नवी मुंबई विमान तळास कोणाचे नाव द्यावे?

Submitted by अश्विनीमामी on 22 June, 2021 - 04:28

आता होउ घातलेल्या नवी मुंबई येथील विमान तळास कोणा चे नाव द्यावे हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे.

दि. बा. पाटील हे स्थानिक कार्यकर्ते व नेते ह्यांची माहिती खाली दिली आहे

दिनकर बाळू उपाख्य दि. बा. पाटील (जन्म : जासई-रायगड जिल्हा, १३ जानेवारी १९२६; मृत्यू : पनवेल, २५ जून २०१३) हे महाराष्ट्रातील उत्तर कोकणातल्या शेतकरी कामकरी पक्षाचे नेते होते. बाळू गौरू पाटील हे त्यांचे वडील. ते शेतकरी आणि शिक्षक होते. दि. बा. पाटलांच्या आईचे नाव माधूबाई होते.दि. बां.च्या वडिलांचा जासई गाव आणि आजूबाजूच्या गावांत शिक्षणाचे महत्त्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा होता. असे असून दि. बा. पाटील यांचे शिक्षण अतिशय खडतर परिस्थितीत झाले. पुण्यामध्ये त्यांनी वकिलीचे शिक्षण घेतले. त्यांचे बंधू आत्माराम बाळू पाटील यांनीदेखील दि. बां.च्या शिक्षणासाठी मोठा हातभार लावला.

दि. बा. पाटील हे पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार होते. सिडको (सिटी इंडस्ट्रियल डेव्हलपमेन्ट काॅर्पोरेशन) ही सरकारी संस्था त्यावेळी नवी मुंबईची बांधणी करत होती. त्या काळात दि. बा. पाटलांनी नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी सारे आयुष्य झिजवले. पोलिसांचा लाठीमार सहन केला, तसेच कारावासही पत्करला. साधी राहणी, उच्च विचारसरणी असणाऱ्या या नेत्याच्या एका हाकेला हजारो, लाखोंच्या संख्येने ओ देणारे कार्यकर्ते होते.

दि. बा. पाटलांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे गाजली. “दिबा” उभे राहिले म्हणजे सत्ताधारी पक्षांच्या गोटात शांतता पसरत असे. करारी आवाज आणि मद्देसूद बोलणे हे त्यांच्या विरोधकांमध्ये त्यावेळी घबराहट पसरवी. शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही. शेकापच्या साई ट वरही हीच माहिती उपलब्ध आहे. लहान पणी शेकाप निवडणुका निकालात फॉलो केलेली आहे. आमचे ओरिजिन शेतकरी व विस्थापित होउन पुण्यात त्यामुळे तेच ते जि वर्ड!!

आज सिडकोने नवी मुंबई पूर्णपणे व्यापली आहे. याच नवी मुंबईसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेतल्या जात असताना त्या दहा-वीस हजार रुपये एकरी भावाने घेतल्या जाणार होत्या. महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या चळवळीत अष्टी किंवा चिरनेर येथे जे जोरदार लढे झाले त्या लढ्यासारखाच सिडकोविरोधातला शेतकऱ्यांचाच्या हिताचा लढा दि. बा. यांनी लढवला. जासई येथील लढाईत पाच शेतकरी मारले गेले, शंभर जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबाराचा सामना करून शेतकऱ्यांनी ही लढाई जिंकली आणि सरकारकडून सिडको परिसरातील जमिनीचा जास्तीत जास्त भाव मिळवला.

रायगड आणि नवी मुंबईतील सामान्य आगरी जनतेबरोबर त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. दि. बा. पाटील पुढे शेतकरी कामगार पक्षातून बाहेर पडले आणि १६ ऑगस्ट १९९९ रोजी शिवसेना पक्षात आले. मात्र, नंतर ते सक्रिय राजकारणातून निवृत्त झाले.

१९५७ – शे.का.प. चे मध्यवर्ती चिटणीस शे.का.प. च्या अनेक पदांवर कामे केली.

• १९५७-१९६२,१९६२-१९६७,१९६७-१९७२,१९७२-१९७७,१९८०-१९८४ – असे पाच वेळा विधानसभेवर निवडून आले.

• १९६०- पहिले हायस्कूल जासई गावात सुरु केले.त्यानंतर १० माध्यमिक शाळा सुरु केल्या.

• १९६७ ते १९७२ -महाराष्ट्र राज्य शेतकरी सभेचे अध्यक्ष.

• १९७० – पनवेल वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय स्थापन केले.

• १९७० पासून आजपर्यंत सिडको संग्राम चालूच आहे. १९८४ चा सिडको लढा देशभर गाजला. प्रकल्पग्रस्तांना “साडेबारा टक्के" चा लाभ झाला. अजूनही जे.एन.पी.टी. चा लढा चालू आहे.

• १९७२-१९७७- विधानसभेचे पक्ष प्रतोद. अंदाज समिती,लेखा समिती, उपविधान समिती, आश्वासन समिती आदि. समित्यांवर लक्षवेधी काम केले.

• १९८२-८३- विधानसभेचे विरोधी पक्ष नेते.

• १९७४- पनवेल नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले.

• १९७५-च्या बेळगांव-कारावारसाठीच्या आंदोलनात ११ महिन्यांचा तुरुंगवास.

• १९७७-१९८४-खासदार म्हणून २ वेळा निवडून आले.

• १९९६ - महाराष्ट्र शासनाचा पहिला उत्कृष्ट वक्ता संसदीय पुरस्कार.

• “आगरी दर्पण” मासिकाचे नियमित प्रकाशन सुरु केले.

• म.फुले, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांचे आग्रही प्रचारक.

• आगरी कोळी कराडी अशा भुमीपुत्रांचे श्रध्दास्थान, मार्गदर्शक, लोकनेते. ह्या समाजातील अनिष्ट प्रथांबद्दल आवाज उठवून सुधारणेचा आग्रह त्यांनी धरला.

आदरणीय छ त्रपती शिवाजी महाराज चरित्र मराठी माणसाला माहीत आहे. आम्हाला चौथीच्या इतिहासात शिकायला होते

जे आरडी टा टा : मुंबई व भारतातील महत्वाचे उद्योजक व समाजकार्यातील अग्रणी. भारतातील एविएशन मध्ये त्यांचे योगदान महत्वाचे आहे. त्यांचे औद्योगिक वारस श्री रतन टाटा हे ही एक माणूस म्हणून मला फार आदरणीयच वाटतात. काय करू स्वभाव दोष असावा. टाटा मेमोरीअल हॉस्पिटल, टीसीएस सारखी कंपनी ह्या मुळे खरेच जिव्हाळा वाट्तो.

अशी नावे चर्चेत आहेत व त्यामा गे प्रत्येक गटाचे मर्यादित राज कारण आहे. आपल्या देशात इतक्या बहु भा षा आहेत् व त्यात कितीतरी सुरेख शब्द आहेत. त्यातील एखादा सुद्धा देता येइल नाव म्हणून पण ते होणे नाही. तुमचे मत काय आहे या बाबतीत.

हा एअर्पोर्ट नक्की कधी तयार होईल
आमच्या हयातीत झाला तर बरे. किती वर्शे पुणे मुंबई करताना तो बोर्ड च पाहिला आहे.

संदर्भः शे का प. वेब साइट.
मराठी विकी पिडी आ.

उरण कर ह्यांचा प्रतिसाद डकवते आहे
विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे कधीही कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून दिलेले लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? कोरोना कळतय राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून जे प्रकल्प अजून कशात काय नाही त्यांच्या नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. तिथे का नाव नाही दिले जात?
काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर आपण सर्वजण करतोच.
आपण फक्त आता एक पक्ष चालवत नसून लोकशाही असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा साहेबांनी विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देत आहेत. अंतिमतः आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे?
आणि इथे जे म्हणतात ना की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले?

प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहिलेच nri लोकांनी ,विदेशात राहणाऱ्या लोकांनी महाराष्ट्र मध्ये corona आणून राज्यातील लोकांचे जीवन धोक्यात आणले आहे.

इतकी सुचवलेली नावे पाहून ..... मी कशाला मागे राहू ? हात धुवून च घेते. तसाही धागा विनोदी झालाय तर मंडळी *टाटा याया* जाणाऱ्या लोकांना टाटा (जमशेदजी टाटा म्हणून पण) येणाऱ्या साठी याया आपलं स्वागत आहे

इतकी सुचवलेली नावे पाहून ..... मी कशाला मागे राहू ? हात धुवून च घेते. तसाही धागा विनोदी झालाय तर मंडळी *टाटा याया* जाणाऱ्या लोकांना टाटा (जमशेदजी टाटा म्हणून पण) येणाऱ्या साठी याया आपलं स्वागत आहे>> अहो तुम्ही तर लोकल आदिवासी लोकांच्यासाठी काम करता ना? मग दि बा पाटलां चे जिथे लोकल लोकांच्यात काम आहे तिथे इतका शाळकरी विनोद का करता? हा ह जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म मुंबई करांसाठी.

स्थानिक आदिवासीं साठी काम करणे म्हणजे एखाद्या जागेला स्थानिक आदिवासीचे नाव देण्यास पाठिंबा असलाच पाहिजे का? व्यक्तींचे नाव देऊ नये असे विचारही असू शकतात.

Jaja airport असं नाव द्या. जाणार्‍यांनी मराठीत 'जा जा' असे वाचावे, आणि येणार्‍यांनी स्पॅनिश उच्चारानुसार 'या या' असे वाचावे. सांस्कृतिक देवाणघेवाणीस मदत होईल. आमच्यासारख्या लोकांनी 'ह्याह्या' केले तरी चालेल.

स्थानिक आदिवासीं साठी काम करणे म्हणजे एखाद्या जागेला स्थानिक आदिवासीचे नाव देण्यास पाठिंबा असलाच पाहिजे का? व्यक्तींचे नाव देऊ नये असे विचारही असू शकतात.>> पाठिंबा नसेल पण लगेच जनतेची ही डिमांड विनोदी?

आमच्यासारख्या लोकांनी 'ह्याह्या' केले तरी चालेल.>> गणि त चुकलेले आहे.

नक्की कुठे आहे लोकेशन? प्रतिसाद उडत उडत वाचले, मजेशीर आहेत.

आपल्याला कोण विचारतोय म्हणा पण नवी मुंबई बेलापूर वाशी पनवेल जे जवळ असेल त्याचे नाव द्यावे. सोपे असावे, ते षॅट्रपटी खूप काॅमेडी वाटतं, भूतावळ नको, माणसाचे नाव नकोच (तसंही माझं नांव काही येणार नाही च)

ते षॅट्रपटी खूप काॅमेडी वाटतं>> विनोदी वाटायचे कारण काय..? परदेशी व्यक्तींना शुद्ध मराठी उच्चारण्यासाठी कसरत करावी लागते म्हणुन आपण ते विनोदी अंगाने घ्यायचं हे पटण्यासारखं नाही. ही अशा पद्धतीची अनाऊंसमेंट परदेशी व्यक्ती करत असेल तर ते विनोदी वाटून घेऊ नका... त्यांच्या मर्यादा समजुन घ्या आणि सोडून द्या. पण हो, जर अशी अनाऊन्समेंट मुद्दाम एखादा भारतीय्/अनिवासी भारतीय असलेला अनाजी करत असेल तर त्याचं मुस्काड फोडून हातात द्यायला कचरू नका...!

मग तर अख्खा प्रवास हाणामारीतच जाईल. प्रत्येक जातीचा माणुस स्वतःचा स्वाभिमान दाखवुन विमानातच हाणामार्‍या करेल. Proud

अफ्रिकन वंशाच्या लोकांना निग्रो किंवा निगर बोलणे कायद्याने ( परदेशात ) दखलपात्र गुन्हा आहे. तरी लोक असे बोलुन गोंधळ घालतात. पण अनिवासी किंवा कुठलाही भारतीय मुळात छत्रपती असे म्हणणारच नाही. महाराजच म्हणेल. वर अमितवने उदाहरण दिलेच आहे. तवा स्वाभिमान ठेवा पण दुराभिमान नको.

कुणाला काय म्हणायचं ते तो व्यवस्थित म्हणेल.. विमानात हाणामार्‍या करणार नाही कोणी पण परदेशी व्यक्तींना छत्रपति म्हणाता येत नसेल हे एक वेळ समजुन घेता येईल परंतु अनाजीच्या पणतुंखेरीज इतर कोणी छत्रपती या नावाला सडकं तोंड वेंगाडून विचित्र उद्गारणाअर नाही हेही तितकंच खरं.. अशांना दुर्लक्षून चालत नै वैनी... हो क्की नै..? नाहीतर सडकी बुद्धी कुठून कुठपर्यंत पोचते हे जेम्स लेन प्रकरणावरून सर्वांना कळाले आहे.

नाव वगैरे गोंधळात बेसिक सुरक्षितता , विमानतळ नियमावली ह्यांचा विसर पडू नये इतकंच मागण आहे.

षॅट्रपटी काॅमेडी वाटतं ते राजकारण किंवा दुसर्याच्या उच्चाराला हसावे म्हणून नव्हे.तर वेगळंच काहीतरी ऐकू येतं न नंतर समजतं अरे हो छत्रपती! आपणही परदेशी नांव उच्चारतो तेव्हा दमछाक होते की (मी तर बरेचदा टाळते अशी नांव घेणं). माझ्या नवर्याचं सोपे नाव व आडनाव लांब लचक असलेने पण परदेशी लोकांनी भलतंच काहीतरी लिहीले लं पाहिलंय (ई-मेल मध्ये) व ऐकलं सुद्धा आहे.त्यांना व मलाही राजकारण मध्ये काही रूची नाही, उगीच भावना दुखवून घेण्यात काही अर्थ नाही.

बाय द वे सिंधुदुर्गात चिपीला विमानतळ झाला की त्याचं नांव काय ठेवावं वर ॠन्मेष धागा काढणार आहे की काढून झालाय?

इतकी नावे सुचवली पण एकमत होईना. त्यामुळे आता अखिल भारतीय उपोषणपटू मा. अण्णाजी हजारे यांचे नाव या ठिकाणी सुचविण्यात येत आहे.

या विमानतळावर व इथून उडणा-या विमानात खाण्यापिण्याचे जिन्नस मिळणार नाहीत.

अरे चांगला विनोदी अंगाने चालला होता की धागा!
उगा धाग्याला कुलूप लागेल असे काही करु नका प्लीज Proud

मस्त टाईमपास होतोय

शांत माणुस , कल्पना भारी आहे. Proud

कितीही काथ्याकुट झाला तरी बहुतेक दोनच नावे निश्चीत होऊ शकतील.

१) दि बा पाटील ईंटरनॅशनल एअरपोर्ट

२) न्यु मुंबई ईंटरनॅशनल एअरपोर्ट

बाय द वे सिंधुदुर्गात चिपीला विमानतळ झाला की त्याचं नांव काय ठेवावं वर ॠन्मेष धागा काढणार आहे की काढून झालाय?
>>>>>
सध्या तरी चिपी विमानतळच म्हटले जातेय ना? नाव ठेवायचे आहे का त्यालाही?
तसे असल्यास मायबोलीवर धागा काढायच्या आधी गावच्या व्हॉटसप ग्रूपवर एक पोस्ट टाकायला हवी. कारण मी स्वतः सिंधुदुर्गचा आहे. आईवडिल दोघांकडून. आमच्यातच नाव ठरले तर कश्याला गावाबाहेर न्यायचे हे प्रकरण Happy

नाहीतर सडकी बुद्धी कुठून कुठपर्यंत पोचते हे जेम्स लेन प्रकरणावरून सर्वांना कळाले आहे.>> आणि ग्रेड लोकांचा "तमाशा" पण सुजाण लोकांनी बघितला आहे!

हाय्ला अजुन विकतायत amazon वर...
https://www.amazon.com/Shivaji-Hindu-King-Islamic-India/dp/0195141261

आदरणीय साने गुरुजी विमानतळ हे नाव द्यावे!


कैच्या काय लाॅजिक लावतो काय रे! या न्यायाने माझी आई वडील दोन्ही कडून ट्रेसेबल वंशावळ जिल्हा सिंधुदुर्ग असणार्या मला व माझ्या भावंडांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे नाही का?
अर्थात माझी भावंडे- विमानतळ झाला की कुणाचही नांव लावा आम्हाला काही फरक पडत नाही किती आंब्याच्या पेट्या व फणस नेता येतील याचा विचार करणारे-कॅटेगरीतले त्यामुळे तूच मान घे बाबा कमिटी त बसायचा
मी तर म्हणते नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाच्या कमिटी त सुद्धा तुलाच घ्ज्ञायला हवे , यासाठी वेगळं आंदोलन होऊन जाऊदे

@नावातकायआहे - जोपर्यंत अनाजीचे पणतू आहेत तोवर अमेझॉन वर सडक्या पिलावळीचा कावेबाजपणा खपला जाईल कारण खरेदी करणारे पणतू असतील.... एवढंच काय पणतुंना विखारीपणाचा पान्हा पाजणाऱ्या रेशिमबागी मातृसंस्थाच्या चोळ्या ज्या घटकांचुकी खेळताना वाड्यात सापडल्या त्या देखील खपत राहतीलच...

@ DJ साहेब! एवढा राग " प्रक्रुतीस " बरा नव्हे.
असो. काळजी घ्या!

आदरणीय साने गुरुजी विमानतळ हे नाव द्यावे असे माझे मत आहे!

ईथे तुम्हाला तुमचा स्वाभाविक राग " व्यक्त " करायला खूप जण भेटतील.

https://www.rss.org/pages/joinrss.aspx

सल्ल्या बद्दल आभार!

आदरणीय साने गुरुजी विमानतळ हे नाव द्यावे असे माझे मत आहे!

विखारी विचार प्रकृतीस घातक असतात>>> दुमत असायचे काहिच कारण नाही. परंतु आपल्या ह्या आणि इतर धाग्यातील प्रतिसादात तसे दिसत नाही हे खेदाने नमुद करावेसे वाटते.
आपण सुज्ञ आहात. आपणास अधिक काय सांगावे?

आदरणीय साने गुरुजी विमानतळ हे नाव द्यावे असे माझे मत आहे!

दी . बा. पाटील हे नाव अत्यंत योग्य आहे बाकी कोणाचेच नाव देण्याची गरज नाही.
आणि ते शक्य नाही झाले तर. ज्यांनी विमान उडवण्याचा प्रथम प्रयोग केला ते ग्रेट महाराष्ट्र चे great सुपुत्र शिवकर बापूजी तळपदे ह्यांचे नाव देणे योग्य ठरेल.
बाकी कोणत्याच परप्रांतीय लोकांचे नाव नको.
गांधी, कलाम,वाजपेयी कोणी नको.

सगळे अनाजिचे का समजता अमितव..? एवढा कॉम्प्लेक्स बरा नव्हे... बाजीप्रभूंचे पणतू व्हायचा प्रयत्न करून बघा... जमतंय का ते.

दि. बा. पाटील हे स्थानिक कार्यकर्ते व नेते

हे फायनल करा.
माझे नवी मुंबईत बरेच स्थानिक मित्र आहेत. त्यांच्या व्हॉटसप स्टेटसवर यांच्या नावाची मागणी बघतोय. जर स्थानिक रहिवाश्यांची मागणी असेल, आणि त्यांच्या भावना यात गुंतल्या असतील, तर ती मागणी पुर्ण झाली पाहिजे असे मला वाटते. आणि हा नियम सगळीकडेच लागू करावा. सगळे खुश राहतील. अन्यथा हे एकमेकांच्या आनंदात आणि सुखसमाधानात टांग घालायचे राजकारण चालूच राहील. जे लोकं कधी आयुष्यात विमान प्रवास करणार नसतील ते सुद्धा राजकारण्यांच्या भडकावण्यावरून एकमेकांची डोकी फोडून घेतील.

@नावात काय आहे ?
कृपया अर्जाचा हा नमुना इथे देऊ नये. जिथे आदर केला जात नाही तिथे आगाऊपणे फॉर्म पुरवण्याने टिंगल टवाळीच होईल याची कल्पना तुम्हाला असावी ही अपेक्षा. जे विरोधक आहेत त्यांच्याकडून अपेक्षाच नाहीत.

अमा ह्यांच्या धाग्याचा बाजार उठु नये म्हणुन आणि कुपमंडुकांना फाट्यावर मारण्यात आले आहे ह्याची जाहिर नोंद करुन सध्या थांबतो.

आदरणीय साने गुरुजी विमानतळ हे नाव द्यावे असे माझे मत आहे!

विमानतळ नामांतराचा वाद हा

विमानतळ नामांतराचा वाद हा राज्य सरकारने त्यातही एका विशिष्ट खात्याच्या मंत्री महोदयांनी स्वामी निष्ठा दाखवण्यासाठी जाणुनबुजून उकरून काढलेला वाद आहे. 6 महिन्यांपूर्वी इथे कधीही कोणतेही वाद नव्हते. पण, कोरोणा काळात जनतेच्या मागण्या तसेच 2008 सालापासून दिलेले लेखी प्रस्तावावर कोणतीही कार्यवाही न करता सरकारने सिडकोकडून अन्य नावाचा प्रस्ताव पारित करून घेतला आणि घाईघाईने राज्य कॅबिनेट मधून हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला. जो प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास अजून 4 वर्षाचा कालावधी बाकी आहे तिथे नामांतराचा घाट का घातला गेला? कोरोना कळतय राज्य सरकारला जनतेच्या हिताची कामे सोडून जे प्रकल्प अजून कशात काय नाही त्यांच्या नामांतर प्रक्रियेत रस का आहे? सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ पुर्ण स्थितीत आहे. तिथे का नाव नाही दिले जात?
काही ठिकाणी बोलले जात आहे की, हा प्रकल्प मुंबई विमानतळाचा extension असेल. पण, ज्या रीतीने राज्य सरकार उतावीळ होऊन नामकरण करत आहे त्या अर्थी इथे नवीन कोड लागणार आहे हे सध्यातरी स्पष्ट आहे. आणि जर extension असेल आणि मुंबई विमानतळासारखाच कोड असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा आदर आपण सर्वजण करतोच.
आपण फक्त आता एक पक्ष चालवत नसून लोकशाही असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या उच्चस्थानी आहोत याचा साहेबांनी विचार करणे आवश्यक आहे. सल्लागार स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी चूकीचे सल्ले देत आहेत. अंतिमतः आयुष्यभर जो समाज आपल्या सोबत राहिला त्याला अडचणीत आणून नक्की काय साध्य होणार आहे?
आणि इथे जे म्हणतात ना की हे नाव द्या, ते नाव द्या... त्यांच्यापैकी किती जणांची जमीन कोणत्याही प्रकल्पासाठी गेलेली आहे? प्रशासनाने दबाव टाकून, पावसाळ्यात पाणी तुंबवून, अनियंत्रित ब्लास्ट करून दगड राहत्या घरावर उडवून लोकांना राहती घरे सोडण्यास भाग पाडले?
प्रश्न फक्त नावाचा नाही, भविष्यातील अस्तित्वाचा आहे. स्वतःच अस्तित्व वाढवताना दुसऱ्याचे अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न कृपया कधीही करू नका ही मनापासून विनंती.

उरणकर, तुम्ही छान पोस्ट लिहिली आहे. अनेकांना हा इतिहास माहित नसावा (मलाही). जेएनपीटी झालं तेव्हा नक्की काय झालेलं? तेव्हा दि. बा. पाटलांनी काय काय केलेलं की ज्यामुळे स्थानिकांना जिव्हाळा/ प्रेम आहे. आणि कशामुळे त्यांचे नाव कायम होण्याची गरज आहे हे सविस्तर शक्यतो वेगळा धागा काढून लिहिलंत तर लोकांपर्यंत पोहोचेल. मला वाटतं तुम्ही लिहिताय तशा पोटतिडिकीने सविस्तर लिहिलेत तर अनेकांना हा मुद्दा पटेल.

वर फाटेफोडायला आणि वाद वाढवायला मंडळी गोंधळ घालत आहेत. तुम्ही मुद्देसुद लिहा. मला वाटतं तुम्हाला पाठिंबा मिळेल. सामान्य माणसाला या नेहेमीच्या नावांचा उबग आलेला आहे. सगळीकडे राजिव गांधी, इंदिरा गांधी, ठाकरे नाहीतर मग एकदम शिवाजी महाराज, शाहू महाराज, टिळक, सावरकर, पटेल असा पुराण काळ.
गेल्या चाळीस पन्नास वर्षातील हाडाच्या कार्यकर्त्याचं, स्थानिक नाव असेल तर मला तरी आवडेलच.

अमितव +७८६

माझीही लास्ट पोस्ट ऑन ए सिरीअस नोट होती. ज्या दोघांच्या व्हॉटसप स्टेटटसवर मी दि.बा. पाटील यांचे नाव पाहिले ते स्थानिक आपली जमीन गमावलेलेच होते.

सविस्तर माहीतीचा वेगळा धागा काढायला हरकत नाही. भले तिथे प्रतिसादात गोंधळ होऊ दे. धाग्याच्या हेडरमधील माहिती धक्का न पोहोचता संकलित राहते आणि सर्वांच्या वाचनात येते.

जिल्हा स्तरावर भूमिपुत्रांकरता लढा दिला हा क्रायटेरिया ठरत असेल तर मेधा पाटकर यांना देखील आशा आहे.

मंडळी, एक लक्षात घ्या, हा आंतरराष्ट्रिय विमानतळ आहे, तोहि मुंबईसारख्या महानगराचा. हाच एखादा रिजनल/काउंटि एयरपोर्ट असता तर गोष्ट वेगळी होती. यात दिबा पाटिल यांच्या कार्याचा प्रश्नंच उद्भवत नाहि. सिडकोने बाळासाहेबांचं नांव मधे आणुन सनसनाटि वातावरण निर्माण केलेलं आहे. या गोंधळात राज ठाकरेंचा प्रस्ताव सगळ्यांची तोंडं बंद करणारा आहे. महाराजांच्या नांवाला बगल देणं हि कृती कदाचित राजकिय आत्महत्या किंवा महाराजांच्याच भाषेत टकमक टोकावरुन कडेलोट करणारी असेल...

आणि यात भूमिपुत्रांचा मुद्दा कुठुन आला? उद्या बुलेट ट्रेन गिरणगांवातुन गेली तर तिथल्या टर्मिनसला दत्ता सामंतांचं नांव देणार काय?..

^^^
लिव्हरपोल इथल्या आंतरराष्ट्रीय विमनातळाला जॉन लेननचं नाव दिलं आहे. इंडोनेशियात पडंग इथल्या विमानतळाला स्थानिक जमातीचे नाव मिनँग्कबाऊ दिलेले आहे. स्थानिक व्यक्तीचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देऊ नये असे आंतरराष्ट्रीय मानक नसावेत बहुधा.

राज तुमचे म्हणणे संयुक्तीक असले तरी इथे मुंबईत खूप वाद पेटलाय. दि बा पाटील यांचे समर्थक हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरलेत. कारण शिवसेनेच्या भूमिकेला त्यांचा विरोध आहे.

हा ह जिव्हाळ्याचा प्रश्न आहे म मुंबई करांसाठी>> रिअली? सामान्य मुंबईकरांना ह्या असल्या फालतू गोष्टीत रस आहे? राजकीय कार्यकर्ते आणि नेते सोडून.

रिअली? सामान्य मुंबईकरांना ह्या असल्या फालतू गोष्टीत रस आहे? राजकीय कार्यकर्ते आणि नेते सोडून.
>>>>>
बिलकुल नाही
तुमच्या डोक्यात भरवल्याशिवाय तुम्हाला कुठल्या वास्तूला कोणाचे नाव देताहेत, कोणाचे कुठे स्मारक बांधताहेत वा मंदिर बांधताहेत, वगैरे गोष्टींमध्ये जराही रस नसतो ज्याने आपल्या दैनंदिन जीवनावर शून्य फरक पडणार असतो.

Pages