Calendar spread कॅलेंडर स्प्रेड आणि इतर ऑप्शन स्ट्रॅटेजीज

Submitted by BLACKCAT on 15 May, 2021 - 10:54

अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

ह्या मे पहिल्या आठवड्यात निफ्टी 14500 असताना डबल कॅलेंडर स्प्रेड केले.
14500 मे कॉल व पुट सेल केले
14500 जून कॉल व पुट बाय केले.

नुसतेच कॉल किंवा नुसतेच पुट जोडी केली की त्याला सिंगल स्प्रेड म्हणतात , दोन्हीपण एकदम केले की त्याला डबल स्प्रेड म्हणतात.

चौघेही एकमेकांना हेज करतात, सुरुवातीला कधी 200 मायनस , कधी 800 प्लस असे होत रहाते , 2100 मायनसपण झाले होते , पण हट्टाने सुरूच ठेवले , कारण ऑप्शन झिजायला म्हणजे क्षय व्हायला वेळ लागतो .

15 दिवस गेले की करंट मंथचे ऑप्शन्स झिजू लागतात व हळूहळू प्रॉफिट दिसू लागते .

अंत उन्नतीचा पतनी होई या जगात
दिसे भासते ते ते सारे विश्व नाशवंत
वर्धमान ते ते चाले मार्ग रे क्षयाचा

आता अजून 4,6 दिवसात प्रॉफिट 8 ते 10 हजार जाईल , ह्या सगळ्या झिजाझीजित निफ्टी 100 ते 120 पॉईंट आरामात मिळून जातात.

ऑप्शन ट्रेडिंगमध्ये सामान्य माणसाला 2 राक्षस छळत असतात

ऑप्शन बाय केले की तो कमी कमी होतो व झिजतो , ह्याला भस्मासुर राक्षस म्हणतात.

ऑप्शन शॉर्ट सेल केले की तो कमी न होता वाढत जातो व आपल्या अंगावर पडतो , ह्याला घटोत्कच राक्षस म्हणतात.

हेज केले की दोघे एकमेकांत भांडत बसतात. Proud आपण 15 दिवस गप्प बसून रहाणे.

1. पोझिशन महिन्याच्या सुरुवातीला घ्यावी, निफ्टी स्पॉटच्या जवळचे ऑप्शन निवडावेत.
2. करंट मंथ कॉल पुट सेल करणे
3. नेक्स्ट मंथ कॉल पुट बाय करणे
4. पोझिशन घेताना आधी बाय करणे , मग सेलच्या पोझिशन घेणे , चारही पोझिशन घेताना सुमारे एक लाख मार्जिन लागते.
5. पण नंतर पोझिशन हेज झाल्याने साधारण 60,000 इतकेच मार्जिन लागते व उर्वरित मार्जिन दुसऱ्या दिवशी मोकळे होते.
6. हळूहळू जवळचे ऑप्शन झिजतात व लांबचे जास्त झिजत नाहीत, पण ही झीज सुमारे 15 दिवसानंतर दिसू लागते. तोवर रोजचे प्रॉफिट लॉस बघत बसणे. ते फारसे नसते , +2500 ते -2500 वगैरे होत रहाते.
7. वीस ते पंचवीस तारखेत शक्यतो प्रॉफिट बुक करावे, निफ्टीचे 100 ते 150 पॉईंट आरामात मिळतात.
8. सगळ्या पोझिशन एकदम स्क्वेअर ऑफ कराव्यात. आधी सेल पोझिशन क्लिअर कराव्यात , मग बाय केलेल्या पोझिशन काढाव्यात. म्हणजे दंड लागत नाही. तसेही सगळे एकदम काढणारच असल्याने दंड बसणारच नाही.
9. असे स्टोकमध्येही करता येईल , मला sbi बरे वाटले , पण कधी केले नाही,
10. बँक निफ्टीतही करता येईल, पण मला अभ्यास नाही.
11. लोक असेच दोन विकली , दोन 15 दिवसवाले , अशाही जोड्या करून स्प्रेड करतात, पण ते फारच धावपळीचे होते.
12. थोडे प्रॉफिट मिळाले 2,4 हजार की पोझिशन मोडून नवीन निफ्टी लेव्हलची पोझिशन घेणे , असेही ट्रेडिंग 2,4 दा करता येईल. पण मी कधी केले नाही.
13. ह्यात फंडामेंटल , टेक्निकल काहीही ज्ञान लागत नाही.
14. यु ट्यूबवर ह्यावर भरपूर व्हिडीओ आहेत.
Screenshot_2021-05-14-20-14-11-444_com.android.chrome.png

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निफ्टी २४ जून १६२५० कॉल्स विकले आणि १७ जून १६४५० विकत घेतले. असे चार सेट्स >>>

आज सकाळीच या ट्रेडमध्ये ६०% च्या वर प्रॉफिट मिळत होते. अजून आठवडाभर थांबण्यात अर्थ नव्हता. 2850 प्रॉफिट बूक केले. पुढच्या आठवड्याच्या एक्सपायरी साठी आज दुपारी ३ नंतर किंवा उद्या पोझिशन्स घेईन.

छान

पावसाळा स्पेशल

पावसात मंदी येणारे सेकटर खालीलप्रमाणे
खाण काम - खाणीत पाणी जाते , धंदा बंद
गाडी - लोक कमी गाड्या घेतात , विक्री कमी होते , गाडीवाल्या कंपनीच्या ग्राफमध्ये जानेवारीत मोठी हिरवी दांडकी दिसतील, दसरा दिवाळीत जास्त विक्री झाल्याने ह्या मोठ्या हिरव्या कँडल दिसतात , मंथली ग्राफ पहा
सिमेंट सेकटर

ह्यांचे लांबचे कॉल विकले तर ते शून्य होतील , जून जुलै ऑगस्ट.

कालचा रिलायन्स 2500 चा कॉल 5.55 वरून 4.25 झाला.

जुलै 2680 चा कॉल 10 रु आहे , मार्जिन 60 हजार

छान माहिती.
मी अशोक लिलँड 140 विकुन 150 विकत घ्यायचा विचार करत होतो काल (म्हणजे आज पोझिशन घेणार होतो.) काल 140 1 ला आणि 250 0.5 ला होता. (1 - 0.5) x 4500 (lot size) = 2250 पोटंशीअल होते, 63000 मार्जिनला.
पण आज सकाळीच तो आपटला.

मी विचार करतोय की इंडिव्हिज्युअल स्टॉक पटकन 10 - 15% वाढू शकतो. एकट्या त्या स्टॉकच्या बातमीवर.
इंडेक्सची अशी शक्यता कमी असते. इंडेक्स मधील काही वाढले, काही कमी झाले असे होते बहुत करून. इंडेक्स एवढा वाढयला पूर्ण मार्केटची पॉझिटिव्ह बातमी हवी.

तेव्हा इंडिव्हीज्यूअल स्टॉकचे कॉल विकावे की नाही अजून विचार करतोय. लिक्विड 15 मधले अनेक स्टॉक पहात आहे, पण अजून ठरवले नाही.

तुम्ही केलेत त्यालाही calendar spread with diagonal spread म्हणतात

मी असेच ऑगस्ट निफ्टी स्ट्रेडल विकायचे आणि विकलेला प्रीमियम खाली वर वजा बेरीज करून तितके जुलै चे ऑप्शन बाय करायचे असे करणार होतो

पण इथे जुलैचे ऑप्शन फक्त हेज करणे व मार्जिन कमी करणे यासाठी आहेत, स्टोप्लॉस लावावा लागेल, असे वाटते

तसं पाहिलं तर टेक्निकली कॅलेंडर स्प्रेड आहे.
पण यात विकत घेतलेले कॉलस् एवढे लांबचे आहेत की त्यांचा ट्रेड मध्ये प्रॉफिट देण्यास काही उपयोग नाही, की लॉस कमी होत नाही, स्टॉपलॉस ठेवावाच लागतो.
नुसते १ जुलैचे कॉल्स विकले असते तर पाच लाख कॅपिटल लागले असते. किंबहुना असे म्हणता येईल की मी ठेवलेल्या १.८ लाख कॅपिटल मध्ये फक्त एकच कॉल विकता आला असता, 15.4 ला विकला म्हणजे 1155 मिळाले असते.
त्या जोडीला तो लांबचा कॉल 3 ला विकत घेतल्याने प्रॉफिट 225 ने कमी म्हणजे 930 होणार. पण कॅपिटल 40 हजारच लागते. त्यामुळे चार कॉल्स विकता येतात, आणि 3720 प्रॉफिट मिळते.

तसा तर 1 जुलैचा कॉलच विकत घ्यायला पाहिजे. (बिअर कॉल स्प्रेड होतो). पण त्याची किंमत जास्त असते प्रॉफिट अजून कमी होते. १ जुलैचा 3 रुपये एवढा कॉल घेतो म्हटलं तर तो एवढा लांबचा होतो की मार्जिन 55-60 हजार होते आणि तीनच कॉल्स विकता येतात. म्हणुन जवळच्या एक्सपायरीचा घेतो. आणि २४ जूनला प्रॉफिट मिळत नसेल पोझिशन 1 जुलै पर्यन्त ठेवायची असेल तर २४ जून ला, २४ जून एक्सपायरीचे कॉल्स विकून १ जुलै एक्सपायरीचे घ्यायचे. तो पर्यंत तेवढ्या लांबचे कॉल्स 3 च्या आसपास मिळतील. जुने कॉल्स 1 च्या आसपास विकले जातात. म्हणजे प्रॉफिट 150 x 4 = 600 ने कमी होते, तरी 3120 मिळते.
पण बहुत करून एक आठवड्यातच अशी मूव्ह येते की प्रॉफिट बूक करून बाहेर पडता येते.

खेला होबे
रिलायन्स कॉल 5.65 वरून 2 रु झाला

ब्यांक निफ्टी विक वाटला, 34500 होता , म्हणून 36000 चा कॉल 47 ला विकला , हेज करायला 37000 चा 17 रु ला बाय केला

झिरोदाने इन्कार किया , म्हणून अक्सिस मध्ये केले
आता दोन्ही झिजले आहेत
ब्यांक निफ्टी 34000 ला आला
मार्जिन फक्त 21000 अडकले आहे ,

आधी विकुन मग हेज वाला विकत घेता येतो झिरोदा मध्ये.
पण मग आधी फुल मार्जिन लागते आणि मग हेज वाला विकत घेतला की मोकळे होते.

दोन्हीची बास्केट ऑर्डर करूनही फायदा नाही.

----
मी 1 जुलैच्या 16300 मध्ये 1200 प्रॉफिट बूक करून, त्याच्या जागी 16200 विकले.

कॉल्स विकणारे कॉलभरती आणि पुट्स विकणारे पुट्टपार्थी.
आता आपण कॉलभारती आहोत. मार्केट दणकून आपटून खालच्या लेव्हलला स्थिर झाले की कॉल विकणे रिस्की होते. मार्केट अजून पडणार नाही आणि रिकव्हर होणार अशी परिस्थिती आली की आपण पुट्टपार्थी व्हायचे.

मी मोबाईल ऍप नाही वापरत, मोबाईलवरूनही ब्राऊजर ने लॉगिन होतो, सर्व आहे, ऍपची गरज नाही.

मी मोबाईल ऍप नाही वापरत, मोबाईलवरूनही ब्राऊजर ने लॉगिन होतो, सर्व आहे, ऍपची गरज नाही.

मी मोबाईल ऍप नाही वापरत, मोबाईलवरूनही ब्राऊजर ने लॉगिन होतो, सर्व आहे, ऍपची गरज नाही.

Ok

निफ्टी सी सॉ खेळतेय.
आज सकाळीच अजून 1250 प्रॉफिट निघत होते.
निफ्टी २४ जूनला १५७५०-८०० ला गेला तर एवढे किंवा कमी प्रॉफिट मिळाले असते, म्हणुन सकाळीच प्रॉफिट बूक करून एक्झिट केले. ऑर्डर एक्झिक्युट होईस्तो प्रॉफिट १,००० वर बूक झाले. एकूण प्रॉफिट 2200 या ट्रेडचे.

चांगले आहे

रिलायन्स 2500 कॉल दीड रुपाया झाला

3 दिवसात मार्केट 9 % वाढणार नाही
म्हणून रिलायन्स 2380 चा कॉल 5 रु त विकला , स्पॉट 2220
तो पण लगेच खाली आला

मी रिलायन्सचे २५०० CE विकले तीन.
गुरुवार पर्यंत ठेवून पहायचे आहेत square off न करता एक्सपायर होऊ देऊन. मार्जिन शुक्रवारी रिलीज होईल.
अर्थात ITM नाही गेले तर. ITM जात असतील तर square off करावेच लागतील. नाहीतर compulsory physical डिलिव्हरी नियम आहे.

Reliance 11 rs वाढला , स्पॉट 2237
पण कॉल कमी झालेत , 5 , 10 पैशाने कमी

हो, आता एक्सपायरीच्या शेवटी शेवटी ऑप्शन मधील टाईम व्हॅल्यूला चांगलाच उतार लागतो.
मला खरं तर अशोक लिलँडचे कॉल्स विकायचे होते, पण २४ जूनला त्यांचे अर्निंग डिक्लेअर होणार आहे. तेव्हा २४ जूनला जरा तिथे उलथापालथ होऊ शकते म्हणुन टाळला.

अशोक लिलँडला मार्जिन जास्त आहे. हेज करावे लागते.
अप्पर सर्किट 128 त्याच्या जस्ट वरचा 130, तो 0.25 ला होता. त्याच्याही वरचा 132.5 चा 0.15 ला आणि हेज करायला 0.1. मग त्यात अर्थ नव्हता, 130 CE च विकायला हवा.
दोन दिवसात स्पॉट 2.1 नी वाढला की गुरुवारचे अप्पर सर्किट 130 च्या वर जाणार.

अक्सिसने मजाच केली

तिथे ऑर्डर दिली की काही लवकर कळतच नाही, काय झाले ते, माझे ब्यांक निफ्टी कॉल 2 बाय झाले होते, दोनदा प्रेस झाल्याने, आणि सेल 1 च झाला होता, हे दोन दिवसांनी , आज लक्षात आले , त्यामुळे सरळ 350 रु प्रॉफिट मिळवून बाहेर पडलो , अपेक्षित प्रॉफिट 800-1000 होते, ब्रोकरेज कमी आहे, त्यामुळे काहीतरी पदरात पडेलच

रिलायन्स 2500 चा कॉल 5.55 ला शॉर्ट केला होता, 1.40 ला ला कव्हर केला .

1000 रु प्लस

रिलायन्स खाली जात आहे
म्हणून 2320 चा 8 रु ला शॉर्ट केला
सोबत 2500 चा 1.40 ला बाय करून हेज केला

2320 जरा अग्रेसिव्ह झाला.
ओपन इंटरेस्ट डेटा पाहिला की बरेच लोक असे करतात असे दिसते, 2300 चे कॉल्स विकून. पण स्टॉक जसा वर येतो तसे ते एक्सपायरीच्या दीड दोन तास आधी पर्यन्त 2300 विकत घेऊन 2320 विका, 2340 विका असे करताना दिसतात.
कसे काय परवडते माहीत नाही. ते बहुतेक अल्गो ट्रेंडिंग असावे.

हो

पण आज रिलायन्स आधी 10-15 वाढला आणि मग कमी झाला , शेवटी तर लालच झाला. म्हणून रिस्क घेतली. हेज केल्याने मार्जिन फक्त 60 हजार लागले.

डेली चार्टवर वोल्युमपण फार कमी झाला आहे , म्हणून जास्त वाढणार नाही असे वाटते

IMG_20210622_173114.jpg

Volume support नसेल तर तेजी किंवा मंदी टिकत नाही म्हणे

वोल्युम बार रेड ग्रीन का असतात ? व्हॉलूम तर नुसताच आकडा असतो ना ?

गुगलवर दिसले

Volume Bars are the familiar red and green bars. A green bar indicates that the closing price is higher than the close of the previous bar while a red bar indicates that the closing price is lower than the previous close.

Pages