नवी मुंबई विमान तळास कोणाचे नाव द्यावे?

Submitted by अश्विनीमामी on 22 June, 2021 - 04:28

आता होउ घातलेल्या नवी मुंबई येथील विमान तळास कोणा चे नाव द्यावे हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

दि. बा. पाटील हे स्थानिक कार्यकर्ते व नेते ह्यांची माहिती खाली दिली आहे

दिनकर बाळू उपाख्य दि. बा. पाटील (जन्म : जासई-रायगड जिल्हा, १३ जानेवारी १९२६; मृत्यू : पनवेल, २५ जून २०१३) हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते.दि. बां.च्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. असे असून दि. बा. पाटील यांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनीदेखील दि. बां.च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला.

दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.

दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही. शेकापच्या साई ट वरही हीच माहिती उपलब्ध आहे. लहान पणी शेकाप निवडणुका निकालात फॉलो केलेली आहे. आमचे ओरिजिन शेतकरी व विस्थापित होउन पुण्यात त्यामुळे तेच ते जि वर्ड!!

आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला.

रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दि. बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

१९५७ – शे.का.प. चे मध्यवर्ती चिटणीस शे.का.प. च्या अनेक पदांवर कामे केली.

• १९५७-१९६२,१९६२-१९६७,१९६७-१९७२,१९७२-१९७७,१९८०-१९८४ – असे पाच वेळा विधानसभेवर निवडून आले.

• १९६०- पहिले हायस्कूल जासई गावात सुरु केले.त्यानंतर १० माध्यमिक शाळा सुरु केल्या.

• १९६७ ते १९७२ -महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष.

• १९७० – पनवेल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय स्थापन केले.

• १९७० पासून आजपर्यंत सिडको संग्राम चालूच आहे. १९८४ चा सिडको लढा देशभर गाजला. प्रकल्पग्रस्तांना “साडेबारा टक्के" चा लाभ झाला. अजूनही जे.एन.पी.टी. चा लढा चालू आहे.

• १९७२-१९७७- विधानसभेचे पक्ष प्रतोद. अंदाज समिती,लेखा समिती, उपविधान समिती, आश्वासन समिती आदि. समित्यांवर लक्षवेधी काम केले.

• १९८२-८३- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

• १९७४- पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.

• १९७५-च्या बेळगांव-कारावारसाठीच्या आंदोलनात ११ महिन्यांचा तुरुंगवास.

• १९७७-१९८४-खासदार म्हणून २ वेळा निवडून आले.

• १९९६ - महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता संसदीय पुरस्कार.

• “आगरी दर्पण” मासिकाचे नियमित प्रकाशन सुरु केले.

• म.फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही प्रचारक.

• आगरी कोळी कराडी अशा भुमीपुत्रांचे श्रध्दास्थान, मार्गदर्शक, लोकनेते. ह्या समाजातील अनिष्ट प्रथांबद्दल आवाज उठवून सुधारणेचा आग्रह त्यांनी धरला.

आदरणीय छ त्रपती शिवाजी महाराज चरित्र मराठी माणसाला माहीत आहे. आम्हाला चौथीच्या इतिहासात शिकायला होते

जे आरडी टा टा : मुंबई व भारतातील महत्वाचे उद्योजक व समाजकार्यातील अग्रणी. भारतातील एविएशन मध्ये त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचे औद्योगिक वारस श्री रतन टाटा हे ही एक माणूस म्हणून मला फार आदरणीयच वाटतात. काय करू स्वभाव दोष असावा. टाटा मेमोरीअल हॉस्पिटल, टीसीएस सारखी कंपनी ह्या मुळे खरेच जिव्हाळा वाट्तो.

अशी नावे चर्चेत आहेत व त्यामा गे प्रत्येक गटाचे मर्यादित राज कारण आहे. आपल्या देशात इतक्या बहु भा षा आहेत् व त्यात कितीतरी सुरेख शब्द आहेत. त्यातील एखादा सुद्धा देता येइल नाव म्हणून पण ते होणे नाही. तुमचे मत काय आहे या बाबतीत.

हा एअर्पोर्ट नक्की कधी तयार होईल
आमच्या हयातीत झाला तर बरे. किती वर्शे पुणे मुंबई करताना तो बोर्ड च पाहिला आहे.

संदर्भः शे का प. वेब साइट.
मराठी विकी पिडी आ.

उरण कर ह्यांचा प्रतिसाद डकवते आहे
विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे कधीही कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून दिलेले लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? कोरोना कळतय राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून जे प्रकल्प अजून कशात काय नाही त्यांच्या नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. तिथे का नाव नाही दिले जात?
काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर आपण सर्वजण करतोच.
आपण फक्त आता एक पक्ष चालवत नसून लोकशाही असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा साहेबांनी विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देत आहेत. अंतिमतः आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे?
आणि इथे जे म्हणतात ना की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले?

प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सई ताम्हणकर /स्वप्नील जोशी / सुबोध भावे / सचिन पिळगावकर / ऋन्मेष खान

माबोकरांनी माबोकरांचीच नावे सुचवावीत हे योग्य आहे. दोन नावे आहेत.
1. ऋन्मेष खान आंतरराष्ट्रीय धागापट्टी विमानतळ
2. बोकलत आंतरराष्ट्रीय तंत्र मंत्र विमानतळ
तिसरे कोण सुचवणार?
असंबद्ध विमानतळ पण चालेल.

पुष्पक विमानतळ, नवी मुंबई>> अय्या

अहो एक खूप चांगले माउंटॅनिअरिन्ग किट आहे पण त्याचे नाव आहे स्वर्गारो हिणी!!!! स्वर्गातच पोहोचवतात कि काय असे वाट् ले होते मजला.

परवा असाच एक फ्लोअर लँप आवड लेला पण त्याचे नाव फेअर्वेल!! असल्या नावाचा दिवा आपणच लावायचा!!! तो सुद्धा किती महाग. फोन वर माबो सर्फ करतानाच अ‍ॅड आलेली.

Mumbai International Airport असे नाव ध्यावे.
विद्यापीठे, ऐरपोर्टे, रस्ते ह्यांच्या नावावरूनचे राजकारण बंद करावे.

छत्रपति शिवाजी महाराज विमानतळ मुंबई हे सांताक्रुझ मधे आधीच आहे.

त्यामुळे आता राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रिय विमानतळ नवी मुंबई हे नाव सयुक्तिक ठरेल.

J R D Tata.. धर्म, जात, राजकारण या अशा विचारांच्या पलिकडचे व्यक्तीमत्व.

अलाहाबादला जवाहरलाल यांच्या नावाने महाराष्ट्रातले प्रकल्प सुरू करा आणि इथे त्यांचे नाव पुसून टाका.
उद्या दिल्लीतून राजीव गांधी यांच्या नावाचा प्रस्ताव आला तर कॉंगी गुलाम म्हणतील का रायबरेलीला बांधा.

मी, अमा यांचा जाहीर निषेध करते की एवढा संवेदनशील विषयाचा धागा त्यांनी ऋन्मेष च्या मनातुन हायजॅक केला. Proud

Mumbai International Airport असे नाव ध्यावे.
विद्यापीठे, ऐरपोर्टे, रस्ते ह्यांच्या नावावरूनचे राजकारण बंद करावे.

+1

Mumbai International Airport असे नाव ध्यावे.>> सर नावाचा ध्यास कायमच असतो पण नवी मुंबई कि मुंबई हा पोट भेद किंवा पाठ भेद आहे. नक्की कोणते द्यावे? टेक्निकली ते पनवेल जवळील उलवे गाव आहे.

>> बोकलत इंटरनॅशनल एअरपोर्ट.
>> बेफिकीर विमानतळ

Lol
मनसोक्त
असंबद्ध
अमानवी
ही नावे सुद्धा विचारात घ्यावीत
अमानवीय विमानतळ Lol

हैद्राबाद नविन विमानतळ शमशाबादला आहे आणि इथले सगळे त्याला शमशाबाद एअरपोर्ट म्हणुनच संबोधतात आणि बाहेरचे हैद्राबाद एअरपोर्ट किंवा फार तर हैद्राबाद नवीन एअरपोर्ट.

तसेच या नव्या विमानतळाचे नाव काहीही ठेवा लोक नवी मुंबई एअरपोर्ट म्हणूनच संबोधतील.

अरे चांगली नावे दिली तरी लोक त्याचा शॉर्टकट मारतात. आता छात्रपती शिवाजी टर्मिनस असे नाव असुनही लोक CST या नावाने हाक मारतात. मग थोर महापुरुशांची नावे देण्यापेक्षा त्या ठिकाणाचेच द्या की. जसे नवी मुंबई. मी हरचंद पालव आणी मानवदादा यांच्याशी सहमत आहे.

हैद्राबाद नविन विमानतळ शमशाबादला आहे आणि इथले सगळे त्याला शमशाबाद एअरपोर्ट म्हणुनच संबोधतात आणि बाहेरचे हैद्राबाद एअरपोर्ट किंवा फार तर हैद्राबाद नवीन एअरपोर्ट.>> त्याचे खरे नाव राजीव गांधी इंटरनॅशनल एअर्पोर्ट आहे. आर जी आइ ए.

पहिले एक होता तेव्हा फक्त बेगम पेट चलो एअर्पोर्ट जाना है असेच साम्गायचो आटोवाल्याला.

ते RGIA फक्त गुगल मॅप, ओला, उबर वर टाकायला.
बाकी म्हणताना सगळे शमशाबाद एअरपोर्टच म्हणतात.

आधी बेगमपेट एअरपोर्ट, आता शमशाबाद एअरपोर्ट.

नाव कशाला द्यायला पाहिजे? नुसतं नवी मुंबई विमानतळ म्हणा की! >> हेच होणार आहे एअरपोर्ट सुरु झाल्यावर. पनवेल किंवा नवी मुंबई चा विमानतळ का सांताक्रुझ चा विमानतळ असेच बोलल्या जाणार आहे.

आता सुद्धा T१ आणि T२ असेच संबोधून डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल टर्मिनल बद्दल बोलले जाते.

कुठलेही नाव द्या पण त्याकरता आधी त्याचे काम पूर्ण करून सुरु करा. सध्या तरी फक्त रस्तेमार्गाने जाऊ शकतो, त्यात मेट्रोचे स्टेशन करून ते जर जोडले इतर मार्गा बरोबर तर त्याचा काही उपयोग. नाहीतर इतक्या लांब एअरपोर्ट आहे म्हणून टॅक्सी ला भरमसाट भाडे द्यावे लागेल, जे आता हि थोड्या फार प्रमाणात होत आहे.

विमानतळ बनवला नाही त्या आधी GR काढला आहे असं वाचण्यात आलं... समृद्धी महामार्ग चं पण नाव बदलंल आहेच.
तिकडे मोटेरा स्टेडियम चं नाव बदलंल आहेच. उत्तर प्रदेश मध्ये तर विचारायलाच नको.

मुंबईच्या नविन आंतरराष्ट्रिय विमानतळाला छ. शिवाजी महाराजांचेच नांव द्यावे. याबाबतीत राज ठाकरेंच्या मताशी सहमत.

जेआरडिंनी पहिलं विमान जुहु/सांताक्रुझवरुन उडवलं, म्हणुन सांताक्रुझ्/सहार विमानतळाला त्यांचं नांव द्यावं...

अगदिच हट्ट झाल्यास दिना बामांचं नांव एखाद्या रेल्वे स्टेशनला द्यावं...

इतिहासातील लोकांच्या नावे त्यांची स्वतःची भरपूर ठिकाणे आहेत , त्यांचे वारसही खाऊन पिऊन टुण आहेत

1947 नंतर आपण लोकशाहीत बांधतोय तर आपल्या काळातील नावे द्यायला हवीत

एकदा दिलेलं नाव पुन्हा काढुन इतरत्र देणं उचित ठरणार नाही.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळास छ. संभाजीराजे यांचं नाव देण्यात येणार आहे त्यामुळे ते नाव नवी मुंबई विमानतळासाठी देता येणार नाही त्यामुळे नवी मुंबई विमानतळास राजमाता जिजाऊ आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवीमुंबई असं नाव देणेच उचित ठरेल असं मला वाटतं.

नाव काही ही ठेवा .पण मुंबई महाराष्ट्र मधील सर्व एअरपोर्ट चे व्यवस्थापन मराठी लोकांच्याच हातात पाहिजे.अगदी सुरक्षा सुद्धा cisf वैगेरे कोणत्याच केंद्रीय यंत्रणेकडे नको .
महाराष्ट्र पोलीस चीच नवीन शाखा त्यासाठी असावी.वरिष्ठ अधिकारी पण मराठीच असावेत.

ऋन्मेष खान
>>>

धन्यवाद. पण एक सूचना. यातले खान हटवता येईल.
मी तसेही कुठल्या जाती धर्म वा राजकीय पक्षाशी संबंधित नाही. तर माझे नाव दिल्याने कोणाच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत.
ऋन्मेष मधील ऋ हा ऋषीमुनींपासून ऋग्वेदातही आढळतो. त्यामुळे भारतीय संस्कृती जपल्याचाही एक फिल येईल नावाला.
जर लोकांनी ऋन्मेष विमानतळ न म्हणता नुसते नवी मुंबई विमानतळ म्हटले तर मला रागही येणार नाही.
मी स्वत:ही नवी मुंबईलाच राहायला आलो आहे. तर आपल्यातल्याच एकाचे नाव दिले म्हणून स्थानिकांच्या भावनाही जपल्या जातील.
जर विमानतळाच्या नावावरून खरेच वाद होणार असेल तर ते टाळायला तुम्ही एकमताने माझे नाव सरकारला सुचवू शकता.
जर माझ्या नावावरूनही वाद होणार असेल तर मात्र बिलकुल माझे नाव नको.
मग आपण एक काम करूया का? हे ठरवायला एक पोल काढूया का? Happy

जोक्स द अपार्ट…
मला *नवी मुंबई ईंडियन्स* हे नाव छान वाटते.

Pages