आता होउ घातलेल्या नवी मुंबई येथील विमान तळास कोणा चे नाव द्यावे हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
दि. बा. पाटील हे स्थानिक कार्यकर्ते व नेते ह्यांची माहिती खाली दिली आहे
दिनकर बाळू उपाख्य दि. बा. पाटील (जन्म : जासई-रायगड जिल्हा, १३ जानेवारी १९२६; मृत्यू : पनवेल, २५ जून २०१३) हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते.दि. बां.च्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. असे असून दि. बा. पाटील यांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनीदेखील दि. बां.च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला.
दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.
दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही. शेकापच्या साई ट वरही हीच माहिती उपलब्ध आहे. लहान पणी शेकाप निवडणुका निकालात फॉलो केलेली आहे. आमचे ओरिजिन शेतकरी व विस्थापित होउन पुण्यात त्यामुळे तेच ते जि वर्ड!!
आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला.
रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दि. बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.
१९५७ – शे.का.प. चे मध्यवर्ती चिटणीस शे.का.प. च्या अनेक पदांवर कामे केली.
• १९५७-१९६२,१९६२-१९६७,१९६७-१९७२,१९७२-१९७७,१९८०-१९८४ – असे पाच वेळा विधानसभेवर निवडून आले.
• १९६०- पहिले हायस्कूल जासई गावात सुरु केले.त्यानंतर १० माध्यमिक शाळा सुरु केल्या.
• १९६७ ते १९७२ -महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष.
• १९७० – पनवेल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय स्थापन केले.
• १९७० पासून आजपर्यंत सिडको संग्राम चालूच आहे. १९८४ चा सिडको लढा देशभर गाजला. प्रकल्पग्रस्तांना “साडेबारा टक्के" चा लाभ झाला. अजूनही जे.एन.पी.टी. चा लढा चालू आहे.
• १९७२-१९७७- विधानसभेचे पक्ष प्रतोद. अंदाज समिती,लेखा समिती, उपविधान समिती, आश्वासन समिती आदि. समित्यांवर लक्षवेधी काम केले.
• १९८२-८३- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.
• १९७४- पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.
• १९७५-च्या बेळगांव-कारावारसाठीच्या आंदोलनात ११ महिन्यांचा तुरुंगवास.
• १९७७-१९८४-खासदार म्हणून २ वेळा निवडून आले.
• १९९६ - महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता संसदीय पुरस्कार.
• “आगरी दर्पण” मासिकाचे नियमित प्रकाशन सुरु केले.
• म.फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही प्रचारक.
• आगरी कोळी कराडी अशा भुमीपुत्रांचे श्रध्दास्थान, मार्गदर्शक, लोकनेते. ह्या समाजातील अनिष्ट प्रथांबद्दल आवाज उठवून सुधारणेचा आग्रह त्यांनी धरला.
आदरणीय छ त्रपती शिवाजी महाराज चरित्र मराठी माणसाला माहीत आहे. आम्हाला चौथीच्या इतिहासात शिकायला होते
जे आरडी टा टा : मुंबई व भारतातील महत्वाचे उद्योजक व समाजकार्यातील अग्रणी. भारतातील एविएशन मध्ये त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचे औद्योगिक वारस श्री रतन टाटा हे ही एक माणूस म्हणून मला फार आदरणीयच वाटतात. काय करू स्वभाव दोष असावा. टाटा मेमोरीअल हॉस्पिटल, टीसीएस सारखी कंपनी ह्या मुळे खरेच जिव्हाळा वाट्तो.
अशी नावे चर्चेत आहेत व त्यामा गे प्रत्येक गटाचे मर्यादित राज कारण आहे. आपल्या देशात इतक्या बहु भा षा आहेत् व त्यात कितीतरी सुरेख शब्द आहेत. त्यातील एखादा सुद्धा देता येइल नाव म्हणून पण ते होणे नाही. तुमचे मत काय आहे या बाबतीत.
हा एअर्पोर्ट नक्की कधी तयार होईल
आमच्या हयातीत झाला तर बरे. किती वर्शे पुणे मुंबई करताना तो बोर्ड च पाहिला आहे.
संदर्भः शे का प. वेब साइट.
मराठी विकी पिडी आ.
उरण कर ह्यांचा प्रतिसाद डकवते आहे
विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे कधीही कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून दिलेले लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? कोरोना कळतय राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून जे प्रकल्प अजून कशात काय नाही त्यांच्या नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. तिथे का नाव नाही दिले जात?
काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर आपण सर्वजण करतोच.
आपण फक्त आता एक पक्ष चालवत नसून लोकशाही असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा साहेबांनी विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देत आहेत. अंतिमतः आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे?
आणि इथे जे म्हणतात ना की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले?
प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.
हा ह जिव्हाळ्याचा प्रश्न आहे
हा ह जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म मुंबई करांसाठी>> रिअली? सामान्य मुंबईकरांना ह्या असल्या फालतू गोष्टीत रस आहे? राजकीय कार्यकर्ते आणि नेते सोडून.>> आहे. लोकल जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे. मुंबई करांच्या जिव्हाळ्याचा पण आहे. टाटा किंवा छत्रपती शिवाजी महाराज ह्यांना इथे रिस्पेक्ट आहे.
दिल्ली गुर गाव पट्ट्यात औरंग जे ब र रोड तुघलक रोड वगैरेची नावे का बदलली? गुरगाव चे गुरुग्राम का केले? तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर फाइन. पण लोकांना त्यांची मते मांडता तर आली पाहिजेत.
तुम्ही लोड घेउ नका
तुमच्या डोक्यात भरवल्याशिवाय
तुमच्या डोक्यात भरवल्याशिवाय तुम्हाला कुठल्या वास्तूला कोणाचे नाव देताहेत, कोणाचे कुठे स्मारक बांधताहेत वा मंदिर बांधताहेत, वगैरे गोष्टींमध्ये जराही रस नसतो ज्याने आपल्या दैनंदिन जीवनावर शून्य फरक पडणार असतो.
हे साफ चुकीचं मत आहे ..
माणूस माणूस आहे रोबोट नाही रोबोट ला भावना नसतात पण माणसाला भावना असतात.
राग,प्रेम,जिव्हाळा,खुन्नस,तिरस्कार,आपुलकी सर्व भावना माणसात असतात त्या मुळे तो आजूबाजूच्या प्रतेक घटनेशी जोडला गेलेला असतो.
त्याचा संबंध असू नाही तर नसो प्रतेक प्रसंगावर त्याच्या मनात प्रतिक्रिया असते.एक मत असते.
हा हा.. महापुरुषांबद्दलचे
हा हा.. महापुरुषांबद्दलचे रिस्पेक्ट
सॉरी हसल्याबद्दल
पण
ईथे प्रत्येक जातीधर्माने आपापले महापुरुष वाटून घेतले आहेत !
हेमंत तुम्ही बरोबर म्हणालात, माणसाला भावना असतात. त्याच भडकावल्या जातात.
एकेकाळी मी सुद्धा या भावना भडकाऊ पोस्टचा शिकार झालेलो. सुदैवाने वेळीच बाहेर पडलो. आता ईतरांना सावध करतो.
https://www.mumbaimirror
मुंबई करांच्या जिव्हाळ्याचा
मुंबई करांच्या जिव्हाळ्याचा पण आहे >> अरे बापरे! हो की काय! हंसगामिनी आणि विमान विश्राम अशी जिव्हाळ्याची नावं आहेत. दि बा पाटलांबद्दल दोन ओळी लिहायला ही शोधू करून लिहिते म्हणावं लागतं आणि शोध काही संपत नाही.
बाकी शिवाजी, टाटा ही कोणीतरी बोललं आणि त्याला विरोध केला तर बरं दिसणार नाही म्हणून रेटायची नावं आहेत.
रूनमेश शी संपूर्ण सहमत. अस्मिता ही पेटवली की पेटते. किती मुंबईकरांनी रिक्षावाल्याला / टॅक्सीवालीला छत्रपती शिवाजी महाराज आतंरराष्ट्रीय विमानतळ चलो सांगितलंय ? बहुदा एकही नसेल. सो जिव्हाळा अस्मिता राहूच द्या.
अस्मिता मला माफ कर;)
अस्मिता मला माफ कर >>
अस्मिता मला माफ कर >>
माझं नाव ठेवलंत तर मला खूप
माझं नाव ठेवलंत तर मला खूप बरं वाटेल. मी सगळ्या मायबोलीकरांना आयुष्यभर विमान प्रवास फ्री देईन.
वानलेस हॉस्पिटल बाहेर जो
वानलेस हॉस्पिटल बाहेर जो रिक्षा स्टँड आहे ना त्याला तुमचे नाव देऊया
ईथे प्रत्येक जातीधर्माने
ईथे प्रत्येक जातीधर्माने आपापले महापुरुष वाटून घेतले आहेत !>>>>> मागे संत साहीत्य अभ्यासक प्राध्यापक यु म पठाण असेच म्हणाले होते पण लोकांनी दुर्लक्ष केले. सगळे मार्ग विठ्ठलाकडे जातात, पण ज्ञानेश्वर ब्राह्मणांचे, तुकोबा वाण्यांचे ( आता तुकोबा म्हणले तरी लोक भडकतील की संत तुकाराम का नाही लिहीले ) . इथे छत्रपतीवरुन भडका उडालाय काही ठिकाणी. नरहरी सोनारांचे, गोरा कुंभारांचे.
मी काय म्हंटो विमानतळाऐवजी
मी काय म्हंटो विमानतळाऐवजी प्रत्येक गेटला एकेका महापुरुषाचे नाव देऊया. मग सगळे महापुरुष वजा जाऊन सुद्धा फ्युचर नावांसाठी काही गेटं शिल्लक राहतील. 'दिल्ली जानेवाली विमान बालासाहेब ठाकरे गेट के बजाय दि बा पाटिल गेट पे आयेगी' अशा अनाउन्समेंटनी जरा रंजन पण होईल.
प्रत्येक गेटला एकेका
प्रत्येक गेटला एकेका महापुरुषाचे नाव देऊया>>> गेट कमी पडतील.
खुला, अ.जा., अ.ज., वि.जा., भ.ज. (१), भ.ज. (२), भ.ज. (३), वि.मा.प्र., इ.मा.व., आ.दु.घ. आणिक यादित भर पडणार!
आदरणीय साने गुरुजी विमानतळ हे नाव द्यावे असे माझे मत आहे!
मी इथे न येताच पेटले व मला
मी इथे न येताच पेटले व मला 'राहूच द्या'ही केलं
ऋन्मेष,
ऋन्मेष,
एकच माणूस वेगवेगळ्या धाग्यांवर प्रचंड हेकट, प्रचंड बालिश, प्रचंड प्रामाणिक आणि प्रचंड प्रॅक्टिकल वगैरे कसे लिहू शकतो?
हॅट्स ऑफ!!
दि बा पाटलांबद्दल दोन ओळी
दि बा पाटलांबद्दल दोन ओळी लिहायला ही शोधू करून लिहिते म्हणावं लागतं आणि शोध काही संपत नाही.>> २४/ २५ भारतातील तारखा मला मंथ एंड व क्वार्टर एंड मुळे खूप हाय प्रेशर काम असते. दर महिन्यालाच व क्वार्टर एंडला जास्ती. त्यामुळे ऑफिसातून काहीही करता आले नाही.
आज धाग्यात अपडेट केले आहे. संदर्भ दिला आहे.
शिवाजी, टाटा ही कोणीतरी बोललं आणि त्याला विरोध केला तर बरं दिसणार नाही म्हणून रेटायची नावं आहेत.>> माझ्या बाबतीत तरी जे आहे ते मूळ बाफत अपडेट केले आहे.
मी इथे न येताच पेटले व मला 'राहूच द्या'ही केलं >> टेक केअर
अपडेटसाठी धन्यवाद.
अपडेटसाठी धन्यवाद.
भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर
भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांचे नाव देण्यात यावे.
स्वरुप धन्यवाद, पण
स्वरुप धन्यवाद, पण प्रामाणिकपणेच सांगायचे तर मी स्वभावानेच प्रचंड बालिश, प्रचंड हेकट आणि प्रचंड अटेंशन सीकर आहेच आणि स्वभावाला औषध नसते
@ धागा
आज वर उल्लेखलेल्यांपैकी एका मित्राच्या स्टेटसवर मोर्चाचा फोटो पाहिला. लाखो लोकं आज दि बा पाटील यांच्या नावाची मागणी घेऊन जमली होती का?
Tomorrow I am flying to CSIA
Tomorrow I am flying to CSIA Mumbai from IGI Delhi
हे खरं आहे.
जर माझं नाव दिलं तर मी
जर माझं नाव दिलं तर मी प्रत्येकाला एक एक डेरी मिल्क आणि गेम्स गोळ्यांचे पाकीट देईल.
विली वॉंका आहात का तुम्ही?
विली वाँका आहात का तुम्ही?
एअरपोर्ट तयार व्हायला अजून 3
एअरपोर्ट तयार व्हायला अजून 3 वर्ष आहेत ना? आतापासूनच काय आंदोलन...
आपले लोक कुठे एनर्जी वाया घालवतात सांगता येत नाही...
@ऋन्मेष होय. लाखाचा जनसमुदाय
@ऋन्मेष होय. लाखाचा जनसमुदाय नवी मुंबई येथील पाम बीच रस्त्यावर शांततेत जमला होता.
@च्रप्स गैरसमज नसावा. परंतु, एका राजकिय पक्षाने सत्तेचा वापर करुन कोरोणाच्या लॉकडाउन काळात जनतेला अंधारात ठेऊन प्रकल्पाचे नामातरण करुन मोकळे झाले. लॉकडाऊन आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यासाठी केले. मग, नामतरन वैगेरे मुद्दे आरोग्य सेवेत येतात का? सरकारला अशी कोणती घाई झाली आहे की जो प्रकल्प पुर्ण नाही त्याला नाव देऊन मोकळे झाले? मग, यावर जनतेने काहीच बोलू नये? सविस्तर माहिती लवकरच देतो.
उरणकर, आधी काहींनी सुचवल्या
उरणकर, आधी काहींनी सुचवल्या प्रमाणे माहितीचा एक वेगळा धागा काढता आला तर बघा.
मानव जी, लवकरच काढतो. कारण
मानव जी, लवकरच काढतो. कारण खरोखर त्या ठिकाणी काय होत आहे याची माहिती तेथील स्थानिक जनता सोडून महाराष्ट्रातील इतर जनतेपर्यंत पोहोचली नाही किंवा घटनाक्रम काय झाला ती खरी माहिती पोहोचू दिली नाही. त्यामूळे महाराष्ट्रातील जनतेला स्थानिक लोकांची भूमिका चुकीची वाटू शकते.
काय ठरलं मग?
काय ठरलं मग?
धागा गंमतीतून नकोत्या वळणावर गेलाच.
मला वाटतं आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तर 'पपु नरेंद्र दामोदरदास मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ' नाव योग्य आहे.
शाॅटफाॅर्म 'नमो एयरपोर्ट' पण मस्त होईल.
>>मानव जी, लवकरच काढतो.
>>मानव जी, लवकरच काढतो.
उरणकर खरच लिहा एखादा माहितीपूर्ण लेख..... मायबोलीकरांना आवडते असे सकस काहितरी वाचायला
मोगांमा के पठान विमानतळ.
मोगांमा के पठान विमानतळ.
मोदी गांधी मायावती केजरीवाल पवार ठाकरे नरसिंहराव
सगळे आले.
नवी मुंबई विमानतळाला दि बा
नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील साहेबांचे नाव का देण्यात यावे?
https://www.maayboli.com/node/79383
आपण ज्यांच्या नावाचा आग्रह
या पुढे रस्ते सुलभ शौचालय
या पुढे सुलभ शौचालय वगळता कोणत्याच गोष्टीला जीवित वा मृत व्यक्तीचे नाव देता येणार नाही असा कायदा करण्यात यावा. मग बघु किती जण पुढे येतात आमच्याच माणसाचं नाव द्या म्हणून. नाव देण्यासारख्या सामान्य गोष्टीवर आन्दोलन करून समाजाचा किती वेळ पैसा आणि एनर्जी वाया जातोय याचं कुठल्याच नेत्याला काहीच पडलेलं नाहीय.
जगात असा कायदा कोणत्या देशात
जगात असा कायदा कोणत्या देशात आहे का?
दुसरा धागा निघाला आहे लोक्स.
दुसरा धागा निघाला आहे लोक्स. चर्चा तिथे शिफ्ट करा.
https://indianexpress.com
https://indianexpress.com/article/trending/trending-in-india/aviation-mi...
>> जगात असा कायदा कोणत्या
>> जगात असा कायदा कोणत्या देशात आहे का?
आपण पहिला देश असलो तर काहि प्रोब्लेम आहे का
माझं नाव द्या.
माझं नाव द्या. विमानतळापासून थोडं दूर माझा 500 मीटर उंचीचा पुतळा बांधा. विमानात अशी सिस्टीम करा की विमानं येता जाता ऑटोमॅटिक माझ्या गळ्यात पुष्पहार टाकतील. नाहीतर पायलटला थोडा रिस्क घ्यायला सांगून खिडकीतून माझ्या गळ्यात पुष्पहार टाकायला सांगा.
बोकलत
बोकलत
तुमचे कोणी नाव देत नसेल तर सरळ जावून तुमच्या नावाचा बॅनर च जावून लावा तिथे.
झक मारत तुमचे नाव द्यावे लागेल.
एक तर बोकलत कोण हे समजायला च काही वर्ष जातील.
वाह वाह, परिचित आले. कुठे
वाह वाह, परिचित आले. कुठे होतात इतके दिवस, सर. I was missing you so much.
Submitted by उपाशी बोका on 24 June, 2021 - 10:04
>>>>>>>
अहो मी भानगडीतला माणूस आहे माझ्या मागे असंख्य लफडी असतात. वेळ मिळतो कमी, शिवाय त्यात मी इथे बदनाम आहे. इथली साहेब लोक मला वस्सकन अंगावर येतात म्हणून मला यायची भीती वाटती इथे.
मला वाटले प्रत्येकाने आपले नाव सांगून बाजूला व्हायचे. पण हिते तर मारामारी सुरु आहे आपआपल्या माणसाचे नाव घेऊन. मग मीच का मागे रहावे? मी पुन्हा एकदा सांगतो नाव हे सनी लिओनिचेच दिले पाहिजे आणि मी मस्करी नाही करत. ह्या देशातल्या लाखो लोकांची मागणी हिच असणार. सनी जाते तिथे लाखो लोकांची गर्दी होते. ज्याने कुणी विमानतळाच्या नावासाठी सर्वेक्षण केले त्यांनी सनी लिओनिच्या नावाचा पर्याय दिला का लोकांनला? तुमच्या आवडीच्या तीन चार पर्यायांपैकीच का निवडायला सांगता. अहो बाकीचे पर्याय द्या ना आणि मग बघा.
सनी लिओनि नको असेल तर राखी सावंत हे नाव सुद्धा मला चालेल. जसे कि राखी सावंत आंतरराष्ट्रीय विमानतळ.
एकच प्रश्न विचारतो. तुम्हाला ज्यांचे कुणाचे नाव द्यायचे आहे ते नाव दिल्यामुळे देशाला काय फायदा होणार आहे? ह्याचे फक्त उत्तर द्या. बाकी काही बडबड करू नका.
सनी लिओनि चे नाव दिल्याने देशाला हे फायदे होतील
१) सनी कोणत्याही (धर्म, पंथ, देश, जात) गटाची प्र्तीनिधी नसल्याने आणि सर्वच जणांना ती प्रिय असल्याने तिचे नाव दिल्यास देशातील सर्वानाच आनंद होईल
२) कोणत्याही देशाने पोर्नस्टारला इतका सन्मान दिलेला नाही. ती संधी भारताला चालून आली आहे. यामुळे जागतिक ह्युमन राईट्स इंडेक्समध्ये भारतास मोठे नाव होईल.
३) सनीच्या नावामुळे एअरपोर्टचा भाव वधारेल आणि टुरिझम मध्ये वाढ होऊन भारताच्या एअरपोर्ट क्षेत्रास भरगोस नफा होईल
४) आजूबाजूच्या हिरव्यागार डोंगरात सनी निवांत पहुडली आहे असे विमानतळाचे ल्यांडस्केप केल्यास ते जगप्रसिद्ध होईल. वरून खाली उतरताना किती छान दिसेल कल्पना करा.
५) तुला पण नको, मला पण नको, घाल कुत्र्याला. ह्या न्यायानुसार, कुठल्याच गटाचे नको, सनीचेच नाव योग्य. त्यामुळे सगळी भांडणे मिटतील.
६) सनी लिओनीने पोर्नस्टार ते सिनेस्टार असा नेत्रदीपक यशस्वी प्रवास केला आहे व भारतात प्रचंड देणग्या दिल्या आहेत. त्यामुळे तरुणांना उत्तेजन मिळेल.
७) सनीच्या नावामुळे भारताचे अमेरिका आणि कॅनडासोबतचे संबंध खूप सुधारतील.
सनी
सनी
तरुण आहे आता म्हणून लोकप्रिय आहे.अजुन वीस तीस वर्षांनी.
सनी चे दात पडलेले असतील .सर्व उठावदार अवयव गायब झालेले असतील,डोक्यावर टक्कल पडले असेल,डोळ्यांनी नीट दिसत नसेल.
तेव्हा हे नाव का दिले असे विचारले तर त्या वेळच्या सनी la दाखवली तर लोक जोड्यानी मारतील.
त्या मुळे शारीरिक आकर्षक पना सोडून बाकी काही उत्तुंग कर्तुत्व असणाऱ्या व्यकी चेच नाव देणे सोयीस्कर.
सदासर्वकाळ ते कर्तुत्व तेज च देत राहणार.
जसे छ्त्रपती शिवाजी महाराज.
ज्यांचे नाव घेतले की आज पण स्फुरण चढते आणि त्यांच्या कर्तुवा समोर नतमस्तक होण्याची इच्छा होते.
पण विमान तळाला दीं बा पाटील हेच नाव योग्य आहे.
अजुन वीस तीस वर्षांनी.
अजुन वीस तीस वर्षांनी.
सनी चे दात पडलेले असतील .सर्व उठावदार अवयव गायब झालेले असतील,डोक्यावर टक्कल पडले असेल,डोळ्यांनी नीट दिसत नसेल.
तेव्हा हे नाव का दिले असे विचारले तर त्या वेळच्या सनी la दाखवली तर लोक जोड्यानी मारतील.
त्या मुळे शारीरिक आकर्षक पना सोडून बाकी काही उत्तुंग कर्तुत्व असणाऱ्या व्यकी चेच नाव देणे सोयीस्कर. नवीन Submitted by Hemant 33 on 27 June, 2021 - 00:41
>>>>>>>
कर्तृत्व सगळे तरुण असतानाच करतात. शंभर वर्षांनी जरी विचारले तरी सनी चे तरुणपणीचे फोटो दाखवा. तुम्ही इतर कोणाचेही कर्तृत्ववान स्त्री/पुरुषाचे तरुणपणीचे दाखवता तसेच. आणि सांगा सनी अशी एक कर्तृत्ववान होती व सर्वाची आवडती होती कि जीने साधी पोर्नस्टार ते आघाडीची अभिनेत्री असा पर्वास केला. हेच तिचे कर्तृत्व. राजकारण आणि समाजकारण ह्या फिल्डमध्ये कर्तृत्व करणाऱ्यांचे स्मारक म्हणून मोठे मोठे म्युजियम तसेच वाचनालय किंवा त्यांचे खास त्यांचे मोठ्या प्रमाणात स्मारक उभा करून तिथे त्यांचे पुतळे उभे करून व ग्रंथसंपदा ठेवता येईल. लोकांना आठवण राहावी म्हणून चौका चौकात सुद्धा त्यांचे पुतळे उभे करा.


परंतु विमानतळ हि अशी एक आंतरराष्ट्रीय ठिकाण आहे जिथे परदेशी प्रवासी येतात. पर्यटनाच्या दृष्टीने ती एक अशी जागा आहे जी खूप आकर्षण वाटायला पाहिजे अशीच हवी. तरच प्रवासी येतील नि फायदा होईल. लोकांना तिथे यावे वाटले पाहिजे.
शारीरिक आकर्षण सगळ्यांनाच असते. कुणालातरी शारीरिक आकर्षण वाटले म्हणून तर दुनीयातले सगळेजण आज अस्तित्वात आहेत. पण म्हणून शारीरिक आकर्षण असलेले सगळे सनी लीओनी सारखे कर्तृत्ववन होत नाहीत. एकीकडे सनी ला कमी लेखणारे लोक तीला बघायला बघा कशी किड्या मुंगी सारखी गर्दी करतात:
विमानतळाला नाव दिले आणि तिथे सनीचे पुतळे फोटो लावले तर किती गर्दी करतील लोक विचर करा. ते काही नाही नाव दिले तर सनीचेच नाहीतर मी त्या विमानतळावर फिरकणार सुद्धा नाही.
अन्य नावे जी आंतरराष्ट्रीय प्रवाशांना आकर्षित करून भारतीय टुरिझम क्षेत्रास करोडो रुपयेच नफा मिळविण देतील:
१) कामजीवन आंतरराष्ट्रीय विमानतळ (विमानतळाच्या जवळपासच्या भागास कामनगरी नाव द्यावे)
२) लव्हबर्डस इंटरन्याशनल एअरपोर्ट
३) Pose69 इंटरन्याशनल एअरपोर्ट
४) Kinky Paradise International Airport
५) Oh Yeah Oh Yeah International Airport
कृपया सनी लोनी ओळखू येतील
कृपया सनी लोनी ओळखू येतील असे फोटो द्यावेत.
- हुकूमावरून.
पॉर्नस्टार ते फिल्मस्टार या
पॉर्नस्टार ते फिल्मस्टार या प्रवासाचे कौतुक करताना एअरपोर्टला नावे सुचवताना मात्र पॉर्नस्टार सनीलाच डोळ्यासमोर ठेऊन सुचवली आहेत
- सहज एक निरीक्षण
याचा अर्थ तिने कितीही प्रवास केला असला तरी लोकांच्या डोक्यातील तिची पॉर्नस्टार ईमेजच पक्की आहे.
बिचारी सनी ..
आणि तुमच्या?? तिचे उल्लेख
आणि तुमच्या?? तिचे उल्लेख करायची खुमखुमी कशामुळे येत असेल?
अगदी प्युअर राजकीय विचार
अगदी प्युअर राजकीय विचार केला तरीही शिवसेनेने ठाकरेंच्या नावाचा आग्रह सोडून दि बा पाटिल यांचे नाव द्यावे. येती निवडणूक शिवसेनेला जड जाणार आहे. भाजपा सर्व शक्तिनिशी उतरणार, आघाडीतही आलबेल नाही, काँग्रेस चे स्वबळाचे तुनतुणे आहेच. अशावेळी सुरुवातीपासूनच सेने बरोबर राहिलेल्या मोठ्या समाजाला दुखवणे महाग पडेल. अर्थात उठांकडे चांगला सल्ला देणारे सल्लागार असले तर. त्याचीच तर वानवा दिसते, अन्यथा शेवटच्या क्षणापर्यंत वाझे व परमबीर यांचे समर्थन करत बसले नसते.
नाव काय कुणाचही दिल तरी
नाव काय कुणाचही दिल तरी देशातील सध्याची परिस्थिती पहाता आणि सरकारी मालमत्ता विक्रीस काढण्यासाठीची धोरण पहाता हेही विमानतळ विकल जाणार नाही याची खात्री आहे का?
नाव काय कुणाचही दिल तरी
नाव काय कुणाचही दिल तरी देशातील सध्याची परिस्थिती पहाता आणि सरकारी मालमत्ता विक्रीस काढण्यासाठीची धोरण पहाता हेही विमानतळ विकल जाणार नाही याची खात्री आहे का?
नाव काय कुणाचही दिल तरी
नाव काय कुणाचही दिल तरी देशातील सध्याची परिस्थिती पहाता आणि सरकारी मालमत्ता विक्रीस काढण्यासाठीची धोरण पहाता हेही विमानतळ विकल जाणार नाही याची खात्री आहे का?
नाव काय कुणाचही दिल तरी
नाव काय कुणाचही दिल तरी देशातील सध्याची परिस्थिती पहाता आणि सरकारी मालमत्ता विक्रीस काढण्यासाठीची धोरण पहाता हेही विमानतळ विकल जाणार नाही याची खात्री आहे का?
One airport cannot be sold
One airport cannot be sold four times . Are you bunty bubbly sir?
(No subject)
विमानतळ बांधणे, ऑपरेट करणे
विमानतळ बांधणे, ऑपरेट करणे ,ह्याचे नियोजन सरकार,विमान प्राधिकरण ह्यांचे आहे.
त्यांनी त्यांची ही जबाबदारी राज्य हित डोळ्यासमोर ठेवून पार पाडावी.
Pages