पाऊस पडतोय

Submitted by चिन्नु on 16 June, 2021 - 07:50

पाऊस

पाऊस पडतोय
झिरपतोय हळूहळू
रांगत येईल हळूच वाणसामानात
तिथून मग उद्याच्या विवंचनेतही..

पाऊस पडतोय
ओल्या भिंतीवर
चिंब भिजलेल्या आठवणी
हिरव्या होतील पुन्हा..

पाऊस पडतोय
घामात मिसळतोय
रक्तात भिनतोय
स्वेदफुलांना सुगंध येईल आता मातीचा..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई. व Amupari, धन्यवाद!
आडवा तिडवा पडणार्या पावसाचा फोटो पण आडवा अपलोड झाला Happy