आता होउ घातलेल्या नवी मुंबई येथील विमान तळास कोणा चे नाव द्यावे हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.
दि. बा. पाटील हे स्थानिक कार्यकर्ते व नेते ह्यांची माहिती खाली दिली आहे
दिनकर बाळू उपाख्य दि. बा. पाटील (जन्म : जासई-रायगड जिल्हा, १३ जानेवारी १९२६; मृत्यू : पनवेल, २५ जून २०१३) हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते.दि. बां.च्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. असे असून दि. बा. पाटील यांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनीदेखील दि. बां.च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला.
दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.
दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही. शेकापच्या साई ट वरही हीच माहिती उपलब्ध आहे. लहान पणी शेकाप निवडणुका निकालात फॉलो केलेली आहे. आमचे ओरिजिन शेतकरी व विस्थापित होउन पुण्यात त्यामुळे तेच ते जि वर्ड!!
आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला.
रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दि. बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.
१९५७ – शे.का.प. चे मध्यवर्ती चिटणीस शे.का.प. च्या अनेक पदांवर कामे केली.
• १९५७-१९६२,१९६२-१९६७,१९६७-१९७२,१९७२-१९७७,१९८०-१९८४ – असे पाच वेळा विधानसभेवर निवडून आले.
• १९६०- पहिले हायस्कूल जासई गावात सुरु केले.त्यानंतर १० माध्यमिक शाळा सुरु केल्या.
• १९६७ ते १९७२ -महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष.
• १९७० – पनवेल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय स्थापन केले.
• १९७० पासून आजपर्यंत सिडको संग्राम चालूच आहे. १९८४ चा सिडको लढा देशभर गाजला. प्रकल्पग्रस्तांना “साडेबारा टक्के" चा लाभ झाला. अजूनही जे.एन.पी.टी. चा लढा चालू आहे.
• १९७२-१९७७- विधानसभेचे पक्ष प्रतोद. अंदाज समिती,लेखा समिती, उपविधान समिती, आश्वासन समिती आदि. समित्यांवर लक्षवेधी काम केले.
• १९८२-८३- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.
• १९७४- पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.
• १९७५-च्या बेळगांव-कारावारसाठीच्या आंदोलनात ११ महिन्यांचा तुरुंगवास.
• १९७७-१९८४-खासदार म्हणून २ वेळा निवडून आले.
• १९९६ - महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता संसदीय पुरस्कार.
• “आगरी दर्पण” मासिकाचे नियमित प्रकाशन सुरु केले.
• म.फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही प्रचारक.
• आगरी कोळी कराडी अशा भुमीपुत्रांचे श्रध्दास्थान, मार्गदर्शक, लोकनेते. ह्या समाजातील अनिष्ट प्रथांबद्दल आवाज उठवून सुधारणेचा आग्रह त्यांनी धरला.
आदरणीय छ त्रपती शिवाजी महाराज चरित्र मराठी माणसाला माहीत आहे. आम्हाला चौथीच्या इतिहासात शिकायला होते
जे आरडी टा टा : मुंबई व भारतातील महत्वाचे उद्योजक व समाजकार्यातील अग्रणी. भारतातील एविएशन मध्ये त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचे औद्योगिक वारस श्री रतन टाटा हे ही एक माणूस म्हणून मला फार आदरणीयच वाटतात. काय करू स्वभाव दोष असावा. टाटा मेमोरीअल हॉस्पिटल, टीसीएस सारखी कंपनी ह्या मुळे खरेच जिव्हाळा वाट्तो.
अशी नावे चर्चेत आहेत व त्यामा गे प्रत्येक गटाचे मर्यादित राज कारण आहे. आपल्या देशात इतक्या बहु भा षा आहेत् व त्यात कितीतरी सुरेख शब्द आहेत. त्यातील एखादा सुद्धा देता येइल नाव म्हणून पण ते होणे नाही. तुमचे मत काय आहे या बाबतीत.
हा एअर्पोर्ट नक्की कधी तयार होईल
आमच्या हयातीत झाला तर बरे. किती वर्शे पुणे मुंबई करताना तो बोर्ड च पाहिला आहे.
संदर्भः शे का प. वेब साइट.
मराठी विकी पिडी आ.
उरण कर ह्यांचा प्रतिसाद डकवते आहे
विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे कधीही कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून दिलेले लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? कोरोना कळतय राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून जे प्रकल्प अजून कशात काय नाही त्यांच्या नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. तिथे का नाव नाही दिले जात?
काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर आपण सर्वजण करतोच.
आपण फक्त आता एक पक्ष चालवत नसून लोकशाही असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा साहेबांनी विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देत आहेत. अंतिमतः आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे?
आणि इथे जे म्हणतात ना की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले?
प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.
माझं नाव दिलंत तर जे जे लोक्स
माझं नाव दिलंत तर जे जे लोक्स त्या विमानतळावर येतील त्या सगळ्यांना जिओ चा एक महिन्याचा 399 वाला रिचार्ज मोफत देण्यात येईल तसेच ते ज्या देशात प्रवास करत असतील त्या देशाचे नागरिकत्व पण देण्यात येईल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ते जेव्हा जेव्हा बाहेरच्या देशातून भारतात येतील तेव्हा विमानतळावर देशभक्ती गीत लावण्यात येईल. आणि त्याचा व्हिडिओ इंस्टावर अपलोड करण्यात येईल.
बोक्या पक्षी बोकलतश्री तुझे
बोक्या पक्षी बोकलतश्री तुझे सर्व प्रतिसाद एकत्र करुन एक फर्मास वी डंबण लेख होईल. वीड घेउन लिहिल्याचे फीलिन्ग आलेच आहेत. जरा मेहनत कर.
ब्लॅककॅट तुमचे शेवटचे दोन
ब्लॅककॅट तुमचे शेवटचे दोन प्रतिसाद वाचून जाम हसलो

कसं सुचतं एवढं..? भक्तांना असा सपाटून मार देऊन बोलती बंद करण्यात तुम्ही, आ.रा.रा. अन झम्पू माहिर आहात

@बोकलत :


@अमा :
फक्त पहिल्या पानावरचे
फक्त पहिल्या पानावरचे प्रतिसाद वाचले.
I demand
माझं id नाव द्या विमानतळाला
'किल्ली'
किती छोटं छान आणि अर्थपूर्ण आहे!!
सर्वच माध्यमांनी
सर्वच माध्यमांनी
कुठलीही शहानिशा न करता बातमी देणे हे आता रोजचेच झाले आहे.
______________________________________________________
मग सिमला ऑफिस पुण्यात आहे ते
मग सिमला ऑफिस पुण्यात आहे ते चालतं का?
नवी मुंबई विमानतळाला दि बा
नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देणार.
https://www.loksatta.com/maharashtra/cm-uddhav-thackeray-on-navi-mumbai-...
Pages