Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ब्या नि ही पेअर लॉस मध्ये आहे
Screenshot_2021-07-07-14-51-14-195_com.axis_.login_.png

ह्यात 2 मार्ग आहेत

1. उद्या एक्सपायरीला जे जसे असेल तसे काढणे व होईल तो लॉस ( प्रॉफिट) बुक करणे , ह्यात 2000 , 3000 लॉस होईल , पण ही स्ट्रॅटेजी बाकी वेळेला व्यवस्थित प्रॉफिट देत आहे , म्हणून हा लॉस drawdown समजून बुक करणे आणि पुन्हा आहे ते continue करणे

फॉर्म्युला : विकली पेअर , ब्यांक निफ्टी स्पॉट प्लस 1800 चा पुढील आठवड्याचा कॉल विकणे , त्यात प्लस 500 करून ह्या विकचा कॉल बाय करून हेज करणे , मार्केट सतत वाढतच गेले तर असा लॉस होईल , पण असे सतत होणार नाही , 10 मध्ये 1

2. बाय पोझिशन उद्याच्या एक्सपायरीला मरेल , मग त्याच्या ऐवजी योग्य पोझिशन पुन्हा बिल्ड करून सेल पोझिशन अजून एक आठवडा सुरू ठेवणे , आताही आपली सेल strike price ही स्पॉट पासून 1000 पॉईंट वर आहे, त्यामुळे तो झिरो होईल , असे वाटते

दुसरा पर्याय घ्यावा तर हेज कसे करावे ?

निफ्टीममध्ये मी आजच 2200 चा लॉस बूक करून उद्याचे 15650 चे पुट विकून ते 15350 ने हेज केले. यात 1950 निघतील.

दुसरा पर्याय घ्यायचा असेल तर 15 जुलैचाच 800-1000 वरच्या कॉलने हेज करावे लागेल बँकनिफ्टीत.
36500 फार लांब नाही, मला वाटते लॉस बुक करून दुसरे ट्रेड बघावे.

आहे की BSE पण. Sensex हा BSE चाच इंडेक्स आहे. काही स्टॉक्स फक्त BSE वर लिस्टेड आहेत.
पण बहुतेक स्टॉक्स दोन्हीकडे लिस्टेड आहेत.
SENSEX लांबचे ऑप्शन्स पण असतात, जवळचे नसतात.

हो आहे

पण तो का आहे , त्याची गरज काय आहे , असे विचारले

मोदी गिफ्ट सिटीत अजून एक सुरू करणार म्हणे.

ब्यांक निफ्टी आज परत लगीन लावले.

पण तो का आहे , त्याची गरज काय आहे , असे विचारले >> उप्स, माय बॅड.

अजून CSE (Calcutta) सुद्धा आहे. त्याचे ब्रोकर्स कोणते माहीत नाही.

त्या लॉस वाल्या ब्यांक निफटीला अजून एक पर्याय आहे

120 ला अजून एक लॉट विकणे
म्हणजे एवरेजिंग होऊन 70 होते

पण मार्जिन फार दाखवले , म्हणून केले नाही
आता गडगडले

Screenshot_2021-07-08-12-55-15-177_com.android.chrome.png

आज सकाळी निफ्टी विकली स्प्रेड केले होते , दोन्ही 130 होते , एक झिजून 30 झाला , दुसरा वाढून 170,
पण 1500 प्रॉफिट आले , म्हणून घालवले

ह्या गडबडीत , ते परवा केलेले ब्यांक निफ्टी कॉल स्प्रेड , तेही 1000 रु प्रॉफिट होते म्हणून उडवले.

आता फक्त ते एकसिस मधले ब्या नि दोन लॉट बाकी आहेत, ब्या नि 36500 ला नाही गेला तर तेही झिजून जातील.

-----

एक्सपायरी दिवशी सकाळी ब्या नि चे ऑप्शन 120 च्या आसपास असतात , तेच बुधवारी सकाळी 200, 210 असतात , मग ह्या स्ट्रॅटेजीत बुधवारी सकाळी पोझिशन घेऊन गुरुवारी दुपारी स्क्वेअर ऑफ केल्यास कदाचित जास्त प्रॉफिट मिळेल किंवा ह्या 2 दिवसात कधीही चांगले प्रॉफिट मिळाले तर ढकलता येईल.

पुढुच्या बुधुवारी बुघू

ओके. मी पण लक्ष ठेवीन बुधवारी.

मी फ्युचरला ऑप्शनने हेज करून काही डायरेक्शनल ट्रेड्स घेऊन पाहिले. लॉस कमी होतो, पण पुढे प्रॉफिट निघत नाही फार ऑप्शनचा डेल्टा वाढतो. मोठी मूव्ह आली (> १०० निफ्टी मध्ये) तर काही प्रॉफिट निघते.

या प्रकरणात बास्केट एन्ट्री घेताना बास्केट नीट केली नाही ( एक मार्केट ऑर्डर एक लिमट ऑर्डर गेली / मग एक इंट्राडे, दुसरी नॉर्मल गेल्याने मार्जिन मुळे अडकली) या प्रकरणात ब्रोकरेज धरून 3 हजार गेले.

या गडबडीत, एक स्ट्रेडल घेतला होता पावणे तीन वाजता आजच्या एक्सपायरीचा, - त्यात 3 नंतर लगेच प्रॉफिट /लॉस बूक करायचे होते, तो विसरूनच गेलो. तो प्रॉफिट देऊन मी बघत नाहीये म्हणुन रुसून ८०० लॉस मध्ये जाऊन बसला.

विकलेले पुट्स मात्र दोन हजार प्रॉफिट देऊन शहीद झाले.

आज नाही घेतल्या पुढल्या पॉझिशन्स.
सोमवारी मार्केट कुठे जाते बघुन घेईन.
पण आता निफ्टी पेक्षा बँकनिफ्टीत जास्त स्कोप दिसतोय कॉल विकण्यास.

आज मलाही जमले नाही

त्या ब्या निफ्टयी कॉल्स शॉर्ट , प्रॉफिट मध्ये आल्या, 4 दिवसांनी मरतील

Stock आणि इंडेक्स मध्ये स्ट्रॅडल करायचे असेल तर एक तारखेलाच करावे , असे वाटते , 40 % प्रीमियम पहिल्या 10 दिवसातच झिजून जातात , नंतर ते फार कमी होतात , हेजदेखील करताना अवघड होते.

ब्यांक निफ्टी विकली एक्सपायरी बुधवारी करू की गुरुवारी हे अजून समजत नाही आहे , बहुतेक गुरुवारी सकाळी किंवा बुधवारी दुपारीच करणे बरे वाटते.

दर गुरुवारी असे दोन दोन लॉट करता येतील.

ब्या नि एवरेज विकली ATR बघून आयर्न कंडोर , 500 पॉईंट वरचा करून बघायचा आहे, कधीतरी 2000 पॉईंट चढून होईल नुकसान , पण ते तसे एकदाच झाले होते , तेंव्हा निर्मलाबाईंनी काहीतरी कॉर्पोरेट टॅक्स बद्दल केले होते , 1 फेब्रुवारी 2021 , तेंव्हाच ते एका आठवड्यात 4000 वाढले होते.

बाकी वेळेला 1500 पेक्षा खालीच हलतो.

Screenshot_2021-07-12-17-31-44-749_com.android.chrome.png

ब्या नि एवरेज विकली ATR बघून आयर्न कंडोर , 500 पॉईंट वरचा करून बघायचा आहे म्हणजे Weekly ATR + 500 पॉईंट्स? सध्या 1400 आसपास आहे weekly ATR.

हो, म्हणजे आता ब्या नि 35000 आहे ,तर 36500 कॉल सेल , 37000 कॉल बाय, दोन्ही एकाच तारखेचे.

आताच ब्यांक निफ्टी बास्केटवर लावून पाहिले , 2 लॉटला 50000 मार्जिन लागते , एकूण नफा 1500 होईल , ( 60-30 , गुणिले 2 लॉट)Screenshot_2021-07-12-18-46-10-095_com.android.chrome.png

मी आज कॅलेंडर स्प्रेड घेतले निफ्टी आणि बँकनिफ्टीत एक एक.
निफ्टी १५ जुलै १६००० CE विकला आणि २२ जुलै १६२०० विकत घेतला. खाली मॅक्स लॉस 236. वरचे ब्रेक इव्हन १६०४७.

बँकनिफ्टी १५ जुलै ३६३०० विकला आणि २२ जुलै 3७००० विकत घेतला. खाली मॅक्स लॉस 347 बरचे ब्रेक इव्हन ३६४६९.

वरच्या बाजूला मी जास्तच सेफ ब्रेक इव्हन घेतलाय.

बघूया गुरुवारी काय होतं.

Option trading करिता खूप उप्योगी धागा , माहितीचा स्तोत !!!

अनेक दिवस हा धागा वाचतोय , आज nifty call spread केले ...+ ५०० दखवतोय झीरोदा , नेट कीती येतील बघूया.
Market Direction खूप मह्त्वाची काही पोझिशन ला.

SENSIBULL लिन्क आहे झीरोदा ला.

मानव,

15th July Nifty
------------------------------------------------
15600 CE buy @215.4
16000 CE Sell @4.95
Time- 13:53:21
then cover as below

15600 CE sell @223
16000 CE Buy @5.2
Time- 13:57:46
====================================
Net --> +550

margin दाखवले होत ४०,०००

पन नतर ३१० % margin केल्यचा SMS आला ===> square off केले.

Margin rules changed lot by SEBI, ZERODHA.... one cant change MIS to Normal or vice versa now which was allowed 2 month ago(?)....

तुमचा ट्रेड कळला नाही. चारही पोझिशन्स 15 जुलैच्या का?
की वरच्या दोन एन्ट्री आणि खालचे दोन एक्झिट आहेत? असे असेल तर लॉस दाखवतोय.

नॉर्मल to MIS करता येते.
कॉल/पुट long पोझिशन घेतली असेल MIS मध्ये तर ती Normal मध्ये convert नाही करता येत. Short पॉझिशन्स असतील तर MIS to Normal करता येते.

कदाचित पोझिशन कन्व्हर्ट करताना तुम्हाला मार्जिन कॉल आला असेल. Short पोझिशन Normal मध्ये कन्व्हर्ट झाली आणि long पोझिशन करू दिली नाही, दरम्यान एक नॉर्मल आणि एक MIS झाल्याने मार्जिन वाढून, तुम्हाला मार्जिन कॉल आला असेल.

मानव ,
correction केल आहे मी .

आता बघा

विपू बघा...

मानव ,
धन्यवाद

Margin rules changed lot by SEBI, ZERODHA.... one cant change MIS to Normal or vice versa now which was allowed 2 month ago(?)....

===>हो बरोबर, MIS to Normal नहि होत

ओके, तुमचा बुल कॉल स्प्रेड होता तर. पण यात रिस्कही बरीच होती खाली, 15 हजार वर. अर्थात तुम्ही आधीच स्केअर ऑफ केले असते.

NIfty look week near 15900 n strong near 15680.....
हे Outlook होते. ==> बुल कॉल स्प्रेड आज करिता

ओके.

550 आज दिसत आहे. Tax, etc...150 जातील(?)

Pages