शेअर मार्केट ब्रोकरचे अनुभव

Submitted by जागोमोहनप्यारे on 11 September, 2011 - 05:50

शेअर मार्केट ब्रोकरचे अनुभव

इक्विटी आणि एफ ओ साठी चांगला ब्रोकर कोणता? सध्या कमीत कमी ब्रोकरेज कोणाचे आहे?

आय सी आय सी आय चे अकाउंट सोपे, चांगले आहे. त्यांची कॉल ट्रेड सुविधापण चांगली आहे. पण ब्रोकरेज अगदी जास्त आहे.

एस एम सी मध्ये माझे अकाउंट होते. पण तिथले लोक न सांगताच आपल्या अकाउंटला ट्रेड करतात, असा मला तरी अनुभव आला होता.

बी एम ए वेल्थ क्रिएटर सध्या सगळ्यात कमी बोकरेज घेते असे ऐकून आहे. कुणाला काही अनुभव आहे का?

प्रिपेड ब्रोकरेजचा अनुभव कसा आहे? बर्‍याच जणांच्या त्याविषयी तक्रारी आहेत.

रिसर्च स्टडी चांगले देणारा ब्रोकर कोणता?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ICICI direct चा Neo plan आलाय ना?
त्यात इन्ट्राडे व ऑप्शन्स ला 20₹ पर ऑर्डर, फ्युचर्सला शून्य ब्रोकरेज वगैरे आहे.
==> अरे व्वा , नवीन माहिती

धन्यवाद..

angel broking pan aahe na, te koni use kela ka?kay aahe experience

http://rmoneyindia.com

ह्यांचा फोन आला होता

ओ टी एम ऑप्शन्स वर रेस्त्रीक्शन्स नाहीत म्हणे
पर ऑर्डर 18 रु

झिरोदामध्ये आपला प्रॉफिट लॉस व्यवस्थित समजतो , अमुक एका कालावधीतील प्रॉफिट लॉस बघता येतो, 60 डेज चॅलेंजही आहे, axisdirect मध्ये असे काही सापडले नाही , खूप शोधल्यावर एका कोपऱ्यात एक लिंक दिसली , त्यावर फक्त टोटल प्रॉफिट लॉस येते

Axis चे पासबुक प्रिंट करायला गेलो , तर तिथले लोक बोलले, फार बाकी आहे , देणार नाही , मग कंपलेंट केली.

आज एकदम 4 बुके दिलीत !

अक्सिस डायरेक्त व ब्यांक अकाउंट लिंक आहे , आणि तिथे रोज सेविंग फंड ब्लॉक होते किंवा जमा होते.

I cici ला असे नव्हते , आपण फ़ंड अलोकेट केले की तिकडे जाते तिकडून सेविंगला विड्रॉ करावे लागते, मगच येते , त्यामुळे रोजचे पासबुक भरत नाही

Icici ला मग transaction charges पडतात का?

अगदी पुरातन काळी मी खालील ठिकाणी अकाऊंटे उघडली होती

जोइंडर - हे आम्ही शेअर पोझिशनल साठी वापरायचो , चांगली सर्व्हिस होती. फार फार वर्षांपूर्वी पेपरात एक वसंतराव पटवर्धन नावाचे गृहस्थ टीप लिहायचे, सकाळ , तरुण भारत , अर्थ साप्ताहिक इ मध्ये, त्यांनी लिहिलेले शेअर अगदी हमखास वाढायचे , 3 ते 6 महिन्यात , ह्या अकाउंटवर आयपीओ देखील घेत होतो. वर्षातून 5 आयपीओ , 2000 नफा दिले तरी 10000 सुटायचे ( रिटेल लिमिट 50000 होते), त्या काळात NTPC , TCS इ इ आले होते.

https://youtu.be/_tAftpredHE

ICICI - slow आणि costly म्हणून सोडले

कोटक सिक्युरिटी - चांगले होते , पण तेंव्हा इन्ट्राडे करणे ज्ञान नसल्याने समजत नव्हते म्हणून बंद केले होते.

यु त्युबवर अनेक व्हिडिओ आहेत, खालिल ब्रोकर डिस्काउण्ट देतात , ५०० ते १००० फिक्स ब्रोकरेज प्रति महिना

India bulls
DHANI
SAS Online
Prostocks
Tradeplus

झिरोदात नफा मस्त मिळत आहे, पण ब्रोकरेज फार जात आहे.

Pages