शेअर मार्केट ब्रोकरचे अनुभव

Submitted by जागोमोहनप्यारे on 11 September, 2011 - 05:50

शेअर मार्केट ब्रोकरचे अनुभव

इक्विटी आणि एफ ओ साठी चांगला ब्रोकर कोणता? सध्या कमीत कमी ब्रोकरेज कोणाचे आहे?

आय सी आय सी आय चे अकाउंट सोपे, चांगले आहे. त्यांची कॉल ट्रेड सुविधापण चांगली आहे. पण ब्रोकरेज अगदी जास्त आहे.

एस एम सी मध्ये माझे अकाउंट होते. पण तिथले लोक न सांगताच आपल्या अकाउंटला ट्रेड करतात, असा मला तरी अनुभव आला होता.

बी एम ए वेल्थ क्रिएटर सध्या सगळ्यात कमी बोकरेज घेते असे ऐकून आहे. कुणाला काही अनुभव आहे का?

प्रिपेड ब्रोकरेजचा अनुभव कसा आहे? बर्‍याच जणांच्या त्याविषयी तक्रारी आहेत.

रिसर्च स्टडी चांगले देणारा ब्रोकर कोणता?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

MoneyPip is an Indian stock market advisory Blogger Website firm. It's proven month after month that trading and investing in stock market can be profitable whether market is bull or bear.As suggested last week our all client made a very good profit in the sell position of bankNIFTY.Free Intraday Trading Tips For Today. @ZeeBusiness Live Tv

Axisdirect चे अकाउंट उघडले , सगळे ऑन लाईन झाले , डेरिव्हेटिव्ह एकटीव्हेट व्हायला अजून 2 दिवस लागतील
पण मस्त वाटले, बाकी सगळे घरी बसूनच केले.

पण पारंपारिक पद्धतीची मार्केट वॊच लिस्ट दिसत नाही
हाच एक तोटा आहे

चार्ट , ग्राफही नाही
तसेही मला गरज नाही

ब्रोकर्ज कमी आहे म्हणे , ऑप्शन 10 की 20 रु

तसे झिरोदा मस्त आहे ,
पण मला मल्टीपल पोझिशन्स घेऊन प्रयोग करायचे असल्याने अजून एक हवे आहे,

झिरोदा मध्ये निफ्टी कॅलेंडर स्प्रेड केले आहे. आधी 2 महिने फक्त ग्राफ ट्रेक केले होते.

मग गेल्या महिन्यात सिंगल calendar spread केले होते , फक्त कॉल शॉर्ट केले होते, 2500 आले होते.

सध्या 3500 + आहे , , आता डबल calendar spread केले , कॉल व पुट दोन्ही शॉर्ट केले आहेत,

मग पुढच्या महिन्यात निफ्टी आणि रिलायन्स दोन्ही स्प्रेड.

Screenshot_2021-04-08-17-21-32-825_com.android.chrome.png

Axisdirect मध्ये रिलायन्स फाकवणार आहे Proud

Screenshot_2021-04-08-17-24-31-408_com.android.chrome.png

एका अकाउंटवर इंडेक्स आणि एकावर स्टॉक असे करायचा प्लॅन आहे.

हर्षद मेहता की जय ! Proud

आहे की Axis Direct ला.
तुम्हाला स्वतःची लिस्ट बनवायचे Options पण आहेत.
Swift Trade 2.0, 3.0 ला जाऊन पहा बरं.

आज axisdirect वर प्रथमच ट्रेड केले , मोबाईल वरून केले , मोबाईलवरून वेबसाईटचे पेजेस लवकर उघडत नाहीत
म्हणून एप डाउनलोड केले

दोन्ही तितकेच बेकार आहेत , एका क्लिकवर काहीच दिसत नाही , तीन तीन दा पुढे पुढे उघडावे मग स्वतःला हवे ते दिसते

स्प्रेड करायला मार्जिन कमी पडले , म्हणून एक पूट एकटाच बाय केला होता तो 10 रुत विकून टाकला 700 रु प्रॉफिट

Screenshot_2021-04-12-16-51-53-475_com.axis_.login_.png

घरी पीसीवर स्विफ्ट बघितले ते चांगले वाटले , पण मोबाईलवर सगळा भुलभुलैया आहे , काही सापडत नाही

झिरोदा मोबाईलवरपण मस्त दिसते

Axis direct payout बोंबाबोंब आहे

शेवटी कॉल सेंटरला फोन करून पे आउट करवला

आज शेवटचा गुरुवार , मार्केट 14800 ते 15100 मध्ये राहील असे पाहून 14800 चा पुट 13 ला आणि 15100 चा कॉल 20 ला विकला

शेवटी एक 10 पैसे झाले , एक 15 पैशे झाले

2500 प्लस
झेरोदा मध्ये केलेScreenshot_2021-04-29-15-45-07-863_com.android.chrome.png

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

काल अक्षय तृतीया , 14 तारखेपासून क्षय सुरू झाला व ईदच्या मुहूर्तावर 2500 हिरवे झाले.

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होतो वाढत जातो व आपल्या प्रीमियमच्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात.

Proud
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

पियापेटी झिरोदा मध्ये लांबचे ऑप्शन्स ट्रेड करणार नसाल तरच घ्या झिरोदा.
दुसरे असे की इन्ट्राडे करणार असाल तर त्यात ब्रॅकेट ऑर्डर नाहीय. BTST, स्विंग करणार असाल तर GTT आहे ब्रॅकेट करायला.
बाकी मस्त आहे झिरोदा.

ब्रॅकेट ऑर्डर टेम्पररी ब्लॉक आहे असा मेसेज अल्गो ट्रेडिंग करताना येतो. त्यामुळे काही दिवसात BO पुन्हा सुरु करतील असं वाटतंय.

ओके.

झिरोदात तुम्ही ट्रेड करा किंवा न करा , पण अकाउंट असणे आवश्यक आहे, त्यात ग्राफ बघणे , इंडिकेटर लावणे , ट्रेडिंग च्या वेळी वेगळ्या वेगळ्या ऑप्शन च्या किमती एकत्र वोच लिस्ट मध्ये बघणे , मार्जिन बघणे , इ साठी तुम्ही उपयोग करू शकता, ह्या गोष्टी इतर ब्रोकर कसे देतात माहीत नाही , axis मध्ये तर नाहीत
झिरोदाचे पे इन , पे आउट देखील वक्तशीर आहे

Axis चे DirectTrade, Swift Trade 3.0 वापरून पाहिले का?

शेअरखानचे Trade Tiger मस्त आहे. मी झिरोदावर ट्रेड घेतानाही Trade Tiger च वापरतो analysis, entry, exit, stoploss trail ला.

झिरोदात तुम्ही ट्रेड करा किंवा न करा , पण अकाउंट असणे आवश्यक आहे,
==. १०० % सहमत , charges including brokerage cheapest ....

Icici direct सर्वांत महागडे !!!! पण त्यांचे Daily, weekly reports are good one !!!

ICICI direct चा Neo plan आलाय ना?
त्यात इन्ट्राडे व ऑप्शन्स ला 20₹ पर ऑर्डर, फ्युचर्सला शून्य ब्रोकरेज वगैरे आहे.
माझा विचार आहे घ्यायचा. कोण neo plan वापरतय का, काय अनुभव आहे?

Pages