Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आताच निफ्टी 8 जुलै 16300 कॉल्स विकले आणि 1 जुलै 16500 विकत घेतले. 50% पॉझिशन्स घेतली आज, दोन सेट्स.
बाकी सोमवारी बघेन.

माझे आता hdfc, शेअरखान आणि झिरोदा तीन अकाउंट्स झाले. hdfc उगीच काढले. तिथे ऑप्शन पर लॉट 120 ₹ आहे. गेले दीड वर्ष वापरत नाहीय. ते बंद करायला HDFC सिक्युरिटीज ऑफिस मध्ये जावे लागते जे लांब आणि गर्दीच्या ठिकाणी आहे. पुढल्या आठवड्यात जाऊन बंद करेन.

तुमचे कॉपी केले

37000 बँक निफ्टी कॉल , 8 जुलै , सेल केला 58 रु
37500 बँक निफ्टी कॉल , 1 जुलै , बाय केला , 8 रु

2 लॉट
60000 मार्जिन,

झिरोदात ब्लॉक होते , म्हणून एकसिस मध्ये केले,
लगेच 150 रु प्रोफीटात आले, ठेवले आहे

82 हजार. यात 1920 प्रॉफिटचे पोटेन्शयल आहे.

----
तुम्ही घेतलेल्या ट्रेड साठी झिरोदा मध्ये 65.3 हजार कॅपिटल दाखवत आहे.

मला 62000 लागले

दोन भिन्न एक्सपायरी असतील तर प्रॉफिट पोटेन्शन कसे calculate केले ?

मी थिअरॉटिकल घेतले.
समजा एका आठवड्यात निफ्टी एवढा पडला की दोन्ही कॉल्सची किंमत 0.05 झाली. एकाचे 0.05 मिळणार, एकाचे जाणार, टोटल प्रॉफिट दोघांच्या खरेदी किंमतीतला फरक.
समजा स्पॉट तेवढाच राहिला एक आठवड्याने आणि ग्रीक्स तेवढेच आहेत, तर जितक्या लांबचे स्राईक्स मी घेतोय त्यात ६० -८०% प्रॉफिट मिळते एका आठवड्यात.
पण समजा स्पॉट वर गेला आणि प्रॉफिट निघत नाहीय आणि मला विकलेला कॉल कॅरी फॉरवर्ड करायचाय, तर आठवडा लांबचा विकत घेतलेला कॉल शून्य होईल आणि मग त्या पुढल्या आठवड्याचा विकत घ्यावा लागेल, त्याची किंमत जेवढी असेल तेवढ्याने प्रॉफिट कमी होईल.

माझे गुडविल मध्येही आहे

तो पूर्वी निफ्टी एक लॉट 10000 मध्ये ट्रेड करू द्यायचा,

त्याचाही रेट 10-20 पर लॉट आहे

Up stocks किती आहे?

Uptox २०₹ per order, झिरोदा सारखे.

ICICI Direct Neo Plan मध्येही ऑप्शन्सला ब्रोकरेज २०₹ per order आहे.

Chittorgarh वेब साईटवर सगळ्यांचे comparison आहव.

मी गेल्या वर्षी अप्सतोकला एप्लाय केले होते, पण प्रोसेस अर्धवट सोडली होती

आता त्याला परत वेबसाईटवरून रिक्वेस्ट टाकली, पण तिथेही लांबच्या ऑर्डर ब्लॉक करतात का ?

https://www.quora.com/Which-broker-allows-to-take-position-in-deep-OTM-s...

झिरोदा, अपस्टॉक मध्ये OTM trade allow होत नाहीत

This is a kind of 100% fraud by some stock brokers. You can file complaint in consumer court against Zerodha, Upstox and you will definitely win the case and can get huge compensation also. SEBI never allowed any brokers to block any trade but still they are blocking trades with some kind of SEBI’s manipulated message which is not fair trade practice. You can file RTI also in this regard to get the answer whether they have any right to block any specific trade or not and I am sure you will get answer in your favor with the RTI copy you can go to court to win the case.

मला नाही वाटत की हे चिटिंग आहे. त्यांचेच कस्टमर नाराज होतात आणि त्यांचेच ब्रोकरेज जाते.

15% OI per broker हा नियम खरंच असावा.

झिरोदा मध्ये ऑप्शन्स विकत घ्यायला रेंज रेस्ट्रीक्शन आहे.
विकायला नाही.
आणि एकदा विकला की त्याला हेज म्हणुन एक ऑप्शन कुठल्याही रेंज मध्ये विकत घेता येतो.
प्रॉब्लेम हा आहे की आधी ऑप्शन विकावा लागतो, तेव्हा।त्याचे पूर्ण मार्जिन असावे लागते.

दुसरं असं की ऑप्शन इंट्रा डे साठीही विकत घेता येतो कुठल्याही रेंज मध्ये. पण तो ब्लॉक्ड रेंज मधला असेल तर इंट्रा डे टू नॉर्मल कन्व्हर्ट नाही करता येत.

पण समजा आपण इंट्रा डे विकत घेतला. मग विकायचा ऑप्शन नॉर्मल विकला. तर तो इन्ट्राडे नॉर्मल ला कन्व्हर्ट करता येतो का हे बघायला पाहिजे.

सोमवारी पहातो करून.

झिरोदा मध्ये ऑप्शन्स विकत घ्यायला रेंज रेस्ट्रीक्शन आहे.
विकायला नाही.
आणि एकदा विकला की त्याला हेज म्हणुन एक ऑप्शन कुठल्याही रेंज मध्ये विकत घेता येतो.
प्रॉब्लेम हा आहे की आधी ऑप्शन विकावा लागतो, तेव्हा।त्याचे पूर्ण मार्जिन असावे लागते.

दुसरं असं की ऑप्शन इंट्रा डे साठीही विकत घेता येतो कुठल्याही रेंज मध्ये. पण तो ब्लॉक्ड रेंज मधला असेल तर इंट्रा डे टू नॉर्मल कन्व्हर्ट नाही करता येत.

पण समजा आपण इंट्रा डे विकत घेतला. मग विकायचा ऑप्शन नॉर्मल विकला. तर तो इन्ट्राडे नॉर्मल ला कन्व्हर्ट करता येतो का हे बघायला पाहिजे.

सोमवारी पहातो करून.

Screenshot_2021-06-26-00-01-47-637_com.android.chrome.png

1 ते 7 फेब्रुवारी 2021
ब्यांक निफ्टी 31000 पासून 35000 झाला
म्हणजे जवळजवळ 14% वाढला.

आपण ज्या पोझिशन घेतोय , त्यात समजा असे अचानक 10 % वाढले , तर आपले दोन्ही कॉल किती होतील आणि संभाव्य नुकसान , नफा किती असेल ?

दणकून नुकसान होऊ शकते.
स्पॉट वाढला की ऑप्शन ची किंमत कुठल्या दिवशी किती होईल हे या साईटवर बघता येईल.
तिथे सध्याची implied volatility द्यावी लागते.
ती NSE साईटवर, ऑप्शन्स चेन मध्ये बघायची आपल्या स्ट्राईकची.
आधी सध्याच्या स्पॉट वर iV टाकून ऑप्शनची सध्याची किंमत बरोबर येते की नाही ते पहायचे, त्या साठी iV थोडा adjust करायचा.
मग स्पॉट वाढवून बघायचा.

खाली एक ऑप्शन व्हॉल्यू तारखे प्रमाणे ग्राफ येतो. त्यात कळेल कुठल्या तारखेला किती किंमत होईल ते.
हे iV तेवढीच राहिल हे गृहीत धरून. आता iV दहा टक्क्याने वाढवून पहा. जसा iV वाढवत जातो तसा घाम फुटायला लागतो. स्पॉट जेव्हा अचानक वाढतो तेव्हा iV चांगलीच वाढलेली असते, किती ते सांगणे कठीण.

आपला मॅक्स तोटा हा आपल्या दोन कॉल्सच्या किमतीच्या स्ट्राईक प्राईस मधील फरक उणे दोन कॉल्सच्या किमतीतला फरक आहे. म्हणजे तुमच्या पोझिशनला
(37500 - 37000) - (58-8) = 450. 450 x 25 = 11250 ₹. एका सेटचे, दोन्हीचे 22500.

मी कॉल जेवढ्याला विकला त्याच्या तिप्पट स्टॉपलॉस लावतो, राउंड फिगर मध्ये. लॉंग कॉलला अर्थात स्टॉपलॉस नाही.याने मॅक्स नफ्याच्या दुप्पट लॉस लिमिट होईल. मी ट्रेड लॉगिंग सुरू केलेय आणि जसजसा अनुभव येईल त्याप्रमाणे स्टॉपलॉस किती लावायचा हे फाईन ट्यून करेन. तुम्हीही करा आणि तुमचे मत कळवा.

पण . जर का मार्केटने अचानक दिवाळी केली आणि मोठ्या गॅप अप ने ओपन झाला, तर स्टॉपलॉस ऑर्डर एक्झिक्युट न होण्याचे बऱ्यापैकी चान्सेस आहेत. (मार्केट प्राईसला स्टॉपलॉस लावता येत नाही.) अशा वेळी भरपूर नुकसानाची (वर मॅक्स नुकसान दिलेय तेवढे) तयारी ठेवावी. असे घडण्याची प्रॉबॅबिलिटी खूप कमी आहे तशी. पण असे झालेच तर त्यावेळी काय पोझिशन आहे, मूव्ह टेम्पररी आहे लगेच खाली येईल का वगैरे विचार करून ऍक्षन घ्यायची.
उदा. मार्केट अजून वाढणार असेल तर शॉर्ट कॉल मिळेल त्या किमतीत काढून टाकायचा आणि लॉंग कॉलला लावून वाढू द्यायचा आणि स्टॉपलॉस ट्रेल करायचा.
किंवा मार्केट खाली येईल असे वाटले तर लॉंग कॉल स्क्वेअर ऑफ करून शॉर्ट कॉलला स्टोप्लॉस लावून ट्रेल करायचा. काहीच सुचत नसेल तर दोन्ही स्क्वेअर ऑफ करून फिरायला जायचे.

पण एवढा मोठ्या गॅपने अप ओपन बहुत करून मार्केट अपटलेले असताना होते. मार्केट जोरदार आपटले असते तेव्हा आपण कॉल्विकीचे पुट्टपार्थी झालेलो असू. त्यामुळे ही परिस्थिती येणार नाही.

दुसरी शक्यता म्हणजे बजेट, RBI policy, FM ची अनाउन्समेंट वगैरे इव्हेंट्स. इव्हेंट कॅलेंडरवर लक्ष ठेवायचे. अशा इव्हेंट्सच्या आधी एक्झिट व्हायचे. मोठा इव्हेंट असेल तेव्हा स्ट्रेडल विकत घेता येईल (किंवा अजून काही सजेशन्स?).

अजून काय शक्यता आहेत न आपटलेले मार्केट मोठ्या गॅप ने वर ओपन होण्याच्या/ ओपन असताना अचानक वर उचलण्याच्या?

म्हणजे हेज पोझिशनच्या स्त्राऐक थोड्या जवळ ठेवाव्या लागतील

आणि सेम strike calendar spread असेल तर फक्त प्रीमियमच्या फरकाईतके नुकसान होईल

ATM option जवळ डेबिट स्प्रेड करावे लागते आणि अगदी OTM च्या जवळ क्रेडिट स्प्रेड करावे लागते

मला एक महिना रिलायन्स शॉर्ट स्ट्राँगल करायचे आहे , फार एक्सपायरीवाले
त्यात एकूण 210 रु प्रीमियम जमा होतो , रिलायन्सच्या upper lower circuit लेव्हलपेक्षा हा प्रीमियम जास्त आहे Proud म्हणजे लगेच एका दिवसात काही होत नाही, निफ्टी आणि ब्यांक निफ्टीचे ATM चा प्रीमियम आणि सर्किट ह्यात प्रचंड गॅप आहे.

दीड लाख मार्जिन लागते , पण 50000 प्रीमियम क्रेडिट होतो, म्हणजे एकच लाख लागते

15 दिवसात त्यातला 40 पॉईंट जरी झिजला तरी प्रॉफिट येईल

1 लाख - strangle
1 लाख - छोटे छोटे जे आता करतो आहोत ते
सगळ्यात मिळून 12000 तरी गोळा व्हावेत

Same strike कॅलेंडर स्प्रेड केला तर वेगळे कॅल्क्युलेशन आहे. असे एक आणि दोन आठवडा लांबचे केले तर प्रॉफिट
थोडे कमी होते आणि पहिल्या आठवड्याच्या एक्सपायरीला स्पॉट १% ने जरी वर गेला तरी आप पण लॉस मध्ये असतो, स्राईक प्राईस ला स्पॉट आला तर मॅक्स लॉस हा मॅक्स प्रॉफिटच्या 8-9 पट असतो.

मग लॉस मध्ये असेल तर एकतर लॉस बुक करायचा किंवा पुढच्या आठवड्याच्या कॉल विकत घ्यायचा, तो मग प्रॉफिट मध्ये असायला जवळचा घेऊन चालत नाही आणि आपण परत त्याच सिच्युएशन मध्ये येतो.

तुमच्या बँकनिफ्टीच्या ट्रेड मध्ये पुढल्या गुरुवारी स्पॉट 36000 ला गेला की तुम्ही थोडे लॉस मध्ये असाल. पण लॉंग कॉलचा लेग बदलावा लागेल, आणि त्याच्या पुढच्या आठवड्यात 37000 च्या खाली पूर्ण प्रॉफिट.

शुक्रवारचे ट्रेड स्क्वेअर ऑफ करून (प्रॉफिट ५५०) आज निफ्टी ८ जुलै १६२०० विकले आणि ८ जुलैच्याच १६४०० ने हेज केले. स्टॉपलॉस तिप्पट ठेवला.

झिरोदा मध्ये रेंज ब्लॉक मूळे आधी शॉर्ट पॉझिशन घेऊन मग लॉंग पोझिशन घ्यावी लागते, यात सुरवातीला मार्जिन खूप लागते, तर का बुवा आम्ही झिरोदावरच रहावे?
याबद्दल असणारे कॅपिटल, लागणारे मार्जिन, बास्केट ऑर्डर मध्येही प्रॉब्लेम यांचे स्क्रीन शॉट्स देऊन सविस्तर लीहिले आहे, आणि बास्केट ऑर्डर मध्ये एकूण मार्जिन बघुन ऑर्डर्स एक्झिक्युट कराव्यात असे सुचवले होते. आधी स्टँडर्ड रिप्लाय आला, त्यावर तुम्ही नीट वाचले नाही असा रिप्लाय दिला.
त्यावर आज तुमच्या समस्येवर विचार करू असा रिप्लाय आलाय.

शेंडी लावताहेत की खरंच एस्केलेट केलंय कुणास ठाऊक.

अनेकांनी याबद्दल (आम्ही ऑप्शन्स विकतो आणि हेज करतो हे नमूद करून) लिहिले तर कदाचित काहीतरी करतील.

रिटेल लोकांची नाकाबंदी करून बड्याना संधी देण्यासाठी आहे.

15 % लिमिट म्हणे , कशाचे 15 % , कुणाचे 15 % ?

बर आउट ड मनी तर 100 पॉईंट वरच सुरू होतो , मग नेमके रेस्टरीक्षण कुठलया स्राएक प्राईसवरून सुरू होणार ?

तरी आज एक निफ्टी लांबचे कॉल बाय सेल करून हेज केले , फक्त इंट्राडे आलाऊ झाले, 3 ला उडवले, 270 रु प्रॉफिट झाले

ब्यांक निफ्टी 200 प्लस , अजून ते पूर्वीचे लॉट तसेच पडून आहेत

आधी सेल करून, मग बाय नॉर्मल मध्येही करता येते, इन्ट्रा डे ची गरज नाही. फक्त प्रश्न हा आहे की आधी सेल करायला मार्जिन जास्त (जवळपास तिप्पट) लागते.

मार्केट जोरात हलले की कॅलेंडर , कंडोर ह्या सगळ्या हेजिंग मध्ये गा मा मा रे गा होऊन जाते Proud

जरा स्ट्रेडल करून डेल्टा बघायला हवा,

रिलायन्स , 2100 , ऑगस्ट , straddle , दोन्ही प्रीमियमची बेरीज 210 होती , आता 190 आहे

5000 घेऊन लोणावळ्याला गेलो असतो
Proud

Pages