नवी मुंबई विमान तळास कोणाचे नाव द्यावे?

Submitted by अश्विनीमामी on 22 June, 2021 - 04:28

आता होउ घातलेल्या नवी मुंबई येथील विमान तळास कोणा चे नाव द्यावे हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

दि. बा. पाटील हे स्थानिक कार्यकर्ते व नेते ह्यांची माहिती खाली दिली आहे

दिनकर बाळू उपाख्य दि. बा. पाटील (जन्म : जासई-रायगड जिल्हा, १३ जानेवारी १९२६; मृत्यू : पनवेल, २५ जून २०१३) हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते.दि. बां.च्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. असे असून दि. बा. पाटील यांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनीदेखील दि. बां.च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला.

दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.

दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही. शेकापच्या साई ट वरही हीच माहिती उपलब्ध आहे. लहान पणी शेकाप निवडणुका निकालात फॉलो केलेली आहे. आमचे ओरिजिन शेतकरी व विस्थापित होउन पुण्यात त्यामुळे तेच ते जि वर्ड!!

आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला.

रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दि. बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

१९५७ – शे.का.प. चे मध्यवर्ती चिटणीस शे.का.प. च्या अनेक पदांवर कामे केली.

• १९५७-१९६२,१९६२-१९६७,१९६७-१९७२,१९७२-१९७७,१९८०-१९८४ – असे पाच वेळा विधानसभेवर निवडून आले.

• १९६०- पहिले हायस्कूल जासई गावात सुरु केले.त्यानंतर १० माध्यमिक शाळा सुरु केल्या.

• १९६७ ते १९७२ -महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष.

• १९७० – पनवेल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय स्थापन केले.

• १९७० पासून आजपर्यंत सिडको संग्राम चालूच आहे. १९८४ चा सिडको लढा देशभर गाजला. प्रकल्पग्रस्तांना “साडेबारा टक्के" चा लाभ झाला. अजूनही जे.एन.पी.टी. चा लढा चालू आहे.

• १९७२-१९७७- विधानसभेचे पक्ष प्रतोद. अंदाज समिती,लेखा समिती, उपविधान समिती, आश्वासन समिती आदि. समित्यांवर लक्षवेधी काम केले.

• १९८२-८३- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

• १९७४- पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.

• १९७५-च्या बेळगांव-कारावारसाठीच्या आंदोलनात ११ महिन्यांचा तुरुंगवास.

• १९७७-१९८४-खासदार म्हणून २ वेळा निवडून आले.

• १९९६ - महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता संसदीय पुरस्कार.

• “आगरी दर्पण” मासिकाचे नियमित प्रकाशन सुरु केले.

• म.फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही प्रचारक.

• आगरी कोळी कराडी अशा भुमीपुत्रांचे श्रध्दास्थान, मार्गदर्शक, लोकनेते. ह्या समाजातील अनिष्ट प्रथांबद्दल आवाज उठवून सुधारणेचा आग्रह त्यांनी धरला.

आदरणीय छ त्रपती शिवाजी महाराज चरित्र मराठी माणसाला माहीत आहे. आम्हाला चौथीच्या इतिहासात शिकायला होते

जे आरडी टा टा : मुंबई व भारतातील महत्वाचे उद्योजक व समाजकार्यातील अग्रणी. भारतातील एविएशन मध्ये त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचे औद्योगिक वारस श्री रतन टाटा हे ही एक माणूस म्हणून मला फार आदरणीयच वाटतात. काय करू स्वभाव दोष असावा. टाटा मेमोरीअल हॉस्पिटल, टीसीएस सारखी कंपनी ह्या मुळे खरेच जिव्हाळा वाट्तो.

अशी नावे चर्चेत आहेत व त्यामा गे प्रत्येक गटाचे मर्यादित राज कारण आहे. आपल्या देशात इतक्या बहु भा षा आहेत् व त्यात कितीतरी सुरेख शब्द आहेत. त्यातील एखादा सुद्धा देता येइल नाव म्हणून पण ते होणे नाही. तुमचे मत काय आहे या बाबतीत.

हा एअर्पोर्ट नक्की कधी तयार होईल
आमच्या हयातीत झाला तर बरे. किती वर्शे पुणे मुंबई करताना तो बोर्ड च पाहिला आहे.

संदर्भः शे का प. वेब साइट.
मराठी विकी पिडी आ.

उरण कर ह्यांचा प्रतिसाद डकवते आहे
विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे कधीही कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून दिलेले लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? कोरोना कळतय राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून जे प्रकल्प अजून कशात काय नाही त्यांच्या नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. तिथे का नाव नाही दिले जात?
काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर आपण सर्वजण करतोच.
आपण फक्त आता एक पक्ष चालवत नसून लोकशाही असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा साहेबांनी विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देत आहेत. अंतिमतः आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे?
आणि इथे जे म्हणतात ना की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले?

प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी, जमीन आमची म्हणून आमचेच नाव द्या, हे काही पटले नाही , जमिनिव्यतिरिक्त पैसा तंत्रज्ञान मनुष्यबळ नियोजन अशा अनेक गोष्टी असतात

जमीनमालकाचेच नाव द्यायचे तर विश्वातील सगळ्या प्रोजेक्तना आदिमानवाचे नाव द्यावे लागेल

बाकी, जमीन आमची म्हणून आमचेच नाव द्या, हे काही पटले नाही ,
>>
जमीन त्यांची म्हणुन किंवा ते मालक म्हणुन त्यांचे नाव द्यायचे नाहीये.
त्यांच्या मर्जीविरोधात - ईतरांचे भले व्हावे म्हणुन - त्याकाळी उत्पन्नचे साधन असलेली जमीन - कायद्याचा वापर करुन काढुन घेतली - म्हणुन त्याबद्दल कृतज्ञता व पुढील पिढीला + ईतरांना इतिहास त्याग कळावा म्हणुन त्यांचे नाव द्यायचे आहे. चु.भु.दे.घे.

एकंदर सर्वत्र नावावरून होणाऱ्या राजकारणावरून व्यक्तींचे नाव न देता त्या जागेचे (गाव / शहर) नाव द्यावे अशी भूमिका आहे.

जर व्यक्तीचे नाव द्यायचेच हा आग्रह असेल दि बा पाटलांचे नाव योग्य वाटते.

पण आंदोलन करण्या इतका महत्वाचा प्रश्न आहे का हा?

पण आंदोलन करण्या इतका महत्वाचा प्रश्न आहे का हा?
नवीन Submitted by मानव पृथ्वीकर on 28 June, 2021 - 20:21
>>
समाजमाध्यमांवरुन मला मिळालेल्या माहितीनुसार, याचे मुख्य कारण - योग्य ती लोकशाही प्रकीया न अवलंबवता - आरोग्याच्या कारणासाठी लावलेल्या लॉकडाऊनचा गैरवापर करुन - गुपचुप घाईघाईत संबंधीत समाजाला अंधारात ठेवुन - निर्णय घेतल्यामुळे फसवणुकीची भावना तयार झाली आहे - त्यातही सरकारने निवडलेले नाव हे संबंधीत समाजाच्या दृष्टीने विवादास्पद ठरत आहे.

मर्जीविरुद्ध घेतले तरी शेवटी ते बार्गेनिंग करून सेल डीड होते, पैसा, पर्यायी जागा, नोकरी सगळ्या बेनेफिट्सची कागदपत्रे होतात , ते काय दधीची ऋषींचे देहदान नव्हे

मानव पृथ्वीवर सर, एप्रिल पासुन आम्ही सरकारकडे सतत विनंती करत होतो की, कुठेतरी आताच नाव मागे घेऊन पुढील संघर्ष टाळा. मुख्यमंत्री साहेबांच्या सोबत समितीच्या दोन बैठकी झाल्या. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, विमानतळ सोडून दुसरीकडे बोला. शेवटच्या बैठकीत मीटिंगमधुन निघून गेले. मधल्या काळातील सविस्तर वृत्तांत सांगितला तर इथे वाद होतील. कसे लोकल पुढारी प्रेशर टाकून समाजा विरुद्ध केले गेले हे तरुणांनी पाहिले. त्यामुळे तरूण पिढी अधिक सतर्क झाली कारण पुढारी वर्ग फितूर झाल्यामुळे त्यांच्यावरचा विश्वास संपला. जे काही घडले ते शिस्त पाळून प्रत्येकाने स्वतःच्या मनाने सहभाग घेतला. राजू दादा पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे... पक्षाअगोदर समाज महत्त्वाचा आहे...

मर्जीविरुद्ध घेतले तरी शेवटी ते बार्गेनिंग करून सेल डीड होते, पैसा, पर्यायी जागा, नोकरी सगळ्या बेनेफिट्सची कागदपत्रे होतात , ते काय दधीची ऋषींचे देहदान नव्हे >>>>>>
मग ते हाले लूया चे देहदान होऊ शकते का ?
तुझ्या नासक्या तोंडाने प्रत्येक वेळी हिंदू देव देवता ऋषी मुनींची नावे का वापरतो ?

मर्जीविरुद्ध घेतले तरी शेवटी ते बार्गेनिंग करून सेल डीड होते, पैसा, पर्यायी जागा, नोकरी सगळ्या बेनेफिट्सची कागदपत्रे होतात , ते काय दधीची ऋषींचे देहदान

ब्लॅक कॅटी

तुम्ही ह्या धाग्यावर प्रतिक्रिया न देणे हे उत्तम.तुम्हाला काहीच ज्ञान नाही ह्या विषयात तुमचे अज्ञान इथे प्रकट करू नका.
अधिग्रहण ,अन्याय,करून कागद पत्र साफ ठेवणे अतिशय किरकोळ गोष्ट आहे.
पण अन्याय ,अत्याचार होतो म्हणून लोक विरोध करतात हे त्रिवार सत्य आहे.

राजकारण्यांची नावे बंद करून समाजसुधारक , शास्त्रज्ञ , संत , नोबेल विजेते , कलाकार , डॉकटर ह्यांची नावे द्यावीत असे माझे मत आहे

एक सावरकर वगळता कोणतेही अराजकीय नाव असणारे एअरपोर्ट मला तरी अद्याप दिसले नाही .

इंदिरा गांधी विमानतळाला डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव द्यावी अशी मागणी करून हा प्रस्ताव ठेवावा. काँग्रेसींचे नाव द्यायचे असते तर असे विचार सुचले असते का ?
जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे नाव देताना का नाही असा विचार केला ? काय संबंध नेहरूंचा ?

बोकलत, चुकून विमान मिस झालं तर एका वेगळ्या विमानाने त्या विमानाचा पाठलाग करून प्रवाशांना त्यात ढकलण्यात येईल.

अभ्या, ईशा विमानतळ नाव ठेवा. अंबानिपण खुश होतील, सद्गुरू पण खुश, गेलाबाजार हेमामालिनी खुश व्हायला हरकत नाही. बाकी कोप्पीकर, गुप्ता वगैरेंनी घरातल्या घरात खुशी साजरी केली तरी चालेल.

शांत माणुस, मल्ल्या यांचे नाव औचित्य पूर्ण होईल. त्यांची विमान कंपनी बुडाली आणि ते उडाले.

Lol Lol Lol

आरारा यांची सूचना उत्तम
माझे विमानतळ हे नाव छान राहील. प्रत्येकाला आपलं वाटेल आणि भांडण होणार नाही.

मुंबईत मी जिथे राहायचो त्या भागाचे नाव काय ठेवायचे यावरूनही बरीच लफडी झालेली.
शेवटी मग हाच उपाय करण्यात आलेला.

ऋनमेष
La स्वतःचे असे काही मत नाही

मुंबई प्रसिद्ध आहे बॉलिवूड साठी.. आणि बॉलिवूड म्हणजे कपूर आणि खान मंडळी..
खान इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा कपूर एअरपोर्ट पण ऑप्शन्स चांगले आहेत...

च्रप्स, हा पर्याय देखील खान आहे आय मीन छान आहे.
त्यातही स्पेसिफिकली शाहरूखचेच नाव दिल्यास एसआरके हा शॉटफॉर्मही छान वाटेल.

  1. फिरोज गांधी
  2. लाल बहादूर शास्त्री
  3. सरदार वल्लभ भाई पटेल

का? मग बाळ ठाकरे जन्माला आल्याचा काय उपयोग होणार होता? तशीही मुंबई कॉग्रेसेतर नेत्यांमुळेच महाराष्ट्रात आली (खरं तर राहिली).

Finalise draft policy for naming airports after cities: Bombay HC to Centre
The Bombay high court (HC) has directed the civil aviation ministry to finalise the draft policy which proposes to name and rename airports after the cities they are located in, after it was informed that the policy had been pending for a long time

https://www.hindustantimes.com/cities/mumbai-news/finalise-draft-policy-...

एअरपोर्टची नावे शहराच्या नावावरून ठेवण्याबाबत हायकोर्टाने सरकारला सूचना केली.

( हाय कोर्ट अजून Bombay आहे का , ते Mumbai नाही झाले ?)

लोकशाही मध्ये लोकांनी निवडून दिलेले लोकनियुक्त सरकार ला सर्वोच्च अधिकार असणे अपेक्षित आहे.
कोर्टाला नाव काय ठेवले पाहिजे, हे ठरवण्याचा बिलकुल अधिकार नसावा.
ना कोणती सूचना करायचा.
लोकांनी निवडून दिले आहे ना सरकार ते बघेल काय करायचे ते.

लोकांनी निवडून दिले आहे ना सरकार ते बघेल काय करायचे ते.>>>>>> आँ ! अहो मग लोकांनी जर सरकार निवडुन दिले आहे तर मग लोकांनाच तो अधीकार का नसावा? आणी सरकार कोणाचे ? तर ठाकरे बाबाचे. ते उठसुठ बाळासाहेबांचे नाव जिकडे तिकडे देत सुटतील. मान्य आहे का तुम्हाला हे?

काहीही नाव द्या पण त्याचा शॉर्ट्फॉर्म AA किंवा AAA पासून सुरु करा म्हणजे तिकीट बुक करते वेळी ड्रॉप डाउन मध्ये पहीले येइल. शोधत बसावे लागणार नाही.

"Ladies and Gentlemen, This is your captain speaking. We are preparing to land at Hin..Hin..uh..Hindu... Hindu Rudy Sam... Hidden Door...uh... Hiding some rats...um.. Hindu Ruday Samrat...uh..uhh... Bala...uh..Balance..um... Balasaheb...umm.umm...ummm......."
"Ladies and Gentlemen, for technical reasons we are diverting to Juhu airport....."

असे कुठे नाही.प्रतेक देशात शहर च्या नाव वरून विमानतळ ची नाव खूप कमी आहेत.
फक्त महाराष्ट्र चा विषय असेल तर कोर्ट पासून ,विद्वान पर्यंत सर्व ज्ञान देत असतात.
महाराष्ट्रातील विमान तळाचे नाव फक्त महाराष्ट्रातील महान व्यक्तीच्या नावावरूनच असले पाहिजे.
मग कोणी पण चालेल.
वाजपेयी,गांधी, कलाम,मोदी ,किंवा बाकी कोणीच गैर मराठी नाव बिलकुल नको
.

काहीही नाव द्या पण त्याचा शॉर्ट्फॉर्म AA किंवा AAA पासून सुरु करा
AA - आली अंगावर विमानतळ, (अली-अंगद पण चालेल)
AAA- अमर अकबर अ‍ॅन्थोनी विमानतळ

आणि मग अंदमानात सावरकर विमानतळ आहे

ते केंद्र सरकार नी लादले आहे स्वतःच्या बापाची मालमत्ता समजून.
अंदमान मधील लोकांनी मागणी थोडी केली होती.
तिथे अंदमान मधील च व्यक्ती चे नाव हवे

याच न्यायाने काँग्रेस ने केंद्रात असताना सत्तर वर्षांत नेहरू आणि गांधी परिवार चा उदोउदो केलाय तो बापाची जहागिरी समजून च केला असावा !!!!!

हं

मग हाच न्याय लावला तर राम आणि कृष्ण फक्त अयोध्या अन गोकुळात / द्वारकेतच पुजले जावेत का ? की सगळ्यांचे पूर्वज तिकडेच रहात होते ?

जर तुमचे लॉजिक वापरले तर सगळ्यांनाच लागू होईल

पण असे कुणी करत नाही
फक्त आपल्याच गावातील , राज्यातील महापुरुष वंदनीय मानावेत , असे म्हटले तर मग शर्ट पँट , मिक्सर , फ्रीज , मोबाईल हे शोधणारे कोण होते त्यांच्याच गावानी त्या त्या वस्तू वापरायच्या का ? आणि फक्त तिथेच त्यांचे पुतळे उभारायचे का ?

Pages