंकेची पाल चुकचुकली. अफगणिस्तानवरच्या दुसर्‍या लेखावरच्या प्रतिक्रियांचा आकडा पाहून अंदाज आला. मी जिज्ञासा, भरत,उदय आणि mi_anu ह्यांच्या प्रतिक्रियांशी सहमत आहे. तुम्ही इथे लिहिणं थांबवणं हे ह्या असल्या ट्रोलर्सना प्रोत्साहन दिल्यासारखं झालं. तुमचं लिखाण जे मन लावून वाचतात त्यांच्यावर हा अन्याय आहे.

ह्या अश्या विषयांबाबत बर्‍याच लोकांना उत्सुकता असते पण मुद्दाम वेळ काढून वाचायला सगळ्यांना जमतंच असं नाही. ते वाचून वेळ खर्च करुन इथे आपल्या शब्दांत लिहिणं हे सोपं काम नाही. त्यावर केवळ त्रास देण्यासाठी उठवळ प्रतिक्रिया देणं तुलनेनं फार सोपं. ह्यावरून तुमच्यात आणि इतरांत असलेला फरक कळून येतो. समोरची व्यक्ती संयत शब्दांत आपली बाजू मांडत नसेल तर त्या व्यक्तीला एकदा उत्तर द्या - तेही तुम्हाला वेळ आणि इच्छा असेल तर. त्याउप्पर हुज्जत घालणं चालू ठेवलं तर गप्प बसा. भांडण दोन लोकांत होतं, नाही का? तीच व्यक्ती प्रत्येक लेखावर येऊन विनाकारण हुज्जत घालत असेल तर इग्नोरास्त्र मारा. आपलं हसं करून घ्यायची हौस असेल एखाद्याला तर होऊ देत मनासारखं.

लिहिणं थांबवू नका ही विनंती फक्त मी करू शकते. तुमच्या निर्णयाचा आदर आहेच.

स्वांतसुखाय म्हणुन लिहा.  कुपमंडूकाना अनुल्लेखाने फाट्यावर मारून लिहीत रहा. 

हर्पेन, हीरा  यांचा प्रतिसाद बघा. 

बाकी निर्णय तुमचा. तुमची मर्जी! शुभम् भवतु!

इतिहासाच्या काही बाबींवर प्रतिवाद केला तर बिघडले कुठे? तुम्ही म्हणाला की अब्दाली पानिपत युद्धानंतर भारतात आला नाही. ते पुराव्यानिशी शाबीत केलं की पानिपत नंतर तो ३ वेळा भारतात आला. त्यात राग येण्यासारखे काय आहे? तसेच तुमच्या बाकी sweeping स्टेटमेंट वर आक्षेप घेतला तर तुम्ही थयथयाट केला. अफगाणिस्तान विषय असलेल्या धाग्यावर गांधी कमी आणि सावरकर जास्त असले प्रतिसाद खुद्द लेखकानेच दिले तर त्याला प्रतिवाद होणारच. तुम्ही लिहिलेलं सर्व काही सत्य मानायला तुम्ही मोदी नाही आणि आम्ही भक्त नाही. तुम्ही स्वतः Bigot आहात का याचं पण परीक्षण करावं फावल्या वेळात.

योग्य निर्णय !
प्रतिसादांचा त्रास होत असेल तर ईथल्यापुरते लिखाण थांबवा.
मला ही लेखमाला वाचायची फार उत्सुकता आहे. पण तुम्हाला त्रास होत असेल तर माझ्या स्वार्थासाठी तुम्हाला हा त्रास झेलत थांबवणे स्वार्थीपणाचे ठरेल.

ईथे असे प्रतिसाद येतच राहणार आणि अश्या लिखाणावर येणे स्वाभाविक देखील आहे. ते चूक की बरोबर हे प्रत्येक प्रतिसादानुसार केस बाय केस बदलत जाईल. म्हणजे काही प्रतिसाद खरेच जेन्युईनपणे क्रॉस क्वेश्चन असतील, वाचकांचा तो हक्क राहील. तर काही वाहत्या गंगेत हात धुणारे, आणि तुम्ही ईथून जावे याच हेतूने दिलेले हिणकस असतील. जर तुम्हाला ते ते वेचून त्यानुसार डिल करता येत नसेल. आणि त्यामुळे तुमची मन:शांती ढळत असेल, मानसिक त्रास होत असेल, लिखाणातील आनंद हरवत असेल तर ईट्स ओके. मायबोली म्हणजे जग नाही. ईथे नका लिहू, पण कुठेतरी हे लिखाण पुर्ण करा जर तुम्हाला हे खरेच जगापर्यंत पोहोचवायचे आहे. आणि मग शक्य असल्यास एक करा. कुठे ही लेखमाला संपुर्ण लिहिल्यास त्याची लिंक जरूर द्या. वाचायला आवडेल. शुभेच्छा Happy

फारच वाईट झाले. तुम्ही पहिले नाही आहेत जे लिखाण बंद करत आहे अशा बाजारबुणग्यांना वैतागुन.
लिहिणं थांबवू नका ही विनंती.

नाझी पक्ष ज्यावेळी भरात होता त्यावेळी पण भारावून गेलेले कोणाच्याही ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हते आणि आता तीच परिस्थिती इथे आहे. तालिबान कडे सत्ता आल्यानंतर असे काही मेसेज फिरू लागले आहेत की विरोधकांना इथे आवडत नसेल तर व्हिसा शिवाय ५०००० मध्ये आलिशान घर मिळेल काबूल मध्ये. म्हणजे आता यांची मजल इथून निघून जा आणि तिकडे पाकिस्तानापासून अफगाणिस्तानला जा हे सांगेपर्यंत पोहोचली आहे.

तुम्ही मायबोली सोडून जाऊ नये असं वाटतं. तुमचे लेख कायमच आवडले. जगात सगळ्याच प्रकारचे लोक असतात मग मायबोली त्याला अपवाद कशी असेल.
तसंही दुसर्‍याचा मनाचा विचार करून तारतम्याने विचार मांडायचे दिवस आता राहिले नाहीत.
तरी सुद्धा निघून जाणे हा पर्याय योग्य नाही.

तुम्ही लिहित रहा हो!!
मायबोलीवरच्या चोखंदळ वाचकांना अश्याच दर्जेदार लिखाणाची ओढ असते.... बाकी ट्रोलर्स लोक सगळीकडे असतात..... त्यांच्या तोंडी अज्जिबात लागायचे नाही.
अनुल्लेखासारखा दुसरा अपमान नाही म्हणतात!

जिज्ञासाशी सहमत. राजकीय धाग्यांवर किंवा कोणत्याही पब्लिक धाग्यावर उलटेसुलटे प्रतिसाद येणारच. त्या प्रत्येकाशी किती "एंगेज" व्हायचे हे तुमच्यावर आहे. आणि त्यातूनही झाले थोडेफार वाद तर त्यातून लेखमाला बंद करणे/ मायबोली सोडून जाणे इतक्या टोकाला जायची गरज नाही.

Pages